सफर कोकणची, निसर्गाच्या जादुई नगरीची
तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी.. कोणती म्हण कुठे लागू होईल काही सांगता येणार नाही. वस्तू असावी एका ठिकाणी आणि आपण उगाचच नको तीथ शोध घ्यावा अशा अर्थांनी आपण अनेकदा अनेक म्हणी वापरतो.
काय गंमत आहे नाही, “मामाकी ऐनक” आपण ऐकलं असेल तशीच आपली गत आहे. आपण मुंबईकर सुट्टीत किंवा विकेंडला जाण्यासाठी खुप दूरचे पर्याय निवडतो त्यासाठी प्रचंड नियोजन, मोठ्या ब्रांडचे टुरीस्ट अॅरेंजर, अॅव्हान्स बुकिंग, पासपोर्ट,व्हिसा, करंन्सी ट्रांसफर ,विशिष्ट रोगावरील प्रतिबंध लस इंजेक्शन ,मेडिकल क्लिअरन्स , एक ना दोन एवढे सगळे उपद्व्याप कशासाठी तर वाळूवर पडून राहण्यासाठी, तेथील स्पा आणि हेल्थ मसाज घेण्यासाठी किंवा वॉटर गेमचा थरार अनुभवण्यासाठी.बॅक वॉटर किंवा वॉटर स्पोर्ट राईडसाठी आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी.
जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येथेच अनुभवता आल्या तर!
चेष्टा नव्हे, खरं तेच सांगतोय , मंडळी जर हा आनंद आपल्या जवळच अनुभवता आला आणि तो ही कोणतीही जास्तीची दगदग न करता तर तुम्हाला आवडेल ना ?
आपण कोस्टल रोड संबंधी ऐकून असालच, चिपळूण मागे टाकलं की समुद्राच्या अंगाअंगाने आणि त्याची गाज ऐकत, त्याच्या अथांगतेच दर्शन घेत, त्याच्या लाटांचे मनोहारी नृत्य पहात आणि किना-यावर त्यांचे संगीत अनुभवत आपण संपूर्ण किनारा पालथा घालू शकता. लुसलुशीत वाळूत ” एक बंगला बने न्यारा ” म्हणत घरकुल उभारु शकता, किंवा येणा-या लाटांच्या प्रवाहात उभं राहून लाटांचा धुसमुसळेपणा आणि वाळूचा सुखद स्पर्श अनुभवू शकता. लाट माघारी फिरली कि वाळूत उमटणारी तुमची पदचिन्हे पाहू शकता. सागराची भव्यता हृदयात साठवू शकता. मुख्य म्हणजे यासाठी ना डाॅलर, ना व्हिसा आणि तुम्ही तुमच्या प्रयत्नाने सशक्त कराल ग्रामीण रोजगार निर्मीतीला.
आज ग्रामीण भागातील अनेक लोक सबसीडीच्या कुबड्यांवर जगत आहेत. केशरी कार्ड आणि शंभर रूपयात पस्तीस किलो धान्य याची चैन करत आहेत. खरं तर ह्या सवलतीनच आपण त्यांची कार्यक्षमताच नष्ट करत आहोत. या कुबड्या काढून घेऊन त्यांना सशक्त आणि व्यसनमुक्त बनवण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मीतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
कोकण पट्ट्यात अगणित नैसर्गीक सौंदर्यस्थळ आहेत त्यांचा जाणीवपूर्वक विकास करून हे पर्याय तेथील आजच्या तरूणाईपर्यंत प्रयत्नपूर्वक पोचवले तर पर्यटनाचे जे चलन इतर देशांत जात आहे ते ग्रामीण भागाकडे वळेल. खेडी आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होतील.
कोकणाला मिळालेली प्रचंड किनारपट्टी त्यावर उभ्या राहिलेल्या पोफळी, माड आणि केळीच्या बागा, डोंगराच्या उतारावर असणारी बांबूची विस्तीर्ण बेटे, रातांबे, काजू फणस, जांभळं यांची मे महिन्यात असणारी रेलचेल आणि डोंगर रांगातून समुद्रात ऊन्हातही मंद गतीने वाहणारे नदीचे आणि ओढ्यांचे प्रवाह हे सौंदर्य डोळे दिपवून टाकते.
