माणुसकी

माणुसकी

 काही वेळा आपल्या संपर्कात अश्या वक्ती येतात कि त्यांना विसरणं शक्यच नसत.ह्या व्यक्ती प्रवासात,एखाद्या प्रासंगिक कार्यक्रमात भेटतात आणि आपला ठसा समोरच्या व्यक्तीच्या मनपटलावर कायम सोडून जातात.संक्रांतीच्या आदल्या दिवशी असच घडल.माझ्या ऑफिसच्या काही महत्वाच्या फाइल्स मी सोबत घेवून निघालो होतो.दिवस भराच्या कामाने थकलो होतो.दादरला संध्याकाळी ४.५३च्या बदलापूर गाडीत मी चढलो.दूर पल्ल्याच्या सर्वच लोकलना चांगलीच गर्दी असते.बदलापूर गाडी त्याला अपवाद नव्हती.प्रत्येक गाडी पकडण्यासाठी जजमेंट लागत.त्याचा अंदाज चुकला कि गाडीत  शिरण मुश्कील होत. मी गाडीत चढलो आणि सीटच्या प्यासेजमध्ये मोठ्या मुश्किलीन पोचलो.दिवस भराच्या कामान उभ्या उभ्याच मला पेंग येत होती. घाटकोपर गेल तरी कोणी साध हलतही नव्हत.ठाण्याला कोणी उतरण्याची शक्यता वाटत नव्हती.मी निदान व्यवस्तीत उभ राहता याव म्हणुन ब्याग आणि फाइल्सची पिशवी क्यारीयर वर ठेवली.माझ्या नशिबान एक प्रवाशी विक्रोळी जाता जाता उठला आणि मला जागा मिळाली. माझा डोळा कधी लागला तेच कळल नाही. मला जाग आली तेव्हा दिवा स्टेशन गेल असाव समजून मी उठून जागा दुसऱ्या प्यासेन्जेरला दिली.डोंबिवली येताच नेहमी प्रमाणे उतरून वाटेला लागलो.स्टेशन बाहेर पडलो आणि अचानक माझ्या डोळ्यावरची झोप उडाली मला  आठवल कि माझी ऑफिसची महत्वाची फाईल लोकल मध्येच राहिली.क्षणभर मला  धक्का बसला कारण त्या फाईल मधली कागद पत्रे अत्यंत महत्वाची होती.
     पायाखालची वाळू सरकण म्हणजे काय? त्याचा प्रत्यय मला क्षणात आला पण लगेचच मी सावरलो. मी रेल्वे स्टेशन मास्टर कार्यालय गाठल.तिथे पळत पळत गेल्याने माझी स्तिती पाहताच स्टेशन मास्तरनी मला बसायला सांगितलं. मी घडलेली हकीकत सांगताच त्यांनी फारसा विलंब न  लावता बदलापूर स्टेशन मास्तरांना फोन लावला आणि माझ्या ब्यागेच वर्णन त्यांना सांगत म्हणाले जिनका ब्याग है वे मेरे सामने बैठे हुए है | ब्याग मिलतेही मुझे खबर कर दिजीये |  मला आश्वस्त करत म्हणाले “समजो आप का ब्याग मिल जायेगा,पुरे दिनमे पंधरा बीस कम्प्लेंट आही जाती है, ज्यादा तर महिलाये होती है | आपके ब्याग मे यदी कोई किमती  चीज होती तो शायद न मिलती,फायलेही है तो जरुर मिलेंगी | मी मनात धावा केला,देवा मिळूदे रे फाईल.
       मास्तर माझ्याशी गप्पा मारता मारता म्हणाले,”कल यहा जो भी कूच हुवा बहुत गलत हुवा| एटीव्हीम मशिने तोडनेसे पब्लिक को क्या लाभ मिला? ये काम जीन्होने किया वे पकडे गये है, हम हमराही नुकसान कर रहे है| हमे इससे क्या लाभ होगा? आप हि अपनी सुविधा को हानी पहुचा रहे है | ते  माहिती सांगत असतांनाच एक पन्नाशी पार केलेल्या महिला आल्या त्यांनी प्लाटफोर्म कमी उंचीचे असल्याने होणाऱ्या त्रासा बाबत सांगितले,स्टेशन मास्तरनी अतिशय सहज शब्दात तीची समजूत घातली, ”देखिये म्याडम, प्लेटफार्मकि हाईट बढाने का काम प्रायोरिटीपर है |  हमने पाच नंबर प्लाटफार्मसे काम शुरू किया है, एक और दो नंबर का काम होनेमे समय लगेगा.आप निश्चिंत रहिये|  असे सांगत त्यांनी तिचे समाधान केले. त्याचा चांगुलपणा हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.ते घड्याळ पाहात म्हणले छे इक्कीस को लोकल बदलापूर पाहुचती  है,दस मिनटके बाद हम फोन करेंगे |
       मी अस्वस्थपणे चुळबुळ करत होतो कधी एकदाचा फोन येतो आणि माझी फाईल सुरक्षित असल्याच मला कळत ह्या साठी मी आसुसलो होतो.फोनची घंटी वाजली तसे माझ्या छातीचे ठोके वाढले.मास्तर फोनवर बोलत होते. ”शर्माजी बेग मिला ना? —-क्या हुवा पैर को, लगा,अरे लगने दो नही तो तुम बैठे हि रहते हो | मै उनको मेमो देके भेज देता हू,—–क्या? अरे हा ,हा | सर आप का ब्याग मिल गया,जिसको फोन किया ओ पोइंटमन है,थोडा लंगडा है| आखिर उनकी ही मदत लेनी पडती है| हमारे पास अलगसे स्टाफ है नही, समझके उसको चाय पानी के लिये दोसो दे दिजीये| आज काल त्यांचा चहा सुद्धा महाग झाला हे मला तेव्हा कळाल,पण माझे डॉक्युमेन्ट मिळाल्याचा आनंद झाला. मी मास्तरकडे पाहात म्हणालो ”दे दुंगा साहब,मेरी फाईल मिली यही बहुत हुवा | मास्तरनी मला मेमो बनवून दिला.ये पर्चा आप उन्हे दिखाईये | मी त्यांचे आभार मानून निघालो . बदलापूर गाडी अब छे तीस की है,उससे आप आसानीसे जा पायेंगे | अशी माहितीही त्यांनी दिली.
     मी बदलापूर गाडी पकडून कधी बदलपुरला पोचतो आणि फाईल ताब्यात घेतो असे मला झाले होते.गाडी वेळेत आली.पुढच्या वीस – पंचवीस मिनिटाचा प्रवास मला काही दिवसांसारखा वाटला.मी बदलापूरला पोचताच एक नंबर प्लाटफोर्म गाठुन तिथल्या स्टेशन मास्तरना मेमो दाखवला.त्यांनी उगाचच आढे वेढे घेतले, “थैली कैसी है? कोनसा रंग है?” मला प्रचंड राग आला पण रागावर ताबा मिळवत मी म्हणालो साहब अभी आपको डोंबिवली मास्टरने फोन किया था | त्यांनी शोधण्याच छान नाटक केल,अर्धा तासांपूर्वी ठेवलेली वस्तू त्याला आठवत नसावी एवढा तो निर्बुद्ध नसावा. त्यांनी बाहेर पाहात हाक मारली “शर्माजी, यहा आईये, अभी अभी एक थैली मिली ओ किधर रखी ? “ शर्मांनी तिथेच ठेवलेली प्लास्टिक ब्याग काढून दिली. ”साहब देख लीजिये आपकी सब चीज है ना ! “ मी ब्याग उघडून पहिली,त्यात दोन्ही फाइल्स होत्या,शर्मा माझ्याकडे पाहात म्हणाला “सब ओरीजनल डाकुमेंट है,नही मिलती तो आपको बहुत  परेशानी होती| मला त्याच्या सांगण्याचा अर्थ कळला. मी दोनशे रुपये त्याच्या हातावर ठेवले तसा तो हसला.       मला मी ज्या गाडीने आलो ती उभी असलेली दिसत होती.त्याचे आभार मानून मी निघालो. डोंबिवली स्टेशनच्या मास्टरनी मला मोलाची मदत केली होती,त्याचे आभार मानायला माझ्याकडे खरच शब्द नव्हते.ज्याच्याकडून मदत होईल या बाबत आपण शाशंक असतो त्या व्यक्तीकडून मदत मिळते तेव्हा तो आपल्यासाठी देवदूत ठरतो.माझ्या फाईलमध्ये असणारा पत्रव्यवहार अतिशय महत्वाचा होता म्हणुनच मी मनोमन डोंबिवली स्टेशन मास्टरला धन्यवाद दिले.माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची ओळख झाली,त्याच्यातल्या चांगुलपणाची साक्ष पटली.ह्या माणुसकीचा ओलावा टिकून राहिला तर अनेकांचं जगण सुकर होईल. किमान आपल्याला नेमुन दिलेलं कर्तव्य प्रामाणिकपणे केल तरी आपल्या राज्याची अन देशाची हमखास प्रगती होईल.जे आपल कर्तव्य स्वतः साक्षी ठेवुन प्रामाणिकपणे करतात त्याची नोंद इतिहास नक्कीच घेतो.अश्या सर्वच प्रामाणिक भारतीयांना पाजासात्तक दिनी प्रणाम.विशेषतः डोंबिवली रेल्वे मास्टर मधल्या कर्तव्यदक्ष माणसाला सलाम.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar