राणीची आई भाग ४

राणीची आई भाग ४

Practical exam सुरु कधी झाली आणि कधी संपली कळले देखील नाही. External examiner उगाचच उभे-आडवे प्रश्न विचारून वाट लावत होते. कधी कधी दोन-दोन मुलांना तर कधी एकत्र चार-पाच मुलांना Viva ला उगाचच मूलं घाबरत होती. या दिवसात exam number वेगळे असल्याने अभयची  भेट झाली नाही. प्रितम भेटली तरीही फारसं बोलली नाही. तिला मी कॉल न घेतल्याचा राग आला होता परंतू मला आता माझ्या वेळेचा खेळखंडोबा होऊ द्यायचा नव्हता.मी तिला बेस्ट ऑफ लक म्हणून निघून गेलो.

माझी written exam चार दिवसांनी सुरू होत होती आणि कॉलेज मध्ये time pass करणं मला परवडणार नव्हतं. दोन पेपर्स मध्ये कधी दोन तर कधी एक दिवसाचा gap होता त्या प्रमाणे मी माझं schedule ठरवलं  होतं. मी दोन अडीच तास paper solve  करुन माझा writting Speed वाढवत होतो. Discriptive answers साठी मला पुरेसा वेळ मिळावा याचा सराव गरजेचा होता. प्रत्येक पेपरच्या वेळेस काका-काकी आणि आत्या मला बेस्ट ऑफ लक करुन माझं मनोबल वाढवत होते. खरं तर त्यामुळे माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा मुळे माझं टेन्शन वाढत होते. राणीची आई मी परीक्षेला निघतांना हातावर साखर ठेवत होती.

मी पेपर चांगला लिहावा म्हणून देवाला साकडं घालत होती. इतके माझ्या पाठीशी असल्याने मला ते संकट वाटत  होतं. मी त्यांचा अपेक्षा भंग करून चालणार नव्हते. माझी तयारी चांगली झाली होती तरीही मी दडपणाखाली होतो.

कितीही अभ्यास केला तरी काहीतरी राहून गेले असं सारख वाटे आणि मग पुन्हा तोच theorem ते definition पुस्तकात चाळल्याशिवाय अस्वस्थता संपत नसे. हे काही माझ्या एकट्याच्या बाबतीत होत होते अशातला भाग नाही. “अपूर्णतेच शल्य नेहमी दुःखदायकाच असते”. परीक्षेच्या काळात प्रीतम अनेकदा दिसली पण बेस्ट ऑफ लक पुढे आम्ही गेलो नाही. मी जे प्रितमला रागावून बोललो ते तिने चांगलंच मनावर घेतलं होत.

माझ्यासाठी झालं ते योग्य होत. या काळात राणीची आई माझी खूप काळजी घेत होती. अस्ताव्यस्त पुस्तके आणि माझा बेड लावणे, मी प्रॅक्टिस साठी वापरलेले रफ पेपर लाऊन ठेवणे आणि नियमित खोली स्वच्छ करून ठेवणे ही कामे ती करीत असे. विशेष म्हणजे माझ्या अभ्यासाच्या टेबलवर एका ग्लास मध्ये ती रोज एखादं सुवासिक फुल ठेऊन जाई. कधी कधी काकू पुष्प गुच्छ आणून ठेवत असे. जणू त्या घराला Exam Fever झाला होता. विशेष म्हणजे शार्विक मला नाष्टा आणून देई. माझ्या अभ्यासात मदत व्हावी म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत होते. आत्याने तर कमालच केली, परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी तिने दोन पार्कर पेन चा सेट आणून दिला. मी तिला म्हणालो, “अगं आत्या एवढा महागडा पेन सेट कशाला? मागे तू दिला आहेस की.” तशी म्हणाली, “माझा भाचा एवढा मेहनत करतो तर त्याला आम्ही  शाबासकी नको का द्यायला?” आत्या एका Multi National कंपनीत P.R.O होती. दिसायला स्मार्ट होती पण तिने अद्यापही लग्न केलं नव्हत. ती सुदृढ होती, शिकलेली होती पण तिने लग्न का केलं नव्हतं ते मला कधीच कळलं नाही. घरात तिच्या लग्नाचा कधीच कुणीही विषय काढत नसे. काका आणि काकू तिच्याशी विषयापुरतच बोलत पण ती मात्र शर्विका, संजू आणि मी असे मोकळे असलो की गमती जमती सांगे.

कधी कधी काहीतरी वेगळा पदार्थ खायला घेऊन येई.अगदी राणीच्या आईला बोलावून खायला देई. मात्र काकाकाकू बरोबर तिचं बोलणं मोजकं होतं. आमचं घर म्हणजे एक गूढ कथा असल्याचा भास होत असे.

आमची परीक्षा  बावीस दिवस चालली. शेवटच्या दिवशी प्रितम कॉलेज बाहेर उभी होती. मला कॉलेज बाहेर येताना पाहून हसली, माझ्या बरोबर चालता चालता मला म्हणाली, “आज तरी तुला माझ्याशी बोलायला वेळ आहे ना?” मला माहीत होत, ती जरी रागावली असली तरी आज नक्कीच भेटणार, मी आढेवेढे न घेता तिला हसून म्हणालो, “बोला मॅडम,काय हुकुम आहे गुलामाला!” ती जोरात हसली, “तु आणि गुलाम, तुला इतरांना गुलाम बनवायची सवय आहे, तु कुणाचा गुलाम होशील यावर माझा तरी विश्वास नाही”. मी हसलो, “बरं, मग काय करू म्हणजे विश्वास बसेल”. “तु आज सगळा वेळ मला द्यायचा,काही सबब न सांगता. आहे कबूल?”

 “ओ मॅडम, नक्की बेत काय आहे तुमचा? तो तर सांगा.नाही म्हणजे उद्या तुम्ही आम्हाला उठा बश्या काढायला लावाल”. माझ्या बोलण्यावर ती नाराज झाली. एकटीच पुढे गेली, मी चार पावले वेगाने चालत तिला गाठलं आणि तिचा हात धरला.त्या वेळेस हे मला का करावस वाटलं याच उत्तर माझ्याकडे नाही. परंतू त्या वेळची ती सहज घडून आलेली रिअँक्शन होती.तिने चमकून माझ्याकडे पाहिले, मी हसलो. तशी ती शांत झाली. “आता कुठे जायचं सांगणार आहेस, की असच चालत राहाणार?”  ती खुलली,”आपण गिरगाव चौपाटीवर जाऊ, मलबार हिलवर जाऊ, चालेल?” आता तिचा रुसवा घालवण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता, “जाऊ की, कसं जायच? म्हणजे लोकल की बेस्ट”. तिला बेस्ट चा पर्याय आवडला, “छान, बेस्ट पकडून जाऊ, मस्त निवांत गप्पा मारत जाऊ”. Highway वर आम्ही डबल डेकर पकडली, ती बेस्ट मध्ये वरच्या डेक वर चढून गेली, मी तिच्या मागोमाग गेलो.तिने एकदम पुढची सीट पकडली. तिने बाहेर पहात हळूच माझ्या मांडीवर हात ठेवला, क्षणभर मी गोंधळलो, पण स्वतःला सावरत आजूबाजूला पहिले. ती हसत म्हणाली “स्नेहल, I Love You”. “Prit, I Love You too, तुझ पिंपळ पान मिळालं बर, पण तेच पान माझ्या आत्याला किंवा काकूला मिळालं असतं तर माझे काय हाल झाले असते तुला माहीत नाही”. “Very Sorry, मी ते जाणून बुजून नाही केलं, सहज घडून गेलं.” “तु सहज मला घरा बाहेर काढले असते, मग काय तुझ्या पप्पांकडे येऊन राहिलो असतो का?” “I said sorry for that, please, आता तेच बोलत राहशील का?” त्यांच्या गप्पा रंगात आल्या इतक्यात कंडक्टर आला, “बोला, कुठे देऊ?” “चर्नी रोड स्टेशन”, त्याने वॉलेट मधून शंभराची नोट काढून दिली.कंडक्टर दोन तिकीट आणि सुटे पैसे देऊन निघून गेला.

“स्नेहल पेपर कसे गेले? मला तर Maths आणि Drawing ची भीती वाटते, माझे दोन प्रॉब्लेम चुकले आणि Drawing चे Symbols नीट जमले नाही, ड्रॉप लागला नाही म्हणजे झालं.”  तो ऐकून हैराण झाला, “अगं Maths मध्ये प्रॉब्लेम दोन वर्ष आधीच्या Question Paper मधले रिपीट केले होते, तु मागच्या year चे question set सोडवले नव्हते का?”  “अरे सोडवले,पण तुझ्यामुळे माझा मुड बिघडला होता,किती दिवस तू माझा कॉल घेतला नव्हता, आठव जरा”  “Sorry Prit, हे काही बरोबर नाही, please don’t blame me, तुला मी सांगितलं होतं ना की मला ही exam, हीच नव्हे प्रत्येक exam महत्त्वाची आहे. माझे काकाकाकू माझ्यावर किती मेहनत घेतात तूला नाही समजणार”.

“तु नेहमी काकाकाकूंबद्दल बोलतोस, तुझ्या मम्मीपप्पांच तू नावही घेत नाहीस, तु मम्मीपप्पांबरोबर नाही रहात का? मला काही कळले नाही. “Prit, I have no Parents, मी लहान असताना ते वारले, मला त्यांचा चेहराही आठवत नाही, माझ्या काकाकाकू आणि आत्त्याने  मला वाढवलं, माझ्यासाठी ते सर्व  केलं जे आईवडील आपल्या मुलासाठी करतील. Now it’s my responsibility to keep them happy by achieving my Goals”.

आमच्या गप्पा संपत नव्हत्या, प्रितमने माझा हात घट्ट धरला. तारपोरवाला मत्स्यालय गेलं ते मी वरून पाहिले एवढ्यात कंडक्टर ने बेल वाजवली, चर्नी रोड, चर्नी रोड, आम्ही दोघे झपझप खाली उतरलो. कंडक्टर,आमच्याकडे पहात राहिला.  रस्ता क्रॉस करून आम्ही पलीकडे गेलो, समुद्राच्या लाटा पाहून ती प्रचंड खूष झाली. मी तिला भेळ आणून दिली. ती माझ्याकडे पहात म्हणाली, “तुला नाही आणलीस?”मी हसून म्हणालो “एक भेळ दोघांनी खाण्यात वेगळी मजा असते, पण तुला चालेल ना?” “म्हणजे काय? चालेल की, तुला चालते तर मला का नाही चालणार? मी भेळ तिच्यासमोर धरली तसं तिने भेळ मला भरवली, मी पहात राहिलो, आता माझी टर्न होती मी तिला भेळ भरवली. येणारे जाणारे बघे पहात होते, पण आत्ता आम्ही दोघं वेगळ्या दुनियेत होतो. जून महिना कालपरवा सुरू झाला होता, पण कडक ऊन होत. तिने तीचा स्कार्फ माझ्या आणि स्वतःच्या डोक्यावर धरला.भरती सुरू झाली तसे पाणी जोरात येऊन धक्क्याला आपटू लागले, ती एन्जॉय करत होती. चार वाजून गेले तस मी म्हणालो “तुला मलबार हिल ला जायचं होत ना, इथेच बसलो तर उशीर होईल मग स्किप करावं लागेल. ती नाराजीनेच म्हणाली,”बसूया न इथे, मला लाटांची मजा पहायची आहे”. Okay, as you wish, पण तुला भूक नाही लागली? काही खाऊया , की नको? मला बाबा भूक लागली आह”. मी उठलो,”काय आणू सांग? दाबेली, Ragada Patties, की पाणी पुरी खायला येते?” ती उठली, “आपण बर्गर खाऊ, तुला चालेल ना, कोक घेऊ, ऊन बघ किती पडलं!”  आम्ही स्टॉल वर गेलो, तिनेच ऑर्डर दिली. मी वॉलेट काढून पैसे दिले, तस तिने माझ वॉलेट काढून घेऊन त्यात पैसे परत ठेवले. “स्नेहल, मी देणार पैसे, मी तुला घेऊन आले. Please, नाही म्हणू नको”. “बरं बाई तू दे”. स्टॉलमधला नोकर तिरक्या नजरेने पाहत होता, त्याला काही हे नवे नव्हते पण तो स्वतःच्या नशीबाला दोष देत असावा. आम्ही  स्नॅक्स संपवला आणि कोक ग्लास घेऊन त्याच जागेवर जात होतो पण दुसऱ्या युगुलांनी ती जागा अडवली होती.ते पाहून तिने मला टाळी दिली आणि जोराने हसली रंगात असल्याने त्यांचं लक्षच नव्हतं. आम्ही  मरीन ड्राइव्ह पर्यंत चालत राहिलो.

सर्व किनाऱ्याला अनेक तरुण, मध्यम वयाची आणि बऱ्यापैकी वय झालेली जोडपी गप्पा मारत बसली होती. आम्हाला  मोठी गम्मत वाटली,तिने अनेक वेळा मला स्वतः जवळ ओढत तिचा aggressiveness दाखवला, बहुदा इतर मित्रमैत्रिणी एकमेकांच्या खांद्यावर किंवा कमरेत हात घालून फिरताना पाहून तीच मन बंड करत असावं. “प्रीतम अग कुणी पाहिलं तर?” तो बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला, त्यांने मोबाईल पहिला, अभयचा कॉल होता, जर कॉल घेतला नाही तर तो पुन्हा पुन्हा कॉल करणार यात शंकाच नव्हती. त्यांने मोबाईल प्रितमला दाखविला, तिला गप्प राहण्याची खूण करत, त्यांने कॉल घेतला, “हा अभय बोल, काय म्हणतोस? कसे गेले पेपर?  पेपर को मारो गोली,का रे मित्रा, Maths second जमलं ना?,Sixty मिळणार? छान, मग आता काय बेत आहे?  मी कुठे? का रे? काय ? movie टाकला असता, मग आधी का नाही बोललास? Sorry, अरे,मी लवकर घरी निघून गेलो, किती दिवस जागरण झालं माहीत आहे, आज मस्त निवांत झोप काढणार आहे. अभय, आपण उद्या सकाळी बोलूया चालेल ना? please रागावू नको, नक्की उद्या सकाळी, Bye then”. त्यांने कॉल संपवला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, “पाहिलंस ना, आपण वेळेत कॉलेज बाहेर पडलो नसतो तर त्यांने गाठलं असतं”. “स्नेहल, तु अगदी धडधडीत खोटं बोललास,

माझ्याशी उद्या असच खोटं — ” तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मी तिचा हात सोडून दिला मला तिचं बोलणं खटकलं. मी रागाने  तिला म्हणालो, “प्रितम हे सर्व तुझ्यासाठी, Mind it well, त्याला सांगू का मी आणि प्रितम इथे चौपाटीवर आहोत म्हणून. छ्या, काय  वाटतं होत तुझ्याबद्दल  आणि तू काय आहेस?”

तिला तिची चूक कळली, पण तिचे शब्द मला अजिबात आवडले नाहीत. मी तिच्याकडे न पाहता निमूट मरीन लाइन्स स्टेशन च्या दिशेने चालू लागलो. “Sorry Snehal I do not mean it, just joking.” ती माझा हात धरत अजिजिने म्हणाली. मी तिच्याशी काही न बोलता स्टेशनवर आलो आणि दोन तिकीट काढली एक तिला दिले आणि मी बोरिवली लोकल मध्ये General डब्यात चढलो, ती माझ्या मागोमाग चढली,ती मला हळू आवाजात समजावण्याचा प्रयत्न करत राहिली. स्टेशन भराभर निघून गेली. मी माटुंगा आले तसे उतरलो आणि पाठी न  वळून पाहता  चालत राहिलो. तिने गाडीतून मला पहात sorry असं ओरडून म्हटलं आणि हात हलवला.

मी घरी पोचलो तेव्हा काकाकाकू घरी आले होते. आत्या काळजी करत होती. अजून मी आलो नाही म्हणून मला  कॉल करणार होती, काकूच म्हणाली.बहुदा काकू तिला म्हणाली असावी, म्हणूनच तिने कॉल केला नव्हता. मला पाहताच आत्या  रागावत म्हणाली, “अरे फोन तरी करायचा ना? आम्ही केवढे काळजीत होतो.” “Sorry आत्या, अग आता, महिनाभर भेट होणार नाही म्हणून आम्ही कॅन्टीन मध्ये गप्पा मारत बसलो होतो, कधी उशीर झाला कळलंच नाही”.  आजी बाहेर येत म्हणाली, “गप्पा नंतर मारा, आज तिने गोड शिरा केलाय  आणि हवी तर कॉफी करणार. आवरा लवकर”. आजीने सर्वांना गोड शिरा आणला,”राणीच्या आईने केलाय बर का? कसा झाला ते सांगा” सर्वांना शिरा आवडला. आजीने कॉफी आणली. शर्विका आणि संजू त्याच्या खोलीत आले,

“दादा, तुझी Exam आटोपली म्हणजे आत्ता तू फ्री झालास ना,आमच्या बरोबर Chess खेळशिल का? आम्ही दोघं आणि तू apponent चालेल ना!” “हो, संजू नक्की, आज मी थोड rest करतो, उद्या सकाळी आपण खेळू, चालेल ना? शर्विका तुझा काय बेत?” “आम्ही मैत्रिणी उद्या गोराई बीच वॉटर पार्कला जाणार आहोत, अर्थात मम्मा ने जाऊ दिलं तर”.

थोडा वेळ गप्पा मारून दोघं निघून गेले. तो स्वतः विचारत पडला,आज प्रितामच्या आग्रहा खातर आपण तिच्या बरोबर गेलो आणि झालं काय? कारण नसतांना तिच्यावर रागवावं लागलं आणि सगळा मुड खराब झाला. काकाकाकू एवढे काळजी घेतात जर हा प्रकार त्यांना कळला तर, आत्याची प्रतिक्रिया काय असेल?

नाही, हे उपयोगाचं नाही. झाल एवढं पुरे. यातून बाहेर पडलेच पाहिजे, इतर मुलांप्रमाणे मी वागलो तर माझ्यात आणी इतर मुलांमध्ये फरक तो काय? असले उद्योग करायला आपण मोकळे नाही. तो एकांतात पण विचार चक्रात बुडाला होता, इतक्यात मोबाईल वाजला,त्यांने स्क्रीन पाहीली, ती प्रितम होती, त्यांने फोन silent मोडवर ठेवला. पुन्हा मोबाईल vibrate झाला. तो तिचा मेसेज होता, “स्नेहल मला माफ कर, मी चुकले, मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही”. त्याने मेसेज delete केला आणि मोबाईल ठेऊन दिला.

मी मनाशी पक्के ठरवले जो पर्यंत डिग्री पूर्ण होत नाही तोपर्यंत आता कशातही गुंतायचे नाही.रात्रीच्या जेवणासाठी dining टेबलवर सर्व एकत्र बसले असताना काकांनी माझ्याकडे पहात शर्विकाला सांगितले, “शर्विका आपण सर्व काश्मीर टूरवर जात आहोत”. ते ऐकताच संजूने आणि शर्विकाने हायफाय केल, तेव्हा आत्या हसून म्हणाली “ह्या मुलाचं वेड आपल काहीतरीच.” तसे काका तिला थांबवत म्हणाले 

“अग सुमे, तुझे संदर्भ जुने झाले, मी तर या मुलांना एकत्र भेटताना जे काही प्रकार करतांना पाहतो, ते एन्जॉय करतो, आपल्याला नाही जमलं, त्यांनी एन्जॉय करायचं नाही तर कोणी करायचं!” तस सुमा आत्या हसून म्हणाली, “काय हे भाई,अरे ही मुले रस्ता म्हणू नको की स्टेशन म्हणू नको, दिसली आणि भेटली की एकमेकांना मिठ्या मारतात, असं चारचौघात हे प्रदर्शन बर का?” काकू आत्येचा त्या मिठ्या मारतात शब्दाला खूप हसली. तसं आत्या तिला म्हणाली “वैनी, तुलाही भाईसारखं वाटत का?” “अहो ताई, जग बदलले, आता ते हस्तांदोलन आणि रामराम, शुभप्रभात तुम्हाला कसं ऐकू येणार,तरुण पिढीच काही तरी नवीन असणारच, आपण समजून घ्यायला हवं.”

स्नेहल काकाकाकूंचे विचार ऐकून प्रभावित झाला. मनाशी म्हणाला, आपण समजतो त्या पेक्षा दोघंही बरेच समजूतदार आहेत. काकांनी मूळ विषयाकडे येत पुन्हा विचारलं  “शर्विका, संजू जायचं ना काश्मीरला?” तस दोघेही खूश होत म्हणाले, “पप्पा कधी निघायचं? कसं जायचं, विमानाने?” “विमानाने नाही बेटा, आता ह्या सीझनमध्ये विमानाचं तिकीट मिळणार नाही, आपण राजधानीने  प्रथम दिल्लीला जाणार आहोत, तिथून आपलं काश्मीरसाठी बुकिंग आहे, येत्या रविवारी बरं का! तेव्हा मम्मा सांगेल तशी तिला मदत करायची,स्नेहल तुझेही कपडे, इतर तयारी करून ठेव, थ्री डेज मोअर ओके”.

राणीची आई आमचा संवाद ऐकत होती, मलाही काकांना विचारायचे होते की आत्या, राणीची आई, आणि आजीही येणार ना? पण म्हटले कळेलच की उद्या. मला खरंच खूप आनंद झाला होता.मुख्य म्हणजे आज झालेल्या प्रकाराने मी थोडे दिवस शहरापासून आणि प्रितमपासून शक्यतो लांब राहिलेले बरे ह्या निर्णयास  आलो होतो.

दुसऱ्या दिवशी दुपारी मला शर्विका आणि संजूने आपण पाच जण जाणार आहोत, आजी आणि राणीची आई घरी राहणार असल्याचे सांगितले. मला थोडे वाईट वाटलं, पण घर सांभाळायला कोणालातरी राहणे भाग होते.

दुपारी अभय चा कॉल आला, त्याला माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या, त्याने पुन्हा कालचाच विषय काढला, “घरी जाण्याची काय इतकी घाई होती, पाहिलं असता की एखादा नवीन movie”. तो जरा रागातच बोलला. “अरे दोस्ता, जाऊ की कधीतरी,का एवढा upset होतो.” मी त्याची समजूत काढली. त्याला संशय होता की मी आणि प्रितम नक्की त्याला उल्लू बनवून फिरायला गेलो आणि त्याला उगाचच घरी गेल्याच भासावलं. त्याचं समाधान करता नाकीनऊ आले. काश्मीर टूरची तयारी करता करता दोन दिवस कसे संपले कळले देखील नाही. टूरबाबत मी अभय ला WhatsApp करायचं ठरवलं होत.

रविवारी आम्ही राजधानी एक्सप्रेस ने मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरून संध्याकाळी निघालो. आमचं सेकंड AC च बुकिंग होत, या पूर्वी आम्ही, माथेरान तसेच गोव्याला जाऊन आलो होतो, परंतु एवढ्या दूरचा हा पहिलाच प्रवास होता. गाडीने अर्ध्या तासात मुंबई पार केली, बहुदा ऐशी किलोमीटर वेगाने गाडी पळत होती. विरार पाठी पडलं तशी खाडी दिसू लागली. सूर्य अस्ताला निघाला होता, त्याची सोनेरी किरणं पाण्यावर चमकत होती.ह्या रुट  ने मी कधीही प्रवास केला नव्हता केवळ लोकल मधील मॅप मुळे त्याला विरार पर्यंतची स्टेशनं माहीत होती. राजधानी इतक्या वेगात होती की स्टेशनचे नाव पाहीपर्यंत स्टेशन मागे पडे. आता बाहेर अंधार पडू लागला होता. प्रकाश दिसू लागला की स्टेशन आले इतके समजत होते. गाडी सुरतला थांबली तेंव्हा पावणेआठ वाजले होते.काका आणि मी खाली जाऊन पाय मोकळे करून आलो. फेरीवाले खमण पात्रा असं ओरडत होते.काकांनी खमण आणि आळूवडी घेतली.गाडीने जवळ जवळ अडीचशे किलोमीटर अंतर कापले होते.

संजू आणि शर्विका कॉमिक्स वाचण्यात गर्क होते तर काकू मोबाईलवर गाणी ऐकत होती. आम्ही खमण आणलं पाहून काकू म्हणाली, “अहो, थोड्या वेळाने लंच येईल आणि तुमची मुलं जेवणार नाही, कळतय का?” ते हसत म्हणाले, “राहू दे,राहीलं तर, गुजराती लोकांचा ढोकळा वेगळाच असतो, आपण पुन्हा मुद्दाम इथे ढोकळा खायला येणार आहोत का? टेस्ट कर मजा येईल.”  संजू आणि शर्विकाने अगोदरच खायला सुरुवात केली होती, काका माझ्याकडे पहात म्हणाले, “अरे स्नेहल खा की, काकूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको”. काकूने स्वतः

एक पेपर डिश काढून त्यात मला खमण आणि अळूवडी दिली. एकदम स्पाँजी होता. संजू माझ्याकडे पहात म्हणाला “दादा घे हा लवकर,नाहीतर आम्ही संपवून टाकू”. मी हसलो. स्टेशनं पाठी पडत होती, थोड्या वेळाने T.C. रिझर्व्हेशन पाहून गेला. मी मोबाईल वर आलेले मेसेज वाचत होतो. मला प्रितमचा मेसेज दिसला. मी मोबाईल स्विचऑफ केला आणि गाडी बाहेर अंधारात पहात राहीलो.

काकाकाकू त्यांच्या ऑफिस मधल्या गमती सांगत होते. दोघांनाही मित्र मैत्रीणीनी दिल्ली आणि काश्मीर येथून आणायच्या वस्तूंची यादीच दिली होती. काका सांगत होते, त्यांच्या  बँकेत assistant cashier असणाऱ्या गावडे बाईंनी त्यांना रुद्राक्षाची माळ आणि अक्रोड आणायला सांगितले होते. काकूजवळ भली मोठ्ठी यादी होती कोणाला shawl हवी होती तर कोणाला woolen स्वेटर. काका हसून म्हणाले,” अग आपल्या चार पाच बॅग्स आहेत त्याच नेणं अवघड त्यांचं सामान कुठे ठेवणार?” काकू रागावून म्हणाली,”त्याची चिंता तुम्हाला नको मी, सॉफ्ट बॅग आणल्या आहेत,माझी मुलं घेतील त्या.” काका हसत म्हणाले, “आधी त्यांच्या स्वतः च्या बॅग उचलू दे,म्हणजे उपकार होतील”. 

कॅटरिंगवाले dinner घेऊन आले. संजूला हाताने हलवत काकू म्हणाली, आता वाचन पुरे, जेवून घ्या आधी आणि गाडी हलते सारखं वाचू नका डोळे दुखायला लागतील. आमच्यासोबत एक सरदार प्रवास करत होते. ते बराच वेळ लॅपटॉप वर काम करत होते. Dinner आल तस काकांनी त्यांना विचारले, “भाईसाब आप खाना नहीं लेगे?” ते हसून म्हणाले,” हम घरसे खाना लावे हैं, मेरी बीवी ई खाना ना खाणे देती”. त्यांनी आपल्यासॅक मधून टिफीन काढला, परोठे आणि टोमॅटो रस्सा भाजी त्यांनी आणली होती. ते काकांकडे पहात म्हणाले, “साब आप लो एक पराठा देखो भाभी कैसी बनायी हैं.” त्यांनी काकांच्या डिश मध्ये पराठा ठेवला, काका हसून म्हणाले, “आप ये चपाती ले लो” सरदार हसून म्हणाले, अरे साब, ये देखो तो कितने पराठे हैं, खाईये आप, ये सब्जी दू क्या!”  काका हातानेच खूण करत नको म्हणाले. जेवण उरकलं तस ते सरदार वरच्या बर्थ वर झोपायला गेले. आम्हीही थोड्या वेळाने आवरून झोपी गेलो.

सकाळी आम्ही उठलो तेव्हा अगोदरच्या स्टेशन वर सरदारजी उतरुन गेले होते. नवी दिल्ली स्टेशन खूप गजबजलेलं होत. वेगवेगळ्या गाड्यांची आल्याची आणि सुटण्याची घोषणा हिंदीच्या वेगळ्या लकबीत सुरू होती.

काकांनी मुंबई वरून Residency या थ्रीस्टार हॉटेल मध्ये बुकिंग केलं होतं. आम्ही कॅब पकडून हॉटेलला पोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. काउंटरवर एन्ट्री करून आणि की घेऊन आम्ही पहिल्या मजल्यावर पोचलो. काकांनी आत्येला फोन करून आम्ही पोचल्या बद्दल कळवले, घरची खुशाली घेतली.

रूम खूप स्वच्छ आणि प्रशस्त होत्या.समोर स्विमिंग पुल होता. संजू आणि शर्विका एकदम खूश झाले. काकूने हाशssहुश करत बेड वर अंग टाकून दिलं. काका मात्र वॉश रूमला गेले. थोड्या वेळाने आंघोळ उरकून आले. त्यांनी गॅलरीत बसून स्विमिंग पुल पाहणाऱ्या दोघांनाही आंघोळ उरकून घ्यायला सांगितलं. मी माझे कपडे घेऊन आंघोळीला निघालो. अर्ध्या पाऊण तासात आम्ही आवरून हॉटेलच्या रेसटॉरंट मध्ये स्नॅक्स आणि कॉफी घेतली. काऊंटर वर बोलून काकांनी Cab मागवून घेतली.संपूर्ण दिवसाचं बुकिंग करून आम्ही निघालो.

काकांनी कॅब ड्रायव्हर ला प्रथम कुतुबमिनार येथे घेऊन जायला सांगितलं, तस्स तो म्हणाला “सहाबजी, कैसे, कहा जाणा हैं हम पे छोड दो, बाईस साल का Experience हैं जी”. त्यांनी पहिलं कुतुब मिनार येथे नेल. ७३ मीटर ची सुबक वास्तू पाहून मन थक्क झाले. कुतुब ऐबकने  ही वास्तू ११९३ मध्ये बांधली होती.

म्हणजे आठशे वर्षापेक्षा जास्त काळ ती उभी होती. ड्रायव्हर सरदार होता, त्याला सर्व ठिकाणांची माहिती होती, तोच आमचे ग्रुप फोटो काढून देत होता. तोच गाईडचं काम करत होता. तिथून आम्ही हुमायूनची कबर पाहायला गेलो. इथे इतरही मोघल सत्ताधीशांच्या कबरी आहेत. तिथून आम्ही नेहरू पार्क येथे गेलो. ही तीन ठिकाण पाही पर्यंत दुपारचा दीड वाजला.  काका ड्रायव्हर ला म्हणाले,”सरदारजी अब भूक लगी हैं आप का क्या सुझाव हैं?” “सर जी आप को, होटल मे खाणा हैं, या ठेले पे चलेगा?” काकांनी काकूकडे पाहिलं, काकू म्हणाली, “जहा अच्छा खाना मिलेगा चलिये, जादा आँइली नही चाहिए”. सरदारजी म्हणाला, “हां जी, बिलकुल कम तेलवाला. आप चखेगी तो बोलेगी, जसबीर सिंग बराबर लेकें आया”. 

एका सरदाराच्या ढाब्या जवळ कॅब थांबली, तसे सर्व खाली उतरलो. संजू आणि शर्विकाने कॅब मधून खाली उतरून आजू बाजूला पहिले. “पप्पा, इथे जेवायचं, हे हॉटेल कुठे आहे?” शर्विका तिथलं वातावरण पाहून गाडीत जाऊन बसली. काकांनी कशीतरी समजूत घालत त्यांना खाली उतरवले. जेवण खूब टेस्टी होत. पनीर टिक्का, नान, रुमाली रोटी, मशरूम, वेज कढाई,आणि छास . संजू आणि शर्विका नाक मुरडत होते. पण नंतर जेवण छानच आहे अस शर्विका स्वतः म्हणाली.

“सर जी कुछ पान बिन होंदा के?” जसबिर अंकल नी काकांना विचारलं, तस काका गमतीन म्हणाले, “सरदारजी मिठा मीलेगा क्या?” “क्यो नाहि,जरूर मिलेगां जी, मॅडम भी लेगी क्या?” काकांनी, काकू कडे पाहत विचारले,” खाणार ना तू,गोड पान?” ती रागावून म्हणाली “मुलं ही मागतील. देणार का?””का नाही?, लग्नातली गोड सुपारी, बडीशेप नाही खात, रोज थोडच देतोय, ती फिरायला, मजा करायला आली आहेत, खाऊ दे त्यांना”. ती काही बोलली नाही, तिची मूकं संमती मिळाली समजून त्यांनी पानाच्या ठेल्यावर ऑर्डर दिली “पाच मिठा पान और एक इनका.”

“जसबीरजी अब कहा चलेंगे? दो चार जगह होनी चाहिए.” अस फरमावल. जसबिर अंकल हसून म्हणाले, “सहाब, यदी ठीक देखणा हैं तो टाइम तो लगेगा जी,अभी हम राष्ट्रपती भवन जायेंगे, वहा दोचार स्पॉट नजदीक हैं जी”. आम्ही तिथे राष्ट्रपती भवन, राजपथ पाहिले, राष्ट्रपती भवन वास्तू तीन मजली आणि प्रचंड विस्तार असलेली आहे. त्याची भव्यता नजरेत भरते. तिथे तासभर फिरून आम्ही इंडिया गेटकडे गेलो, दुसऱ्या महायुद्धानंतर हे स्मारक बांधले असे म्हटले जाते. तिथून जंतरमंतर ही राजा जयसिंग यांनी बांधलेली खगोल संशोधन वास्तू जवळ आहे. आता या वास्तूच्या जवळ मोठ्या इमारती झाल्यामूळे तिचा वापर होत नाही. तिथून आम्ही “राजघाट” या गांधीजींच्या स्मारकाला भेट दिली.ज्यांनी अहिंसा, सत्याग्रह, बहिष्कार या अस्त्रानी ब्रिटिश सरकारला जेरीस आणले त्यांच्या समाधी स्थळास वंदन केले.

संध्याकाळी आम्ही अक्षरधाम मंदिरास भेट दिली. एक दिवसात बरेच फिराल्याने संजू, शर्विका, काकू खूप दमले होते. काकांनी त्याला गाडी हॉटेलवर घ्यायला सांगितली. जसबिरअंकल काकाना म्हणाले, “साहाब जी कल कॅब होणा कें? “हा, सरदारजी, कल हम जलदी निकलेंगे, जो नजदीक हैं वह शामको देखेंगे,पहले लंबे का पूरा कर लेते है”. “हा जी, हा जी, कल मैं, सुबे हाजिर हू सर, आप तय्यार रहिये”. सरदार निघून गेले, काकू आणि शर्विकां आधीच निघून गेल्या होता तर संजू एकटाच मेडोवर खेळत होता. एका दिवसात बरेच फिरणे झाले होते.रात्री हॉटेलच्या रेसटॉरंट मध्ये जेवण घेऊन आम्ही झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सरदारजी अंकल सकाळीच हजर झाले. आम्ही लाईट स्नॅक्स आणि coffe घेऊन बाहेर पडलो सकाळी आम्ही स्वामीनारायण मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. दुरूनच जामा मशीद पहिली. या वास्तूत असलेल्या प्रांगणात एका वेळेस २५००० लोक नमाज अदा करतात अशी माहिती जसबिर अंकल नी दिली. तिथून आम्ही पुन्हा लाल किल्ला पाहण्यासाठी पोचलो दर १५ ऑगस्ट ला पंतप्रधान इथूनच राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. १६३८ मध्ये शहाजहान यांनी हा किल्ला बांधला अशी माहिती मिळाली. हा किल्ला संपूर्ण लाल दगडांनी बांधलेला आहे.

संध्याकाळ पर्यंत फिरूनही आम्ही जंतर मंतर, नेहरू प्लानोटरियम आणि चांदणी चौक इतकेच पाहू शकलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला काश्मीर साठी दुसऱ्या ग्रुप मधून ट्रॅव्हलबरोबर जायचं होतं. शर्विका आग्रा येथील ताजमहाल पाहायला उत्सूक होती. वेळेअभावी ते आता शक्य नव्हते म्हणून काकांनी काश्मीर वरून परतल्यावर शक्य झाल्यास आग्रा जाऊ असे सांगून तिची समजूत घातली. दिल्ली ते काश्मीर  अंतर साडे आठशे किलोमीटर इतके होते, बावीस ते तेवीस  तासांचा प्रवास होता. त्याच रात्री आठ वाजता ट्रॅव्हल बस निघणार होती आणि रस्त्यात काही अडचण आली नाही तर दुसऱ्या दिवशी रात्री साडे आठ पर्यंत पोचणार होती. टूर ऑपरेटर नी आम्हाला प्रवासा दरम्यान काय काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले. आम्ही हिमाचल प्रदेश, चंदिगढ असा प्रवास करून जाणार होतो. दिल्ली पाठी पडली तसा झगमगाट संपला. राष्ट्रीय महामार्ग असल्याने प्रवास चांगला चालला होता. दर दोन ते तीन तासांनी बस चहापाण्यासाठी थांबत होती. ड्रायव्हर फ्रेश  होऊन पुन्हा स्टिअरिंग सांभाळत होते. प्रवास पर्वतमाथ्यावरून चालू होता. अंधार असल्याने कोणते शहर आले आणि गेले कळायला मार्ग नव्हता.सर्व प्रवासी थेट काश्मीरला आणि एकाच हॉटेल मध्ये उतरणार होते त्यामुळे कुणालाच घाई नव्हती. बस स्लीपर कोच असल्याने पडून राहणे इतकेच काय ते हाती होते.

