वाहिन्यांवरील चर्चा आणि त्याचे पडसाद
चर्चा आणि वाद ह्यात अंतर असाव कि नसाव,आपला विचार मांडतांना प्रक्षोभक भाषा वापरण टाळणे शक्य नाहीच का ? ह्या चर्चेचा वापर वाहिन्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी करतांना नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे कि नाही? एखाद्या गावात घडलेल्या घटनेच दृष्य वारंवार दाखवून तो प्रश्न चिघळवण किंवा त्या प्रश्नाला राजकीय स्वरूप देण हे वाहिन्यांच काम योग्य आहे का? वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या चर्चेच स्वरूप पाहिलं तर त्यात सामाजिक प्रश्न सोडवण्याची तळमळ कमी आणि प्रपोगंडा जास्त अस सर्रास दिसत. चर्चा म्हणजे शाब्दिक हल्ला करण्याचा आखाडा असा ग्रह चर्चेत भाग घेणाऱ्या नेत्यांचा झाला असल्यास नवल नाही याचे कारण मुलाखत घेणारा निवेदक किंवा निवेदिका त्या प्रश्नाच्या मुळा पर्यंत जातांना त्याचा संबंध जाणीव पूर्वक पक्षाशी जोडतात आणि मुलाखतीसाठी बोलावलेल्या नेत्यांना किवा समाजसेवकाला एकमेकांबरोबर भिडवून देतात.आपण जाहीर कार्यक्रमात बोलत आहोत ह्याच भान मग मुलाखत देणाऱ्या नेत्याला उरत नाही,आणि आपल्या पोतडीत किती प्रकारचे बाण नव्हे क्षेपणास्त्र आहेत ते नेते प्रेक्षकांना दाखवुन देतात त्यांनी त्यांचेच हसे होते.
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला मी यांना किती अडचणीत टाकू शकले ह्याचा वृथा अभिमान वाटू लागतो.त्यांच्या चर्चेन खरच सामाजिक प्रश्नाची कोंडी फुटली त्यावर काही तरी ठोस उत्तर निघाल तर वाहिन्याचे आभार मानावयास हरकत नाही, पण केवळ चर्चेचा आखाडा भरवून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा निंदनीय प्रकार थांबला पाहिजे.महाचर्चा नावाखाली आताशा काही खपत. मोदींनी परदेशी दौरे करावे कि नाही ! एका महिन्यात किती दौरे करावे हा चर्चेचा विषय कसा असू शकतो? पण वाहिनीवर काही तरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी विषय हवा असतो आणि वाहिन्यांचे चाकर, मोदींनी किती दौरे केले,किती वेळा कोट बदलले,कोणत्या हॉटेल मध्ये त्यांनी काय नाष्टा केला ह्याचा विश्लेषण अहवाल सादर करून त्या प्रश्नांना फोडणी देण्याच काम इमानीपणे करत असतात. महाराष्ट्रात कमी पावसानी दुष्काळी स्थिती आहे हे सत्य पण हे पाप कोणत्या पक्षाच ह्याची चर्चा रंगवण्यात काय हशील? त्यापेक्षा सरकारी पक्षाने आणि विरोधी बाकावरील सन्माननीय सदस्यांनी एकत्रितपणे कृती आराखडा तयार करून तो वेगानी कसा राबवता येईल ह्या साठी काम करणे गरजेचे आहे.किती बंधारे बांधले आणि किती बंधाऱ्यात भ्रष्टाचार झाला ह्याच मोजमाप करीत बसण्यापेक्षा फुटलेले बंधारे प्रशासन यंत्रणा राबवून तातडीने दुरुस्त करण्यासाठी कंबर कसली तर जनता जागरुक नेत्यांना दुवा देईल.फुटलेल्या बंधाऱ्याच निरिक्षण करून काही तरी शासन विरोधी मत व्यक्त करण्यापेक्षा आणि वाहिन्यांना बीट देण्यापेक्षा स्वतःच्या पातळीवर त्वरेने कृती करण्या एव्हढी धम्मक आणि आर्थिक कुवत महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याकडे आहे.प्रत्येक नेत्यांनी आप- आपल्या भागात लोकांच्या सहभागातून आणि स्वतःचा नव्हे तर शासनांनी आमदार म्हणून समाज कार्यासाठी दिलेला निधी वापरला तरी दुष्काळ कायमचा दूर होईल.पण कोणत्याही नेत्याला दुष्काळ कायम स्वरूपी दूर करण्याची इच्छा नाही कारण जनतेचे प्रश्नच संपले किंवा सुटले तर ह्यांची मतपेटी सुरक्षित कशी राहील?म्हणूनच चर्चेच आणि महाचर्चेच गुऱ्हाळ चालू ठेवण्यात सगळ्याच पक्षाना रस आहे. कोणताही पक्ष निव्वळ समाजकारण करण्यासाठी स्थापन झालेला नाही.केवळ म्हणताना दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण म्हणायचं हे ह्याचं ढोंगी तत्व.
सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात राहावं आणि आपला अंकुश आपल्या कार्यक्षेत्रात राहावा आपल्याला सामान्य जनतेन चारदा सलाम करावा ह्या अपेक्षेन नेत्याच सोंग घेतलेली मंडळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात.समाजाचं दुर्दैव हे कि ज्या वर्तमान पत्रांनी आणि वाहिन्यांनी समाजाचे प्रश्न समतोल भूमिकेतून मांडावेत तीच कोणत्य तरी पक्षाच्या दावणीला बांधली जातात आणि निष्फळ चर्चा महाचर्चा घडवून जनतेत तेढ वाढवतात.प्रश्न सोडवण्या ऐवजी नवे सामाजिक आणि भावनिक प्रश्न निर्माण करतात. रोज चर्चेत वेळ फुकट घालवण्यापेक्षा या वाहिन्यांनी एखाद्या दिवशी एखाद्या प्रश्नाला भिडण्यासाठी समाजाला आव्हान केलं आणि त्यासाठी आवश्यक ती यंत्र सामुगी पुरवली तर एका वाडीचा,एका खेड्याचा,एका तालुक्याचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल.तुम्हाला काय वाटतंय? तुमचा रोख कोणाकडे आहे? शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? सरकारचं काय चुकल अस तुम्हाला वाटत? असल्या वांझोट्या चर्चेन पश्न संपणार नाहीत आणि सुटणार नाहीत,नेते बीट देत राहतील फोटो येत राहतील लोकांची स्थिती जैसेथे राहील.
जर चर्चेने मानसिकता बदलवता येत असेल आणि त्या साठी आधी केले मग सांगितले ही वृत्ती नेत्यात असेल आणि निवेदाकात असेल तरच त्याच अनुकरण होईल अन्यथा चर्चेच गुऱ्हाळ सुरु राहील सामन्याची फरफट सुरु राही नेते मात्र अलिशान गाडीत बसून चर्चेसाठी येतील एसी हॉल मध्ये चर्चा रंगेल आणि त्याच चित्रीकरण पाहून आपल्या नेत्याची लायकी घरबसल्या समाजाला कळेल. निवडणुकीचा हंगाम आला कि चर्चेला ऊत आणायचा आणि समाजाची दिशाभूल करायची हा या पोटभरू लोकांचा धंदा झाला आहे. या चर्चेतून सत्य बाहेर आल आणि त्या प्रश्नांची तड लागली अस झाल्याच क्वचितच आढळत.वाहिनी ताब्यात आहे आणि वाहिन्यावर चामाकीशागिरी करायला मिळणार म्हणुन महाचर्चा भरवायची आणि आणि दहा वेळा कमर्शियल ब्रेक घेत जाहिरातीचे पैसे कमवायचे हा पोटभरू धंदा जनतेला कळल्या शिवाय राहील का? पुरे झाल्या तुमच्या चर्चा, त्या ऐवजी नानाच्या “नाम” सारख काही केलत तर जनता स्वतःहून आपल्या भाऊ बंधांच्या मदतीसाठी जरूर उभी राहील. वाहिन्यांनी जनतेला भुलवून चिक्कार नोटा छापल्या आता त्यांच्या मालकांनी स्वतःहून मदतीसाठी पुढे झाले पाहिजे तरच आधी केले मग सांगितले याला काही अर्थ उरेल !
Undeniably consider that which you stated. Your favourite reason appeared to
be on the internet the easiest factor to be aware of.
I say to you, I definitely get irked whilst people consider issues that they just
don’t recognise about. You controlled to hit the nail upon the highest as neatly as outlined out the entire thing without having side effect , other folks could take
a signal. Will probably be again to get more. Thanks