मांगल्य
गंध नसणारी रानफुले रंगाने लक्ष वेधुन घेतात
वाळूतील खडबडीत शिंपलेही मौल्यवान मोती देतात
आकर्षक दिसणं कधीच आपल्या कुणाच्या हाती नसतं
पण जग एवढं आचरट, खोट्या दिखाव्यालाच भुलतं
कातळावर फुलणारं फुलही तितकाच सुगंध देतं
गरिबीत जगणारी माताही मुलावर प्रेम करते रितं
चिखलात उगवूनही पंकज अतिशय मोहक दिसतं
फाटक्या कपड्यातल बाळही तितकंच निरागस हसतं
साधेपणही तितकंच मोहक असतं हे फार थोड्यांना कळतं
संमजसपणाचं बीज तर सुसंस्कृत घरातच सहज रूजत
कोणी कुठे जन्म घ्यावा? हे मुळी कुणाच्याच तर हाती नसतं
जीवाच्या मायेन रोपटं रुजवलं, तर काट्याकुट्यातही ते फुलतं
जीवनात संघर्ष असेल, तर संकट आलं, तरी पाऊल पुढेच पडतं
ज्यांना रोजचं जगण्यासाठी झगडावं लागतं त्याचं कुठे कशाने अडतं?
आव्हानाला भिडण्याची, वेडावण्याची ज्यांच्या मनगटात असते कुवत
तेच स्वप्नांना जोजावत साकार करतात, निराशा त्यांना नाहीच खुणावत
एक घर तुटलं, एक स्वप्न भंगलं म्हणून कुणी जीव फुंकत नसतो
दगडाला दहा ठिकाणी छिन्नी बसते तेव्हा कुठे त्याचा देव बनतो
आठवा आपली पाटील स्मिता जी आपल्या भूमिकेत ओतायची जीव
रंगरंगोटी करूनही भूमिकेत शिरता आलं नाही तर प्रेक्षक करतात कीव
नावात काय आहे? पण दगडूशेठ म्हणताच आठवतो पुण्याचा गणपती
बाळालाही सोनू म्हणताना, ते हसावं म्हणूनच ना आईमावशी अंगाई गाती
आकर्षक चेहरा भपकेबाज राहणी यालाच फसण्याचा असतो धोका
घरातील तम उजळवायला पुरतो छतावरील एक छोटा झरोका
पावित्र्य तर साध्या झोपडीतही फुलत तिथेही ह्रदयी तोच ठेका
डोंगरातील झराही भागवतो तहान मनी नसावी उगाच आशंका
मनी नम्रता, ह्रदयी प्रेम, अंतरी तळमळ हे त्रीगुण मांगल्याचा डंका
तो सगुणाचा पुतळा नारायण ठसे अंतरी, जो दुर्गुणांची जाळी लंका
Good poem with strong message kavya rachana hi ishwar shakti aapka jalal ahe