बीज असहिष्णुतेचे, फळ कशाचे …?
गेले काही महिने रोज न्यूज पेपर मधून विविध वाहिन्यावरून चर्चा सुरु आहे ती देशात घडणाऱ्या विविध प्रसंगाची ,त्यावर व्यक्त होणाऱ्या मत मतांतराची, मग पुण्यात एफ.टी .आय. मध्ये संचालकांच्या झालेल्या नेमणुकीबाबत असो ,विविध ठिकाणी अल्प वयीन मुलींवर झालेल्या बलात्काराचे असो कि विविध कारणाने झालेल्या आत्महत्यांचे असो. ज्या उच्च पदस्त व्यक्तींनी हे प्रश्न ज्या पद्धतीने हाताळले किंवा त्यावर मत व्यक्त केल ते पाहता प्रश्नाच गांभीर्य या उच्च पदस्त व्यक्तींना नाही कि काय अशी दाट शंका मनात येते. या घटना याच वर्षी घडल्या ,या पूर्वी घडत नव्हत्या अस काहीही नाही मग याच काळात असहिष्णुता वाढली अस म्हणायचं कारण काय ? खरच समाजातील सामंज्यश्य नष्ट झाल कि काय ? पुरस्कार वापसी पर्यंत प्रश्न चिघळला तरी त्यावर प्रधान मंत्र्यांनी जाहीरपणे आपली भूमिका न मांडल्यानी संशयाच धुक गडद झाल.जणू भारतभर घडणा-या घटनाना मोदींचा आशीर्वाद आहे. मोदींच्या मौन धारण करण्या बाबत विरोधी गटाकडून प्रचंड टीका आणि जाहीर निषेध व्यक्त झाला. या पूर्वी शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा हॉटेलमध्ये संशायाप्रद झालेला मृत्यू , घटना खुद्द दिल्लीत घडूनही तेव्हा त्याची योग्य ती चौकशी झाली नाही आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.दिल्लीतच स्कूलबस मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी बालगुन्हेगार ,अल्पवयीन असल्यानी त्याच्या गुन्ह्याबद्दल काय शिक्षा द्यावी ,कठोर शिक्षा देता येईल का यावर उच्च न्यालयात काथ्याकुट होवूनही “निर्भायाला” न्याय मिळाला नाही. ती असहिष्णुता नव्हती का ? आमच सरकार अनेक घटनांमध्ये फक्त आयोग नेमत आणि आजच संकट आणि दुखण उद्यावर लोटत. “to delay justice is to deny justice”अस कधी तरी वाचनांत आल होत. निर्भायाच्या बाबतीत न्याय झाला का ? असहिष्णुता फोफावते आहे अस म्हणतांना त्याच्या मागचे तपशील तपासून पाहावे लागतील.गोध्रा का घडल ? राम मंदिर आणि अयोध्या हे प्रश्न जीवन मरणाचे आहेत का ?
वर्षानु वर्ष राम मंदिर प्रश्न न्यायालयात भिजत का पडला आहे ? न्यायालयाचा मान भारतीय नागरिकांनी राखावा कि राखू नये ? एकाच देशाच्या घटनेत नागीकांना वेगवेगळे कायदे आणि फायदे देणे योग्य ठरत का ? भारतीय घटनेतील एकता , समानता ,बंधुता हि तत्व नक्की कोणत्या नागरिकासाठी ? ,दुहेरी कायदे आणि नियम यांची घटनेतील तरतूद हि विशिष्ट समाजासाठी पळवाट तर नाही ना ? अशा अनेक प्रलंबित प्रश्नांनी असहिष्णुतेची बीज पक्की केली आहेत .काश्मीर बाबत आपण नेहमीच बोटचेप धोरण स्वीकारल्यानी आपल्या शत्रूच फावल आहे.सिमला क्ररारच पालन केल नाही तरी भारत आपल काहीच वाकड करत नाही असा ठाम समज शत्रुचा झाला असल्यान चक्क मुंबईत किंवा संसदेत शिरून आपल्यावर शत्रू हल्ला करू शकला आणि तरीही आपण काहीही करू शकलो नाही.
हेडली आज अमेरिकेत सूरक्षित राहून मुम्बई बॉम्ब हल्या प्रकरणी वक्त्यव्य करून निवळलेल वातावरण गढूळ करत आहे .बॉम्ब हल्ल्यात जे नागरिक मृत पावले त्यांना आणि त्यांच्या वारसांना न्याय मिळण कायद्याच्या चौकटीत बरोबर असल त्या हल्ल्य मागे असणारा पाकिस्तानचा चेहरा जागा समोर येण गरजेच असल तरी न्यायालीन प्रक्रिया जाहीरपणे मांडून उज्वल निकम जो माहोल मिडिया समोर तयार करत आहेत त्यांनी नक्की काय साध्य होणार आहे? दोन समाजात असणारी कटुता त्यांनी वाढू नये या साठी न्यायालयाला काही बंधन पालन शक्य आहे कि नाही ? इर्शाद जहां विषयी हेडलीने मांडलेल मत किती गंभीरतेने घ्याव त्यांनी असहिष्णुता वाढण्यास निकम वाव देत आहेत अस वाटत नाही का ?
मुंबई मधील बॉम्ब हल्ल्यात शेकडो नागरिक मृत पावले तरी तो हल्ला कसा झाला ? ज्याला आम्ही पकडलं तो खरच शत्रू कि कोण ह्याची शहानिशा करत आम्ही चार वर्षे आमच्याच पैशांनी त्यला सुरक्षा पुरवली त्याला पाहुणचार झोडू दिला आणि तरी म्हणे आम्ही असहिष्णू झालोत ,काय मंडळी खर वाटतय का ? अभिनेत्याच्या गाडीखाली चिरडला गेला त्याच्या आत्म्याला जावून विचारा त्या बापड्यान काय गुन्हा केला होता ? केवळ घर घ्यायची ऐपत नव्हती म्हणून तो पदपथावर झोपला होता .त्याला चिरडून ठार केल्यावरही आमच्या न्यायालयन अभिनेत्याला पुराव्या अभावी सोडून दिला आणि आम्ही षंढत्व पत्करून त्या विरोधात काही बोलू शकलो नाही आणि तरी म्हणे आम्ही असहिष्णू ! इस्थर प्रकरणी रिक्षाचालकाला शिक्षा किती वर्षान झाली? मागे पंजाबमधून एक युवती करीअर करायला म्हणून मुंबईत आली होती. कोणा नराधमान तिच्या चेहऱ्यावर “तेजाब” टाकल बिचारीचा चेहरा जळून गेला हि असहिष्णुता किती जणांना दिसली?, तेव्हा नक्की काय झाले,आताच असहिष्णुतेच्या नावान गळा काढणारे तेव्हा कुठे होते ?
जगात ब-या -वाईट घटना घडत असतात ,वाईट घटनांच्या विरोधात समाजाने उभे राहणे गरजेचे आहे,समाज जागृत असल्याचे ते लक्षण आहे ,पण ज्या घटनांचा कोण्या एका पक्षाशी संबंध नसेल तेव्हा त्यासाठी नक्की कोणाला जबाबदार धरणार ? उघड्यावर आपणच रोज कचरा टाकायचा आणि महानगरपालिका आपले काम नित करत नाही म्हणण्यासारखाच हा प्रकार झाला. असहिष्णुता आपल्यात नाही का ?आधी फायदे होरपायचे आणि पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पुरस्कार परत करत असल्याच ढोंग करायचं हि असहिष्णुता समाजाला दिसत नाही का ? पुरस्काराबरोबर मिळालेली घसघसीत रक्कम जनतेला परत करणार आहात का ? आपल्या घरात भाजी च्नागली झाली नाही म्हणून पत्नीवर तोंडसुख घेणारे आपण दुसऱ्याला असहिष्णुतेच्या गप्पा सांगतो हा विनोद नाही तर काय म्हणाव. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर लहानपाणी आपण काय करायचो ? आईनी एखादी वस्तू तातडीने विकत घेऊन दिली नाही तर आपण रस्त्यातच बसकण मारत होतो ते हि जरा आठऊन पहा अन मग बोला असहीष्णुतेवर चर्चा करण्याचा हक्क आपल्याला आहे ? लोकसभेत लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवाज उठवण हे लोकानेत्याच कामच आहे पण एखाद्या भ्रष्ट व्यक्ती विरोधात पोलीस किंवा अन्य शासकीय यंत्रणा चौकशी करणार हे कळल्यावर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी लोकसभेला किंवा अन्य सभागृहाला वेठीला धरण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हि असहिष्णुता नाही का? “ज्याच स्वतःच घर काचेच असत त्यांनी दुस-याच्या घरावर दगड मारू नये अशी म्हण आहे ” दुर्दैवान आज विरोधी पक्षात असल्यान ते विसरले कि दिल्लीत “तंदुर कांड” झाल तेव्हा यांचच सरकार सत्तेत होत.
सहिष्णुता हि कोणा एका पक्षान पाळायची गोष्ट नव्हे सत्ताधारी पक्षाला देखील देशात घडणाऱ्या घटनांचा आपण कसा अर्थ घेतो हे तपासून पहावाच लागेल ,या पूर्वीच्या सरकारन काय केल? हे विचारण म्हणजे तुम्ही गाय मारलीत मग आम्ही वासरू मारलं तर बिघडलं कुठे ! असा पोरसवदा प्रश्न घेऊन भिडण शोभा देत नाही.सुधारणा घडवण आणि लोकांना आश्वस्त करण हे सत्ताधारी पक्षाच काम आहे .लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरन्यासाठी आणि “A party with differences” सिद्द्ध करण्यासाठी स्वतःचे वर्तन सुधारून आणि आपल्या जबाबदार नेतृत्वाच्या वक्तव्यावर अंकुश ठेऊन मत मांडण्याची कला अवगत करावी लागेल अन्यथा ” A party which follow previous policy in different way ” म्हणायची पाळी आल्यास जनता नक्कीच माफ करणार नाही.