रेषा
पुसता आली जर आपल्यातील मतभेदांची रेषा
अन् मिटवता आलं जर वाढत्या वयातील अंतर
दोस्तहो खरच काय धमाल वेळ आला असता?
लुटलाच असता पून्हा जवानीचा तारूण्य बहर
बसलो असतो तुमच्याच थव्यात मैत्रीणी सोबत
अन् आणली असती जीवनाला वेगळीच रंगत
गेलो असतो मोहरून तिच्या हळुवार स्पर्शांनी
अनुभवली असती नव्या पिढीची प्रेम कहाणी
खाल्ली असती भेळ एकमेकांच्या मुखी भरवत
दाखवली असती तिला अशाच प्रेमिकांची गंमत
धावलो असतो दोघेही भरतीच्या समुद्र लाटात
प्रेमाच्या गप्पा रंगल्या असता घेऊन हात हातात
स्वत:चा माल, म्हणुन मस्त मारली असती मिठी
तरुणपणी प्रत्येक कृतीत असतेच भन्नाट गती
व्हाट्सअप,चॅट करत मस्त मारल्या असत्ता गप्पा
मित्रात कशी पटवली, सांगायला मारल्या असत्या थापा
फिरलो असतो भ्रमर बनुनी नव्या संकेताच्या शोधात
निळ्या आभाळाखाली एकांती घेतला असता हात हातात
दाखवला असता पोर्णिमेचा चंद्र तिच्याच मांडीवर पडुन
अन् दिलं असतं तीच्या ओंजळीत सुख भर भरून
वाटला असता अशा वेड्या प्रेमविराचा तिलाही हेवा
आणि लाडीकपणे म्हणाली असती मला नवरा तुच हवा
छान.
Thanks for complement
Chanach kavita sir.
Thanks Bhosale
रोमँटिक कविता पण आता सर्व कल्पनेतच राहू दयात