माय मराठी

माय मराठी

कमनीय बांध्याची सुंदर ललना, मज आवडे माय मराठी
भावगीत, भक्तीगीत, पोवाडा, रंगते लावणी माझ्या ओठी
मदनाची मुर्ती, अखंड जगी किर्ती, आसुसलो तिच्या भेटी
ती चाणक्याची जिव्हा, शब्द तिचे लाव्हा, सांगते कुटनीती

भरल्या बाणांचा भाता, लवलवते नागीण पाते, तिच्या हाती
मुलुख मैदानी तोफ, तिचा धाक,करील दुर्जनांची क्षणात माती
ती स्वरूप सुंदर गजगामीनी, लोचन मोहिनी, अजोड तिची शक्ती
जो तिच्या पदावर चाले, तैसेची बोले, गुंतुनी जडेल तिजवर प्रिती

तिची वाणी जणू अमृत, जसे सरस्वती संगीत, पडे मना मोहिनी
तिच्या शब्दात नजाकत, जणू विड्यावरी कात, श्रीहरीची कामिनी
ती सुपीक वसुंधरा, प्रसवते त्वरा, शब्दांचा पेरा, कधी बने संगिनी
ती स्वर्गीची अप्सरा,मोहात पाडते शुरा,ती पेशव्यांची मद मस्तानी

ती कधी वऱ्हाड मूलखाची, कधी साताऱ्याची, कोकण मुलुखाची
वेसाव कोळीयांची, आगरी वरळीची वा साजूक तूपकट पुण्याची
तिज म्हणे कोणी घाटी, वा अहिराणी, अविट बोली बहीणाबाईंची
जगास वाटे हेवा, ती भाषा ज्ञानीयाची, परंपरा जपतो मायबोलीची

महाराष्ट्र माझा, आम्ही सारे मराठी, आम्हाला मराठीचा अभिमान
या मराठी भाषेची पताका,जगात मी मिरवीन,गाईन तिचे गुणगान
जोवरी श्वास देहात सेवेचे कमवीन पुण्य,मी सेवा चरणी अर्पिन धमन्यात वाहते मराठी, जिव्हेवर नाचवीन, जपेन अखंड सन्मान

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “माय मराठी

  1. Nsuene

    Well written

  2. سریع دانلود ویدیو از تیک تاک

    What i do not realize is in fact how you are no longer actually much more wellfavored than you might be right now Youre very intelligent You recognize thus considerably in relation to this topic made me in my view believe it from numerous numerous angles Its like men and women are not fascinated until it is one thing to do with Lady gaga Your own stuffs excellent All the time handle it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *