ती…
त्या पालकांना बोलवायची ती पहिलीच वेळ नव्हती . त्यांच्या मुलाविषयी तक्रारी वाढत चालल्या
होत्या .वर्गतलि बरीच मूलं त्याच्याविषयी तक्रार करत होती . तो कुणाचे डबे फस्त करत होता ,
मधल्या सुट्टीत पट्ट्यांनी माराम्रारी करत होता .बिच्चरि आई …दर वेळेस येवून माफी मागून जात
होती . त्या दिवीशी ती मुलाच्या वर्ग शिक्षिकेसह आली. नेहमी प्रमाणे वर्ग शिक्षिकेने त्याच्या तक्रारी सांगितल्या शिक्षिकेला एकाच वेळेस तक्रार करणारी मुल आणि पालक यांना तोंड द्यावे लागते . त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही म्हणून पालकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते . शिक्षिकेने त्याच्या तक्रारी सांगता सांगता निरोप घेतला . त्यांना वर्गावर वेळेत पोचणे भाग होते अन्यथा नव्या तक्रारींना सामोरे जावे लागले असते . माझ्या जा , थांबा ह्या शब्दांची वाट न पाहताच त्या वाटेला लागल्या .
त्या नेहमी प्रमाणेच “स्वारी सर , पुन्हा नाही तो अस करणार मी सांगते त्याला ,गौतम बाळ नाही न अस करणार ?
त्या मुलाचे पिरड बुडू नये म्हणून मी त्याला रागावून वर्गावर पाठवल . मी बाईंकडे मोर्च्या वळवत म्हटलं सांगा पाहू आम्ही कुठवर सांभाळायच ?बाई उसासा टाकत म्हणाल्या ” सर आम्हीही त्याला सांगून थकलो . तो म्हणतो तुझा सगळ्यांवर विश्वास आहे फक्त माझ्यावरच नाही , सर हे अस काय होतंय ? मी समुपदेशक नव्हतो अन मानसोपचार तज्ञ नव्हतो तरी मला हे कळत होते त्याची पोगंड अवस्था त्याला स्वस्थ बसू देत नव्हती . मी त्या बाईंना म्हणालो ” अहो तुमचा मुलगा मोठा होतोय इतर मुलांच्या तुलनेत त्याच पोषण चांगल झाल्याने प्रचंड उर्जा त्याच्या पाशी आहे . मी चा नव्याने शोध सुरु आहे ,आपण वेगळे आहोत हे भासवण्याचा त्याचा उदयोग सुरू आहे त्याचाच इतरांना त्रास होत आहे .
“सर अगदी कंटाळा आलाय रोज तक्रारी , कधी कधी पालक माझ्या येण्याची जणू वाट पाहत असतात. तोंड लपवून रहाव लागत . कित्ती समजवायचं ?घरी अभ्यासही करत नाही . त्याच काय होणार कुणास ठावूक ?
त्याला आम्ही समुपदेशक बाईंकडे पाठवल होत .एक दोन वेळा त्यांच्याकडे जावून फार फरक पडणार नव्हता … बाई तुमच्या मुलाला समुपदेशक बाईंकडे जास्त वेळा पाठवण्याची गरज आहे त्यांचा चेहरा त्रासिक दिसला . तुमची आमची मुलांना समजवायची भाषा फारच रुड असते आपण सरळ त्याला कानाखाली काढण्याची धमकी देतो . मुल आपल्याकडे मोकळी होत नाही . समुपदेशक त्यांना जस समजावून सांगू शकतो त्यांच्या अंतरंगात डोकावू शकतो ते आपण करू शकत नाही
सर गेल्या वर्षी त्याला बाईंकडे पाठवल होत पण फरक नाही पडला . ह्या वर्षी ती जास्तच आक्रमक झालाय . त्याची बहिण खूप समजुददार आहे मग तोच का असा ? ” बाई इक विचारल तर सांगाल ?तुमच आणि ह्याच्या बाबांचे संबंध कसे आहेत ।त्यचे बाबा कधी त्याची चवकशी करायला आले नव्हते म्हणुन मी विचारले होते .त्य काही न बोलता बसून राहिल्या पण सांगू शकल्या नाहीत त्याचं मूक रुदन बरच काही सांगून गेल. .त्याच्या वागण्यातील गमक तिथच दडलं होत.
मी त्या विषयी बोलणारच होतो ,तरीही विषय बदलत मी म्हणालो ” बाई ,समुपदेशक बाईंचे म्हणणे आहे
तुम्ही दोघांनी त्यांना भेटावे . घरातल्या वातावरणाचा मुलावर काय परिणाम होत आहे ते त्यांना पहायचे आहे . “”सर, मला सांगायला थोड अक्वर्ड वाटतंय पण ह्याचे बाबा म्हणाले माझा मुलगा काय वेडा आहे का ? कॉन्सेलेर कशाला हवा ?ते यायला तयार नाहीत मी काय करू ? ” मी शांत राहून ऎकत होतो .त्य बाईंना बोलू देण गरजेच होत . “सर खर सांगू का ?त्याच्या बाबांनाच कॉन्सेलेरची गरज आहे . मला प्रोब्लेम समजला वदिअन्नच आपल्या मुलाचे दोष दिसत नव्हते किंवा मान्य कराव अस वाटत नव्हत मग उपाय कसा होणार ? पालकांनीच आपल्या पाळ्या बद्दल जागरूक असण गरजेच होत . अर्ली डीटेकशन मिन्स अर्ली रिकवरी पण हे सांगायचं कोणी ? मनावर सुद्धा उपचाराची गरज असते हे पटवण सोप्प नव्हत . मी बाईंना समजावलं तुम्ही फक्त ह्याच्या बाबांना इथे आणा त्यांना काय सांगायचे ते आमच्यावर सोडा . फुलावर फवारणी आधी झाडाच्या खोडावर फवारणीची गरज होती. निदान वेळीच झाल तर झाड
कोमेजणार नाही इतकच आमच्या हाती होत.
Hello there, You have done an incredible job. I’ll definitely digg it and personally
recommend to my friends. I’m sure they’ll be benefited from this website.
Everything is very open with a very clear clarification of the challenges.
It was truly informative. Your website is extremely helpful.
Thank you for sharing!
Hello just wanted to give you a quick heads up.
The words in your content seem to be running off the screen in Chrome.
I’m not sure if this is a format issue or something to do with browser
compatibility but I thought I’d post to let you
know. The layout look great though! Hope you get
the issue fixed soon. Thanks
When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and
now each time a comment is added I get three e-mails with the same
comment. Is there any way you can remove me from that service?
Appreciate it!
Hello there, just became aware of your blog through Google, and found that it’s truly informative.
I’m going to watch out for brussels. I will be grateful if you continue this in future.
Numerous people will be benefited from your writing.
Cheers!