जनाधार
नियतीची गती न कळे कुणा, खटखटे पुन्हा मोदींच्या स्वप्नाचे दार
लोकशाहीला म्हणावे काय? असे पून्हा त्यांच्याचवरीच देशाची मदार
पून्हा एकदा देशात, नरेंद्र दामोदरदास मोदी यांचेच एनडीए सरकार
आता मात्र शिवू देऊ नका मनास, सत्तेचा माज वा मिथ्या अहंकार?
लालकिल्ला लखलाभ तुम्हाला, नका करु जहरी टीकेने कुणावरी प्रहार
नेतृत्व तुम्हाला दिले जनतेने, स्मरा मनाशी तुमचा शब्द, ‘ये मेरा परिवार’
दुर्दैवाने नितेशजी, चंद्राबाबू यांचा घ्यावा लागला आहे तुम्हा आधार
करा चिंतन, बहुमताचा आकडा भाजपा का करू शकले नाही पार?
नको भाषणे, प्रचार धुरळा, परदेशवाऱ्या, वा हिंदुत्ववाचा फुका पुकार
जनता सांगते, उद्योग उभारून, द्या नोकऱ्या, नको विषमतेचा अंगार
ओळखा जनमत, द्या हाताना काम, शेताला पाणी, वाढवा उद्दीम व्यापार
नकोत आता भाकड चर्चा, नकोत सल्ले, द्या मुक्त जगण्याचा अधिकार
कोणाचाही भरोसा न येथे, सोबतीस आले तरीही ते ही करतील शिकार
कराल का हिमंत नागरी कायद्याची? ठरलाय एनडीएत अलिखित करार
भले राष्ट्रपती देतील मत्र्यांना गोपनीयतेची शपथ आणि मुक्त अधिकार
खरंच का मंत्री घेतील स्वतः निर्णय की बनतील मुके, अंध, बहिरे ठार?
आता दवडू नका संधी, नकोच पीएम चे दडपण मनी, वा स्वार्थी विचार
व्हा निर्भय, घ्या निर्णय, द्या जनतेस दिलासा, नको दिव्याखाली अंधार?
नाही निर्णायक बहुमत तुम्हाला, नको अप्रिय निर्णय वा उगा शिरजोरी
उमटवा आपल्या कार्याचा बहुमोल ठोस ठसा ती भविष्यासाठी शिदोरी
निर्विवाद सत्य आहे, काँगेसी मित्र मिळूनही शतक करू न शकले पार
कशाचा राहुल,खरगे,शरद,ममताने करावा गर्व? बसा पाच वर्षे गपगार
तुमच्या नाना, नानी, आणि पप्पांचा जिहादी लोकांशी प्रेमाचा व्यापार
म्हणता नागरी संशोधन नको, ठेवाव्या का खुल्या सीमा, मुक्त संचार?
खोटे मुद्दे, मांडले त्यांनी, संविधान बदलाचा धाक, असा खोटानाटा प्रचार
‘हम दो हमारे दस’ नारा ऐकूनही राहुलजी, का करता खोटीच तक्रार?
कश्मीर, सियाचीन घालवले तुम्हीच, का उगाच मातम हाहाःकार?
साठ वर्षे तुमचेच राज्य, आतंकवाद थांबवला न आला, किती झाला संहार?
म्हणे आपण उच्च विद्याविभूषित, आपल्याला जनतेच्या प्रश्नांची जाण
स्वातंत्र्य मिळवले पाक देऊन, दिले काश्मीर,सियाचीन, का पुन्हा द्यावी मान?
वाढले वय ढळली जवानी, शिकून घ्या राष्ट्रवाद, करू नका देशास बदनाम
अल्पसंख्यांकाचे नको फाजील लाड, का द्यायचे पंजाब शत्रूला पून्हा दान?
लोकशाही आणि विकासासाठी मोदींना द्या साथ आता तरी व्हा शहाणे
खरेच देशाचा अभिमान वाटत असेल तर होऊ नका पक्षाचे बुजगावणे
विरोधक ही करू शकतो विधायक कामे, द्या की जनतेला ठाम विश्वास
पंधरा वर्षे सरकार नाही, नसू द्या, एकजूट करा, दाखवा विकासाचा ध्यास
करा मौलिक सूचना, तुमच्या नितीची गरज राष्ट्राला, सांगा नामी उपाय
प्रगती पथावर देशा नेण्या, दाखवा एकजूट, नका ओढू कुणाचे पाय
पहा सहकार्य करून तुम्ही प्रामाणिकपणे जनता तुम्हालाही देईल साथ
करा पदयात्रा, पहा भारत, जाणून घ्या समस्या नका दाखवू दुर्दैवी हात
मोदींनीही स्वतःस, समजू नये शहाणा, करू नये अरेरावी ने कारभार
वर्षानुवर्षे राहतात येथेच सारे भारतीय, तेच नागरिक, तत्व करा स्विकार
पुजा लंपाठ जरुर करा, देशाच्या पैशाने प्रसिद्धीचा टाळा खोटा हव्यास
नागरीकांच्या समस्या प्रथम स्थानी, गरीबीचे उच्चाटन मनी धरावा ध्यास
उपहास करुन चेष्टा करणे पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला शोभेल कसे?
दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवत सततचे बोलणे यानी होई स्वतःचे हसे
समजता, स्वतःस गंगामातेचा पुत्र, विशुद्ध मनाने मागा मैत्रीचा हात
आचरण हवे शुध्द, राजकरणात नैतिकता, तेव्हाच सुटेल प्रश्नांची गाठ
विकसित राष्ट्र बनवण्या हवा ग्रामीण जनतेचीही विकासात सहभाग
कौशल्य शिक्षण, अजोड मेहनत, राष्ट्रनिष्ठा, स्वार्थी वृत्तीचा थोडा त्याग
राष्ट्रसेवा धर्म आपला, भगवा त्यागाची प्रतिमा, त्यासाठी सोडला संसार
तिसऱ्या वेळीही निवडून आला आहेस मित्रा विसरू नको संघसंस्कार