निकाल

निकाल

तो मुलाचा बारावीचा ऑन लाईन निकालाचा दिवस  होता. त्यापूर्वी चार दिवस  कुठे प्रवेश घ्यायचा? कोणते कॉलेज चांगले? कुठे चांगल्या Faculty आहेत या विषयी चर्चा होत होती. मुलाने स्वतः कॉलेजविषयी बरीच माहिती काढली होती. काहींचा Campus चांगला होता, तर काही कॉलेजमध्ये चांगले infrastructure होते, तर काही कॉलेजचा staff चांगला होता. काही कॉलेजमध्ये campus interview साठी कंपन्या स्वतः येत होत्या. यातून निवड आपल्याला करावी लागणार होती. अर्थात जर JEE चा निकाल Favourable आला तर! आणि मला याच, “तर” चे टेंशन होते.

मुलाच्या क्लास साठी पाच लाख मोजले होते, वर्षभर आम्ही स्वतःवर Control ठेवला होता. ना कुठे जाणं ना कुणाच येणं. गेल्या दोन तीन वर्षांत  अगदी गरज असेल तेंव्हाच नाना आले, येऊन तातडीने गेले होते. नातवाच्या प्रगतीआड नको रे बाबा, एक वेळ मुलगा परवडला पण नातू त्याची बातच नको. मी ऑफिसमध्ये जाईन म्हणत होतो पण मुलाचा Result आणि बाप office ला काही Responsibility आहे की नाही? असं अगदी माझा ऑफिस प्युनही  म्हणाला असता.

दुपारी बारा नंतरच ऑनलाइन लिंक ओपन होणार होती. आता फक्त आठ वाजले होते म्हणजे अजून किमान चार तास वाट पाहावी लागणार होती. ऑफिसमध्ये फोन करून काही अर्जंट काम नाही ना म्हणून फोन करावा म्हटले म्हणून मोबाइल हाती घेतला तर स्क्रीनवर व्हाट्सअप मेसेज दिसला तो मुलाचा होता. मी मेसेज ओपन केला आणि तो पूर्ण वाचण्यापूर्वीच मोबाइल माझ्या हातून खाली पडला. पुढे काय झाले ते मला कळलेच नाही.

जेव्हा कळले तेव्हा मी  हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला होतो. तोंडावर मास्क, हाताला सलाईन आणी छातीवर असंख्य वायरच जाळे अशी माझी अवस्था होती, असाह्य पणे छताकडे नजर लावून होतो. माझ्या शेजारी माझा लहान भाऊ आणि त्याची बायको बसली होती. थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांनी स्क्रीन पाहून माझ्या भावाला काहीतरी सांगितल्याचे मी पाहिले. नर्सने माझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि हळूहळू मला मोकळे केले. “समीर कस वाटतय? Are you comfortable ?” माझ्या बंधूंनी मला विचारलं. मी त्याच्याकडे पाहून हसलो. “अरे अभिजीत, मला झालंय काय ?आणि मी इथे कसा ?”

तो हसला,”अरे दादा, तुला थोड बर नव्हत,म्हणून तू इथे अँडमिट होता. तुला काही आठवतं का?” मी डोक्याला ताण देऊन पाहिलं पण  मला काही, काही म्हणून आठवत नव्हते. थोड्या वेळाने अभिजीतच्या बायकोने मला ज्यूस आणला, मी तो अगदी हळूहळू प्यायला. थोडी तरतरी आली. “अभिजित, मी हॉस्पिटलमध्ये का? तुझी वहिनी कुठे? आणि कुणाल कुठे?” कुणालाच नाव आठवता आठवता मला अचानक मागची घटना आठवली, मी जोराने ओरडलो कुणाल,बेटा कुणाल!  –नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही.

