शेवंता भाग २

शेवंता भाग 2

शेवंता भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेवंती ज्या समाजातील मुलगी होती, ते पहाता त्यांचा सल्ला तिच्या काकीने ऐकला असता हयाची खात्री नव्हती. पण ती मोठ्या आशेने त्यांना विचारत होती. तिला तसंच वाटेला लावणं योग्य नव्हतं. ते तिला म्हणाले, “शेवंती, उद्याचो दिवस कळ काढ, बघूया काय उपाय सापडता तो, तुझ्या मते सापव मराक व्हयो आणि काठी तुटता नये, बरोबर मां! सोमवारी तू ये,आता शांत घराक जा”. ती हसली, “सर, सोमवारी नक्की माका उपाय सांगा, माका सहन नाय जाणा. आजपर्यंत शांत रवलय, आता ता शक्य नाय”.  सामंत सर हसले. ती तिच्या वाटेला लागली. तिला चौदावं वर्ष सुरु होतं, मन बंडखोरी करू पहात होतं आणि ते चुकही नव्हतं.

शेवंता घरी पोचली, तिला पाहून चुलती म्हणाली, “गो, शाळेतून पोरा कधीची इली, तू खय होतं? तुका उशीर कित्याक झालो?” ती उत्तर न देताच घरात शिरली तशी चुलती रागावली, “आयकाक येणा नाय काय? खय होत?” “खय जातलय ? अभ्यास विचारीत होतंय सरांका. काय काम होता काय तुझा?” चुलती तिच्याकडे पहात राहिली. चुलती तिच्या आईकडून केस विंचरून घेत होती. ” गो, नीट फणी फिरव, हातात त्राण नसाल्यावरी काय करतं, गिळाक बरी पटपट, खसखाशीत फणी लागाक व्हयी, गुंत कशी मोडतली?” सिताने जोरात फणी फिरवली जावेला लागावं असा काही तिचा उद्देश नव्हता पण फणी लागली तशी ती जोरात ओरडली, “हाय हाय,गो, वसाड पडली तुझ्या तोंडावर,किती जोरान फणी घासत, काय माका मारू बिरूचो इचार हा काय?”

शेवंताने ते ऐकलं आणि तिने आईच्या हातून फणी ओढून घेतली, “कशाक केस उगवतं गप बस जा. “ती चुलतीकडे पहात म्हणाली, “गे तुझे केस तुका उगवक काय झाला, आरसी हा ना?” तिने चमकून शेवंता कडे पाहीले. “तुका खूळ लागला काय? जा निंबराचा इलस, ता पाणी बिणी पी. थोड्या वक्तान जेवक वाढतंय तवसर अभ्यास कर” पुन्हा जावेकडे पहात म्हणाली, “तोंड सांडून बघीत कित्याक रवल, केस उगव.” शेवंता धुसफूस करत घरात शिरली, तिने घरातली भांडी जोराने जमिनीवर आदळली.





त्या आवाजाने चुलती घरात आली, तिच्या समोरच तिने चुलीवर शिजत असलेली पेज वाईलात ओतून टाकली. ते पाहून ती ओरडली,”काय झाला ह्या पोराक?” ती शेवंता कडे पहात राहिली. तिचा असा रुद्रावतार तिने कधी पाहिला नव्हता. तिने जावेला हाक मारली  “गो सीता,अशीच खायल्या वाडीत जा, बाबू ताम्हणकरांक बोलावला म्हणान सांग. व्हयत्या पोराक कोण लागलो कळणा नाय, तरी त्याका सांगलय पिपळाकडसून येव नको म्हणान, थयलो समंध बरो नाय, पण आयकतला कोण?” सीता उठून वाटेला लागणार तोच शेवंता धावत बाहेर आली आणि तिला अडवत म्हणाली, “गे खय जातं, दोपार झालीहा बस निवांत, तिचा डोक्या बिघडला हा, तुझा ठीक हा मा?” आपली मुलगी चुलतीला अस कस बोलू शकते? तिला कळेना हिला झालं तरी काय? तिने शेवंताला जवळ घेतले आणि मुसमुसत रडत म्हणाली, “माझे बाय, तुका काय गो झाला असा?” सीतेचा आवाज कानी पडताच जाव घरातून बाहेर येत म्हणाली,”तुका मी ताम्हणकरांका बोलावक सांगलय, आजून हयच, फटकी गो पडली तुझ्यावर?”

