मित्रहो! थोडा करा विचार
सारेच पक्ष आता बदनाम कोणाकडे न उरली निती
प्रत्येक पक्षाची आता सत्तेसाठी कुणाशीही अभद्र युती
कधी युतीत तर कधी आघाडीत कळेना यांची रणनीती
अर्ध्यारात्री राज्यभिषेक, सत्तेसाठी लाचार, गुंग होते मती
घड्याळ हाताला बांधले म्हणजे राज्याची होईल का प्रगती?
शब्दावर हवेच ना ठाम! लहान मुलांचा खेळ नव्हे ओलीसुकी
कधी शेजार, कधी आधार तर कधी बहिष्कार, कशी राहील किर्ती?
असली मैत्री खरीच नव्हे, जी दिवसा देते, राजभवना बाहेर मुठमाती
सत्ता, खुर्ची, पदे, गोळा होणारा हप्त्याचा पैसा यावरच ह्यांची प्रिती
नशीब बलवत्तर म्हणून येथे येऊनही थांबला नाही मायावतीचा हत्ती
गल्ली, रस्ते, उद्याने, सभागृह, हमरस्ते यांना नावापासून मिळेल का मुक्ती?
कुठे हरवली निष्ठा, कुठे राहिला संकल्प, कुठेतरी दिसते का राष्ट्रभक्ती?
आपली महत्वकांक्षा पुरवण्यासाठी, पक्षाची का कुणी करावी गोची?
मी येईन चा नारा देत, राज्य घालवणं याला कुणी म्हणेल का युक्ती?
सभागृहात शिरा ताणून आरोप करता, अन रात्री बारमध्ये पेगची दोस्ती
हात, घड्याळ ठिक होतं पण धनूष्य बाण हाती घेता, कशी हो ही भट्टी?
महान राष्ट्र, महाराष्ट्र, काहिच मनसे होत नाही ही खंत नव्हे तर भिती
गृहमंत्री कैदेत, आयुक्त फरार, सारेच अनाकलनीय,पण यांना प्यारी खुर्ची
आम्ही सारेच षंढ ठरतो, कुणालाही निवडून देतो, निष्फळ मतांची शक्ती
विचार करा या राष्ट्राचे भविष्य कोणा हाती? का गुंग झाली आमची मती?
जबरदस्त …..सगळ्यांनीच धडा घ्यावा ….असा पंच….