असहाय्य…

असहाय्य…

सत्त्यापाल सिग यांच्या कल्पना कृतीतून  उतरलेली महामृत्युंजय  योजना महाविद्यालय पातळीवर राबवण्याचा निर्णय झाला य़ योजनेची माहिती देण्यासाठी आयुक्त परिमंडळ चारचे आयुक्त धनंजय कुलकर्णी  यांनी प्राध्यापक आणि मुखाध्यापक  यांची सभा त्यांच्या वरळी कार्यालयात घेतली . समाजात घडणाऱ्या  गुन्ह्याच स्वरूप त्याची तीव्रता ,त्यात अनाहूतपणे ओढली जाणारी तरुण पिढी याची माहिती  देतांना त्यांनी सांगितले विद्यार्थांना मोबाईल ,बाईक ,भन्नाट वेग याच आकर्षण ,हॉटेलिंग ,मौजमजा या साठी लागणारा पोकेटमनी या मुले मुले नको त्या मार्गाला वळतात आणि नकळत गुन्हा करायला प्रवृत्त होतात. महाविद्यालयातील मुलांना जर ह्या साऱ्या  गोष्टीचे वाईट परिणाम समजावून सांगितले, पोलिसखाते कसे काम करते त्याची ओळख करून दिली तर जागरूक विद्यार्थी पोलिस खात्यला मदत करू शकतील गुन्हा घडू नये यासाठी योगदान  देवू शकतील.

       आम्ही सर्व सहका-यानी या योजनेला पाठींबा दिला    चांगल्या योजनेला नेहमीच  पाठींबा मिळतो ,तसा ह्या योजनेला मिळाला ज्या  पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आम्ही आलो त्यांनाही आपण नवीन काही करतो ह्याचा आनंद झाला होता त्यातील  बरेच अधिकारी एमपी एस सी करून आले होते . सदरक्षणाय खलनिग्रहाय हे ब्रीद शिकले होते. आमच्या कार्यालयात या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकारी आले होते चहा- पाना नंतर  गप्पामध्ये मी त्यांच्या या योजनेची प्रशंसा  केली  विद्यालयाचे  बदलेले वातावरण ,शिक्षक आणि विद्यार्थी याचे बदललेले नाते .यावर बरीच चर्चा झाली .नवीन जोडप्यांस एक मुलगा किवा मुलगी असल्याने शिक्षा झाल्यास पालकाकडून येणारी प्रतिक्रिया यावर बोलतांना आम्हाला येणारा अनुभव सांगितला .पोलिस
अधिकारीच म्हणाले ” खर आहे सर, हल्ली घरातल्या महिलाच आपल्या मुलांना मोबाईल  पोकेट मनी या  साठी आग्रही असतात आमच्या घरातही काही वेगळ नाही.”    हट्ट  पुरवण्यासाठी   महिला नेहमीच आघाडीवर असतात आपलीही पत आहे हे दाखवण्यासाठी त्या नव-याच्या खिशाला कात्री लावायला मागे पुढे पाहत नाहीत . आमच बोलण सुरु असतांना माझ्या शिक्षिका एका मुलाला घेऊन आल्या. “सर हाच प्रथमेश काही केल्या ऐकत  नाही,सारखा उपद्व्याप चालू असतो. सर ,किती वेळा शिक्षा करायची ?   पालकांना बोलावूनही येत नाहीत तुम्हीच काय ती शिक्षा द्या .”  पोलिस पाहून त्याची गाळण उडाली होती .तो मान खाली
घालून निमूट उभा होता जणू त्यांनी काही केल नसाव शिक्षिका उगाचच तक्रार करत असाव्यात .
मी त्याला जवळ बोलावलं “प्रथमेश ,इथ ये काय रे तुला किती वेळा समजवायचं ? किती वेळा शिक्षा करायची ? तुला नाहीच सुधरायच का ? ह काढ उठाबशा ,एक ,दोन ,तीन  निट  काढ ,पूर्ण खाली बस. झाल्या का दहा जा वर्गात निट  बैस मस्ती केलीस तर नाव कमी करणार .तो जायला निघाला त्याच्या चेहऱ्यावर शिक्षा झाल्यचे अजिबात दुखः नव्हते. बाहेर पडताच त्याने धाव मारली.

          माझ्या समोर बसलेले पोलिस अधिकारी माझा मवाळ स्वभाव  पाहून बहुदा हैराण झाले असावे . बर तर आपण काय म्हणत होतो ,ह मग तुम्ही कधी लेक्चर घेणार ते सांगा तशी सूचना मी काढतो .” माझ्या चेहऱ्याकडे पाहत ते म्हणाले सर हे ए टी एस चे भोसले दहशतवाद आणि कारणे ह्या बददल ते विद्यार्थ्यांना माहिती देतील. भारतात काही धार्मिक संघटना तरुण मुलांना हाताशी पकडून विघातक कृत्य करत आहेत . मुले ,विशेषता  तरुण जागृत असतील तर त्याला आळा  घालू शकतील त्याचं म्हणण  मला  पटल .ठीक आहे सर आपण या मी प्रोजेक्टरची सोय करतो. भोसले हस्तांदोलन करत उठले साशंक नजरेने पाहत म्हणाले सर एक विचारू ? मी हसत म्हणालो” विचाराकी ”   “सर, त्या मुलाला तुम्ही मारल नाहीत .एव्हढ शांत तुम्ही कस राहू शकता ?  भोसलेंच्या प्रश्नाचं उत्तर काय द्याव हा प्रश्न मला पडला होता “भोसले साहेब कालचा पेपर पाहिलात? ” भोसले माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते . “अहो शासनाने शिक्षकाच्या हातातली काठी
काढून घेतली आहे. अहो मुलांना शारीरिक शिक्षा राहिली दूर साध गाढव बोलाल तरी पालक  भांडायला येतात.  ह्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला नाही म्हणून वर्गाबाहेर बसवलं तरी त्यांचा अपमान होतो .” ते हसले ” खर आहे सर आता आम्ही गुन्हेगाराला शरीरिक शिक्षा करू शकत नाही अगदीत्यांनी हात उगारला तरीही आमच्या हातातला दंडुका शोभेचा राहिला आहे. एखादया सराईत गुंडाला शिक्षा करायची म्हटली तरी भीती वाटते न जाणो आपल्यावर निलंबनाची पाळी  येईल “

 शिक्षकांच्या हातातली काठी आणि पोलिसांच्या वर्दीला आता कोणी घाबरत नाही, अगदी लहान मुलं  सुद्धा…
दोघही तितकेच असहाय्य…

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar