तुझे अस्तित्व हाच झोल

तुझे अस्तित्व हाच झोल

या वर्षी जून काहिसा कोरडा गेला, पेरलेलं गेलं वाया
जुलै महिन्यात सगळ गेलं वाहून, उतरून गेली रया

दुबार पेरणी करत वावरात, उभं केलं पुन्हा हिरवं धन
काळतोंड्यांने साधला पुन्हा डाव,कुस्करलं भोळं मन

कपास गेली, बुडले सोयाबीन, मक्याला पून्हा फुटले अंकुर
वावरात भेटी सुरु, मंत्र्यांची आश्वासने नुसता शब्दांचा धूर

सर्वत्र नुसताच राडारोडा ,स्वप्नांळू डोळ्यात आता अश्रूंचा पूर
तासाभरात आभाळ बदलते रंग, दयाळू निसर्ग बनतो रौद्र, क्रूर

श्रावण सरला तरीही, थांबल्या नाहीत कोसळणाऱ्या धारा
वैरी झाल्या श्रावण सरी, त्यांनी गिळला गरीबांचा आसरा

छळवाद मांडतो बेभानपणे, धरेने किती सोसावा त्याचा मारा
अशी कशी क्रूर चेष्टा? नकोशी वाटे ही पोशींद्याची तऱ्हा

मायबापा व्हावे उदार, आवरा हा क्रोध नका मांडू पसारा
डोळ्या देखत बुडले सारे, खंतावल्या जीवा, कसला थारा?

उदार होई शासन, एक रूपयात उतरवला पिकाचा विमा
मिळालीच जरी शासन मदत, वर्षभर कशी येईल कामा?

गणपती बाप्पा कर कृपा, सावरण्याची गरिबाला दे शक्ती
कशी करावी पूजाअर्चा? कशी करावी सांग तुझी भक्ती

नको पाहुस ईश्वरा अंत इतका, जगणे होईल मातीमोल
विघनहर्ता तुज म्हणू कसे? तुझे अस्तित्व हाच तर नाही ना झोल?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “तुझे अस्तित्व हाच झोल

  1. techyin

    I was suggested this web site by my cousin Im not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble You are incredible Thanks

  2. ibomma

    Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do so Your writing taste has been amazed me Thanks quite nice post

  3. forbesblogs

    Hello my loved one I want to say that this post is amazing great written and include almost all significant infos I would like to look extra posts like this

  4. streameast

    Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website

  5. streameast

    Hello i think that i saw you visited my weblog so i came to Return the favore Im trying to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

Comments are closed.