बदल

बदल

मी माझ्या ऑफिसमध्ये कामात असतांनाच तो आला . “सर येऊ का ?” मी कामातून मान वर करून पाहिले.
अंदाजे चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा तरूण माझ्या समोर उभा होता. मुले मोठी झाली की त्यांचे चेहरे बदलतात, कधी कधी हा बदल इतका आमूलाग्र असतो की मेंदूला ताण देऊनही ओळख नाही पटत.

माझ्या चेह-यावर ओळख न पटल्याचे भाव पाहून तो म्हणाला ,”सर, नाही ना ओळखलत, मी अजित, १९९०ची बॅच, वशी बंधूंची”. हे वशी बंधू त्या वेळेस फारच प्रसिध्द होते. बरेच विद्यार्थी स्वत:ची ओळख सांगताना त्यांचा संदर्भ देत.
तेवढं वाक्य ऐकताच लखकन डोक्यात प्रसंग आठवून गेला, बोलायला नको ते बोलूनही गेलो. “अच्छा अजित म्हणजे टर्म फी न भरता त्या पैशांनी मजा केली तो तुच!” तो लाजला. “काय सर? ,काय म्हणून माझी आठवण ठेवली तुम्ही!” मी त्याचा हात हाती घेतला आणि हळूवार दाबला. “sorry दोस्ता, मला आठवतंय, दुस-या वर्षी तु आव्हान स्विकारून सर्व तुकड्यांतून बोर्डात पहिला आला होतास. तुला कसा विसरेन, ये बैस”. तो तरीही उभाच होता. तस मी त्याला हात धरून बसवलं आणि शिपायाला चहा मागवण्यासाठी सांगितलं.”सर कसे आहात? ब-याच वर्षांनी आलो, काम आणि संसार यामूळे इच्छा असूनही येणं जमलंच नाही.”

तो माझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत होता तितक्यात चहा आला. “अजित, घे चहा मग बोलू.”. अजितने चहा संपवला, “सर, तुमच्यात प्रचंड फरक पडलाय, आम्हाला शिकवणारे ,शिस्त पाहणारे सर गेले कुठे ? सर असं काय झालं?” माझ्या मध्ये झालेल्या बदलामूळे त्याच्या मनातील माझ्या प्रतिमेला धक्का बसला होता.त्याच्या बोलण्यावरून ते कळत होतं.
मी त्याच्या भावना समजू शकत होतो, ८९-९० चे त्यांचे शिक्षक हरवले होते. त्या वेळेस विद्यार्थांना आणि समाजालाही शिक्षक या व्यक्तिमत्वाबद्दल आदर होता. तो आदर टिकून रहावा या करता शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक प्रयत्न करत. विद्यार्थी उशिराने शाळेत आला आणि शिक्षकांनी शिक्षा केली तर पालक हस्तक्षेप करत नसत. परिणामी विद्यार्थी आपल्या वागण्यात सुधारणा करत असे.

१९८८- ते २००० पर्यंत मी कनिष्ठ महाविद्यालयाची शिस्त पहात असे त्या करीता मला कोणीही तोंडीसुध्दा सूचना केली नव्हती पण या बारा वर्षात कोणत्याही विद्यार्थ्यांचे पालक किंवा आमचे तात्कालीन मुख्याध्यापक यांनी माझ्याकडे या बाबत चौकशी केली नव्हती एवढा दृढ विश्वास परस्परात होता. अजित हा याच काळातला विद्यार्थी. त्याने माझ्याकडून शिक्षा भोगली होती.सहाजीकच आता २०१९ मध्ये विद्यार्थांच वर्तन पाहून त्याला धक्का बसला होता. तो चहा संपताच मूळ पदावर आला. “सर, मी आपल्या इथे येताना पाहिलं, मुल, मुली हातात मोबाईल घेऊन फिरत होती, काही विद्यार्थ्यांनी कानाला इअरफोन लावले होते, कपड्यांची त-हा काही विचारूच नका, सर हे चालतं तुम्हाला?”

मी त्याला थोडं शांत होऊ दिलं, तो माझ्याकडे पहात होता, त्याला माझ्याकडून उत्तर हवं होतं. “अजित , झालं तुझं बोलून, तु शिकत होता ते १९८९ किंवा ९० साल असावं, पुलाखालून फार पाणी वाहून गेलं. मला सांग, आता तुझा मुलगा तुझ्या बरोबर फिरायला किंवा मार्केटींगला गेला तर तुझ्याकडे काय मागतो?” तो हसला, “मुलांना बाहेर नेण फार रिस्की आहे सर, ती काहीही मागतात, पिझ्झा,बर्गर हे नाॅर्मल झालं पण कधी कधी आपण न ऐकलेली डिश, आणि खेळही मागवतात आणि हैराण करतात. आता पास्ता मी कधी खाल्ला नाही पण त्याला विरोध करून चालत नाही, मंचुरीयन, फ्राईड राईस, हे या मुलांना हवं असत घरी करुया म्हटल तर नाक मुरडतात. मम्माला यातलं काही जमणार नाही म्हणतात. नाही दिल की आपल्या इज्जतीचा पंचनामा करायला मूल मागे पूढे करत नाहीत.फारच agressive झाल्यात मुल. काय करणार!”

तो चिंतेत दिसला. मी त्याच्याकडे पहात विचारणा केली तु लहानपणी जर हा हट्ट केला असता तर काय झाले असते?” तो हसला, “आमच्या वेळेला मुलांनी म्हणजे मी हट्ट केला असता तर कमरेत सणसणीत लाथ बसली असती. आम्हाला घरी जेवण मिळत होते प्रसंगी काही गोड-धोंड मिळत होतं यातच आम्ही समाधानी होतो. कधीतरी आईकडे हट्ट करायचो तेव्हा आई काहीतरी वेगळं करायची पण कधीतरीच इतर वेळेस दोन्ही वेळेस पोटभर अन्न मिळतय यातच समाधान होत.” मी मूळ मुद्दयावर येत म्हणालो पाहिलंस ना, किती बदल आपल्याच घरात झालाय,
तेव्हा बदलाचा वेग कमी होता त्यामूळे जाणवत नव्हतं इतकंच.आता पालकच मुलांना मोबाईल देतात
त्यांना मुलांच्या संपर्कात रहाण ही गरज वाटते. तुझ्या वेळेस तू शाळेतून घरी दोन तास उशिरा गेलास तरी चौकशी होत नसे, आता मुले शाळेतल्या वेळेनुसार घरी पोचलो नाही तर पालक मुलाला फोन करून त्यांची विचारपूस करतात. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसतो त्यांचे पालक या कार्यालयात फोन करुन विचारपूस करतात. समजा असे दहा फोन आले तर उत्तर देत कोण बसणार ?”. “सर, हे खरंच कठीण आहे. मला माहित नव्हतं की किती गंभीरतेने विचार करावा लागतो, तरीपण कानाला हेडफोन किंवा इअर फोन लाऊन मुलं फिरतात ते नाही पटत, यांचे कान बंद असतील तर ते तुमच्या सूचना कशा ऐकणार?”. “खरं आहे तुझं, पण त्यांना शिस्त लावणं आता अवघड झाल आहे, जर तु मुलांचे कपडे, त्यांचा मोबाईल यावर बंधन घातली तर मुलं अशा काॅलेजात प्रवेश घ्यायला येणारच नाहीत, त्यांना ही बंधन नकोच असतात. मुख्यतः म्हणजे पालकही मुलांची ही मागणी रास्त समजतात. मोबाईल नसणं हे गांवढळ असल्याचं मानलं जातं किंवा पालकांची एवढीही ऐपत नाही असंही समजलं जातं.”

आमचं बोलणं चालू असतांनाच मिश्रा मॅडम एका विद्यार्थाला घेऊन आल्या. विद्यार्थांचे केस विस्कटलेले होते चेह-यावर पेनाने ओरबाडल्याच्या खुणा होत्या. “सर, हा यतीन परब, आज याने दोन मुलांना वर्गात मारलं मी वर्गावर गेले तेव्हा हा गौरव कोयंडेच्या पोटावर बसून मारत होता. सर, आता पर्यंत चार वेळा शिक्षा करून झाली.एक आठवडा घरी ठेवल, वर्गात घेतलं नाही पण सर त्याच्यात काहीच फरक पडलेला नाही. तुम्हीच पहा काय करायचं ते.सगळे शिक्षक कंटाळलेत याला”.

“बरं मी पाहतो, जा तुम्ही वर्गावर, याला थांबू दे इथे”. माझ्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही. “सर याच्या मुळे माझा तास फुकट जातो, हा वर्गात नसला तर वर्ग शांत असतो, सर प्लीज ह्या विद्यार्थांचा निर्णय घ्या.” मी आश्र्वासक नजरेने मॅडमकडे पाहील, त्यांच्या चेह-यावर नाराजी दिसली.मी पुन्हा त्यांना हळू आवाजात म्हणालो,”मिश्रा, आय विल सी हिम ,डोन्ट वरी”. तसं त्या स्माईल देऊन निघून गेल्या, अजित गोंधळलेलाच दिसला. तो माझ्याकडे पाहत होता आणि यतीन आम्हा दोघांकडे खाली मान घालून आळीपाळीने पाहत होता.

मी खुर्चीतून उठून माझ्या कपाटाकडे वळलो, तिथे एक बांबूची हातभर काठी ठेवली होती त्याला संपूर्ण सोलो टेप गुंडाळली होती. मी काठी घेऊन यतीनच्या दिशेने गेलो, मला पाहून त्यांनी दोन्ही हात पाठी विश्राम अवस्थेप्रमाणे घट्ट पकडले, तो गयावया करू लागला. मी त्याच्या पर्यंत पोचलो, “यतीन हात पुढे कर” माझा आवाज ऐकूनही तो मागे हात धरूनच उभाच होता. माझा आवाज वाढला, “यतीन,हात पुढे”. सपकन एक काठी ढुंगणावर जोरदार बसली तसं तो जोराने ओरडला, “सर, मारू नका, नका ना मारू, पून्हा नाही करणार मस्ती”. माझे कान तो पर्यंत बहिरे झाले होते. माझ्याच माजी विद्यार्थासमोर माझ्या शिक्षिकेने मी शिक्षा करेन की नाही याबाबत संशय व्यक्त केला होता.तो एकप्रकारे माझ्या पदाचा आणि माझ्या अनुभवाचा अपमान होता. मी सपासप आणखी चार-सहा काठ्या त्याच्या पाठीवर ओढल्या.

अजित अवाक झाला होता. मला थांबा असं म्हणण्याचे भानही त्याला राहीलं नाही. यतीन जागेवरच चुळबूळ करत होता, मार खाऊन तो निर्ढावला होता. मी त्याच्यावर ओरडलोच जा, घरी जा आणि बाबांना आणल्या शिवाय शाळेत येऊ नको.”
तो ऑफिस बाहेर निघून गेला. तसं अजित भानावर आला, “सर, केवढ मारलत त्याला, काही कमी जास्त झाले तर!” मी विषादाने हसलो, “अजित, पाहिलंस आणि ऐकलसही. त्या वर्ग शिक्षिका किती निर्वाणीला येऊन बोलल्या. आमच खरच मरण, यापूर्वी अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण बदल करायचाच नाही असं म्हटल्यावर कोण काय करणार? असो,असतात अशा केसेस, बरं तुझ कसं चाललय?” “माझं छान चाललंय, आता सायनलाच नवीन फ्लॅट घेतला. मी गणपतीला आपल्याला बोलवलं होत. या की एकदा मला बरं वाटेल”. “या वेळेस नक्की येईन बरं, तुझा मुलगा कुठे शिकतोय? कोणत्या वर्गात आहे?” “अर्णव चौथीत आहे सेंट थाॅमसला, त्याला सी.बी.एस.सी.ला प्रवेश घेतलाय, त्याची मम्मी त्याला गाईड करते. नंतर त्याला क्लासला घालणार”. त्याने त्याच्या मुलासंबंधी माहिती सांगून टाकली”. बर,तू त्याला सीबीएसई पॅटर्नला का घातला? तसं काही खास कारण?”

“माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये सर्वांची मुलं सीबीएसई पॅटर्नलाच शिकतात, अगदी नात्यातली मुलही, आणि तिथे पुण्याकडेही सीबीएसई म्हणून मी विचार केला आपलं मुल पाठी रहायला नको, सर काही चुकलं का?” “छे,रे मुळीच नाही चुकलं, पण तु शिकत होतास तेव्हा तुझ्या घरच्यांचं शिक्षणाबाबत असलेल धोरण आणि तुझं मत जसं बदललंय तसच शिक्षण क्षेत्रात असणारे शिक्षक आणि आताचा विद्यार्थी यांच्यात अमूलाग्र बदल झालाय. आता तु ज्या पेहरावात आहेस तिथे पोचायला तूला वीस-पंचवीस वर्षं लागली. तुझ्या मूलाला कदाचित पाच वर्षच लागतील आणि पूढील पिढीला हा वेग कमीच वाटेल. तु ज्या कालखंडात शिकलास त्यापेक्षा आताचा कालखंड वेगवान आहे म्हणूनच आताचे विद्यार्थी ज्या प्रकारे वेगाने स्वत: बदल करत आहेत ते आपल्या नजरेत चुकीचे वाटते”. अजीत हसला, खरं आहे सर आता टी.व्ही वर आणि मोबाईलवर ज्या वेबसिरीज लागतात आणि त्यात जे प्रेम आणि विवाह, संसार आणि घटस्फोट यांचं उदात्तीकरण करतात ते पाहून मला लाज वाटते परंतू आमच्या मोठ्या भावाची मुलं त्याची जाहीर चर्चा करत असतात तिने सोमशी ब्रेकअप केले आता तिने तनिष्क सारखा फ्रेंड निवडला किती हॅंडसम दिसतो ना! मला तो आवडतो. ही चर्चा खुलेआम चालते त्यात त्यांना काही वावगं वाटत नाही.ती भावना हळूवार आहे असंही वाटतं नाही. पाहून भिती वाटते सर, माझ्या मुलानेही असाच विचार केला तर!”
मी गंभीर झालो. खर तर हे चित्र आता शहरात मध्यम वर्गीय घरात पोचलंय म्हणायला वाव होता. आता जी मुलं तीस ते पस्तीस वयाच्या दरम्यान आहेत त्या मुला मुलींची लग्न एक तर झालीच नाहीत किंवा झाली तरी त्यांची प्रगती घटस्पोटा पर्यंत पोचली आहे. मुल नको, घरातील वयस्कर माणसांची जबाबदारी नको, आर्थिक खर्चावर आणि घरातून येण्या जाण्याच्या वेळेवर बंधनही नको.खरच समाजात हा झपाट्यानं होणारा बदल योग्य की अयोग्य हेच कळत नाही.
अजित माझ्याकडे पहात म्हणाला, “सर, आमच्या मुलांच भविष्य नक्की काय असेल याची चिंता वाटते,तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शिक्षणातील बदलाने माणूस घडतोय की बिघडतोय हेच कळेनासे झालेय. मात्र कालच्या आणि आजच्या पिढीत बदल होत आहे हे नाकारता येत नाही. सर, आजही आम्हाला आमचे शिक्षक, घरातील जाणती माणसे आणि आमच्या संपर्कातील मोठी माणसे यांच्या विषयी प्रेम कमी मात्र आदर नक्कीच वाटतो. आमच्या मुलांना असाच आदर त्यांच्या शिक्षकांविषयी आणि घरातील जेष्ठांविषयी वाटेल का ? हाच खरा प्रश्न आहे”.
त्यांच बोलणं ऐकून मन सुन्न झाले. तो उठला, पाया पडला, “सर येतो, आपल्याला भेटून आणि आपल्याशी बोलून फार बर वाटल. मनातील जळमटं निघून गेली. सर कधी तरी मन हलकं करायला आलं तर चालेल ना?”
कोणी कोणाच मन हलकं केलं ते ईश्वरालाच ठाऊक पण आजही आपले विचार या मोहमायेत वाहुन गेले नाहीत, आदर्श व्यक्तीमत्वांची ओढ आजही कायम आहे. जे संस्कार बालवयात झाले आणि तारूण्यात त्याची ओळख पटली ते टिकून आहेत हे पडताळून आतून थोडं बरं वाटल ह्याची कबूली देण्यास हरकतच नाही.
काळाच्या ओघात आणि ऑनलाईन लर्निंगच्या जंजाळात गुरु आणि जेष्ठ आणि आदर्श बदलले तरी माणूसकीची भावना आणि दुस-या व्यक्तिविषयी निर्वाज्य प्रेम न बदलो हिच अपेक्षा.भविष्यात कुणा विद्यार्थांला आपल्या शिक्षकांना येऊन भेटावस वाटेल का? आणि विद्यार्थी आलाच तर त्याच्या, आपल्या शिक्षकांविषयी काय भावना असतील? ह्या गोष्टींचा विचार करुनच मन थकून गेलं आणि मी मनाशीच म्हणालो,
” कालाय तस्मैं नम: “!

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

16 thoughts on “बदल

 1. Dominik

  Hi! This is my first visit to your blog! We are a group of volunteers and starting a new initiative in a
  community in the same niche. Your blog provided us valuable information to work
  on. You have done a extraordinary job!

 2. Angie

  Thanks on your marvelous posting! I definitely enjoyed
  reading it, you might be a great author.I will make sure to bookmark your blog and definitely will come back down the road.
  I want to encourage you to continue your great work, have a
  nice afternoon!

 3. custom t shirt

  Нello to every bodу, it’s my first pay a visit of this webрage; this web ste contains ammazing and really exсellent dɑta designed forr ᴠisitors.

 4. Joellen

  I love it when folks get together and share thoughts.
  Great blog, keep it up!

 5. Betsoft Gaming

  Simply want to say your article is as astounding.
  The clarity in your put up is just excellent and i could suppose you are a professional on this
  subject. Well with your permission let me to grasp
  your RSS feed to stay updated with impending post.
  Thanks 1,000,000 and please keep up the gratifying work.

 6. Julia

  Wonderful work! This is the type of information that are meant to be shared around the web.
  Disgrace on Google for now not positioning this put up higher!
  Come on over and visit my site . Thanks =)

 7. Francisco

  This article presents clear idea designed for the new people of blogging, that really how to do blogging.

 8. Neal

  I really like your blog.. very nice colors & theme. Did you make this website yourself or did you hire
  someone to do it for you? Plz answer back as I’m looking to create my own blog and would
  like to find out where u got this from. appreciate it

 9. Thad

  After checking out a few of the articles on your web site,
  I truly like your way of writing a blog. I saved as a favorite it to my bookmark
  site list and will be checking back soon. Take a look at my web site too and tell me your opinion.

 10. Gertrude

  I couldn’t resist commenting. Well written!

 11. Britt

  Hi there, I discovered your website by way of Google while looking for a similar matter, your web site got here up, it
  appears good. I’ve bookmarked it in my google bookmarks.

  Hi there, simply was aware of your weblog through Google, and found that it is truly informative.
  I am going to be careful for brussels. I’ll appreciate
  if you happen to proceed this in future. Numerous other
  folks will likely be benefited from your writing.

  Cheers!

 12. games lines

  Hi there very nice blog!! Man .. Beautiful .. Amazing ..
  I’ll bookmark your blog and take the feeds additionally?
  I am happy to seek out numerous useful info right here in the post, we
  want work out extra strategies in this regard, thanks for sharing.
  . . . . .

 13. Starla

  Hi there! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some
  of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I
  found it and I’ll be bookmarking and checking back often!

 14. Elmer

  Highly descriptive article, I enjoyed that bit. Will there
  be a part 2?

 15. Annie

  Admiring the time and energy you put into your
  website and in depth information you present. It’s good to come across a blog every once in a while that isn’t the same
  out of date rehashed material. Excellent read! I’ve bookmarked your site and I’m including
  your RSS feeds to my Google account.

 16. cryptocurrency bet

  This is really interesting, You’re an overly skilled blogger.

  I’ve joined your rss feed and stay up for seeking more of your magnificent post.

  Additionally, I’ve shared your web site in my social networks

Comments are closed.