ओपन बुक थिअरी
सांगायचं तर, कोणाच जवळ लपवण्या सारख काही नसतांना तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या प्रयत्नात जास्त उघडा पडतो.एक खोट झाकायला किंवा लपवायचा प्रयत्न करतो आणि नव्या दहा खोट्या गोष्टीना जन्म देतो. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकी पूर्वी आपली मालमत्ता घोषित करावी लागते.वर्तमान पत्रात उमेदवाराची माहिती किंवा ओळख किंवा त्याची कामगिरी देतांना, त्यांनी राजकरण करतांना समजासाठी काय काम केले हे जाहीर करावे लागते.मतदारांना ज्या व्यक्तीला आपण निवडून देणार आहोत त्याचा इतिहास-भूगोल कळणे हि काळाची गरज असते. याचाच अर्थ त्या उमेदवाराने,आपल प्रगती पुस्तक समाजासमोर मांडण अभिप्रेत असत. तुम्हाला काय वाटत? खरच तो उमेदवार आपल प्रगती पुस्तक जसेच्या तसे तुमच्या समोर मांडेल ! आणि त्यांनी आपल प्रगती पुस्तक तुमच्या समोर जसेच्या तसे मांडले तर तुम्ही त्याला स्वीकारून सेवेची संधी द्याल ? पक्ष श्रेष्ठींनी उमेदवाराला त्याच्या प्रगतीचा हिशेब विचारणे हे किती खरे वाटते ? श्रेष्ठींनी आपल्याला उमेदवारी द्यावी ह्या साठी जो प्रसाद दाखवावा लागतो त्याच्या अनुमानावरून श्रेष्ठी उमेदवाराच्या खोट्या खऱ्या उत्पन्नाचा अंदाज लावू शकतातच मग हे खोट नाटक करून जनतेची दिशाभुल करण्याच कारण काय? चार व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतांना खर सांगू का ? अशी प्रस्तावना बोलतांना करतात आणि दरम्यानच्या काळात काय काय सांगितलं तर आपण अडचणीत येवू ह्याची उजळणी मनाशी करतात. अर्थात त्या चारी जणात उडदा माजी काळे गोरे असतातच आणि आपल्या समोरची व्यक्ती आपल्या पासून काय लपवते आहे ह्याचा अंदाज बरोबर घेतात.म्हणजे खोट बोलण्या पूर्वी ,खर सांगू का चा आधार घेत खोटच बोलल जातंय ह्याची त्या चारही वीरांना कल्पना असते. राज करणात आपल किती वजन आहे हे दाखवण्यासाठी काही जण उगाचच मोठ्या मोठ्या नेत्याचा संदर्भ बोलतांना देतात किंवा मोबाईलवर उगाचच कोणा तरी मोठ्या राजकीय व्यक्तीच नाव घेत तिस-या व्यक्तीशी गप्पा मारतात,जेणे करून ऐकणाऱ्या माणसाचा समज व्हावा, काय ह्या माणसाची वट आहे ! . अंगावरचे कपडे माणसाच चारित्र्य सांगतात अस म्हटलं जायचं, आज अस म्हणण्याची हिम्मत कोणी करेल काय ? खाली मुंडी आणि पाताळ धुंडी ह्या म्हणी प्रमाणे, कपडे जेव्हडे स्वच्छ आणि सफेद , कृती तितकीच मलीन आणि हिन अस म्हणायची पाळी अनेक नेते मंडळी आणतात.समजासमोर ह्याचं ओपन बुक आहे कुठे ? गांधीजीनी स्वतः टोपी कधी घातल्याचं ऐकिवात नाही,मात्र गांधीनी दुसऱ्यांना स्वदेशीच्या आग्रहास्तव सफेद टोपी घातली. त्याच्या मुळाशी गांधीजींचा स्वच्छ टोपिप्रमाणे आचरण ठेवा असा बहुदा सल्ला असावा.