दिवाळी पन्नास वर्षांपूर्वी

दिवाळी पन्नास वर्षांपूर्वी

गोविंदाsss गोविंदाsss, गोविंदा गोविंदा अशी मोठी आरोळी ऐकू आली की आम्ही अंथरुणातून ऊठत असू, पण अंथरुणा बाहेर यावे असे वाटत नसे इतका गारवा हवेत असे. नऊ, दहा वर्षाचं वय, त्यामुळे प्रत्येक सणाचा उत्साह दांडगा असे, त्यातही दिवाळी सणाची तयारी आठ दहा दिवस आधी सुरू होई. घरासमोरील अंगणात लाल माती आणून चौरस ओटा बनवला जाई. या ओट्यासाठी माती खणून आणणे, त्यातील ढेकळे फोडून माती भूसभूशीत करणे, तिला चांगले शिंपून ती एकजीव करणे आणि लाकडी चोपण्याने चोप काढून सपाट करणे या क्रिया उरकल्यावर ओटा किंवा ओटी तयार होई, तिला रोज सकाळी वातावरण थंड असताना चोप दिला की तिला भेगा न पडता ती तुळतुळीत दिसत असे. दररोज शेणाने सारवले की त्यावरती किमान दोन बोटे रांगोळी ओढली की ओटी ठसठशीत कुंकू लावलेल्या नवतरुणी प्रमाणे दिसत असे. दिवाळी सण साजरा करता यावा म्हणून वर्षभर आई काटकसर करून चार पैसे बाजूला ठेवत असे. तेव्हा प्रपंच मोठा असल्याने सेव्हिंग, बँक अकाऊंट असे शब्द वडिलधाऱ्या मंडळींना माहिती नव्हते. जी काही बचत असेल ती ट्रंकेत एखाद्या पितळेच्या डब्यात वडील ठेवत. आईचे बचत केलेले पैसे कुठे ठेवते हे कोणासही कळत नव्हते. पण पिठाच्या डब्यापासून ते चिंध्यांच्या बोचक्या पर्यंत कुठेही पैसे ठेवे आणि कधी कधी हे पैसे शोधणे जिकरीचे होई. दोन वेळी पुरेसे अन्न हीच तेव्हाची प्राथमिक गरज असल्याने आईच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कुणीही प्रयत्न करत नसे. असे हे वाचवलेले पैसेच सणावाराला तिला उपयोगी पडत. या पैशांतून आधी वाणसामान आणून जर शिल्लक राहिले तर गरजेनुसार मुलांसाठी कपडा विकत आणून त्याचे कपडे घरच्या घरीच आई शिवत असे.

दिवाळीच्या फराळाचे पदार्थ मात्र नरक चतुर्थीच्या आधी तयार करण्याची तिची धडपड असे. भाजलेल्या चण्याचे पिठ आणि गूळ यांच्या करंज्या, मुगाचे गुळाच्या पाकातील लाडू, शंकरपाळ्या, भाजणीची चकली कडबोळी, रव्याचे घरच्या तुपात भाजून केलेले लाडू, बेसन लाडू, त़ांदुळ भिजत घालून केलेले खसखस चवीचे गोड अनारसे, भाजक्या पोह्याचा चिवडा असे सर्व पदार्थ रात्र जागून ती तयार करत असे. दिवसा ती घरातील कामे उरकून थोरामोठ्यांच्या घरी फराळ बनविण्यासाठी मदतीस जात असे. हे पदार्थ तयार होतांना पहिला लाडू, करंजी, चकली जे त्या दिवशी बनेल ते देवास दाखवले जाई आणि नंतरच चव पाहण्यासाठी दिले जाई. त्यानंतर नरकचतुर्दशीच्या दिवशीच डबा उघडे. यामुळेच आम्हाला या दिवसाची प्रतीक्षा असे. आदल्या रात्री लवकर झोपलो तरी कधी एकदा पहाट होते असे होत असे. सकाळी आई नंतर वडील उठून अभ्यंगस्नान करत. तेव्हा आई वर्षांतून एकदा त्यांना आपल्या हाताने उटणे लावी. हे उटणे ती स्वतः आवळा, बेसन, अत्तर असे एकत्र घेऊन बनवत असे. ओवाळत असे. वडील तीन साडेतीन वाजता ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंगस्नान करीत. नरकचतुर्दशीच्या दिवशी गावात लवकर कोण उठते याची चढाओढ लागे आणि गोविंदा गोविंदा आरोळ्यानी आसमंत दणाणून जाई, खुराड्यातून कोंबडेही बांग देऊन साद घालत. कोणकोण उठले हे त्यांच्या गोविंदा गोविंदा आवाजावरून कळत असे.

वडील ऐपतीप्रमाणे फुलबाजे, लवंगी माळा, भुईचक्र, डांबरी फटाके आणत. स्वतःसाठी एक अँटमबाँम्ब चा बाँक्स आणून ठेवत. मोठ्या काटकसरीने तो बाँक्स तुळशीचे लग्न होईपर्यंत जपून वापरत असत. जे फटाके फुटत नसत ते शोधून काढून आम्ही त्याच्या सुरसुरी करत असू. फुलबाजाच्या पाठची तार वाकवून, पेटता फुलबाजा आम्ही झाडावर फेकत असू,तिथे तो फांदीवर अडकला की मनोहारी दृष्य दिसे. असे दोनचार फुलबाजे झाडावर अडकवले की झाडावर नक्षत्र चम चमल्याचा भास होई. एकदा आमच्या शेजारी रहाणारे बंगाली गृहस्थ फटाक्यांचे विमान पेटवत होते, त्याची दिशा चुकली आणि ते त्यांच्या पॅन्टमध्ये शिरले, दुर्दैव त्यांचे, पूढचा महिनाभर ते नीट झोपू शकत नव्हते. 

गावात या काळात जागोजागी भाताची उडवी रचून ठेवलेली असत त्यामुळेच फटाके पेटवून उडवताना खुप काळजी घ्यावी लागे. १९७४-७५ साली दुष्काळ होता, फारशी पीके आली नव्हती आणि अशातच कोणा जवळून फटाका रचून ठेवलेल्या भाताच्या उडव्यावर पडला आणि त्याने पेट घेतला, नशिबाने लोक धावून मदतीला आले म्हणून केवळ भाताचे उडवे जळाले, त्यातील भात काढून पेंढा रचला होता परंतू गूरांचे गवत जळून नष्ट झाले. लेख लिहिण्याच्या निमित्ताने अशा अनेक कडू गोड आठवणी अचानक दाटून आल्या.

आम्ही मुले अभ्यंगस्नान आटोपून नवे कपडे घालून फटाके फोडण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करत असू मात्र वडील तुळशीकडे पहारा द्यावा तसे उभे राहून आमच्याकडून कडू चिराटे फोडुन घेऊन त्याची कडवट चव चाखायला लावत. अगदी नाईलाजाने आम्ही नरकासुराचा प्रतिकात्मक वध चिराटे फोडून करत असू, तेव्हा कोण हा नरकासुर? आणि त्याला का बरे मारायचे? हा प्रश्न आम्ही कधी पालकांना विचारला नाही. त्यांनी कधी हा प्रसंग सांगितला नाही.

 एकदा फटाके फोडताना एक धुऊन वाळवत ठेवलेला रिकामा डबा मी डांबरी फटाक्यावर ठेवला आणि पेटवला जोरदार आवाज झाला आणि डबा उंच उडाला. त्या डब्याची जी तऱ्हा झाली ती पाहून त्यानंतर आईने माझी पाठ शेकून काढली. दुसरा प्रसंग घडला तेव्हा मी चवथीत होतो. आमच्या गावात बरीच गाढवे होती, दगड वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराने आणली होती. तेव्हा माल वाहतूक करण्यासाठी टेंपो नव्हते. एका मित्राने गाढवाच्या शेपटीला डांबरी फटाक्यांची माळ बांधली आणि पेटवली, बिचारे गाढव भितीने गावभर पळत होते. ठेकेदारांनी त्या मुलाच्या घरी तक्रार केली. त्या मित्राच्या वडिलांनी त्या मुलाला शंभर उठाबशा काढायला सांगून त्याचे गाढव केले. त्यानंतर सर्व मित्र त्याची चेष्टा करत म्हणायचे,  “चल, गाढवाच्या शेपटीला फटाके बांधू.” तो रागावून अंगावर यायचा.

नरकचतुर्थीला आमची आई चार वाजताच उठायची, सर्वांच्या आंघोळी झाल्या की देवपूजा करून, रांगोळी काढायची. मदतीला ताई असल्याने ठिपक्यांची रांगोळी हातोहात उरकायची. ताई रांगोळीत सुंदर रंग भरायची.  साडेआठ पर्यंत आईचा फराळ तयार होत असे, तिखटे पोहे, गूळ पोहे, दही पोहे, ऊसळी, करंज्या, चकली, बेसन लाडू, रवा लाडू, चिवडा, शंकरपाळे, चिराटे, अनारसे असे केळीचे पान भरले की मग वडील नैवेद्य दाखवत. प्राणय स्वाहा,उदानाय स्वाहा,समानाय स्वाहा,——आम्ही आपले त्यांच्या फिरणाऱ्या हातावर कधी एकदा नैवैद्य दाखवून संपवतात म्हणून वाट पहात असू , एवढयात आईची हाक ऐकू येई, “या रे इथे हा फराळ पाड्यात पोचवा.” 

दहा बारा फराळाच्या पूड्या बांधून तयार असत आणि आई आम्हाला भरा भर नाव सांगत सूटे, “हा सुबाला, हा मनाला, हा कंबाला, हा जानकीला” तिची यादी संपत नसे. आम्ही घरोघरी जाऊन दिवाळीचा फराळ वाटत असू, हे गरीब लोक सिताफळ, करांदे, कणक प्रेमाने आम्हाला देत. हे वाटप संपवून आम्ही घरी धूम ठोकत असू.

तिकडे केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ आम्हाला खुणावत पण आईच्या आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी आम्ही सूटत असू. कधी एकदा तो फराळ वाटून होतो आणि आम्ही पानावरच्या पदार्थांचा फडशा पाडतो असे होई. एकदाचे फराळ वाटप संपवून आम्ही खायला बसत असू आणि आई समोर उभी राहून म्हणे “आधी, वदनी कवळ घेता म्हणा, फराळ काही पळून जात नाही” , आम्ही वरच्या पट्टीत वदनी कवळ कसे बसे ओढून काढत असू. आमच्या पानावर तुटकी चकली, जास्त भाजलेली शंकरपाळी, अर्धा लाडू, एकदा मी आईला विचारले, आपल्या शेजारी पाजारी आणि पाड्यात वाटायला तू चांगले पदार्थ देते आम्हाला हे जळके तुटलेले, अर्धा लाडू असे का?आई म्हणाली दुसऱ्याला देतांना चांगल तितकं द्यावं, आपण फराळ वाटत नाही आपले संस्कार वाटतो, दुसऱ्याला दिल्याने पुण्य पदरी पडतं. तुमची आजी म्हणायची “आपण गोर गरीबांना दिले तर देव आपल्याला देतो.” या संस्कारात वाढल्यामुळे मी, माझं, मला, हा अहंकार झाला नाही. गरीबी सर्वांच्या घरी होती पण एकटे उपभोग घेण्याचा संकुचित दृष्टिकोन नव्हता.

आता गावाची शहर झाली, दिवाळीच्या दिवशी “गोविंदा गोविंदा “अशी आरोळी ऐकू येत नाही, दिवाळी फराळाची देवाणघेवाण होत नाही, वहिनी आणखी एक चकली द्या बरं, चांगल्या खुशखुशीत चविष्ट झाल्यात चकल्या असही कुणी म्हणत नाही. दिवाळीच्या शुभेच्छा WhatsApp वर येतात, फराळाचे पदार्थ इमेज किंवा फोटो दिसतात. वाटतं, जगणंच तर आभासी होणार नाही ना? हे सणांच स्वरूप उत्सव पध्दतीने डोंबिवली, गिरगाव, गोरेगाव, पूणे येथे दिवाळी पहाटेच्या स्वरूपात साजर केल जातं ही चांगली बाब आहे पण त्यात मनोमिलन, आपलेपणा किती आणि  दिखाऊपणा किती ते फक्त तेच जाणोत! या वर्षी करोनाचे संकट जगभर आले आणि जगण्याचे संदर्भच  बदलले.सर्व सामान्य नागरिकांना प्रवासाची साधने बंद झाली. ना दिवाळी पहाट ना भेटी गाठी, सर्वच आभासी, नात्याचाच संकोच होणार नाही ना! ही भिती खरी न होवो हीच ईश्वराकडे प्रार्थना.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

31 thoughts on “दिवाळी पन्नास वर्षांपूर्वी

 1. Sachin kale

  लहानपणीचे दिवस आठवले, कोकणातील दिवाळी चलचित्र रुपाने डोळ्यासमोरून जणूकाही प्रवास करीत होती.

 2. किशोर डांगे
  किशोर डांगे says:

  एकदम भारी अनुभव वर्णन आमच्या वाट्याला थोडया फार प्रमाणात अनुभव आलेले शेवटची दर्शवलेली भिती मात्र खरीच वाटते

 3. Mohanchandra Samant
  Mohanchandra Samant says:

  ,,,??

 4. Mangesh kocharekar
  Mangesh kocharekar says:

  Dange ,Mohan
  Thanks for complement

 5. 720p

  Way cool! Some extremely valid points! I appreciate you penning this write-up and also the rest of the website is really good. Sue Torrin Hungarian

 6. yetiskin

  Thank you ever so for you blog article. Really thank you! Fantastic. Caitrin Garrot Edd

 7. sikis izle

  I am incessantly thought about this, regards for putting up. Aleta Mateo Bubalo

 8. 720p

  I saw a lot of website but I believe this one has got something extra in it. Audy Keir Justus

 9. sikis izle

  I have been examinating out some of your articles and i can state nice stuff. I will make sure to bookmark your blog. Karol Devy Intisar

 10. sikis izle

  Thanks again for the post. Really thank you! Great. Elianore Royall Gorlicki

 11. bedava

  I have read so many articles about the blogger lovers but this piece of writing is genuinely a pleasant post, keep it up. Talia Osbert Jone

 12. indir

  Hurrah! After all I got a webpage from where I know how to actually take helpful facts regarding my study and knowledge. Carita Thaine Eldredge

 13. torrent

  Article writing is also a fun, if you know then you can write or else it is complicated to write. Joell Zerk Squier

 14. web-dl

  Very good post. Really looking forward to read more. Much obliged. Rhea Eal Kone

 15. bedava

  Wow talk about crafty! These came out so pretty and I love the colors. Would look great in any yard or patio. Gilly Marv Gisela

 16. bedava

  I was reading some of your blog posts on this website and I believe this website is rattling instructive! Continue posting. Sherill Jerrold Hirsh

 17. web-dl

  Dr Gladys Loggin-Folorunsho Is a very close and personal friend to me. Tiphanie Skippy Ezri

 18. torrent download

  Hi there very cool website!! Man .. Beautiful .. Wonderful .. Alfy Ches Florin

 19. hint filmi izle

  Hello. This post was really interesting, particularly since I was searching for thoughts on this matter last Wednesday. Alysia Worth Maxantia

 20. 1080p

  Hi there very cool blog!! Man .. Excellent .. Wonderful .. Deeann Yuma Wertheimer

 21. netflix

  I think other web site proprietors should take this website as an model, very clean and excellent user friendly style and design, let alone the content. You are an expert in this topic! Genna Eduardo Steffane

 22. bluray

  I precisely needed to appreciate you once again. I am not sure the things that I might have gone through in the absence of the entire pointers documented by you directly on such a problem. It had been a very frightening difficulty in my circumstances, however , looking at the skilled manner you managed that made me to jump over fulfillment. I am happier for this help and even hope you find out what a great job you are doing instructing others through the use of your site. I know that you have never encountered all of us. Shelagh Rochester Gord

 23. altyazili

  How could I write blogs or articles and get paid for it? Alysa Read Ernie

 24. diziler

  Good article. I will be facing a few of these issues as well.. Agretha Barn Lisette

 25. altyazili

  I am grateful for your friendship! Grateful for your wonderful blog! Happy Thanksgiving! Rey Clemente Linet

 26. dublaj

  Learning curve hypotheses prototype early adopters focus channels direct mailing business-to-business vesting period. Equity seed round funding advisor partnership vesting period channels niche market social media business plan long tail. Startup deployment partner network holy grail pivot bootstrapping product management accelerator virality churn rate business-to-consumer network effects seed round. Influencer client startup. Kalinda Mohammed Hashim

 27. 720p

  Keep the fight going neighbours. They had no right in doing this. Leaving a dent in our community. A fine in the millions and public apology on the news from the owners is the least they can do! Dorita Cazzie Thierry

 28. hindi movie

  I cannot thank you enough for the article post. Thanks Again. Awesome. Konstance Teodoor Witt

 29. dizi

  Hi Jane, thank you for stopping by and please stay tuned. Antonina Edgard Quitt

 30. bedava

  You have observed very interesting points! ps decent site. Amelie Robinson Warfore

 31. amateur

  If some one wishes expert view about running a blog afterward i suggest him/her to visit this webpage, Keep up the pleasant job. Rita Carlin Julius Tommie Elnar Ezzo

Comments are closed.