सत्तासंघर्ष आणि अस्तित्वाचा लढा ।।

सत्तासंघर्ष आणि अस्तित्वाचा लढा ।।

२०१४ साली मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले तेव्हा प्रस्थापित सरकारच्या कारभाराला कंटाळून जनतेने मोदी सरकारचा पर्याय निवडला असा राजकिय विश्लेकांचा पक्का दावा होता. हे यश भाजपच, अण्णांच्या आंदोलनाचं, काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकरणाच कि मोदींच्या “भाईयो और बहनो ” अशा आवाहनत्मक सादेच , याच गणित सोडवण्यात पाच वर्षे कधी मागे पडली ही कोणत्याही विरोधी पक्षाला समजलेच नाही.

  मध्यंतरी दुसरी आणि तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली त्यात चंद्राबाबू नायडू , शरद पवार देवीगौडा,कुमारस्वामी इत्यादी दक्षिणात्य नेत्यांपासून ते सोनीया, मायावती, ममता , आणि अखीलेश कुणीही मागे नव्हते. आपल्या बाबासाहेबांच आडनाव लावणारे प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी सांभाळत महाराष्ट्र पिंजून काडत होते.हे कमी की काय म्हणून राज ठाकरेंनी “मोदी हटाव देश बचाव “चा नारा देत प्रत्येक जिल्हा वेग वगळ्या पक्षाच्या व्यासपीठावरून पिंजुन काढला.तीसरी आघाडी, महाआघाडी प्रत्येकाचे व्यासपीठ दणाणून सोडले. दोन वर्षे अगोदर याच राज साहेबांनी गुजरातला जाऊन , मोदींची भलामण केली होती . गुजरात पँटर्न महाराष्ट्रात राबवला तर महाराष्ट्राचा विकास झपाटय़ाने होइल असे मत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला कानपिचक्या दिल्या होत्या. पण हजार-पाचशेच्या नोटा चलनातुन टाईम बाऊंड काढून टाकायच्या ठरवल्या आणि मोदी ,राज साहेबांच्या मते व्हिलन ठरले.असे काय अघोषित घबाड राज साहेब यांच्या मनसेकडे होते की ज्यामुळे ते एक दिवसात मोदींवर नाराज झाले.

विरोधकांनी अशी रणधुमाळी माजवली की आता मोदी त्या वावटळीत वाहुन जाणार ,विरोधकांच्या हाती खर तर तीन मोठी भाजपने हातून का गमावली राज्य आणि झालेली पिछेहाट हा मुद्दा होता.नाही म्हटल तरी अध्यक्ष शहा, नड्डा, राजनाथ ,स्वराज सगळेच थोडेसे धास्तावले होते. पण मोदी स्थितप्रज्ञ होते त्यांनी राजकरण कोळुन प्यायल होत. हार मानण त्यांच्या रक्तात नव्हत. फिनिक्स पक्षी राखेतून भरारी घेतो अस म्हणतात मग हा तर मोदी नावाचा गरुड त्यानी पराभावाच्या राखेतून विजयस्तंभाकडे झेप घेतली नसती तरच नवल ! 

ज्या अमेरिकेन  मोदींना व्हिजा नाकारला होता त्यांनी त्यांच्याचसाठी पायघड्या घातल्या होत्या. अमेरिका, फ्रान्स, कुवेत, जपान अशा अनेक देशांनी त्यांना सन्मानित केल होत. वर्षांत एकही रजा  न उपभोगता कार्यरत असणारा एकमेव राजकरणी म्हणून जग त्यांच्याकडे पहात होत आणि आम्ही त्यांच्याकडे विविध देशांच्या भेटीवर किती पैसे किती कोटी खर्च केले त्याचा हिशेब मागत होतो . इतर देशांच्या मदतीने त्यांनी पाकिस्तानच्या कट्टर दहशतवाद्याला मन्सूर अझरला काळ्या यादीत टाकायला भाग पाडल तेही पाकिस्तानला चीनचा पाठिंबा असतांना.भारताने शेजारी असणाऱ्या देशांना चिनपासून अभय दिल म्हणूनच श्रीलंकेत चिन प्रचंड गुंतवणूक करून बांधत असलेला तळ तहकुब केला. हेच नेपाळच्या बाबतीत आणि मिझोरामच्या बाबतीतही घडल.चिनसारख्या आर्थिक आणि सामरीक बाबतीत आघाडीवर असणाऱ्या देशाशी टक्कर द्यायला अमेरीकेच्या ट्रंपलाही विचार करावा लागतो परंतु भारताने स्थाई समितीत सभासदत्व मिळवण्यासाठी जे अनेक देश पादाक्रांत केले त्यामुळे चिन सोडता आता उर्वरित मोठ्या राष्ट्रांची आपल्याला संमती आहे.

चिनचा ड्रँगनही मोदींकडे पाहताना जपूनच पाहतो याच कारण भारताची फ्रान्सची आणि रशियाशी असलेली सलगी.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचा निर्माण झालेला दबदबा पाहून विरोधी पक्षात वातावरण थंड पडल .लोकसभेची निवडणूक लढताना सर्व पक्ष एकत्र आले तरी त्यांच्यात ऐक्याची भावना नव्हती कारण प्रत्येकाला डोहाळे होते ते पंतप्रधान पदाचे. ममता, मायावती , अखिलेश, आणि अशा डझनभर स्वयंघोषित नेत्यांना स्वप्न पडत होत ते पंतप्रधान पदाच!

मोदींनी एकहाती ३००चा आकडा पार केला आणि विरोधी पक्षाच्या पायाखालची जमीन सरकली, काँग्रेसचे एवढे अध्

पतन झाले की राष्ट्रीय पक्ष असूनही शंभरी गाठता आली नाही.

कोणतेही सरकार एवढ्या मोठ्या संख्येने येणे हे निर्णय प्रक्रिया राबविण्यासाठी पोषक असले तरी लोकशाहीसाठी खरच पोषक ठरेल का हे काळच ठरवेल.

समाजाच्या विकासासाठी आवश्यक अशी कितीतरी बिल लोकसभेच्या राज्यसभेत बहुमत नसल्याने स्थगित होती .नवीन सरकार निवडून येताच मंत्रीमंडळाची फेररचना मोंदींनी जाणिव पूर्वक केली आणि त्याची सुत्र अमित शहांच्या हाती दिली आणि पहाता पहाता. गेले पाच वर्षे रखडलेली, बहुचर्चित बिल मोदी -शहांनी आवाजी मतदानान मार्गी लावली. ज्या राज्यात भाजपला बहुमत नाही अशा राज्यातही विकासासाठी तेथील इतर पक्षांनी आपल्याच पक्षाशी बंडखोरी केली आणि भाजपला समर्थन देऊन सरकार स्थापन केल.सत्ताधारी पक्ष हताशपणे विरोधी पक्षात जाऊन बसले . या कुटनितीला काय म्हणाव ! 

  काँग्रेसचे नेते असोत की राष्ट्रवादी काँग्रेसचे, पूढील पाच वर्षे हाती कोणतेच पद नसता जगणे अवघड आहे हे प्रत्यकाला समजल्याने साधा, सौप्पा मार्ग अनेकांनी अवलंबला मग चित्रा वाघ असो,कालीदास कोळंबकर,संदिप नाईक,गणेश नाईक आणि राजे शिवेंद्रसिंहराजे पिचड  अशा कितीतरी मान्यवर नेत्यांनी शरद पवारांचा हात सोडून फडणविस आणि उध्दव यांच्याशी सोयरीक केली.फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी भारतीय पक्षाच्या कमळ ध्वजाने तर उध्वव साहेब यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले.पक्ष बदल हे ऊशिराने सूचलेले शहाणपण की राजकीय अपिहार्यता हे कळणे अवघड नसले तरी प्रत्येक पक्ष आणि कार्यकर्ते यांची अवस्था थोड्या फार फरकाने तशीच असल्याने डोकावून पाहण्याची हिंमत कोण करणार ?

विखे, नाईक, वाघ , पिचड अशी मात्तबर मंडळी पक्ष सोडून गेली तेव्हा चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून गेली असे पावरबाज पवार म्हणाले मग तटकरे आणि अजीतदादा कधीपासून सरकारच्या रडारवर आहेत त्यांना हात का लावत नाहीत? तेथे सरकारची कोणती अडचण आहे ? की त्यांचा ऊपयोग राखीव प्यादी म्हणून ऐन निवडणूकीवेळी करायचा अस फडणवीशी डोक्यात आहे!

सत्ता संघर्ष अजूनही ख-या अर्थाने सूरू झालेला नाही. आता चाललेली लठ्ठालठ्ठी ही पूढील घमसान राजकीय युध्दाची नांदी आहे. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सध्या तरी आयुधे शमीच्या झाडाखाली गाडून टाकली आहेत असेच वाटते.महाराष्ट्रातील तमाम नेते ज्यांचे स्वतः चे साखरकारखाने आहेत किंवा ते स्वतः त्या कारखान्यात महत्त्वाच्या पदावर आहेत त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचा एफ .आर. पी दिलेली नाही त्यामुळे ते रडारवर आहेतच कोणता मासा कधी गळाला लावायचा इतकेच काम पाटील दादांकडे शिल्लक आहे. निवडणूक जशी जवळ येईल तशी सरकारी यंत्रणा कामाला लागेल, एसीबी, ईडी, आणि या सारख्या संस्था अचानक कार्यरत होतील आणि नाटकाचा शेवटचा अंक सूरु होईल. आता ट्विट करण देखील जोखमीचे होत आहे, तुम्हाला कधी ट्रोल केले जाईल किंवा कधी धमकिचे फोन येतील याची ग्वाही कोणी देऊ शकणार नाही.

जेव्हा फडणवीस  महायात्रेत २२०पारची ग्वाही देत आहेत तेव्हा त्यांनी काही राजकीय गणितं मांडली आहेत त्यात राजसाहेब म्हणतात तसा ईव्हीएम चा वाटा किती आणि जनतेची केलेली विकास कामे आणि भविष्यातील योजनांचा वाटा व पक्षाचे संघटीत कार्य किती ह्याचे ऊत्तर येणारा काळच देईल. चंद्रकांत खैरे, अडसूळ हे नेते इव्हिएमचे शिकार झाले अस तर राजसाहेब यांना म्हणायचे नाही ना! 

आज मात्र अनेक विरोध गटातील नेते आपल्यापाठी अचानक चौकशी लागू नये या करीता गांधीजींच्या तीन माकडांची भुमीका पुरेपूर वठवत आहेत  कारण त्यांचेही हात बरबरटलेले आहेत.सामान्य नागरीकांने घडणाऱ्या या गोष्टीचा विचारच करायचा नाही असे ठरवले असल्यास लोकशाही जीवंत राहीलच कशी?लोकशाहीचा चौथा स्तंभ हतबल आहे.त्याला भिती आहे कोणत्याही लेखाबद्दल त्याच्यावर सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका येईल आणि  सरकारी पाहूणा बनावं लागेल. सांप्रत फक्त मख्खपणे बसून येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घ्यायच एवढ आणि एवढेच तुमच्या आमच्या हाती आहे.याच कारण तुम्ही लोकशाहितील असे नागरीक आहात ज्याचे हक्क चार वजनदार लोकांनी खरेदी करुन कुलूपबंद ठेवले आहेत. शहाणपण यातच आहे हम कुच नही बोलेंगे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “सत्तासंघर्ष आणि अस्तित्वाचा लढा ।।

  1. India

    I like what you guys tend to be up too. This sort of clever work and reporting!
    Keep up the great works guys I’ve you guys to my blogroll.

Comments are closed.