जेव्हा पुन्हा मला कळू लागलं तेव्हा मी बऱ्यापैकी सावरलो होतो अस अभिजित म्हणतो. आता मी बहुदा घरी होतो. माझ्या आजूबाजूस माझी बायको स्मिता, मुलगी स्नेहा, आमचे नाना,आई, माझी बहिण ऐश्वया तिचा नवरा असे सगळे होते. नव्हता तो कुणाल–त्याचा माझ्या इर्षेन बळी घेतला होता. कुणाल जन्मताच अतिशय हुशार होता. सेंट मायकेल स्कूलमध्ये त्याच दहावी पर्यंत शिक्षण झालं होतं. फक्त अभ्यासात नव्हे तर Sports,Cultural, Debets, Science Exhibition अश्या कित्येक अँक्टिव्हिटीमध्ये तो winner किंवा runner up असायचा. त्याची तयारी आम्ही अशी करून घ्यायचो की त्यांनी कधी पराभव पहिलाच नव्हता.  मग ती वर्गातली परीक्षा असो की मैदानावरचा सामना. स्टेज वरचे भाषण असो की आंतरशालेय विज्ञान स्पर्धा. शाळेच्या फलकावर त्याचंच नाव लिहिलं जायचं मग इव्हेंट कोणताही असो. या सर्व गोष्टीची आम्हाला खूप सवय झाली होती.

कुणाल नववीत गेला तेव्हा एक दिवस माझ्या समोर बसवत मी त्याला म्हणालो, “बेटा कुणाल, पुढची चार वर्षे तुझ्यासाठी आणि आपल्या family साठी फार महत्वाची आहेत. आपण रेसोनन्स क्लास ची निवड केली आहे आणि ते composit study स्टार्ट करणार आहेत, Are You ready?” कुणालने यंत्रवत मान हलवली, त्याला आनंद झाला की नाही हे मी लक्षात घेतलं नाही. आमच्या मनात आणि स्वप्नात एकच ध्येय होत, डॉक्टर, डॉक्टर आणि डॉक्टर. त्याला डॉक्टर बनवण्यासाठी MH CET  परीक्षेसाठी तयार व्हावा म्हणून त्याची तयारी सुरू झाली. 

सकाळी सात पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याचा सतत अभ्यास सुरू असे. नाही म्हणायला कधीतरी क्रिकेटचा आयपीएल, वन डे तो पहात असे पण ते क्रिकेट पाहताना त्याच अर्धे लक्ष टाईम टेबल पाळण्याकडे असे. सण, समारंभ यात तो शरीराने असला तरी मनाने मात्र तो वेगवेगळे थिअरम, फॉर्म्युला यांच्या गराड्यात असे. इतर मुले मैदानात मस्त क्रिकेट खेळत असताना तो डेफिनेशन , डेरिव्हेटिव्हज, इक्वेशन यांची प्रॅक्टिस करण्यात गुंतलेला असे. मलाही आता त्याच हे बिझी वेळापत्रक पाहून वाईट वाटे पण The bell had rung already. He was on  Voyage of his career and has destination yet to achieve.

क्लाससमध्ये मध्ये दर आठवड्यात टेस्ट असे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी त्याची  बिकट अवस्था आम्ही  आमच्या स्वप्नापाई केली होती. कुणाल त्यात भरडला जात होता. तो जेव्हा टीव्ही समोर असे तेव्हा निवांत टीव्ही पाहू देण्याऐवजी त्याचा वेळ किती महत्वाचा आहे हेच त्याला ऐकवत असू. तो क्लास मध्ये पहिल्या तीन Rank मध्ये असे.  त्यालाही आपण जिंकलं पाहिजे आपली Rank सुधारली पाहिजे याचा जणू ध्यास लागला होता. SSC exam मध्ये त्याला 92% मिळाले तरीही आम्ही त्याच्या इतर मित्रांना किती मिळाले त्याची चौकशी करत राहिलो.  92 % is not enough अस ऐकवत राहिलो आणि तो ही बिचारा,  “Sorry Dad I will try for better performance next exam.”  असं म्हणत मला आश्वस्त करत राहिला. अकरावीत त्याला 85 %पडले तेव्हा असं हे होणारच हे माहित असूनही ना आम्ही सेलिब्रेट केलं ना त्याला धीर दिला. PCMB च ओझ घेऊन धावण सोप्पं नव्हतं आणि त्याचे पर्सेंटेज कमी झाले ते Language मुळे. जेमतेम चार सहा दिवसाचा Vacation घेऊन आम्ही पाचगणी येथे जाऊन आलो. त्याला थोड Relax वाटावं असा आमचा प्रयत्न होता. सोबत पूर्ण फॅमेली होती. तिथे निघतांना त्यांनी क्लास च्या नोट्स घेतल्या तेव्हा “ही” त्या नोट्स बाजूला करत म्हणाली, “कुणाल, बेटा नो नोट्स, नो स्टडी, ओन्ली enjoying, तुला हव तर Comics घे, Novel घे पण सिरियसली नो स्टडी मटेरियल.” “Mama,do you know, what  Dad will think?  I am not a responsible guy,  I don’t want to see him unhappy.”

तो हे जेव्हा म्हणाला तेव्हा माझ्यातला बाप नाही पण सह्दयी माणूस जागा झाला असता आणि त्याला जवळ घेऊन मी म्हणालो असतो, की “पिल्ला, “You are precious for us and not your rank,.” पण माझ्यातील अहंकारी बाप काही म्हणाला नाही, क्लास वरती खर्च केलेले लाखो रुपये प्रेमाआड येत होते. त्याने ममा म्हणाली म्हणून स्टडी मटेरियल घेतले नाही पण त्याचा Tab सोबतच होता आणि खात्रीने तो Tab वरती Novel वाचणार नव्हता किंवा Game खेळणार नव्हता.

आम्ही पाचगणीत पोचलो. थ्री स्टार हॉटेल बुक केले होते. सूट प्रशस्त होता. सुंदर गार्डन होते, स्विमिंग पूल होता सगळं काही होत तरीही कुणाल आनंदी दिसत नव्हता. त्याची आई त्याच्या अवती भवती राहून त्याला प्रोत्साहन देत होती. स्नेहा त्याला ओढून नेत होती पण तरीही तो मोकळ्या मनाने सहभागी होत नव्हता. स्नेहा त्याच्या मागे, “ए दादा चल ना स्विमिंग करू. मला हेल्प कर ना अशी विनवणी करत होती. अगदी नाईलाज म्हणून कुणाल तिच्या सोबत पूल मध्ये उतरत होता. सर्वांनी ट्रिप एन्जॉय केली, टेबल टॉप वर मस्त मजा केली, फोटो काढले, हॉर्स रायडिंग केले.

कुणाल शरीराने आमच्या बरोबर होता. मनान मात्र तो त्याच्या derivation, equation, formule, figures circuits graphs यांच्या गराड्यात वेढलेला होता. ते आठवण्याचा प्रयत्न करत असावा अस वाटत राही. कधी तरी खळाळून हसत होता तर कधी अचानक सिरीयस होत होता. तो शरीराने आमच्या सोबत होता पण मनाने?

पाच दिवस असेच उडून गेले आणि Way back to our destination आम्ही घरी परतलो, मी माझ्या ऑफिसमध्ये बिझी झालो. ती तिच्या. पुन्हा एकदा कुणाल आणि त्याची study Room. चार दिवसांनी त्याचे क्लास शेड्युल सुरू झाले आणि रोज सहा तास क्लास आणि  घरी self study करता करता तो फक्त dyening टेबल वर नास्ता आणि dinner  याच वेळात भेटू लागला. त्याची ममा, दुपारी त्यांने लंच घेतला का? कुठे काय ठेवलंय ते सांगत होती, तो फ्री नसल्यास Whatsapp करत होती.

स्नेहा त्याला घरी असेल तेव्हा lunch ची आठवण करून देत होती पण तो Yes, I hear you, go let me finish this chapter I will have my lunch when I will be free.” म्हणत तिच्या अंगावर ओरडत होता. त्या अभ्यासाने त्याला झपाटून टाकले होते. तेव्हा तो किती तास अभ्यास करतो हे मित्रांना सांगून मी अप्रत्यक्ष माझेच कौतुक करून घेत होतो. त्याने मेहनत घ्यावी म्हणून 

Low aim is  a crime अस पुस्तकी वाक्य ऐकवत होतो, आंबेडकर, नरेंद्र जाधव यांनी किती adverse condition मध्ये अभ्यास केला. How they achieved their Goal  हे ऐकवत होतो. पण ते गोल त्यांनी स्वतः ठरवले होते पालकांनी त्यांच्या माथी मारले नव्हते हे सोईस्करपणे लपवत होतो.

त्याने बारावीला झपाटून अभ्यास केला, Weekly Test, Quarterly exam, प्रत्येक गोष्ट तो सिरियस घेत होता कॉलेजमध्ये तो कधी तरीच जात असे. seriously फक्त Science pract अटेंड करायला जाव लागे,  त्यामुळे त्याच्या वर्गात कोण मुले मुली आहेत? त्यांचे क्लास टीचर कोण? कोणत्या Activity तिथे चालतात?,  gathering होत की नाही, त्याला काही कल्पना नव्हती. त्याची Tutorial लिहून ती त्यांच्या concern teacher कडे सबमिट केली की त्यांचं काम होऊन जाई.

या Sandwich Course ने त्याचा Robot  करून टाकला होता. मी पालक म्हणून वेगळ काय मागितलं होत, “We are paying you five lakhs  in advance, we want our son should be selected for MBBS.” आणि क्लास चालकांनी It’s our commitment अस ठाम मुला समोर सांगितलं होतं. म्हणजे जर ते गोल साध्य झाले नाही तर अजाणतेपणी मुलाची लायकी निकाली निघणार होती. बहूदा या जबाबदारीच्या ओझ्यानेच तो थकला होता.

Prelim झाली तेव्हा एका एका पालकाला विद्यार्थ्यांसह बोलवून त्याचे SWOT दोन टिचरनी प्रेझेंट केले. आम्हाला बोलवले तेव्हा मी, ती आणि तो, दोन तास त्यांच्या Conceling रुममध्ये होतो. वर्षभराचा चार्ट आणि सब्जेक्ट प्रमाणे  Graphical representation त्यांनी दाखवले आणि म्हणाले, “Mr.Rande your Son Kunal is doing well. He has reach to his 80% target but he has to work hard. We suggest you should support and  concentrate on his following points.” आम्ही त्यांच्या समोर मान डोलवली. खर तर 80% टार्गेट अचिव्ह केल्याबद्दल त्याच अभिनंदन करुन त्याचा उत्साह वाढविण्याऐवजी  मी  केबीनमधून बाहेर पडताच त्याला म्हणालो, “Did you listen to them? you have to work on weak area.” कुणालने मान डोलवली, “Yes Dad.” 

घरी आल्यावर सौ. रागावली, “अहो काय तुम्हाला घरबंध आहे की नाही, तो बिचारा त्यांच्या लेक्चरने आधीच डिप्रेस झालेला, तिथेच काय सांगता आणि 80%हे कमी आहेत का? तुमचे स्वतः चे गूण पहा किती होते ते!” तीच खर होत अस आता वाटतय, पण तेव्हा मी तिच्यावर रागावून म्हणालो, “आमच्या शिक्षणावर बापाने पैसे खर्च केले नव्हते. मी पाच लाख भरलेत ते ही अँडव्हान्स.” मी पैशाचे म्हणालो तशी ती चिडून म्हणाली, “कोणासाठी कमावता? मुलांसाठी की स्वतःसाठी.एकदा ठरवा. दहा वेळा तेच तेच ऐकवू नका. मुलांपेक्षा पैसे मोठे नाहीत.” त्या नंतर पुढचे दोन दिवस आमचे संभाषण नव्हतं.याचाही परिणाम बिचाऱ्या कुणालवर झाला अस आता वाटते.

त्यानंतर तो झपाटून अभ्यासाला लागला. सकाळी किती वाजता उठे ते कळत नसे पण  त्याच्या स्टडी रूम मधील लाईट नेहमी पेटत असे. चहा नास्ता यासाठी सुद्धा तो रूम बाहेर येत नसे त्याची ममा त्याला नेऊन देई. रात्री डिनरसाठी तो आला नाही तर आम्ही वाट पहात असू. तो अगदी थकलेला दिसे. त्याची ममा त्याच्यासाठी, दूध, फळे सगळं आठवणीने देत असे पण मी त्याच्यासाठी मुद्दाम वेळ काढून त्याची चौकशी करत नव्हतो. त्याने काही खाल्ल की नाही, तो वेळेत झोपतो की नाही याची चौकशी देखील करत नव्हतो.

जानेवारी महिन्यात Practical Exam सुरू झाल्या तसा तो रिलॅक्स झाला. त्याचा चेहरा थोडा प्रफुल्लित दिसू लागला. कधी तरी Hello, Hi  करू लागला. ते पाहून त्याच्या आईचा जीव भांडयात पडला. आता तो डिनर साठी वेळेवर हजर राहू लागला कधी कधी तो किचनमध्ये जाऊन  ममा काय करतेस आज? अस विचारू लागला. त्यामुळे घरातील वातावरण मोकळ झालं. मी त्याला अभ्यास कसा चालला आहे हे विचारायचे नाही असे ठरवले होते तरी चुकून एक दिवस माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडले, “Kunal how is everything? I hope you have covered your target?”

त्या दिवसानंतर तो पुन्हा पहिल्या सारखाच तणावग्रस्त दिसू लागला. मी एक दिवस त्याच्या स्टडी रुममध्ये जाऊन चौकशी केली, “कुणाल तुला माझी काही मदत हवी का? नाही म्हणजे तू म्हणत असशील तर मी रजा टाकतो.” त्यांने माझ्याकडे पहात दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, “No Dad, thanks.” त्यानंतर त्याची Exam सुरू झाली. तो नियमित येऊन आमच्या पाया पडत असे, मी शांत डोक्याने पेपर लिही असा सल्ला देत असे पण या व्यतिरिक्त फारसे बोलणे नव्हते. सर्व सबजेक्ट त्याला चांगले गेले होते except Chemistry. पहाता पहाता पेपर संपले. खर तर गेले चार वर्षे तो फारशी उसंत न घेता टार्गेट मागे धावत होता. परीक्षा संपल्यावर चार दिवस रिलॅक्स व्हायला हरकत नव्हती पण त्याला MH-CET प्रिपरेशनवर फोकस करायचा होता.

त्याच्या क्लासने पंधरा दिवसांच टाईम टेबल मेल केल होत. परीक्षा संपली  म्हणून रविवारी हिने आमरस  पूरीचा बेत केला. आई, नाना, अभी त्याची बायको सर्वांना invite केल, स्नेहाची परीक्षा सूरू होणार होती तरी तिला मदतीला हाताशी घेतल मात्र कुणाल टेस्ट पेपर सोडवण्यात व्यस्त होता. अकरा वाजता आई,नाना,अभी,वहिनी गाडीने आले. त्यांनी येताना कुणालसाठी क्रिकेटची बॅट, बॉल, हँड ग्लोवस अस सगळं किट आणलं होतं. अभिजीत त्याला स्टडी रूम मधून घेऊन आला. “कुणाल हे बघ आजोबा काय घेऊन आले,

आणि हो आज अभ्यास वगैरे काही नाही हा, आज मस्त धम्माल, दुपारी समोरच्या मैदानात जाऊ match खेळू.” तो हसला, “काका अहो पाच मे ला माझी entrance exam आहे. Time लावून पेपर सोडवावा लागतो, वेळ पुरत नाही, कधी कधी एखादा question उगाचच वेळ खातो, आणि तुम्हाला चांगलं माहीत आहे आपल्याला आरक्षण नाही, No excuse under any circumstances, you have to have it.” अभिजित हसला, “कुणाल मी पण CET दिली होती पण तुमच्या एवढी तगडी Competition आमच्या वेळी नव्हती हे खरं. बर एक दिवस रिलॅक्स हो, I promise we will not disturb you again,अरे तुझ्यासाठी आजी आणि नाना आलेत, हो ना! मग आजची वेळ थोडा अभ्यास बाजूला ठेव, ओके.” 

अभीच्या बोलण्यावर कुणाल हसला. त्या दिवशी तो खूश होता. तो दिवस सर्वांनी मस्त एन्जॉय केलं. रात्री Dinner साठी गोल्डन हेवन हॉटेल मध्ये गेलो. अभी ,वहिनी ,आई, नाना परस्पर गाडीने गेले आणि आम्ही घरी आलो. स्नेहा खुश होती बऱ्याच दिवस नंतर सर्व एकत्र आले होते. दुसऱ्या दिवसापासून कुणाल त्याच्या शेड्युल मध्ये व्यस्त झाला. सर्व कस सुरळीत असतांना हे अस विपरीत घडलं होत. CET पार पडली होती आणि मी गावी जावं म्हणून सुट्टी टाकली होती. कुणालच मेडिकल कॉलेज सुरू होण्यापूर्वी गावी जाऊन यावे, थोडा चेंज त्याला मिळेल. आंबे फणस खायला मिळतील, समुद्रावर हुंदडायला मिळेल आणि गेल्या चार वर्षाचा ताण कमी होईल असा विचार होता पण नको तेच घडलं. 

त्याचा मेसेज आठवला की डोळ्यापुढे अंधार येतो, “Dad, तुमची इच्छा मी डॉक्टर बनाव अशी होती, मी खूप प्रयत्न केला, तुम्ही पहात होताच ,बारा बारा तास अभ्यास केला पण Chemistry मला तितकंसं जमत नव्हतं त्यामुळे मी Score करू शकेन ह्याची खात्री वाटत नाही, मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी पैसे खर्च केले, ममा माझ्या सोबत अनेकदा जागली, मला झोप येऊ नये म्हणून कॉफी करून द्यायची. बिचारी खूप मेहनत घ्यायची, मला नेहमी हसते ठेवण्याचा प्रयत्न करायची पण हे आव्हान मला पेलवता आलं नाही. तुमचे पैसे  मी वाया घालवले, तुमचे स्वप्न मला पूर्ण करता येईल की नाही याची खात्री नाही म्हणून मी हे जीवन संपवत आहे. तुमच्यावर माझा राग नाही, जमल्यास मला माफ करा, आईला धीर द्या. ती वेडी आहे मुले आणि तुम्ही या द्वंद्वात कोणाची बाजू ती घेणार ? ती बिचारी जास्त गोंधळात आहे तिला सावरा. तुमचा कुणाल.”

पोलीस केस झाली, पोस्ट मार्टम् झाले,बिचाऱ्या देहाचे हाल झाले. मी शुध्दीवर आलो तेव्हा MH-CET चा निकाल समजला. तीनशे पैकी दोनशे तीस गूण मिळाले होते. पण आता सारे व्यर्थ होते. तो अगोदरच दूरच्या प्रवासाला निघून गेला होता. कुणाल! बेटा, तुझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे,होय मी अपराधी आहे. माझ्या स्वप्ना पाई मी तुझा बळी घेतला, देव मला माफ करणार नाही. खोटा अहंकार बाळगत मी माझा कुणाल गमावला.मी त्याला स्वतःचे भविष्य ठरवू दिले असते तर! पण  दुर्दैव, आता त्या ” तर “ला काही अर्थ नाही. माझ्या स्वप्नांची पूर्तता करता येणार नाही अस समजून कुणाल निघून गेला. हिला या गोष्टीचा मोठा धक्का बसला, माझी अशी अवस्था पाहून तिने स्वतः ला सावरले.

पण अती अपेक्षा आणि माझ्या जिद्दी स्वभावाने भरल्या कुटुंबाचा “निकाल” लावला होता. खरच का शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा एवढ्या महत्त्वाच्या असतात. परीक्षातील गुणवत्ता म्हणजे सर्व काही अस समजण्यातच मी चूक केली. कधीही न सुधारता येणारी चूक आणि माझ्या कुणालला गमावून बसलो. जीवनात अशा कितीतरी परीक्षांना आपण समर्थपणे तोंड देतो हा अनुभव पाठीशी असूनही मी काहीच शिकलो नाही. जीवनाच्या महत्त्वाच्या परीक्षेत मीच अपयशी ठरलो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “निकाल

 1. Kaka samant
  Kaka samant says:

  Quite interesting and a lesson to learn.

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   धन्यवाद सर.

Comments are closed.