सकाळी बस जालंदरला पोचली तेव्हा एका रेसटॉरंट समोर गाडी उभी राहिली.attendent ने “गड्डी आधा घंटा रूकेगी, जीने washroom जाणा हैं, होके आणा, यहा नास्ते का प्रबंध किया है”. अशी अनाउन्समेंट केली. पाच दहा मिनिटात बस रिकामी झाली. आम्ही खाली हॉटेल मध्ये जाऊन सर्व उरकून नाश्त्यासाठी त्यांचे dining गाठले, उपमा, आलू पराठा, सँडविच असे बरेच काही होते. दहा पंधरा मिनिटात आम्ही नाश्ता उरकला.

वाटेत गडबड नको म्हणून काळजी घेणे गरजेचे होते. चहा मात्र एकदम टेस्टी होता.काकाकाकूने दोन वेळा चहा घेतला. आता सर्व दूर अगदी सपाट मैदान दिसत होती आणि शेतकरी ट्रॅक्टरने नांगरत होते. रस्त्याच्या कडेला जागोजागी चहाचे ठेले होते. दुपारी बस अमृतसरला थांबली. तिथे आम्ही दुपारचे जेवण घेतले. बस मधील कोणालाही दुपारची अंघोळ करायला मिळाली नव्हती.सतत बसून आणि झोपूनही अंग दुखत होते. बस एसी असल्याने बाहेरचा त्रास जाणवत नव्हता. बऱ्याच ठिकाणी मोठे कालवे दिसले.रस्ते प्रशस्त आणि पक्के दिसले. तरीही बस वळण घेतांना धक्के बसत होते. बस दुपारी साडेतीनला जम्मूला पोचली. खरे तर आम्हाला जम्मूतावी एक्सप्रेस मिळाली असती तर बस प्रवास टळला असता पण आम्ही उशिराने नियोजन केल्याने बसने प्रवास करावा लागला. आम्ही श्रीनगरला पोचलो तेव्हा साडेपाच वाजले होते. सर्व प्रवासी या बसच्या प्रवासाला कंटाळले होते. कधी एकदा हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होतो असे प्रत्येकाला वाटत होते. हॉटेल हेरिटेज एका टेकडीच्या पायथ्याशी होते, सभोवती उंच वृक्षांच्या रांगा होत्या. टूर ऑपरेटरने प्रत्येक फॅमिलीला त्यांच्या रुमच्या चाव्या दिल्या आणि सोबत बॅगेज नेणारा attendent दिला.

आम्ही दुसऱ्या फ्लोअर वर रूम २०९ मध्ये प्रवेश केला, उंची फर्निचर, सुंदर ड्रेसिंग टेबल, मोठ्या sliding window. मोठा हॉल, आणि मोठी टीव्ही स्क्रीन, तीन बेड असा कंफर्टेबल सूट देण्यात आला होता. शर्विका आणि संजू यांनी बेडवर उड्या मारल्या. थोड्या वेळाने कॉमन announcement झाली आणि सर्वांना रेसटॉरंट मध्ये high tea साठी खाली बोलावले. आम्ही एकमेकांशी introduce करून घेतलं. गुजरात, केरळ, पुणे, मुंबई, एम पी अशी वेगवेगळ्या राज्यातून प्रवासी आले होते. प्रत्येकाची भाषा वेगळी, पेहराव वेगळा पण आत्ता सर्वांना जोडणारा एकाच दुवा म्हणजे प्रवासच आणि काश्मीर भेटीचे आकर्षण.

चहा,कॉफी संपल्यावर सर्व कुटुंब आपल्या रूम मध्ये गेली. शर्वीका संजू आणि मी हॉटेलच्या आवारात फिरत होतो.enquiry काऊंटर च्या बाजूला बाहेर एक मोठा पिंजरा होता त्यामध्ये तीन चार प्रकारचे पोपट ठेवले होते. ते सारखे पिंजऱ्यात फेऱ्या मारत होते. सूर्य अस्ताला जात होता आणि पाठच्या डोंगरातून किरण हॉटेल समोर असणाऱ्या स्विमिंग पूल मध्ये चमकत होती. जून महिना सुरू झाला तरीही हवेत गारवा होता.

आम्ही तास भर आवारात फिरून रूमवर गेलो तेव्हा काकाकाकू अंघोळ आटपून आमचीच वाट पाहत होते. आम्हीही आमच्या अंघोळी आवरल्या. दोन दिवसांनी अंघोळ करत होतो. काकांनी घरी कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र नेटवर्क नसल्याने कॉन्टॅक्ट झाला नाही. घर सोडून आज पाच दिवस झाले परंतू राणीच्या आईची आठवणही झाली नाही. किती स्वार्थी असतो माणूस. सुखात असेल तेव्हा तो इतका लूप्त असतो की स्व:ताच्या सुखाव्यतिरिक्त त्याला काहीच आठवत नाही. गेल्या चार पाच दिवसात प्रितमचा WhatsApp देखील आला नव्हता, कधी मन म्हणे का मी तिची वाट पाहतोय? तर कधी म्हणे तुझा जीव तिच्यात गुंतत चालला आहे, हे खरं ना? याच उत्तर कोण देणार?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar