राजकारण

राजकारण

भाऊबंदकी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा शब्द ,फार मागे गेल नाही तरी रामायणात  तेच महाभारतात तेच आणि शिवाजीच्या शिवकालातही तेच,सत्तेमागची  खरी शक्ती आदिमाया,महामाया,आणि लक्ष्मी किंवा धनलक्ष्मी.युद्ध लढली गेली सत्तेसाठी पण त्या मागची प्रेरणा होती स्त्री,तिच्या मनाची मनीषा,तिची महत्वकांक्षा ,तिचे छात्र तेज आणि त्यासाठी आवश्यक तो मनाचा निग्रह.शहाजी राजांचा इतिहास वाचल्यास जाणवते कि जिजाबाई आपला नवरा परकी सत्तेची गुलामी करतो हे तिला मान्य नसल्याने तिने शहाजी मुलूखगिरी करून जिंकून आल्यावर सुद्धा त्याचं खुल्या दिलान कधी स्वागत केल नाही.जिजाबाई मुरब्बी होती.नवरा सरदार आहे ,वतनाचा मालक आहे एव्ह्ड्यावर समाधान मानणारी असती तर शिवाजी घडला नसता.कोण म्हणत स्त्रीला राजकारण कळत नाही? सत्तेची सोपान चढण्यासाठी कोणी आपल्या भार्येलाच पणाला लावलं तर कधी कधी स्त्रीने मदत केली म्हणुन युद्धात पराजय टळला.बाजीरावास मास्तनिनी मदत केली नसती तर पर मुलाखत बाजीरावाला लढून विजय मिळवता आला नसता. राजकारणात स्त्रिया हुशार असल्याची कितीतरी उदाहरण आहेतच कि, कैकेयीने रामायण घडवल आणि रावणाचा वध  घडवून आणण्यासाठी रामाला वनवास घडवला,द्रोपदी फजिती पावलेल्या दुर्योधनाला हसली म्हणुन महाभारत घडल.ह्या राजकारणाचा प्रवास नेहमीच सुडातून गेल्याच आढळत. सोयरा बाईच्या राजारामालाराज्य मिळाव त्याच बरोबर संभाजीला हद्दपार करता याव ह्या सुडाच्या प्रवासातून महतप्रयासाने उभारलेले सुराज्य लयाला गेले.त्या नंतरही हा सूडाचा प्रवास सुरूच राहिला.   राघोबादादा आणि पडद्या आडून राजकारण खेळणारी आनंदीबाई यांनी माधवरावाचा छळ केला आणि गारद्याकरवी नारायाणरावाचा खून करवला.इतिहास खूप काही शिकवतो अस म्हणतात.इतिहासाचा अभ्यास करून चुका टाळायच्या असतात अस म्हणतात पण आजही तेच तेच आणि तेच, राजकारण आणि त्यावर असणारा स्त्रियांचा  प्रभाव तसा जुनाच आहे.जयललिता हे ताज उदाहरण आहे,तामिळनाडूमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात त्यांना शिक्षा होवुनही त्यांची जनमानसातील लोकप्रियता कमी झालेली नाही.कोलकत्त्यात ममतांनी सिंगूर प्रकरणी चुकीचा निर्णय घेवूनही अजूनही राज्य त्यांच्याच ताब्यात आहे . .राजकारणावर त्यांच्या असलेल्या प्रभावाचे हे उत्तम उदाहरण आहे. भारतिय राजकारणात आजही काका –पुतण्या यांच्या प्रभुत्वाचा वाद तसाच शिल्लक आहे.मग तो ठाकरे कुटुंबात असो कि मुंडे कुटुंबात असो.पवार कुटुंबही याला अपवाद नाही.या वादापाई सत्ता गमावल्याची अनेक उदाहरण असुनही आम्ही अजूनही काहिही शिकलो नाही.सामान्य जनता होरपळली तरी चालेल आम्ही आमचा इगो सोडणार नाही.या सगळ्या घडामोडीतून राजकारण नको ती वळण घेत आहे. इतिहासातील गाडल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या मानगुटीवर अजूनही तशाच बसून आहेत.आजही काका  पुतण्या यांचातले वाद रंगत आहेत.
राजकारणात सगळ काही माफ असत,कालचा शत्रू आज मित्र असू शकतो.ज्यांच्या नावाने बोट मोडली त्यांच्याशीच सोयरिक करायची पाळी  येते तेव्हा अति झालं अन हसू आल अशी स्तिती होते.अगदी खालच्या टोकाला येवून प्रचारात टीका केल्यानंतर पुन्हा आपण कोणत्या तोंडाने त्यांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो हे न  उलगडणार कोड आहे.पण ह्याचा अनुभव जनतेला आजच आला ज्या पक्षावर जातीयतावादी म्हणुन जाहीर टीका केली होती त्याच पक्षाला विनाशर्त पाठींबा द्यायला उगाच कोणी तयार होणार नाहीत.पक्ष नेते आणि ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत किंबहुना ते दोषी असुनही आज उजळ माथ्याने फिरत आहेत त्यांनी आपल्या पुढील संकटातून मुक्त होता यावे म्हणुन केलेली ती  एक सोय आहे अन्यथा आपल्याला हवालात ,आणि विजनवासात जावे लागेल हे ते पक्के जाणून आहेत. जेते या बाबत काय निर्णय घेतात ह्या बाबत समाजात उत्सुकता आहेच पण काळाच्या उदरात काय दडल आहे ते फक्त काळालाच माहित. सुडाच्या राजकारणाचा प्रवास असाच सुरु राहणार कि सहमतीच राजकारण करून तुम्भी चलो हम भी चले चलती राहे जिंदगी असे म्हणत सर्वच पक्ष आपल्याला उल्लू बनवणार ते त्या काळालाच माहिती तो पर्यंत चला दिवाळी साजरी करा आणि जमलंच तर नरकासुराचा वध करा .

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “राजकारण

 1. Ramiro

  Spot on with this write-up, I seriously feel this web site
  needs a great deal more attention. I’ll probably be back again to read more, thanks for
  the advice!

 2. Hilton

  I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s
  both equally educative and entertaining, and let me
  tell you, you have hit the nail on the head. The issue is something that not
  enough men and women are speaking intelligently about.
  I’m very happy that I stumbled across this in my search for something relating
  to this.

Comments are closed.