plakh-mangesh-kocharekar

ओळख

पहिल्यांदाच तिची माझी भेट तशी अचानक झाली
मी होतो तेव्हा अगदीच गावंढळ अन ती रुळलेली
गळ्यात तिच्या लाल स्कार्फ अन डॅशिंग तिची देहबोली
सगळ्या देखत ती गंमत म्हणून अखियोसे मारे गोली
केसांचा छान बॉयकट डिंपलची गोल टोपी कपाळी
हातात ब्रेसलेट, गळ्यात टपोऱ्या मण्यांची माळ काळी

शर्टची दोन बटणे उघडी दाखवत होती काळजाची खोली
घट्ट जीन्स अन तंग टी शर्ट दिसत होती मुसमुसलेली
तिला पाहून नकळत मला किमीची याद उगाच आली
“हॅलो एव्हरी बडी” म्हणत ती माझ्या अंगावरूनच गेली
तिला जवळून पाहता लाजून माझी मान खाली झाली
ती माझ्या जवळ येत पाठीवर हात ठेऊन डार्लिंग म्हणाली

ते मोकळ हसणं, ते मिश्किल वागण एक सेमिस्टर चाललं
तिच्या बिनधास्त वागण्यावर पूर्ण कॉलेज कॅम्पस भाळलं
तद्नंतर अचानक ती पाहता पाहता पारच बदलली
तो मॉडर्न लुक, घायाळ करणारी अदा याना सोडचिठ्ठी दिली
खर वाटेना पण मुसंडी मारत ती सेकंड सेमिस्टरला पहिली आली
तो पर्यंत तिच्या अदेवर, तिच्या नखरेल चालीवर मुंल वाया गेली

दुसऱ्या वर्षी तिने कॉलेजच्या गेटवर कमालच केली
सॅंडलची पूर्ण साईज एका टग्याच्या गालावर काढली
त्याने हात धरू पाहताच कचकचीत शिवी हासडली
त्याचा दिमाख अन हिरोगीरीची नशा क्षणात उतरली
वाटलच नव्हतं सुरवंटाच फुलपाखरू होईल अशी बदलली
पेहराव सुद्धा बदलल्याने ती दिसू लागली सोज्वळ, भोळी

त्या नंतर ती दिसली तेव्हा स्मित करत छान गोड हसली
ती गावरान मुली, तिची छबी खोल माझ्या काळजात बसली
मला ठाऊक नव्हते कोणाच्या परीस स्पर्शाने ती उजळली
पूढील कित्येक वर्षात तिची ना भेट ना आठवण कधी आली
जेव्हा तशीच कुणी स्त्री एकटीच संथ पाऊले टाकताना दिसली
चाळीस वर्षांचा भुतकाळ मागे सारत ती जवळ येत भेटली

मला आपण ओळखता का? ती हळूवार शब्दात बोलली
तुम्ही कॉलेजला “ड्रीमगर्ल” ते ऐकताच तिची कळी खुलली
मी आता डॉक्टर आहे, हार्ट सर्जन ती ओळख देत म्हणाली
मी, Glad to meet you, म्हणताच ती भूतकाळात शिरली
You naughty boy दिलखुलास हसत थाप पाठीवर मारली
चाळीस वर्षाच्या आठवणीची झलक तिच्या स्पर्शाने कळली

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar