संकल्प नवा
श्वासात भरून घेतला, मी वनराईत मोकळा श्वास
कितिक युगे तिने जपला मज जगवण्याचा ध्यास ?
स्वार्थी अंधधूंद आम्ही, तरूवरांचा केला किती नाश
परी नवनिर्मीतीचा तिचा उत्साह, ती झुंजली खास
कधी वणवा, कधी कुऱ्हाड, तिजवर आक्रमणे अनेक
खोड कधी, मूळे, कधी ओरबाडू पाने, केला तिचा उपहास
सरपण कधी तुळया कधी फर्निचर, होती तिजवर आघात
सोलून तिची कातडी बनविले औषध, परी केला न तिने संताप
कत्तल कितिदा केली आम्ही, हमरस्ता, धरणे, पाट शेतास
आणून जेसीबीचा राक्षस, उखडण्यास तिज आवळला पाश
न दिसले तिचे अश्रू कुणा, न तिजसाठी कुणी कधी गहिवरले
आठवा जरा मनाशी तुमच्या, जगण्यास तिने काय नाही पुरविले!
जीवनसाठी पुरविली शुद्ध हवा, उमेद जगविण्या नवी पालवी
जोजावले चवऱ्या ढाळुनी, तुमचा थकवा अन शीण घालावी
काय तुम्ही दिले तिजला स्व मनाला जरा पहा विचारूनी?
उपकारांची फेड करता अपकाराने तिचा परीवार जाळूनी
पिढीने केल्या चुका सुधारू अन्याय आता तिच्यावरील थांबवू
नव्या पिढीचा संकल्प, हवा नवा, चला प्रत्येकी एक झाड लावू
Change for better not Modi type.
Just wish to say your article is as astonishing. The clarity to your submit is just great and i can think you’re knowledgeable on this subject.
Fine together with your permission let me to snatch your feed to keep up to date with approaching post.
Thanks 1,000,000 and please continue the enjoyable work.
Do you have a spam problem on this website; I also am a blogger, and I was wanting to know your situation; we have
created some nice methods and we are looking to swap
strategies with other folks, why not shoot me an email if interested.
I was able to find good advice from your content.