शेवंता आईच्या मिठीतून बाजू झाली चुलतीकडे पहात म्हणाली, “चूप बस उगाच आरड घालीत फिरा नको, माका कायेक जाऊक नाय. तू कित्याक माझ्या आयेक छळतं? स्वतः बसानं रवत आणि माझ्या आवशीबापाशीकडून सगळी कामा करून घेतं, शोभता तुका?” चुलती पहातच राहिली. कधी तोंडातून ब्र न काढणारी मुलगी एवढं कस काय बोलू शकते? हेच तिला कळेना. तिने स्वतःच कपाळ बडवून घेतलं, जाव मध्ये पडून तिला आवरत होती. ती विनंती करत म्हणाली, “गे, गप रव, हात कपाळावर कित्याक म्हणून मारून घेतं? त्या पोरग्या न्हान हा, त्याका काय कळता? आमी कोणी तुका बोललव काय? तुझी तक्रार कोणाकडे केलव काय? नाय मा!”

तिच बोलणं ऐकताच तिच्या जावेला चेव आला. “जन्माक इलस तितपासून तुझा हगणा, मुतणा काढलय, तुका काय म्हणून करूचा ठेवक नाय आणि तू माका बोलतस, लाज गो पेटली तुझी”. शेवंता इरेला  पेटली होती, “होय बोलतलय, माका सगळा कळता, माझ्या आवशीबापाशीच्या जिवावर मजा मारून त्यांकाच छळशीत काय! कित्याक माझ्या आवशी पासून माका तोडलास? सकाळी उठल्यापासून माझे आऊस-बापूस राब राब राबतत. तू ऑर्डर सोडीत रवतस. त्येंका जीव हा की नाय?” चुलती धावून तिच्या अंगावर गेली, हात उगारून ती शेवंताला मारणार तोच शेवंता ओरडून म्हणाली, “मारून तर बघ, आवशीचो छळ केलस म्हणान माझोव कराशीत काय? मी तुझ्या कडसून मार खाव काय?” आता तिची खात्री पटली, हिला नक्की समंधाची बाधा झाली असावी, ती तडक ताम्हणकरांकडे गेली, ते नुकतेच जेवून अंगणात हात धूत होते. तिला पाहून म्हणाले,” वराडकरणी इतक्या दोपारण्याक खय चललं?”  ती कपाळावर हात मारत म्हणाली,” कर्म आमचा, माझा शेवत्या कसा तरी करता, जरा घराकडे येऊन बघा, पिपळा वरचो समंध नडलो की काय तो कळणा नाय?”





ताम्हणकर हात टॉवेलला पुसत म्हणाला, “पोराग्या आफडीचा नाय मा? तसा असात त कठीण, पिपळाचो संमंध बामण हा त्याका आफडीच्या बाईन ओलांडला तर चलना नाय म्हणून विचारतय.” “नाय हो तसा नाय. तसा असता तर तुमका सांगल नस्तय. चला, बेगीन.” ती म्हणाली, तसा त्याने शर्ट अंगात घालत वाट धरली. “वराडकरणी तू घराक जा. हो मी इलय”. तिने वेगात घर गाठले. घराच दार लोटलेल होतं. अंगणात कुणीच नव्हतं, ती घरात शिरली तिथेही कुणीच नव्हतं. तिने हाक मारली पण कोणी प्रतिसाद दिला नाही, म्हणून ती घरपाठी गेली, पण टमरेल नेहमीच्या जागेवर होत. “खय म्हणान गेली? घरात पुरूष माणूस नाय खय शोधतल ह्यांका? ती मोठ्याने बोलली. 

इतक्यात ताम्हणकर आले,”गे वहिनी, गे वराडकरणी –“त्यांचा आवाज ऐकुन ती बाहेर आली,”अहो भाऊजी शेवंता आणि त्येची आवस दोघीव खय गेली कळणा नाय.” “खय जातली, झाड्याक गेली असतीत.”असे म्हणत तो पेळेवर बसला आणि त्याने विडी काढून शिलगावली. त्याला जोराचा ठसका लागला, तसं खोकता खोकता म्हणाला,”शरद खय गेलोहा?” “ते नाना परबाकडे गेले हत, आणि भावोजी आडो करूक डोंगरातल्या बामनाकडे गेले हत,आता ह्यांका शोधतला कोण? खयं  उलाथली कोणास ठाऊक?” ती त्रासून म्हणाली. ताम्हणकर उठले,” गे वहिनी मी नाना पराबाकडे जाऊन बघतय, पिपलाकडून जातंय म्हणजे कळात तरी. ती हय ईली तर माका निरोप धाड” त्यांनी टायरची दणकट चपले पायात सरकवली आणि तो वाटेला लागला.

ती विचार करत बसली,” ह्या पोरग्याक खोटे गुण कसे लागले? आज काय शाळेत जावुक नाय मा?” ती स्वतःशी बोलत होती. ती अचानक उठली आणि रमल्या कोकऱ्याच्या घराच्या दिशेने चालू लागली. तो शाळेत शिपाई होता. तसंच काही घडलं तर त्याला माहीत असावं म्हणून तिचा प्रयत्न होता. तिने हाक मारली, “रमल्या बा घरी आसस काय?” तिची हाक ऐकून तो बाहेर आला. तिला पाहून त्याच्या ” काय गे वराडकरणी, आज हय खय? वाट चुकलं की काय? काय काम काडलं दोपारण्याचा?” ” तसा काम काय नाय, पण आज आमच्या शेवंताचा शाळेत कोणाबरोबर भांडाण जावून नाय मा?” “नाय बा. पण ह्या कित्याक म्हणांन विचारत?” त्याने उत्सुकतेने विचारलं. “रे, ता घराकडे आला तितपासून धुमशान घालीत हा. भांडीकुंडी फेकून दिल्यान, पेज वायलीत ओतून टाकल्यान, कधी नाय ता माका फटा फट बोलला, माझ्या अंगावर धाऊन इला, आणि आता आवशीक घेऊन खय ता नपड झाला, आता बापूस इलो त  म्हणात मीच त्यांका नाय केलंय” म्हणान विचारतय. तो गंभीर होत म्हणाला,” नाय बा, शाळेत काय एक जाउक नाय, त्यातून शेवंताचो प्रश्नच नाय, ता आणि तिचो अभ्यास, कोणावांगडा भांडण तंटे नाय की काय नाय, पण आता ह्या दोपारण्याक खय म्हणान गेला? त्याच्या  बापाशिक सांगलस काय?”

“त्येकाच शोधूक बाहेर पडलय,आपण गेला अणि आवशिक बरोबर घेऊन गेला. अख्खो आवाठ शोधलय, खय मागमूस नाय. ते नाना परबाकडे कामाक गेले हत, थय जाऊन बघतय, तुका गमली त माका कळव”. ती जायला निघाली इतक्यात रमेशला आठवले “वराडकरणी आज तुझा पोरग्या शाळा सुटली तरी थांबला होता, आमच्या सामंत सरांका तिका भेटाचा होता, माका वाटला काय तरी अभ्यासाची अडचण असतात म्हणान मी काय विचारूक नाय तिका. त्यांका काय सांगी होता तिकाच ठाऊक”





ती मधल्या वाडीत परबांच्या अवाठात गेली. नाना कमरेवर हात ठेऊन तिच्या नव-याला कामा बद्दल सांगत होते. तिला येताना पाहून ते शरद वराडकर यांचेकडे पहात म्हणाले, “तूझी माघारीण हय कित्याक येता, कोण पाव्हणें येवचे होते काय?” “नाय वो, आज कशे येतीत, इले तर उद्या येतीत,. आवाठात आसात काय तरी काम.” ती जवळ येताच नवऱ्याला म्हणाली,” वाे, वायच हय येवा.” त्यांनी कुऱ्हाड बाजूला ठेवली, कमरेला बांधलेलं टॉवेल काढून घाम पुसला, तिच्याकडे पहात म्हणाला,” काय ता सांग,कित्याक इल? नानाच्या कामाची खोटी नको”.

ती हळू आवाजात त्याला सांगण्याचा प्रयत्न करत म्हणाली, “आपला शेवत्या आणि तिची आवस घरात नाय, खय गेली या कळणा नाय, अवाठ शोधलय खयच नाय”. तो चिडला “खय जातली? आरतेपारते बघ, झाड्याक नाय मा जावूक? तू उगाच नाचा नको.” ती समजूत घालत म्हणाली, “अवो,घरापाठी संडास असताना बाहेर निमरात कित्याक मराक जातीत? ओ, आज ता शाळेतसून इला तेवा पासूनच डोसक्या फिरल्यावानी करीत व्होता. घरातली भांडी जोरान आदळली, चुलीवरची पेज वाईलीत ओतून टाकल्यान. मी समजूत घालूक गेलंय तर अंगावर इला. म्हणान मी ताम्हणकराक बोलावक गेलंय तवसर दोघी पसार,खय गायब झाली वेताळाक ठाऊक”.

त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली,” खय गेली असात?” त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून नाना परब त्याला म्हणाले, “शरद्या काय झाला? काय सांगता ती?” “अहो, नानानू आमची भावजय आणि तिचा पोरग्या खय तरी वाटेक लागली.” नाना परब जोराने हसले, ” काय मेल्या भीतं, रे सरड्याची धाव कुंपणातागायत, फारच फार त गेली असात माहेराक, जातली खंय?”

शरद मात्र धास्तावला त्याला शेवांताची काळजी वाटू लागली “नानानू वायच बघून येतय, वसंता डोंगरात बामनाकडे गेलो हा आडो करुक. तो म्हणात आमीच तिका पिटाळली”. नाना परब नाराजीच्या स्वरात म्हणाला, “आता ह्या अर्धवट टाकून चलल म्हंजे,——” शरद समजावणीच्या स्वरात म्हणाला,” माका पावणाईची आण, तुमचा काम पुरा केल्याशिवाय मी कोणाकडे जावचय नाय,आता वेळच वाकडी हा”. तो नाना काय बोलतात ते ऐकायला थांबला देखील नाही.

वाटेत तो बायकोला सांगत होता,”गो तुका मी नेहमी सांगत होतंय त्या पोर्ग्याक आवाशी पासून तोडू नको, जावेक बघून घेणस नाय. तिचे बरोबर गोडी गुलाबीन रवाचा सांडून उभो वाद मांडलस. आपणाक मूल नाय ता नाय तिका दुसरा पोरग्या होवक दिलस नाय. जळला तुझा लक्षण”. ती काही न बोलता चालत राहिली. गेले अनेक वर्षे तिने जावेवर अन्याय केला हे त्यालाच नव्हे तर साऱ्या गावाला माहित होते. म्हणूनच ती तोंडाला कुलूप घालून चालत होती. तो सांगत होता त्यात तथ्यच होतं. शेवंताच्या जन्मानंतर तिने वसंता आणि सिता यांना कधीही मोकळीक दिली नाही, सारखं काम, काम आणि काम. बिचारी रात्री थकून झोपून जायची. 

वाटेत भांडण नको म्हणून त्याने आवरतं घेतलं. तो घरी पोचला तरी घराचं दार तसंच होतं. त्याने शेजारच्या शांतारामला कुकारा घालून बोलवून घेतलं. “रे झिला, माझा एक काम कर, असोच लगोलग डोंगरातल्या बामणाकडे जा आणि आमच्या वसंताक बोलवून आण, माझा नाव सांग. जा बाबा, बेगीन”. शांताराम निघून जाताच त्यांनी घरापाठी शेवंताचा शोध घेतला. काय कराव? कोणाला सांगाव? हळू हळू दोघी हरवल्याची बातमी गावभर पसरली. शेजारी त्याच्या घराकडे येवू लागले. वसंताही धापा टाकत आला. घरासमोर जमलेली माणसं पाहून तो घाबरला. “व्हयती कित्या जमलीहत? काय झाला?” त्याने आपल्या भावाकडे पहात विचारलं. त्याची कावरी बावरी नजर शेवंताचा शोध घेऊ लागली. “पोरग्या खंय? शाळेतसून इला मा ?” त्याने शरदकडे पहात विचारले. शरदने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, “जरा शांत रव काय झाला या माकाव ठाऊक नाय, शेवत्या आणि त्येची आवस दोघीव गायब आसत, खय गेलीहत पावणाईक ठाऊक”.





ते ऐकून वसंता मटकन खाली बसला, “दादा, माका काय एक सांगा नको, माझा चडू माका आणून दी”. तो जोराने रडू लागला. शरद त्याच्याकडे पहात म्हणाला, रे चूप रव शोधू या, खंय जातीत, माहेराक गेली असात”. कोणी तरी गर्दीतुन बोललं, “तिच्या माहेराक कोणाक तरी धाडा, काय झाला ता कसा कळतला, हय छळवाद काय कमी केलास, कसा रवतला बापडा?”  “बावीत उडीबिडी घालूक नाय मा, काय सांगूक येवचा नाय, कंटाळला यांच्या जाचाक,

काय करतला रोजचो जाच हा.” कोणीतरी दुसरा म्हणाला. शरदची घरवाली घरातून सगळं ऐकत होती. बाहेर येऊन सगळ्यांना हाकलून द्यावं असं तिला वाटत होत पण तिची हिंमत होत नव्हती. “चला दोन दोन जणा मिळान आरतेपरते शोध घेवया, हय उभ्या रवान ती आपणहून नाय येवची.” पराडकर बोलला. त्यांची चर्चा सुरू असतांनाच, आप्पा कुडव तिथे धावत आला. “रे वसंता, घात झालो, कोणीतरी आमच्या बावडेत जीव दिलो. मी गोरवांका पाणी देऊक जाय होतय तर बावीत माका कोणी तरी बुडतांना दिसला. हो मी धावत हय इलय. लवकर चला नायत बुडान मरतीत आमची बाव वीस हात खोल हा.”

त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत वसंता आणि सर्व जमाव कुडवांच्या परड्याकडे धावला. वसंता धाय मोकलून रडत होता. कोणीतरी आत वाकून पाहीलं. अगोदर विहीरीत कोणी दिसेना. मग कुडवच ओरडला, “मायझयानो ती काय रहाटाच्या राजूक धरून आसत. हळू घेवा त्यांका बाहेर. शांतारामने विहिरीत उडी घातली. शेवंतानी एका हातांनी आईला धरलं होत आणि दुस-या हाताने राजू घट्ट धरला होता. अजूनही दोघी सुरक्षित होत्या.

शांताराम त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी पाहिले दोघी जिवंत होत्या. त्यांनी एक राजू मागवून घेतला. शेवंताच्या कमरेला राजू बांधला आणि वर ओढून घ्यायला सांगितलं. शांताराम सीता काकूला धीर देत म्हणाला, “काकी तू माका धरून रव जास्त हला नको. माका जोर करून  धरू नको, माकाव डुबवशीत.” लोकांनी शेवंताला रहाटाने  हळू हळू ओढून घेतले. मग सीताला वर ओढले. दोघी अतिशय घाबरल्या होत्या. दोघींना नाना कुडवाच्या खोपीत नेऊन झोपवलं. त्या बुडण्या अगोदरच  त्यांनी दोरी धरल्यामुळे त्यांच्या पोटात पाणी गेलं नव्हतं.दोघी तिथे कशा गेल्या आणि कोणी उडी मारली ते एवढ्यात कळणारही नव्हतं. पण शेवंतानेच राजू घट्ट धरत आई आणि स्वत:ला वाचवलं होतं.सगळा गाव कुडवाच्या परड्यात जमा झाला होता. दादा परबही तिथे आले. ते घोळक्यातून त्या दोघींपर्यंत पोचले.त्यांच्याकडे पहात रागाने म्हणाले,”काय झाला गो जीव देऊक, डोस्क्या फिरला काय? उगाच लोकाच्या कामाची खोटी.”

लोकांकडे पहात ओरडून म्हणाले, “जावा आपल्या घराक, हय काय तमाशा हां की शिमगो.” नाना कुडवाने पाण्याचा तांब्या परबांच्या हाती दिला. परबांनी त्यातलं पाणी पित बाजूला जाऊन खाकरून थूंकून टाकले. पाणी पीत त्यांनी तांब्या कुडवांच्या हाती दिला. तस कुडव हसत म्हणाले, “दादानू, पाणी सीता वैनीक हाडलय, तुमी सा पिलास?” दादा परब हसत म्हणाले,” रे मेल्या ती दोघा तासभर पाण्यात होती, पाणी पिल्याशीवाय रवलीत का? देवचोच असात तर घोटभर चा दे पाणी कसला देत!” दादांच्या बोलण्याने हास्याची खसखस पिकली. दादा परब शरदकडे पहात म्हणाले, “ह्यंका घराकडे घेऊन जा, त्यांका कोणी काय बोला नको, काय चुकला असात ता पोटात घाल, पोलीसांका कळला तर तुझ्या बायलेक आणि ह्यांका आत टाकतीत मगे वकील केल्याशिवाय सुटका नाय, हत पैसे वकील करुक?”

शेवंता काही बोलली नाही, ती चुलत्या बरोबर चालत होती. तिच्या पाठीमागे वसंता आपल्या बायको सोबत तिला धरून चालत होता. बघे लोक दुरूनच पाहत होते. गर्दीतून कोणीतरी बोलले,” थोरली,सारखी दांडगाई करता, ह्या पडला गरीब गाय. काय करतला बापडा?” ताम्हणकर त्यांच्या पेळेवर बसला होता, तो शेवांताला पाहून म्हणाला, “बाय, अशी सामकी बस, काय म्हणता तुझी तब्बेत? पिपळाकडसून येताना घाबरलस काय?” ती ताम्हणकरांकडे पहात रागाने म्हणाली “काकानू तुमी घराकडे जावा. माका भूत, देवचार, संबंध, हडळ कोण एक लागाक नाय, मी तुमका हात जोडतयं” “बाय माझे, तुझ्या चुलतीन बोलवल्यान हुणान मी इलय, मी काय रिकाम टेकडो आसय? खूब कामा हत घराकडे.” तो तणतणत निघून गेला. हळू हळू अंगण रिकाम झालं.” गो, चडवा हो प्रकार काय? लोक तोंडात शाण घालतीत,उद्या पोलीस येतीत घराकडे, काय सांगू जीव देवून बघीतल्यान म्हणान. चुलती आसा, बोलतली, अन्न पाणी वेळेवर गावता मा!”





ती बापाकडे रागाने पहात म्हणाली,” होय तर, गाडी ओढणाऱ्या बैलाक पण वैरण वेळेवर गावता, आपण माणसा आसव इतक्या तरी कळताना? समज इली तेवा पासून बगतय आऊस सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत राब राब राबता काय ऊपेग? चुलती तिका घालून पाडून बोलता कधी बायकोची बाजू घेतलास? आपल्या बायलेक ढोर मेहनत करूची लागता ह्याचो विचार केलास? किती म्हणान सहन करतली ? तिका जीव असा की नाय?”

तिचं बोलण ऐकून शरद धास्तावला, ही पोरगी आपल्याला बोलायला कमी करणार नाही. चूक असली तर ती आपल्या बायकोची आहे. “गो चडवा आता पर्यंत तुका व्हया ता सर्व कोणी चुलतेनंच दिल्यानं मा? तुझा हगणा, मुतणा कोणी काढला तिनेच ना? आता तुका लय कळाक लागला? ती काय तुझी वैरीण हां?” “तुमी तिचीच बाजू घेतलास, काकीक अशी वागणूक माझ्या आवशीन दिली असती तर तुमी चूप रवला असतात काय? तुमी काम करतास, आबाव काम करतत, तरी सकाळी काकी आबांका आणि आवशुक पाणी भरूक  लावता, तुमी कधी बावीवरून पाणी आणलास काय? तुमी आणि काकी कित्याक पाण्याक नाय जाणास? दोनी वेळेची भांडी आये घासता, एक वेळेची काकी कित्याक नाय घासणा?” तिचे वेडे वाकडे पण खरे प्रश्न ऐकून चुलती रागावली, “चार महिन्याची होतंस तेवा पासून सगळा केलय त्याचा बरा पांग फेडलंस.” “माका माझ्या आवशीपासून तोडलास ह्या बरा केलास काय? माझ्या आवशीन तुका सांगूंक नाय माझ्या चडवाक बघ म्हणान.” वसंता मुलीवर रागावला,” गो चडवा गप रव, तुझ्या जिभेक काय हाड आसा की नाय? किती बोलशीत, तोंड फाटात. जा, घरात आणि काय असा ता निवांत खा जा.”

“आबा, माका मारलस तरी मी चूप बसूचय नाय, काकी जाईत आये बरोबर. दोघीव सारख्या काम करतीत. तु अजीबात पाणी भरूक जाता नये. शाळेत माका पोरा चिडवतात, तुझो बापूस बाईल माणसावरी पाणी कित्याक भरता म्हणान? तुका नसात काय वाटणा. माका लाज वाटता.” तिचं बोलण त्याला लागलं, गावातील बरेच जण त्याची टिंगल टवाळी करीतच. कोणी  मुद्दाम त्याला विचारी, “आबा, तुमचा खळा कोण सारवता?” कोणी म्हणे “आबा पाणी भरण्यात हुशार दोन दोन घागरी आरामात नेता.” ते ऐकल की त्याला वाईट वाटे, मनात म्हणे उद्यापासून पाणी भरणे बंद पण कोंबडा आरवला की तो उठे आणि पाण्याला जाई. मे महिन्यात सहा वाजण्यापूर्वी पाणी भरलं नाही तर विहीरीत खडखडाट होई. शेवंताचं बोलण ऐकून चुलती वरमली ती लोटयावर येत म्हणाली,”भावजी उद्यापासून पाणी भरता नये,तुमका काय करूचा ता करा  शेवत्या  माका मदत करीत.” तिने एका दगडात दोन पक्षी मारले होते. ते ऐकून शेवंता चुलतीला म्हणाली, “मी भरीन पाणी. आवशीक थोडे दिवस सांगा नको. तिका करु दे आराम. तवसर काका येतीत मदतीक.” तीच बोलण चुलतीला लागलं पण जर शेवंता च्या बोलण्याला विरोध केला असता तर जखम पून्हा वाहणार होती. 

दुसऱ्या दिवशी रविवार असूनही ती लवकर उठली आणि  पाणी भरायला गेली. थोड्या वेळाने काका आणि काकू भांडी घेऊन पाण्याला आले. तिने फार काही न बोलता आई वडिलांची पाणी भरण्याच्या जाचातून मुक्तता केली होती. गेल्या तेरा चौदा वर्षांच्या सरावामुळे वसंताला वेगळच वाटत होत. अवघ्या चौदा वर्षाच्या मुलीने ही किमया घडवून आणली होती.अर्थात त्या करता तिला पुरेशी किंमत मोजावी लागली होती. या पुढे वडिलांची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि निश्चयाला यश आले होते. तिला स्वतःचा अभिमान वाटत होता.

सोमवारी ती शाळेत गेली तेव्हा वाटेत मुले तिच्या विषयी कुजबुजत होती पण तिला कुणाच्या बोलण्याची पर्वा नव्हती. ती शाळेत पोचण्यापूर्वी शिपाई दादा मुळे बातमी शाळेत पोचली.नेहमी प्रमाणे प्रांगणात प्रार्थना झाली.प्रार्थना संपल्यावर मुले वर्गात जाण्यापूर्वी मुख्याध्यापक पाटील सर आणि इतर शिक्षक समोर उभे राहिले. बिलिये बाई माईक वर सांगत होत्या, “आज आपण विशेष प्रसंगा निमित्त थांबलो आहोत आपल्या शाळेची इयत्ता नववीत असणारी शेवंती वसंत वराडकर हिने आपल्या घरातील सर्वांना सन्मानाने जगता यावे यासाठी अभूतपूर्व लढा दिला, तिने योजला तो मार्ग चुकीचा होता पण तिचा प्रयत्न प्रामाणिक होता म्हणून मी आपले मुख्याध्यापक पाटील सर यांना विनंती करते त्यांनी शेवंती हिला पुष्प गुच्छ देऊन तिचा सन्मान करावा आणि शेवंतीला विनंती की तिने भविष्यात चुकीचा मार्ग न निवडता लढा द्यावा.” बिलीये बाईंचे भाषण संपताच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि पाटील सरांनी शेवंतीला पुषपगुच्छ दिला. शेवंतीने सरांना वाकून नमस्कार केला. शेवंता प्रयत्नाच्या युध्दात यशस्वी झाली होती.

इतर कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

56 thoughts on “शेवंता भाग 2

  1. Jere Devine

    i love this just right post

  2. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    छान ! कथा सुरेख लिहिली आहे!

  3. RANJANA RAO

    ओघवत्या कोकणी भाषेत छान लिहिलंय. सिस्टिम विरुद्ध जाताना होणारा त्रास आणि निराशा आणि त्यातून मिळालेले यश छान.??

  4. parasite

    Hi! I understand this is kind of off-topic but I had to ask. Lotta Dilly Adara

  5. Jane

    You produce quality content, I appreciate you

  6. watch

    I’m truly enjoying the design and layout of your website. It’s a very easy on the eyes which makes it much more enjoyable for me to come here and visit more often. Did you hire out a designer to create your theme? Great work!| Lindie Branden Zaller

  7. direk

    Thank you for all your labor on this web site. My aunt take interest in managing internet research and it is obvious why. We learn all relating to the lively tactic you deliver reliable information through the website and as well as welcome contribution from visitors on this point and my simple princess is becoming educated a great deal. Take advantage of the rest of the year. You are conducting a powerful job. Piper Richie Ulphiah

  8. netflix

    Everyone loves it when folks come together and share ideas. Great blog, stick with it! Aubrey Niccolo Florri

  9. dublaj

    I am commonly to blog writing as well as i truly value your material. The short article has really peaks my interest. I am mosting likely to bookmark your site as well as maintain looking for brand-new info. Odetta Sayre Lelia

  10. online

    Going to be starting a cycle of Testosterone with Equipoise. Did the same cycle in the past for 8 weeks with decent results. If I was to cycle the two compounds for 12 weeks this time will the gains be greater? Corry Jamey Trevah

  11. hindi movie

    After looking over a few of the articles on your site, I seriously appreciate your technique of writing a blog. I saved it to my bookmark webpage list and will be checking back in the near future. Please check out my website as well and tell me how you feel. Rubie Toddy Pace

  12. indirmeden

    Do you have any recommendation for device so that I can check it myself? Debby Justin Carline

  13. turkce

    Hi, you illustrations got me here, thank you for the walkthrough. Myra Tarrance Giff

  14. turkce

    Thanks for the helpful post. It is also my belief that mesothelioma cancer has an particularly long latency period, which means that warning signs of the disease would possibly not emerge right until 30 to 50 years after the original exposure to asbestos fiber. Pleural mesothelioma, and that is the most common variety and impacts the area about the lungs, may cause shortness of breath, chest pains, plus a persistent cough, which may cause coughing up bloodstream. Timmi Stavro Danie

  15. turkce

    After I initially left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now every time a comment is added I receive 4 emails with the same comment. Perhaps there is an easy method you can remove me from that service? Thank you! Charline Bent Roede

  16. turkce

    fantastic points altogether, you just won a new reader. What may you suggest about your publish that you made some days ago? Any certain? Corie Zed Cordell

  17. turkce

    Hey, I think your website might be having browser compatibility issues. When I look at your blog in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, fantastic blog! Tawnya Bard Bronez

  18. turkce

    Wow, incredible blog layout! How lengthy have you ever been running a blog for? you make blogging look easy. The entire glance of your website is excellent, let alone the content! Issi Moritz Gonzalez

  19. turkce

    Hey! Someone in my Facebook group shared this site with us so I came to check it out. Martynne Toddy Jessamine

  20. turkce

    Do you have a spam issue on this website; I also am a blogger, and I was wanting to know your situation; many of us have developed some nice practices and we are looking to exchange strategies with others, please shoot me an e-mail if interested. Leonora Cori Castillo

  21. turkce

    Hey there, I think your website might be having browser compatibility issues. When I look at your website in Opera, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, superb blog!| Tera Trey Godliman

  22. turkce

    Nice post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday. It will always be useful to read through content from other writers and practice a little something from other websites. Maryanne Tanner Kynthia

  23. turkce

    opps forgot to mention my brother Frank also has the chinese export Covid. Evelyn Alva Cruz

  24. turkce

    This design is incredible! You definitely know how to keep a reader amused. Marcelline Donnie Celin

  25. turkce

    Pretty! This was an extremely wonderful article. Thank you for providing these details. Kania Milt Philbin

  26. turkce

    You made some nice points there. I did a search on the topic and found most persons will go along with with your website. Midge Consalve Neilla

  27. turkce

    Wonderful article! This is the kind of information that are meant to be shared around the internet. Cacilia Alexandr Gabrielle

  28. turkce

    341472 411708Following I initially commented I clicked the -Notify me when new feedback are added- checkbox and now each time a remark is added I get four emails with the same comment. Is there any method youll be able to take away me from that service? Thanks! 757285 Cherida Luigi Erlin

  29. turkce

    I and also my pals were actually following the good suggestions found on your web page while immediately developed a horrible feeling I had not expressed respect to the site owner for those strategies. All of the young men are actually so happy to read all of them and have truly been tapping into these things. Thank you for genuinely quite kind and then for going for some ideal themes most people are really needing to be aware of. Our own honest apologies for not expressing appreciation to earlier. Rosanne Pepe Xylina

  30. turkce

    Pretty! This has been a really wonderful article. Thanks for supplying this info. Korie Avigdor Bat

  31. turkce

    I have learn a few just right stuff here. Certainly price bookmarking for revisiting. I wonder how a lot attempt you set to create this kind of magnificent informative website. Marta Ogden Mehalek

  32. turkce

    here are some hyperlinks to web pages that we link to for the reason that we think they are worth visiting Myranda Guntar Arne

  33. turkce

    very nice post, i definitely love this website, keep on it Vere Jodi Chavez

  34. erotik

    Can I simply say that of a relief to seek out a person that in fact knows what theyre talking about on the web. You actually know how to bring an issue to light to make it important. Lots more people must check out this and see why side of the story. I cant think youre less popular simply because you certainly develop the gift. Lyndel Reese Arney

  35. erotik

    Useful info. Lucky me I discovered your website by accident, and I am surprised why this coincidence did not came about earlier! Tallulah Bevon Moser

  36. erotik

    My brother suggested I might like this website. He was entirely right. This post actually made my day. You can not imagine just how much time I had spent for this information! Thanks! Jan Meir McHale

  37. bingol escort

    Please bring the continuation of the nice posts, I will be glad if you approve the comment.

  38. buy seo

    Please bring the continuation of the nice posts, I will be glad if you approve the comment.

  39. sa

    I have learn this put up and if I may I want to recommend you some interesting issues or tips.

  40. kaman escort

    Thank you for informing, success is in your hands, escort I would be glad if you support me.

  41. Justin

    I constantly spent my half an hour to read this weblog’s articles all the
    time along with a cup of coffee.

  42. gebze escort

    Fabulous, what a blog it is! This webpage provides helpful facts to us, keep it up. Lebbie Shelton Orlene

  43. siktir pic anan gelsin

    Howdy! I simply want to give a huge thumbs up for the good information you may have right here on this post. I will probably be coming back to your weblog for more soon. Catlee Joachim Inge

  44. aksaray escort

    Thank you ACCEPT my blogpost comment Admin.

  45. burdur escort

    thanks you admin escorts

  46. lefkosa escort

    thanks you admin escorts

  47. biga escort

    thank you admin escort site help me

  48. eskisehir escort

    thank you admin escort site help me

  49. erzurum escort

    thank you admin escort site help me

  50. kepez escort

    thank you for nice sharing

Comments are closed.