माझं आकाश
अथांग अशा अवकाशात माझही एक हक्काचे आकाश
एक तेजपूंज सुर्य तेथे त्याची मला सोबत अन प्रकाश
या आकाशात माझा चंद्र त्याची शितल छाया मनात
दूरवर शेत माझे, या खोपीचे घर तुळस डोलते अंगणात
खोपेमध्ये माझी पत्नी, घट्ट ऋणानुबंध मला तिचीच सोबत
तिच्या हातच्या भाकरीला चव नियमित रंगते दोघांची पंगत
तिच देते मला धीर करते सोबत अन कष्टावर सदैव मात
कष्टाने मी थकून येता खोपीत तीच फिरवते मायेचा हात
हिरवे पातळ हिरवाच चुडा भांगात भरते लाल सौभाग्य कुंकू
साधी रहाणी पण मुळातच देखणी मिठ मोहरी ओवाळून टाकू
रोज दुपारी शेतामध्ये न्याहरीला ती आणते कांदा आणि भाकरी
आम्ही या शेताचे मालक पण करतो त्या भगवंताची भक्तीने चाकरी
आम्ही निमूट घाम गाळतो, पिकांना जोजावते ती काळीआई माती
आमचे भाग्य थोर म्हणून जमीनीत पिकतात जोंधळे, ज्वारी चे मोती
कष्टाने जेव्हां आंबते, शिणते शरीर ती पाय चेपण्यास दिसते अधीर
कधी आजाराने मी भेलकडलो तर तीच तर सावरते देते मला धीर
मी म्हणतो अगं, थकलीस आता किती राबशील? ती मात्र खंबीर
ती पाय चेपता म्हणते धनी मी थकेन कशाने? तुमचे पाय हेच मंदिर
माझ्या ह्दयात आता फक्त तिचेच मंदिर अन तिलाच असे जागा
ती म्हणजे माझ्या जीवनाचे अनमोल वस्त्र अन त्याचा प्रत्येक धागा
माझी पत्नी हिच जेव्हा माझ उभारी देणार आकाश होते
तिचे माझे ऋणानुबंध कोणते? पत्नी कि काही वेगळे नाते?
अप्रतिम…!
शेतकर्यांचे आयुष्य जवळून पाहिले आहे असे लक्षात येते.छान.
छान कविता.., सर