गांधीजींच्या पश्चात गांधी टोपी डोक्यावर ठेवली कि त्याखाली काहीही लपवता येते असा गोड समाज शिष्यांचा झाला आणि टोपी बदनाम झाली. “साधी राहणी,मोकळे मन, स्वच्छ कारभार स्वच्छ प्रशासन” ,विचार फारच बढीया पण ह्या विचारांची प्रचीती सामान्य जनतेला आल्याशिवाय मान्य कस करणार ? पर्रीकर ,सुरेश प्रभू ,ह्यांच्या बाबत आजही समाजात चांगल बोलल जात,त्याचं ओपन बुक खरच ओपन असल्यान ते वाचता येत म्हणून तर काहीही गाजा वाजा न होता ,कोणतीही लॉबी न बनवता ह्या दोन्ही सद्गृहास्तांना मोदिजीनी बोलावून पदभार दिला. महाराष्ट्रात मात्र पद मिळवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर झाला मग ह्याचं प्रगती पुस्तक काय म्हणतंय ह्याचा विचार महाराष्ट्रातील श्रेष्टींनी का केला नाही कि त्यांचेच हात दगडाचे आहेत ?मोकळ असण ,मोकळ वागण ह्या गोष्टींचा विचार नक्कीच चांगला.पण ह्या मोकळेपणाचा विचार ,विचारपूर्वक झाला नाही तर मोकळेपणाने नको ती संकट येवू शकतात.काय काय ओपन असाव ह्याला मर्यादा हव्या ना ! सगळच काही लोकांसमोर ओपन केल तर चालेल का ? आज मेडिया अशा ओपन होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या गोष्टींच्या शोधात असतो.त्यांच्या दृष्टिन तो एक बाईट्स असतो,त्यांच्या वाहिनीचा टी. आर. पी. वाढवण्यासाठी त्यांना अस खाद्य हव असत.कोणाच जीवन त्यांनी उधवस्त होईल ह्याच्याशी त्यांना काही देण घेण नसत. दुर्दैवान आकर्षणापोटी ह्या गोष्टी तरुण मुलांच्या लक्षात येत नाही किंवा “हूज केअर?”अस म्हणत त्याला ते फारस महत्व देत नाहीत. चित्रपटात काम करणाऱ्या नट नट्यांनी वाहिन्यान्या दिलेल्या मुलाखती आणि आणि बाईट्स ह्या प्रसिद्धी साठी असतात,त्यांची अफेअर्स हा ही फार्स असु शकतो. त्याचं ओपेन बुक ओपन असण किंवा नसण हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. जरी त्यांच्या चुंबन दृश्याचे फोटो फेजबुकवर झळकले तरी छान,काय मजा चालाल्याय लेकांची ! अस म्हणण्या पलीकडे कुणीही फारस गांभीर्यानी घेत नाही.पण तरुण पिढीला त्यांची नक्कल किंवा अनुकरण कराव अस वाटत.त्याचं अनुकरण हेच दुर्दैव,आणि त्याची जाहिरात whatapps वर करण हा तर चक्क वेडेपणा,पण आपण आत्ता पुरेसे मोठे आहोत आणि होणारे बरे वाईट परिणाम याची चांगली जाण आहे अशा धुंदीत त्याचं वागण आणि जगण असत.अर्थात त्याचा कुणीतरी गैर फायदा घेणारच. विविध वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या सिरियल्स घरा घरात एवढया चवीने पहिल्या जातात आणि त्याची चर्चा होतांना “अग रोहनने काश्मीराला डिवोर्स दिला,याच कारण काश्मीराच समीर बरोबर आधी पासूनच अफेअर होत, मला वाटलच होत असच काही तरी असणार” अशा गप्पा गाडीत,जिन्यात,अगदी रस्त्यात थांबूनही होतात. ह्या सिरियल्सनी समाज जीवन ढवळून काढाल आहे.आज पर्यंत बंद दारा आड घडणाऱ्या सुखद आणि दुखःद अशा घटना उघड्यावर मांडल्या जातात. सांगा हे ओपन बुक खरच कोणाच्या फायद्याच आहे? पुरेशा कपड्यात असणाऱ्या सुंदर सौदर्याची तुलना नग्न्तेशी होईल का ? आत्ताशा कपड्यांचा वापर हा अंग झाकण्या पेक्षा अंग प्रदर्शनासाठी केला जातो . जाहिरात असते कपड्यांची,पण कपडे अंगावर ठेवण्यापेक्षा अंगावरून खाली पाडल्या नंतर जास्त क्ल्याप्स मिळतात ह्याला काय म्हणायचं ! वा रे ओपन बुक थिअरी ! आजकाल महानगराच्या आसपास कितीतरी रेसौर्ट उघडली आहेत.टिकुजीनी वाडी,शांग्रीला,एक ना दहा,ह्या प्रत्येक रेसोर्ट मध्ये स्विमिंग पुल,रेन डान्स ,मसाज सेंटर ह्या साठी व्यवस्था असते. श्रम परीहारसाठी प्रत्येक विकएंडला तेथे तुफान गर्दी असते आणि वाटर स्लाईड, रेन डान्स ह्यासाठी तुफान गर्दी असते,ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद कुणीही घेण्यास कुणाचीच हरकत नसावी पण मोठ्या मुला-मुलींनी अगदी आखुड कपडे घालुनच पाण्यात उतरावे असा नियम असावा असा गोड समज करूनच सगळे कमीत कमी कपड्यात पाण्यात उतरतात,अगदी बेफान होवून नाचतात. नाचतांना आपल्या अंगावर पुरेसे कपडे नाहीत हे सोयीस्करपणे विसरून मंदाकिनी सारख्या नाचतात तेव्हा वाटत “राम तेरी गंगा मैली हो गई” मधून हाच तर पाठ दिला नसावा ! अगदी लग्न झालेल्या फ्यामेली आपल्या बच्य्या कच्या बरोबर तशाच कपड्यात ह्याचा आनंद घेतात तेव्हा वाटत खरच त्यांच्या मुलांना ओपन बुक थिअरी शिकण्यासाठी कोणा अन्य व्यक्तीची गरजच नाही. आता अगदी वाढदिवशी घातलेला ड्रेस इतका आकर्षक असतो आणि इतक्या कमी कपड्यात बसवलेला असतो कि गिरण्या बंद का पडल्या? ह्याच कारण शोधायला कुठ जाव लागत नाही.चित्रपटात निर्मात्याला किती दाखवू आणि कस कस दाखवू अस झालेलं असत.प्रत्येक चित्रपटात एकतरी आयटम सोंग टाकल्या शिवाय चित्रपट पूर्ण झाला अस वाटत नाही, मग हे गाण कोणावर चित्रित झाल ह्याला महत्व नाही. समाजाची जणू अभिरुचीच बदली आहे कि काय ? अस वाटण्याप्रात परीस्तीती आहे.आपण पुन्हा निसर्ग अवस्थेत जाणार आहोत कि काय असे वाटण्या इतपत वेगाने प्रगती होत आहे. भविष्यात आमचे पूर्वज असे होते हे सांगण्यासाठी चित्रफितीचा आधार घ्यावा लागणार नाही हे मात्र खर . जय हो सुधारणेचा ,जय हो विकासाचा, शासनच खुल धोरण ह्यालाच म्हणायचं का ? पब,डिस्को थेक, जागो जागी निर्माण केली गेलेली रेसोर्ट हीच आमची नवी ओळख आहे का? सगळ काही खुल करण्याचे किती किती फायदे नव्या पिढीला झाले नाही ! खुल्या वातावरणासाठी नवी पिढी तुमच्या विकासाला खरच दाद देईल.आपल्या नव्या संस्कृतीची ओळख जगाला सांगण्यासाठी भक्कम पुरावा आम्ही निर्माण केला आहे . आम्हाला ह्या नव्या परिवर्तीत संस्कृतीचा अभिमान वाटतोय कि काय हेच काळे नसे झाले आहे कारण ह्याचे फोटो राजरोसपणे व्हाटस ऑप वर शेअर केले जातात तेव्हा धन्य धन्य वाटते