शापित

शापित

ब्राह्मण कुळात दादांनी जन्म घेतला तरी घरी कुळजात रग्गड जमीन असल्याने त्यांनी शिक्षणाकडे द्यावं तस लक्ष दिले नाही. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा समज त्या काळी होता. साहजिकच पुरेसे शिक्षण नसल्याने वैचारीक समज कमीच म्हणायला हरकत नाही. पण पिढीजात भिक्षुकी होती त्यामुळे पोथीपुराणे मुखोद्गत होती. मुख्य म्हणजे खणखणीत आवाज आणि पूजा कथा सांगितल्या प्रमाणे सांगण्याची हातोटी ह्या जमेच्या बाजू होत्या. फार घाई असली की कधी कधी गाडी उताराला लागल्या नंतर पळते तसे अर्धेअधीक उच्चार तोंडातल्या तोंडांत करून पुढे जात. भाबड्या माणसांना नाही तरी कळतेय काय? भटाने पूजा सांगितली म्हणजे भरून पावली. त्यांच्या हातावर तुळशीपत्र आणि दक्षिणा ठेवली की यजमान स्वत:ला भाग्यवान समजायचा. दादा, देवा जवळचे एखादे फळ उचलून प्रसाद म्हणून त्याच्या ओंजळीत किंवा तिच्या पदरात देऊन आणि कपाळावर हात ठेऊन आशिर्वाद देऊन मोकळे व्हायचे.

गावातल्या बारा वाड्या आणि ग्राम पंचायत वाट्यास होते. गावातील प्रतिष्ठित घरांची सगळी देवाची कामे ते निगुतीन सांभाळत. वार्षिक वटपौर्णमा ते ब्राह्मण भोजन अशी वार्षिक सर्व देवाची कामे ते करीत व त्यातून चांगली प्राप्ती होई. घरी थोडी बागायत होती, नारळ, सुपारी आणि परड्यात भाजीपाला स्वत: लावत त्यामुळे कसलीच ददात नव्हती.

गावात बामाणा पासून ते तेल्यापर्यंत अठरा पग्गड जातीचे लोक त्यांना वार्षिक देवधर्म सांगायला बोलावत. प्रत्येक कुटूंबात दर दोन वर्षांनी होम आणि सत्यनारायण ठरलेला.नव्या वास्तूची शांती,देवस्थान जीर्णोद्धार झालंच तर लग्नकार्य ह्या गोष्टी होत्याच त्यामुळे नाही म्हटले तरी घरी काही कमी नव्हते. उलट बऱ्याचदा मदतीस अन्य गावातून भट बोलावावा लागे.





कोणत्या वाडीत प्रथम जायचे आणि कोठे सर्वात शेवटी त्याचा आडाखा त्यांच्या मनात ठरलेला असे. जेथे दोन पाच रुपये दक्षिणा मिळणे दुरापास्त ती ठिकाणे ते वगळत किंवा संध्याकाळी सात वाजता पोचत. पण जड्ये भटजी आले नाही तर घरधन्याला काही तरी राहून गेले अशी रुखरूख लागे, म्हणून इतर दिवशी ते दिसले तरी ओळख न दाखविणारे गावकरी सणावाराला, “दादा आमच्या घराकडे येत्तास मा, तुमका घेऊक इलय” अस म्हणत. त्यांच्या घरी सकाळीच स्कूटरसह हजेरी लावत. त्यांचा नाइलाज होई. तेही मनात म्हणत, “रांडेचा सकाळीच पहाऱ्यावर, इतर वेळेस कामास बोलावले तर शंभर कारणे सांगतो. ठीक आहे गाडी आणलीच आहे तर आटपून घेऊ पूजा”. “काय रे वामन्या,पूजेची तयारी केली आहे ना? माझी खोटी करू नको, मला बामणाच्या अवाठात जायचं आहे.तिकडची चार घर केली की मी चौके गाठीन म्हणतो”. त्याच्याशी बोलता बोलता त्यांनी थोडी सुपारी कातरून तोंडात टाकावी आणि उपरणे खांद्यावर टाकत वाट धरावी असा नेहमीचा रिवाज होता.
जिथे जातील तिथे किती वेळ आणि कशामुळे थांबतील याचा नेम नसे. कपभर दूध आणि खायचे पान मिळाले की त्यांचे इंजीन झक्कास चाले.

एकदा गव्हाणकर यांच्याकडे ते सत्यनारायण पूजेसाठी सकाळी आठ वाजता येतो म्हणून आदल्या दिवशी सांगून गेले ते संध्याकाळी सात वाजता पूजेसाठी आले. बरे आयत्या वेळी सत्यनारायण पूजा कोण सांगणार? दादा आले नाही तरी कितीही वेळ तिष्ठत राहणारे आणि दादांविरोधात चकार शब्द न बोलणारे असे हे आगळेवेगळे विसाव्या शतकातले गाव.

पुरोहित फारसे शिकलेले नसले तरी इंग्रजीवर त्यांचे प्रेम. ब-याच वेळा मुंबईकर दिसला की पूजा सांगतांना यांची गाडी नको त्या ट्रॅक वरून थेट “प्रोफेसर वारके” या सद् गृहस्थापर्यंत पोचायची. बिचाऱ्या प्रोफेसर वारके यांना त्यांच्या नावाचा कुणी हवाला देतो हे ठाऊकही नसावं. बारा वाड्यांची काम, ती ही सणावाराला म्हणजे चेष्टा नव्हे. पण चुकूनही कोणी “दादा, आता तुमका पूजेचो वेळ गाठणा शक्य होणा नाय, आम्ही अळवणी भटाक सांगूचा काय? ” एवढे वाक्य कानी पडले की त्यांच्यातला आग्यावेताळ बाहेर पडायचा आणि मग ते काय शब्द प्रयोग करतील ते सांगणे अवघड, त्या वाडीवर बहिष्कार टाकायला ते मागे पुढे पाहत नसत.
इतर कोणी पुरोहीत तिथे जाऊ शकणार नाही याची त्यांना खात्री असायची.आणि कधी तरी स्वतः राग निवळला की पुन्हा हजर व्ह्यायचे.





ह्या जडये भटजींना दोन मुले, मोठा विकास पायान अधू होता त्यामुळे त्याच्यावर त्यांनी शिक्षणाची फारशी सक्ती केली नाही, सातवी पर्यंत तो शिकला आणि वडिलांबरोबर भिक्षुकी करू लागला. दुसरा आकाश दिसायला देखणा अभ्यासात बरी गती म्हणून दादांनी त्याला चांगले शिक्षण द्यायचे ठरवले. काळ बदलला, भविष्यात भिक्षुकास कोण मुलगी देणार म्हणून त्यांनी त्याला पुण्याला पुढील शिक्षणासाठी पाठवावं अस ठरवल. त्यासाठी त्यांनी पैसेही जमा केले. पुण्यात पाहुण्यांकडे शब्द टाकून ठेवला होता, पण गावातील मुलांच्या संगतीने घात केला. एस.एस.सी.ला घोड्याने पेंड खाल्ली आणि दादांचा त्याला पुढे शिकवण्याचा त्यांचा बेत फसला.

तरीही धीर न सोडता त्यांनी त्याला पुण्याला ओळखीने एका देवळाच्या नित्य नेमाने करायच्या पुजेवर नोकरीस लावले. हेतू असा की तिथे जाऊन काही सुधारणा होईल गावगुंडांची संगत तुटेल पण तिथे ह्यांचे बस्तान बसेना, आले पळून, तिथं पासून आकाश शेती पाहू लागला. पावसाळी शेती, उर्वरित दिवस गाव टेहळणी. संगतीने घडू नये ते घडले. कार्टे एका देवळ्याच्या मुलीच्या प्रेमात पडले. त्यांनी ही सोयरीक जमणार नाही सांगूनही नाद सोडला नाही. त्याने तालुक्याला जाऊन कोर्ट मँरेज केले. आईने मुलाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करूनही उपाय चालला नाही. गावात जे त्यांच्याकडे आदराने पहात होते ते विचारू लागले, ” दादानू सून काय म्हणता? कायेव म्हणा, पोरग्या दिसाक एक नंबर हा!” हे ऐकून त्यांचा संताप होई. मुलाने तोंडाला काळे फासले. मग दादा संतापले, मुलाला घरी घेण्यास त्यांनी नकार दिला.

तो भाड्याने गावात राहू लागला.चरितार्थासाठी लोकाची रिक्षा चालवू लागला. दादा भट त्याने पार गोंधळले. भिक्षुकी करण्यात त्यांच चित्त लागेना. लोक फिरून फिरून मुलाच्या लग्नाचा विषय काढत. भिक्षुकी एकट्या अपंग मुलावर येऊन पडली. त्याची चांगली तयारी दादांनी करून घेतली तरी त्याचा वडीलांप्रमाणे जम बसेना.
लोक दादांना टाळू लागले.त्यांना मुलाच्या कृत्याने वेडाचे झटके येऊ लागले. कधीही कुठेही जाऊन “पूजेची तयारी झाली ना” , असे विचारू लागले. मुलाने घरात यायची तयारी दाखवली तर त्यांनी हाकलून लावले. मुलाने बापाचं तोंड बघायला पुन्हा येणार नाही म्हणत काढता पाय घेतला.
भिक्षुकी संपली. त्यांची पत्नी त्याचं हे वेड सांभाळता सांभाळता थकली. अपंग विकासने वडिलांच्या वेडाने हाय खाऊन आत्महत्या केली. दादांचा राबता संसार मोडला.





हे सर्व कमी म्हणून की काय, एक दिवस एक नट्टा पट्टा केलेली बाई सकाळीच रिक्षाने आली, असेल पन्नास पंचावन वर्षाची, देखणी होती, तीच्या सोबत एक तीस पस्तीस वर्षांचा मुलगा होता, ती दादांच्या खळ्यात उतरली, आणि त्यांना हाक मारत म्हणाली, “भटानू मी आलीय, तुमची सुषमा, हा बघ तुझा मुलगा”. तीचे शब्द ऐकताच दादा भट बाहेर आले. “कोण ? सुषमा ! तू इकडे का आलीस? काय काम आहे, मी भिक्षुकी सोडून दिली,जा,तू ,का आलीस इथे?”

इतर वेळेस दादा वेडात काहीही बोलत, आरडाओरड करत, आलेल्या कोणाची ओळख नीट पटत नसे आणि आज तिची हाक येताच घरातून तरा तरा बाहेर आले, त्यांच्या पत्नीला आश्चर्य वाटलं. काय म्हणावं यांना, म्हणजे खुळेपणाचे सर्व नाटकच की काय! तीने त्यांच्यावर डोळे वटारले तसे ते निमूट लोट्यावरून आत गेले. “कोण ग तू ? मी तुला नाही ओळखलं? त्यांना बर नाही, पुन्हा कधी तरी ये आत्ता नको.”

ती बया तिथंच उभी राहिली आणि म्हणाली, “तुम्ही मला ओळखणार नाही, त्यांना बरं नाही असं मुंबईला कळलं म्हणून मी मुद्दाम वेळ काढून आले, माझा मुलगा नेहमी विचारायचा ,आई माझा बाप सावळा, तु सावळी मग मी इतका गोरा कसा? त्याला आपला बाप जीवंतपणी पाहू दे, म्हणून आणलं. माझ्या नव-यान मला तेव्हा तशी स्विकारली केवळ भटासाठी, दोन वर्षांपूर्वी बिचारा गेला, तेव्हा आम्ही त्यांना भेटून निघून जाऊ”. हे ऐकून दादांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण ती ही वेळ नव्हती. तिने त्या बयेला आणि मुलाला पाणी दिले आणि तिची समजूत घालत म्हणाली मी तुझ्या पाया पडते, त्यांना बर नाही, डोक्यावर परिणाम झालाय, कृपया इथून निघून जा, त्यांना भेटून तू आमचं दुःख वाढवू नकोस, तुझी त्यांना गरज नाही”.

“बाई आम्ही त्यांना भेटून लगेच निघतो, प्लीज भेटू द्या”. ती संतापली, “सुषमा की फुषमा आलीस तशी लगेच जा, तुझ्या मुलांने त्यांना पाहिलं, आमची शोभा करायला थांबू नको. उद्या शेजारी पाजारी कळलं तर लोक शेण घालतील तोंडात त्यांच्या आणि तुझ्याही, चल जा इथून”. तिचा अवतार पाहून सुषमा घाबरली तिने आणलेली भेटीची पिशवी बाकड्यावर ठेवत म्हणाली, ” त्यांच्यासाठी कपडे आणि खायचं आणलं होत तेवढं द्या त्यांना. त्यांची काळजी घ्या, फार प्रेमळ माणूस, पण जात आड आली.नाहीतर —-“

दादा, गरादीतून हे पहात होते. बाहेरून कडी घातल्याने ते आतच हातपाय आपटत होते. त्यांनी दोन तीन वेळेस तिला तिच्या नावाने हाक मारत हात गरादीतून बाहेर काढले जणू तिला भेटायला ते उत्सुक होते. परंतु त्यांच्या पत्नीच्या पुढे त्यांचे काही चालेना. तीच त्यांचा ह्या वेडात एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळ करत होती. दादांच्या पत्नीचा अवतार पाहून सुषमाने काढता पाय घेतला.

तिथूनच तिने नमस्कार केला. दादांच्या पत्नीने तिची भेट तिच्या पुढे फेकली.”ही घेवून जा आणि पुन्हा इथे येवू नकोस त्यांची शपथ आहे तुला”. सुषमा एक वादळ निर्माण करून वाटेस लागली.
ती आणि तिचा मुलगा खळ्यातून खाली उतरली, मुलगा रागाने दादांच्या पत्नीकडे पहात म्हणाला,”कसली भट, लोकांच्या पोरीबरोबर खेळ करतांना आवडतं ना, मग आत्ता स्विकारायला लाज का वाटते? दुनियेला आज माहीत नसेलही पण उद्या कळणार नाही असंही नाही.” त्याला त्याच्या आईने गप्प केलं.

“चल, इथे थांबून काही उपयोग नाही, तुझ्या आईवर कोणी विश्वास ठेवणार नाही. ती अब्रुदार माणसं आहेत. त्यांनी स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढले, आपण कोण? ना रक्ताचे ना जातीचे”. “असं कसं म्हणतेस, आपण जगाला ओरडून सांगू, हा माणूस,भोंदू आहे, माझा बाप आहे”. त्यांचं बोलणं ऐकून दादांची बायको भडकली. तिने बाहेर येत त्याच्या एक मुस्कटात मारली.तसे सुषमानी त्याचा हात धरून त्याला ओढले आणि ती वाटेला लागली.
त्या राजबिंड्या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहताच राहिली.तिला स्वतःस भीती वाटू लागली न जाणो या बयेंन गावात जाऊन काही उलटसुलट सांगितलं तर, तिचा ह्या प्रकाराने संताप अनावर झाला. तिने नवऱ्याला ओढत बाहेर आणले आणि ओरडत म्हणाली, “तुम्हीही त्या बये बरोबर चालते व्हा. मला फसवून तुम्ही लग्न केले. इथे राहण्याचा अधिकार तुम्ही गमावला आहे. मी ही माझ्या जीवाच काय करायचं ते करायला मोकळी होईन”.





तिचे शब्द ऐकून त्यांनी तिचे पाय धरले, “रत्ना मी चुकलो मला माफ कर, तू म्हणशील ते मी करेन”. त्यांचे वेड कुठल्या कुठे पळून गेले. तिला आश्चर्य वाटले.काल पर्यंत वेड्यासारखा वागणारा आपला नवरा अचानक बरा झाला हे पाहून ती गोंधळली. तिने त्यांना घरात नेले आणि ठाम शब्दात म्हणाली, “तुम्ही माझ्या मुलाला उद्या कोणतीही अट न घालता घरात घेणार आहात, आहे कबुल?” दादांनी चक्क मान डोलावली आणि तिनेही मोठ्या मनाने त्यांची चूक पोटात घातली.

दुसऱ्या दिवशी ती मुलाला त्याची समजूत घालून सूनेसह घरी घेवून आली. सून आल्या आल्या दादांच्या पाया पडली. दादांनी तिला आशीर्वाद दिले. बाप इतका हळवा कसा झाला त्याचे मुलाला आश्चर्य वाटले. दादांच्या पत्नीने सुनेचे स्वागत केले आणि पाहता पाहता ती बातमी गावात पसरली पण हा आग्यावेताळ शांत कशाने झाला ते कुणास कधीच कळले नाही. रत्ना नावाच्या इज्जतदार गृहिणीने आपले ओठ मिटून दादांची अब्रु वाचवली आणि घरही वाचवले. रत्नाने मात्र मनापासून सुषमाचे, आपल्या सवतीचे आभार मानले. ती आली आणि दादांचे वेड गायब झाले. मुलाचा संसारही मार्गी लागला. ह्या गोंधळात दादांचा मोठा मुलगा विकास मात्र स्वत:चा जीव गमावून बसला.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

46 thoughts on “शापित

  1. SkincellPro

    Hi there, everything is going perfectly here and ofcourse every one is
    sharing information, that’s genuinely good, keep up writing.

  2. PRASHANT GIDH
    PRASHANT GIDH says:

    छान व सुंदर लेख……..

  3. Skincell Pro Ireland

    Do you have a spam issue on this site; I also am a blogger, and I was wondering your situation;
    many of us have created some nice practices and we are
    looking to swap strategies with other folks, why not shoot me an e-mail if interested.

  4. Skincell Pro Mole And Skin Tag Remover

    Incredible points. Great arguments. Keep up the amazing
    spirit.

  5. Carson

    My family all the time say that I am wasting my time here at web,
    however I know I am getting familiarity everyday by
    reading thes pleasant content.

  6. Alpha Femme Keto Genix Reviews Uk

    I love your blog.. very nice colors & theme. Did you make this website yourself or did
    you hire someone to do it for you? Plz answer back as I’m looking to construct my own blog and
    would like to find out where u got this from.
    kudos

  7. Keto Advanced Weight Loss Program

    Thank you a bunch for sharing this with all folks you actually recognize what you’re speaking approximately!
    Bookmarked. Kindly also talk over with my web site =).
    We may have a hyperlink trade contract between us

  8. Leland

    I’m truly enjoying the design and layout of your
    site. It’s a very easy on the eyes which makes it much more enjoyable
    for me to come here and visit more often. Did you hire out a designer to create your theme?
    Exceptional work!

  9. Bobby

    Hello! I’m at work surfing around your blog from my new iphone
    3gs! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Keep up the fantastic work!

  10. instagram takipçi satın al

    Hi there! I’m at work surfing around your blog from my new iphone 3gs!
    Just wanted to say I love reading through your
    blog and look forward to all your posts! Carry on the superb work!

  11. instagram takipçi satın al

    Appreciate the recommendation. Will try it out.

  12. instagram takipçi satın al

    Pretty nice post. I just stumbled upon your
    blog and wanted to say that I have truly enjoyed browsing your blog posts.
    After all I’ll be subscribing to your rss feed and I hope you write again very soon!

  13. instagram takipçi satın al

    Hello there I am so happy I found your webpage,
    I really found you by error, while I was researching on Google for something else, Regardless I am here now
    and would just like to say kudos for a tremendous post and
    a all round entertaining blog (I also love the theme/design), I don’t have
    time to browse it all at the moment but I have book-marked it
    and also added in your RSS feeds, so when I have time I will be
    back to read a great deal more, Please do keep up
    the superb work.

  14. instagram takipçi satın al

    Hi there i am kavin, its my first occasion to commenting anywhere, when i read this article i thought i
    could also make comment due to this good paragraph.

  15. Gretta

    That is a really good tip particularly to those new to the
    blogosphere. Short but very accurate information… Thank you for sharing this one.
    A must read post!

  16. instagram takipçi satın al

    I’m really enjoying the theme/design of your site. Do you ever run into any web browser compatibility issues?
    A few of my blog audience have complained about my blog not working correctly
    in Explorer but looks great in Chrome. Do you have any
    advice to help fix this problem?

  17. instagram takipçi satın al

    Your way of explaining all in this post is actually fastidious, every
    one be capable of effortlessly understand it, Thanks a lot.

  18. online betting

    What’s up to all, the contents existing at this web page are genuinely remarkable for
    people knowledge, well, keep up the good work fellows.

  19. instagram takipçi satın al

    This is my first time visit at here and i am truly impressed to read
    everthing at alone place.

  20. Tyrone

    Thanks very interesting blog!

  21. rokph.com

    We still can’t quite think I could always be
    one of those reading through the important points found on your web blog.
    My family and I are sincerely thankful on your generosity and for offering me the advantage to pursue my personal chosen career path.
    Thanks for the important information I managed to get from your site.

  22. https://www.vsoftlift.us

    Exactly what I was searching for, thank you for putting up.

  23. c3rp.us

    If you wish for to grow your knowledge simply keep visiting this web page and be updated with the most up-to-date news
    posted here.

  24. https://thebasicsofit.com/index.php?title=Travel_Oxygen_For_Copd_Patients

    That is really fascinating, You are a very skilled blogger.
    I’ve joined your rss feed and sit up for in search of extra
    of your fantastic post. Also, I have shared your site in my social networks

  25. Jacques

    You made some decent points there. I looked on the internet to find out more about the issue and found most individuals will go along with your views
    on this web site.

  26. Lionel

    Hmm is anyone else experiencing problems with the
    pictures on this blog loading? I’m trying to determine
    if its a problem on my end or if it’s the blog. Any responses would be greatly appreciated.

  27. vintage t shirts

    Helⅼo thеre! Quiⅽk questjon that’s completely off topic.
    Do yooս know hօww to make ʏοur site mobile friendly?
    My blog looks weird wһen brоwsing from my apple iphone.
    I’m trying to find a themke or plugіn that might be able
    tto fix this problem. If yоu have any recߋmmendations, pleasе share.
    With thanks!

  28. Ngan

    Good day! Do you know if they make any plugins to help
    with SEO? I’m trying to get my blog to rank for some
    targeted keywords but I’m not seeing very good success.
    If you know of any please share. Thank you!

  29. Emile

    It’s really a nice and useful piece of info. I’m happy that you shared this helpful info with us.
    Please stay us up to date like this. Thank you for sharing.

  30. agen judi slot mesin

    Itѕ such as you leatn my mind! You appear to
    understand a ⅼot apρr᧐ximately this,
    like you wrote tһe e-book in it or sometһing. I feel thɑt you simply can do with a few
    % tto pressure the message home a bit, howevеr
    other tjan that, thiss is wonderful blog. A fantastic read.
    I’lⅼ certainly be back.

  31. mohegan sun beyond

    Hello, i think that i saw you visited my blog thus i
    came to “return the favor”.I am trying to find things to enhance my
    site!I suppose its ok to use some of your ideas!!

  32. Lin

    Hello to every one, it’s actually a nice for me to go to see this site, it includes
    precious Information.

  33. Consuelo

    Hello my loved one! I want to say that this post is amazing, nice written and include
    almost all significant infos. I’d like to look extra posts like this
    .

  34. Brenton

    These are genuinely fantastic ideas in about blogging.

    You have touched some fastidious points here. Any way keep up wrinting.

  35. Juliane

    Howdy! I’m at work browsing your blog from my new iphone 3gs!
    Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Carry on the superb work!

  36. Lupita

    Hey there! I know this is somewhat off topic but I was wondering
    if you knew where I could get a captcha plugin for my comment form?
    I’m using the same blog platform as yours and I’m
    having problems finding one? Thanks a lot!

  37. Pat Mazza

    If you desire to get a good deal from this article then you have
    to apply such methods to your won webpage.

  38. sushichat.com

    I’m no ⅼonger positiѵe whеre you are getting
    yoսr іnformation, but greаt topic. I newеds to spend a while ffinding out more or սnderstanding moгe.
    Τhanbk you for wonderfdul inf᧐rmaion I used to be searching for this info for my missiߋn.

  39. Doretha

    Pretty! This was a really wonderful post. Thank
    you for supplying these details.

  40. game show slot machines

    Good post. I learn something totally new and challenging
    on blogs I stumbleupon everyday. It’s always exciting to read articles from other writers and use a little
    something from their websites.

  41. Bernard

    Why viewers still make use of to read news papers when in this technological globe the
    whole thing is available on web?

  42. Deanne

    Hi there Dear, are you really visiting this website daily, if so then you will definitely get fastidious know-how.

  43. Onita

    Hello, I enjoy reading through your article. I like to write a
    little comment to support you.

  44. super bowl point spread

    Hurrah! After all I got a blog from where I can genuinely take useful facts regarding my study and knowledge.

  45. Jacquie

    Hey there just wanted to give you a quick heads up. The text in your
    content seem to be running off the screen in Internet
    explorer. I’m not sure if this is a formatting issue or something to do with internet browser compatibility but I
    figured I’d post to let you know. The design and style look great though!

    Hope you get the problem resolved soon. Many thanks

  46. Jacinto

    Thanks for sharing your thoughts about website.
    Regards

Comments are closed.