बाप्पा लवकर या
कालच त्याच विसर्जन केलं आणि माझ अवसान गळालं
डोहात तो गडप झाला, त्या क्षणी काळीज दुःखाने हललं
गेले पंधरा दिवस त्याच्या तयारीत दुःख उरी लपवलं
वर्षांनी एकदा येतो, त्याला नकोच सांगूया, मनी रूजवलं
तो सर्व साक्षी, सर्व व्यापी त्याच्यापासून कुठे काय लपलं?
येणाऱ्या पाहूण्याला द्यावा, स्नेह, आनंदाचा ठेवा, मनात म्हंटलं
झाड लोट, रंगरंगोटी, मखर, आरास यात मन गुंतवलं
वाती, फुलवाती, वस्त्र करतांना दुःखाचं सावट दूर पळवलं
धोतर, पंचा, उपरणं, सोवळ धुवून सार जागीच निगुतीने लावलं
हळद, पिंजर, अबीर, गुलाल, अक्षता याने पंचपात्र नीट सजवलं
चौरंग धुवून, सुकवून, धुतवस्त्र नेसवून बाप्पाचं आसन नटवलं
मोहक रांगोळी, स्वस्तिक यांच्या भरगच्च रेषांनी अंगण फुललं
किती पत्री? किती फुल? दुर्वा, बेल, आणि तुळस सर्वच सोज्वळ
हे जमा करतांना किती पायपीट, पण भक्तांना तोच तर देतो बळ
चतुर्थीचा दिवस,झुंजूमुंजू होताच सुचिर्भुत होऊन मनोभावे पुजलं
गुळाचा खडा ,पंचामृत, फळासह दुर्वेचा मान देत उदक सोडलं
सुगंधी द्रव्य, अगरबत्ती, धूप, कापूरानी वातावरण प्रसन्न झालं
झांज कडाडली आणि आरतीच्या सुरानी त्याने मौन सोडलं
वत्सा या तुझ्या पुजा उपचारानं मी प्रसन्न, वर माग, काय देऊ?
मी हात जोडत म्हणालो तू माझ्या सोबत रहा बाकी नंतर पाहू
बुध्दी देवता, चतुरानन म्हणाला हवं ते घे पण वचनात नको ठेऊ
सात दिवस, अकरा दिवस सोहळ्याचे स्वप्न मुळीच नको पाहू
मला हवी सुटका या अतिरेकी जाचातून, तू एका जागी बस पाहू
तक्षणी त्याचे दुःख, वेदना कळली, मी म्हणालो चल फिरुन येऊ
तो म्हणाला माझा मुक्काम संपला, नको माझा उगा अंत पाहू
तुमचा झाला उत्सव, माझी परीक्षा, नको मातेपासून अंतर देऊ
पुनरागमनायः म्हणत मी हाती दह्याचा नैवेद्य जड मनाने ठेवला
मी त्याचा निरोप घेताच, भरल्या डोहात तो समोर अंर्तधान पावला
Chan
खूपच छान.सर्व चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.
मॅडम धन्यवाद
छान आहे सर
विजयजी धन्यवाद
खूप छान
प्रशांत धन्यवाद
Khup sundar 👌🙏