कोकणातील खाद्यसंस्कुती विशेष आहे.चरचरणारे भिडावरचे घावणे आणि ओल्या नारळाची चटणी किंवा आंबोळी आणि सोबत काळ्या वाटाण्याची आमटी, एलापे, हळदीच्या पानातले पानगे, नारळाच्या रसातील खापरोळ्या.नारळाच्या रसातील शेवया असे कितीतरी पदार्थ मासे न खाणा-या खवय्यांसाठी मिळतील पण त्याच बरोबर लसणाची फोडणी दिलेले अळूचे फतफते, फणसाच्या कुयरीची खोब-याच्या तेलावर फोडणी दिलेली भाजी, उकड्या तांदळाची पेज आणि जून झालेल्या फणसाची आठळ्यासह भाजी, कुळथाची लसणाची फोडणी दिलेली उसळी, पावट्याची उसळी किंवा वांग्यात ओले काजूगर घालून केलेली भाजी, असे कितीही पदार्थ उदराआड झाले तरी येथील हाॅटेलमधील पाहूणचार संपणार नाही.
कुळथाच्या किंवा उडदाच्या पिठीचे खोबरेल तेलघालून बनवलेले डांगर, भोकाचे वडे आणि काळ्या वाटाण्याची आमटी. पिठी भात आणि चवीला आंब्याची चटणी .आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटते. ही यादी कितीही लांबवली तरी कमीच.
गणपतीच्या काळात कोकणात कोणाकडेही पाहूणचार घेतला तरी हळदीच्या पानातील ओल्या नारळाचे उकडीचे मोदक याची चव आपण विसरणार नाही. एवढे सारे चवीचे पदार्थ उदरात गेल्यावर ते पचण्यासाठी सोलकढी न दिली तरच नवल.
आपले नशीब जोरावर असेल तर याच काळात गाई ,म्हशीच्या खरवसाचा योग जुळून आल्याशिवाय राहाणारे नाही.
मांसाहार करणा-यांसाठी, तिस-यांची भाजाण्याची आमटी, बांगड्यांची आमटी,इसवण,झिंगे किंवा कोळंबीचे निस्त्याक,टोके, रावस ,मुडदूस, सुरमय,हलवे, पापलेट यांचे हळदीच्या पानातील फ्राय केलेले तुकडे. घोळ माशांचा फ्राय, कोळंबी किंवा मोरीची भजी, कोंबडी -वडे, सुके मटण,पेडव्यांच तिखल,ही यादीही अशीच न संपणारी आणि न खाताही तोंडाला पाणी आणणारी. मासे तळतांनाचा वास जरी आला तरी रसना चाळवणारी आणि कधी एकदा पदार्थ समोर येतो ही उत्सुकता ताणणारी.असे तृप्त करणारे पोटभर जेवल्यावर पाण्याऐवजी वाटीभर सोलकढी प्यायली म्हणजे आत्मा तृप्त झालाच म्हणायचा . मग एखादे पानवेली वरचे पान नूसतेच चघळले की ओसरीवर कलंडताच डोळा न लागला तरच नवल.
हे सगळं वाचल्यावर कसं वाटतंय ? ह्या पाकसिध्दीला खर तर काही शेवटच नाही.कोकणात घरगूती खानावळ आणि हाॅटेलमध्येही याची चांगली सोय होते.
रापण ओढताना कधी पाहलाय का? मूळात रापण हा काय प्रकार आहे पहायचे असेल तर कधीतरी देवबाग किंवा तारकर्लीला संध्याकाळी हजर रहा रापणीत अडकलेले उड्या मारणारे मासे पहा म्हणजे मन पाहूनच तृप्त होईल.
हे सगळं वाचलत मग कोकणाची सफर करावी असं मनापासून वाटतंय ना ? चला तर कोकणच्या सफरीला , कुठून सुरुवात करायची ते अर्थात तुमच्यावरच. तुमच्या सोबतीला गुगलही आहे आणि यू ट्युबरही आहेत.
ग्रामीण लोकांकडे असणा-या कलेला वाव दिल्यास बांबूच्या आणि पोफळीच्या सोपांच्या , कलाकुसर केलेल्या अनेक वस्तू ग्राहकांना आकर्षित करून घेतील. मुख्य म्हणजे अनेक किल्ल्यांच दर्शन घेतांना पुन्हा एकदा त्या वास्तूंचा इतिहास जागा होईल.
प्रत्येक गावाचा आणि त्यांच्या नावाचा इतिहास शोधतांना एक वेगळी माहिती वेगळं थ्रील ,वेगळा अनूभव घेता येईल.
रत्नागीरी हे नाव कसं पडलं ते कोडंच आहे! मात्र असं म्हणतात जुन्या काळी हा गड बहामनी राज्याचा भाग होता. विजापूरच्या सुलतानाकडून शिवाजीराजांनी तो जिंकून घेतला. येथे विजापूर येथून रत्नागिरी नावाचा अवलिया फिरत फिरत येथे आला व येथेच राहिला. या गडावर भगवती देवीचे मंदिर आहे.तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे.
रत्नागिरी या अवलियाच्या नावानेच या शहराचे नाव रत्नागिरी पडले असा संदर्भ सापडतो. रत्नागिरी शहराच्या एका बाजूस थीबा पॅलेस आहे .येथे इंग्रजांनी ब्रम्हदेशाचा राजा थीबा याला कैद करून आणले व येथे ठेवले होते.त्याच्यासाठीच इंग्रजांनी महाल बांधला.थीबा यांचा येथेच मृत्यु झाला.या महालाच्या आवारातच शासकीय महाविद्यालय व वसतीगृह आहे.
अस म्हणतात की हा महाल थीबा राजाने स्वत:उभं राहून बांधून घेतला.
या महालाच्या कोणत्याही कमानीतून समुद्राच दर्शन घेता येत. समुद्राची अथांगता आणि निरव शांतता तसेच त्याचे ते रौद्र तांडव येथून न्याहाळता येत.माणसाच मन तरी काय वेगळं कधी ,कधी इतकं शांत आणि इतकं तृप्त की त्याला जगाचाही विसर पडतो तर कधी त्याच्या क्रोधाच्या वडवानलात सगळं कुटूंबच उध्वस्त होत. येथून थोड्याच अंतरावर थीबा पाॅइंट आहे. जेथे नगरपालीकेच गार्डन आहे. संध्याकाळी लाईटच्या प्रकाशात आणि थुई थुई नाचणा-या कारंज्यात हा बगीचा न्हाऊन निघतो आणि बच्चे कंपनी येथील मिनी ट्रेन, हलणारी होडी आणि कारंज्याच संगीत पाहता पाहता स्वत:ला विसरून जाते.
अस्ताचा तो लालबूंद सूर्य थकून भागून जेव्हा समुद्रात विसाव्यासाठी उतरतो ते दृश्य पाहताना डोळ्याच पारणं फिटंत.
आणि सूर्यास्त झाल्यावर अधिरतेने पावलं घराकडे वळतात.
या शहरांशी अनेक ऐतिहासीक घटना जोडलेल्या आहेत.
टिळकांच जन्मघर आजही चांगल्या स्थितीत जतन केलं आहे आणि त्यांचा संगमरवरी पुतळा उजव्या हाताच एक बोट वर करत म्हणतो.”स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळविणारच”. या वास्तूत त्यांची जन्मखोली जतन केली आहे.घराभोवती फणस ,पोफळी आणि माडांची डोलणारी झाड आहेत. तेथे उभं राहील की टिळकांच्या जीवनातील अनेक घटनांचे आपणच साक्षीदार असल्याचा भास होतो. तेथून थोड्याच अंतरावर वि.दा. उर्फ तात्याराव सावरकर यांनी उभारलेले पतितपावन मंदिर दिमाखात उभे आहे.
आज सावरकर यांच्या जीवनावर ते उजवे की डावे आणि ते सवर्णांचे की आणिक कुणाचे असे म्हणत लायकी नसणारी दिड दमडीची माणसे काहीही लिहीतात तेव्हा सांगावस वाटत ज्या नरपुंगव्याने दलितांसाठी मंदिर प्रवेश खूला केला, जो महात्मा स्वातंत्र्यासाठी जीवनाच्या अंतापर्यंत लढला ज्या देशभक्ताने देशाला सर्वस्व अर्पण केले त्याची कुंडली पाहण्याचा हक्क करंट्यानो तुम्हाला मुळीच नाही. या पवित्र वास्तूत प्रवेश करताच सारा अंह गळून पडतो. या पतीतपावन मंदिराच्या शेजारीच सावरकर संग्रहालय आहे. तेथे सावरकरांच्या जीवनाशी निगडीत असणा-या घटना चित्रित केलेल्या आहेत. ‘ने मजसी ने फिरुनी मातृभूमीला’ गीताच्या ओळी वाचतांना शरीरावर रोमांच उभे राहतात. ज्या बोटीवरून तांबड्या समुद्रात उडी मारून त्यांनी सुटकेचा प्रयत्न केला तिची प्रतीकृती पाहतांना त्यांच्या साहसाने उर भरून येतो.
रत्नागिरी, झाडगाव येथे सागरी मत्सालय असून तेथे सर्व प्रकारचे मासे स्टफ करून तसेच काही जिवंत स्थितीत जतन केले आहेत. विविध रंगांच्या मासोळ्या फिशटॅंकमध्ये विहार करत असतात.रंगी बेरंगी विविध आकाराचे मासे पाहताना लहान मुले वेळेच भान हरपून पहात राहातात.
रत्नागिरीचा मांडवी बीच प्रसिध्द आहे.तेथे अनेक पर्यटक वाळूच्या किना-यावर घोडागाडीतून सफर करत असतात तर काही उंटावरून किंवा घोड्यावरून रपेट मारतात.याच बीचवर समुद्राला साक्षी ठेवत प्रेमवीर आणा भाका घेतात किंवा भान हरपून एकमेकांच्या मिठीत शिरता शिरता जगालाच विसरून जातात.
बीचवर भैयाची भेळपुरी, शेवपुरी ,पाणीपुरी खाल्ल्याशिवाय पर्यटकांचे समाधान होत नाही.काही निवृत्त पेन्शनर नियमित येऊन तेथील मोकळ्या वातावरणात आपल्या दिवसाच्या कार्यक्रमाची उजळणी करत असतात.
मांडवीचा किनारा हा काळ्या वाळूने सजलेला आहे तर भाट्टेचा किनारा हा सफेद वाळूचा आहे. अवघ्या एक किलोमीटरच्या अंतराने असणारे दोन किनारे त्यामुळे वेगळेच दिसतात हीच निसर्गाची किमया.
गणपतीपुळे रत्नागिरी येथून चाळीस किलोमीटर आहे परंतू आरे-वारे मार्गाने आपण गेलो तर हे अंतर अवघं पंचवीस किलोमीटर आहे. आरे वारे ही दोन जोडगोळी असल्यासारखी गाव आहेत. येथील किनारा नयनरम्य आहे.समुद्रावरुन येणारे वारे येथील प्रवाशांची दिर्घकाळ सोबत करत असतात म्हणूनच तुम्हीही आरे वारे गावांच्या प्रेमात पडाल.
गणपतीपुळेचा परिसर अतिशय नयनरम्य आहे.गणपतीचे स्वयंभू मंदिर किना-यावर आहे. दिवसातून दोन वेळा तो अथांग सागर श्री च्या चरणापाशी शरण येऊन त्याची पाद्यपूजा करतो. येथील किनारा उथळ व विस्तीर्ण आहे त्यामुळे आबाल वृध्द येथे समुद्रात सफरीचा आनंद लुटू शकतात. येथे अनेक वाटर स्पोर्टची सोय केलेली आहे. स्पीड बोटही आहेत.तसेच अनेक निवासी रेसाॅर्ट सोयीसाठी उपलब्ध आहेत.
गणपती मंदिराला परीक्रमा करण्यासाठी चि-यांची बांधीव पायवाट आहे.
ह्या परीक्रमेच्या मार्गात शुंड गजाननाचे दर्शन घडते. श्रींच्या स्वयंभू दर्शनाने मन प्रसंन्न होते. रोज दुपारी भक्तांसाठी श्री च्या महाप्रसादाची सोय आहे.हे ठिकाण अतिशय नयनरम्य असून येथे वास्तव्यासाठी मंदिराचा भक्तनिवास निवासी सोय आहे तसेच नाश्ता, जेवण यांची सोयही मंदिराने माफक दरात केली आहे.
केशवसुतांचे मालगुंड हे जन्मस्थान येथून मैलाच्या अंतरावर आहे.”एक तुतारी द्या मज आणुनी , फुंकीन मी ती स्व प्राणाने ह्या कवितेचे शिर्षक मांडणारी कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत यांचे तुतारी वाजवतानाचे शिल्प या वास्तूला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. अनेक मान्यवर कवींच्या कविता त्यांच्या माहितीसह येथे चित्रित केलेल्या आहेत. महाराष्ट्र मराठी मंडळाने येथे भेट देणा-या पर्यटकांच्या सोईसाठी पंधरा हजार पुस्तकांचे वाचनालय थाटले आहे.येथे कार्यक्रमासाठी खुले सभागृह आहे. दोनशे व्यक्ती या खुल्या सभागृहात कार्यकर्त्यांचा आस्वाद घेऊ शकतात.
येथून तीस किलोमीटर अंतरावर जयदुर्ग भुईकोट किल्ला आहे.
आज जरी तो जीर्ण अवस्थेत असला तरी कोणे एके काळी येथे सरखेल कान्होजी आंग्रे या दर्यावर्दीचे राज्य होते. आजही किल्ल्याचा संपूर्ण तट शाबूत आहे मात्र आतील कान्होजींच्या वाड्याचे भग्न अवशेष तेवढेच शिल्लक आहेत. जयदूर्ग किल्ल्यावर जे एस डब्लू हया वीज कंपनीचे साम्राज्य आहे.
कंपनीने समुद्रमार्गे कोळसा व द्रव इंधन आणण्यासाठी मोठ्ठी जेट्टी बांधली आहे. भविष्यात जयगडच्या माळावर रेल्वे धावली तर नवल वाटू नये.जे एस डब्लू कंपनीने येथे मोठे रस्ते बांधले आहेत. कामगारांसाठी निवासी इमारती तसेच केंद्रीय शाळा, खेळाचे विस्तीर्ण मैदान यांची सोय केली आहे मात्र येथे असणा-या गरीबांच्या आंबा बागांचे भवितव्य अंधारात आहे कारण येथे हवेत मोठ्या प्रमाणात कोळशाची राख पसरत आहे आणि तिने येथील हिरवाईचा श्र्वास कोंडला आहे.
रत्नागिरीला भेट देणारी व्यक्ती अध्यात्मिक प्रवृत्तीची असेल तर पावस येथे भेट दिल्याशिवाय परतणार नाही. दत्तगुरूंचा अवतार स्वामी स्वरूपानंद यांचे वास्तव्य व चिरंतन समाधी आहे असे पवित्र ठिकाण पावस हे रत्नागिरी वरून अंदाजे १३ किलोमिटर अंतरावर डोंगराच्या पोटात पावस येथे आहे. स्वामींचा मठ हा अतिशय स्वच्छ व मनाला शांती व दिलासा देणारा आहे. येथे अद्यापी व्यवसायीकरण झालेले नाही. मठाचा गाभारा अतिशय देखणा असून आत प्रवेश करताच मनास शांती मिळते. वातावरण पवित्र असून कोठेही घाई ,गडबड नाही. स्वामींचे मूळ घर जतन केले असून, घर अतिशय देखणे आहे.
येथे सकाळी दहा वाजेपर्यंत पोचल्यास दर्शनासह सकाळच्या आरतीचा लाभ मिळतो.येथेही निवासी सोय असून दुपारी महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
संपूर्ण कोकण ही एक यक्षभूमी आहे जेथे जाल तेथे ती तुम्हाला भुरळ घालत राहील.प्रत्येक ठिकाणचे काही वेगळे वैशिष्ट्य नजरेत भरत राहील.कितीही कोकण फिरले तरी मन भरणार नाही.कुठे थांबायच ते तुम्हीच तर ठरवाचय. समुद्र अथांग आहे.
भेट द्यावी अशी ठिकाणं अनेक आहेत, आपल्याला नक्की कुठे भेट द्यावी असं वाटते ते गुगल करू शकता. कोकण फिरुन आलेल्या पर्यटकांचे VLOG यू ट्युबवर आहेतच मग वाट कसली पाहताय?
निसर्गान दोन हातांनी हिरवाईचे दान या परशुरामाच्या भूमीत मुक्तपणे उधळल आहे.या हा या हिरवाईचा थाट पहा, ही नागमोडी वाट पहा ,समुद्राची गाज ऐका आणि मनमुराद आनंद लुटा.
“येवा कोकणच आपलोच आसा, माणसाव आपलीच आसत.साधी आणि भोळी आसत.त्यांचो पाहुणचार घेवचो तर कोकणात जाऊकच व्हया.”
हे दिवस संपू द्या. आम्ही येतोच तुमच्या घरी……!
Beautiful words
Excellent post. I will be going through a few of these issues as well..
If you are going for most excellent contents like myself, only go to see this website everyday as it gives quality contents, thanks
Pretty! This has been an incredibly wonderful
article. Many thanks for supplying these details.
An outstanding share! I’ve just forwarded this onto a friend who
has been conducting a little research on this. And he in fact ordered me
lunch simply because I discovered it for him… lol.
So let me reword this…. Thank YOU for the meal!! But yeah,
thanks for spending time to talk about this subject
here on your internet site.
I’ll immediately seize your rss as I can’t to find your email subscription hyperlink
or e-newsletter service. Do you’ve any? Kindly permit
me understand so that I may just subscribe. Thanks.
Hi there! Quick question that’s totally off topic. Do you
know how to make your site mobile friendly? My site looks weird when viewing from my apple iphone.
I’m trying to find a template or plugin that might be able to correct this problem.
If you have any recommendations, please share.
Many thanks!
Нi there! I know thius iѕ somewhɑt ⲟff topic but I was wondering which
blog platform aгe yyou using for tһis site? I’m getting
sick and tiired of WordPresss because I’ve had issues with hɑckers and I’m looking at alternatives fⲟr
another pⅼatform. I would be great iff you could point me in the direction of a ɡood platform.
Ӏ’m more than haρpy tߋ disсover tһis website.
I want to ttօ thank you for your time duee to this fantastic read!!
I definitely liked every part of it and i also have yoou bookmarked
to look at new stuff in your site.
Thanks for finally talking about > सफर कोकणची,
निसर्गाच्या जादुई नगरीची – प रि व
र्त न < Loved it!
It’s hard to comee bу knowledgеɑble people aЬoսut this topic, butt
you seem ⅼike you know what үou’re talking about!
Thanks
Great delivery. Great arguments. Keep up the great spirit.
This is a topiⅽ that is close to my heart… Take care! Where aree yoսr
contact details thoᥙgh?
great issues altogether, you just received a brand new
reader. What could you recommend about your submit that
you made some days ago? Any sure?
Hello all, here every one is sharing these kinds of knowledge, thus it’s good to read this blog, and I used to visit this web site all the time.
I’ve been browsing online more than 3 hours these days, but I never found any
fascinating article like yours. It’s lovely worth sufficient for
me. Personally, if all webmasters and bloggers made good content material as you
did, the net might be much more helpful than ever before.
Spot on with this write-up, I actually believe this website needs far more
attention. I’ll probably be returning to read more, thanks for the advice!
Wow! In the end I got a website from where I know how to in fact take helpful data regarding my study and knowledge.
At this time it sounds like Expression Engine is the top blogging platform available right now.
(from what I’ve read) Is that what you’re using
on your blog?