माणुसकी

माणुसकी

मी दुपारचा जेवणाचा दाबा संपवून थोड  relax मूड मध्ये बसलो होतो इतक्यात फोन वाजला .
मी रीसिवर उचलला , ” hello . . . . .  hello??” तिथून प्रतिसाद मिळाला :”प्रीन्सिपल आहेत का ?”
मला त्यांच्याशी बोलायचय ”   “हा बोल मीच बोलतोय काय हवय आपल्याला ?”  “सर तुमच्याकडे हे असच
चालत का ?”  मला काहीच अर्थ बोध झाला  नाही . “अहो आपण कोण बोलताय ?कशा संबंधी ?सांगाल का ?”
“सर मी संदेश  गेडामची   बहिण बोलतेय माझ्या लहान भावानी तुमच्याकडे प्रवेश घेतलाय त्याला त्याच्या
शेजारी बसणारी मुल त्रास देतात ”   “हो का? बर मी चवकशी करतो ,तुम्ही काही काळजी करू नका ,तस
 काही घडणार नाही .त्याला मला भेटायला सांगा .” माझ्या पुरता विषय संपला होतही अन न्व्हतहि . कॉलेज मधल्या प्रत्येक विध्यार्थ्याला मी ओळखणे शक्यच नव्हते . मी त्या विध्यार्थ्याची तक्रार संबंधित शिक्षकांना सांगितली .ते म्हणाले : “अहो सर सगळीच मुले एकमेकांना काही न काही चिडवत असतात  त्यात सिर्यस अस  काही नाही ,मी पाहतो ते ” मी तो विषय विसरून गेलो . दोन दिवसांनी एक विद्यार्थी आणि एक बाई  मला भेटायला आल्या ।”सर आत येवू का ? ” त्या आत येताच मी त्यांना बसायला सांगितलं मी त्यांच्या चेर्याकडे प्रश्नार्थक नजरेन पाहिलं तस त्या म्हणाल्या  “सर,दोन दिवसापूर्वी मी आपल्याला फोन नव्हता का केला ?”  भेटायला बरेच पालक येत असल्याने ह्याच त्या बाई अन हाच त्यांचा भाऊ हे मला कसे बरे कळणार ?त्या माझ्यासमोर बसल्या सर मीच आपल्याला फोन केला होता , वर्गातली मुल ह्याला चिडवतात ” मी त्या मुलाकडे पाहिलं माझ्यासमोर भल मोठ टेबल असल्यान मला विद्यार्थी निट दिसत नव्हता तरी पण माझ्या लक्षात आल तो खूप घाबरला होता. बहुदा  त्याच्या  ताईचा हात घट्ट धरून बसला असावा . मी त्याच्याकडे पाहून म्हणालो. “हं  सांग बर काय चिडवतात तुला मुल ? त्यानेकाहीच उत्तर दिल नाही . “अरे काय चिडवतात तुला /कोण चिडवत?” त्याने तरीही मन वर केली नाही
 त्याने आपल्या  बहिणीकडे पाहिलं . मी  वरच्या पट्टीत बोललो “वर पहा ,माझ्याकडे पाहून संग कोण चिडवत तुला ?त्याने बहिणीच्या कानात काही तरी सांगितल जणू ती त्याची दुभाषी  असावी ” सर तो म्हणतो मुल त्याला “गावठी “चिडवतात . खर तर हि बाब शुल्लक होती एखादा ग्रामीण  आला असेल तर हा त्रास काही दिवस त्या विद्यार्थ्याला होतो .शहरी मुल त्याला गि-हाइक करतात .त्यच्य  हेल काढून  दाखवतात एकदि  नव्या शिक्षकाला हा त्रास सहन करावा लागतो . त्यात रागावण्या सारख काही नसत जशास तस  उत्तर देऊन ते थांबवता येत पण त्याला ते जमल नव्हत . आपली भाषा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे ह्याचा नुन्यगंड त्याला वाटत असावा . मी त्याला म्हणालो “अरे कोणी चीडवेना आपण लक्ष देऊ नये किवां जशास तास उत्तर द्याव .”तो तरीही काही बोलला नाही माझ वाक्य पूर्ण होण्याच्या आत्ताच त्याने त्याच्या ताईचा  हात घट्ट धरला .तो हळू हळू तिच्या कानात काही तरी सांगत होता .  मी तिला विचारल “काय सांगतोय तो?”
“सर, तो म्हणतोय तू इथून जाऊ नको . ” मी थोड हळू आवाजात म्हणालो “अरे ! मी काय वाघ आहे कि सिंह ?कशाला घाबरायचं माझ्या ऑफिस मध्ये ८ वि ९ वी ची मुल अगदी बिनधास्त येतात तू तर मोठा आहेस . त्याच्या जवळून प्रतिसाद नव्हता मी त्याला रागाऊन   म्हणालो तू बोलला नाहीस तर मी काय उपाय करणार ? “मी त्याच्या शिक्षकांना निरोप देऊन त्याच्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावून घेतले त्याच्या समोर त्यांना रागावलो . क्या रे कोण ह्याची मस्करी करते ? से सॉरी टु हिम “तिन्ही विद्यार्थी त्याच्याकडे पाहत म्हणाले ” सॉरी फ्रेंड चाल क्लासरूम मध्ये जाऊ .” तो हलला  नाही . खर तर माझी अवस्था कठीण झाली होती एक तास घालूनही मी त्याला समजाऊ शकलो नव्हतो . ती माझी कसोटी होती .
        अचानक मला “थ्री इडियट” पिक्चरची आठवण झाली. त्याला मी विचारले “‘तू थ्री इडियट पिक्चर पाहिलास का? त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले अमीर खानला कॉलेज मधल्या मुलाना कस वठणीवर आणतो :पाहिलास न जा “बी ब्रेव्ह”  मला वाटल चल बाण उपयोगी पडला .तो त्याच्या ताईच्या कानाशी काही म्हणाला मी तिच्याकडे पाहिलं “सर तो म्हणतो मी नाही येणार कॉलेजला मी खूप समजावलं पण व्यर्थ.  तो ऐकत नाही काय करू ? ” ते निघून गेले .दुस-या  दिवशी मी त्यांना म्हणालो जर तुम्हाला प्रवेश नको असेल तर रद्द करा  माझ्याकडे दुसरे पालक आलेत तुमचही नुकसान व्हायला नको आणि माझ्या कॉलेजच देखील… त्या बाई रागवत म्हणाल्या “सर , तुम्हाला काही माणुसकी आहे कि नाही ?”  काल  त्या मुलाला समजवण्यासाठी जो वेळ मी दिला त्याच त्या बाईंना काहीही नव्हत. मी त्यांना समजावत सांगितलं  “अहो जर आपण योग्य
निर्णय घेतला तर मला दुस-या विद्यार्थ्याला प्रवेश देत येईल . माझ्या कॉलेजचे नुकसान होणार नाही . त्या बाईनी चक्क माझ्या माणुसकी विषई प्रश्नचिन्ह उभे केले होते. मला मात्र दोन दिवसापूर्वी माझे अधिकारी मला काय म्हणाले ते आठवत होते ” “डोन्ट  बी गुड फ्रेन्ड ऑफ युवर स्टाफ बी अ गुड डीकटेटर इफ यू  वांट रन युवर सेक्शन विदाऊट हर्डल”  एकीकडे बाई माझ्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभ करत होत्या तर दुसरीकडे माझे संस्था अधिकारी चांगली व्यक्ती बनण्यापेक्षा चांगला प्रशासक बनण्याचं आव्हान करत होते .  माझ्या
भावनेचा लोलक माणुसकी ते हुकुमशहा या मध्ये झुलत होता खरच मी सहृदय होऊन वागाव कि कारभार सुधरण्यासाठी माणुसकी दूर सारत कायद्याच पालन कराव हाच प्रश्न होता.

माझ्या  पुढे प्रश्न होता तो     “टू बी ओर नॉट  टू  बी”

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar