सांगायला हवं आहे
सांगायला हवं आहे, कळवायला हवं आहे
आपला देश महान आहे, असच पीएम सांगत आहेत
आपण विश्वगूरू बनलो,खुळे अनुयायी म्हणत आहेत, भ्रमात सारे जगत आहेत
आपल्या या महान देशात खून, दरोडे पडत आहेत
क्रीडा मंत्री, सचिव, नेते, महिला खेळाडूंच्या शरीराशी खेळत आहेत
तक्रार करून, कारवाई नाही, मोकाट नेते, गल्ली, दिल्लीत फिरत आहेत
आपल्या या महान देशात, कोट्यांनी बेकार फिरत आहेत
नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, जगण्यासाठी, चोरीमारी करत आहेत
याच मुलांना आश्रय देत, गुन्हेगारी आकडे, शहरातुन वाढत आहेत
आपल्या या महान देशात, तरूणाईचे जाहीर धिंडवडे निघत आहेत
चरस, गांजा, हिरॉईन, कोकेन, एलडी, टपरीवर सहज मिळत आहे
तरुण, तरुणी संडे पार्टी, एकत्र येऊन बेफामपणे झिंगत आहेत
आपल्या या महान देशात, स्वातंत्र्याची गळचेपी, काही नेते करत आहेत
पत्रकारांना धक्काबुक्की, माराहाण, त्यांची कॉलर कोणी धरत आहे
बुद्धिजीवीनी व्यक्त न व्हावे, अशी तरतूद, गुंड, दलाल करत आहेत
छोटे व्यवसाय, उद्योग, मरणास लागले, अंबानी, अदानी, लोढा फुगत आहे
कन्येच्या लग्नाचा थाट, कोट्यानी रूपये खर्च, राजवाडे सजत आहेत
निमंत्रण मिळते, बीग बी, सचिनला, उद्योगपती हजेरी लावत आहेत, नृत्यांगना नाचत आहेत
आपल्या या महान देशात, घाटावर पूजा, आरती भाट करत आहेत
जनतेचे प्रश्न सुटले समजून, मंत्री, सचिव परदेश वारी करत आहेत
उत्क्रांत देश किती जाहला, ऑगस्ट क्रांती, तेजस,वंदे भारत, वेगाने दौडत आहेत
आपल्या या महान देशात औद्योगिक क्रांती गावगावात घडत आहे
जमीन मोकळी करण्यासाठी, गावचे रान रात्री बेरात्री जळत आहे
विदेशी कंपन्या उद्योग येथे, मोकळ्या रानी, सुखानैव मांडत आहेत
आपल्या या महान देशात, ग्रामीण भागी, खेडी विकसित होत आहेत
भूमिहीन होती छोटे शेतकरी, मजूर म्हणून शहरात गुमान राबत आहेत
सरकार देई फुकट धान्य, गोरगरीब बिचारे, खोट्या आनंदात, दुःख क्षणभर विसरत आहेत
आपल्या या महान देशात, राजा बनून पीएम मंदिरे बांधत आहेत
प्रतिष्ठापना श्रीरामाची, विदेशी पाहुणे,येथे हजेरी लावत आहेत, धुप आरती जळत आहे
गरीबांच्या दहनासाठी पैसे नाहीत, गंगेत प्रेत कुजत आहेत, मगरी स्वैर दिसत आहेत
आपल्या या महान देशात, जनतेच्या पैशांची, नेते लूट करत आहेत
आमचे नेते, वाराणसी, वृंदावन, अमरनाथ, काशी भगव्यात फिरत आहेत
मोठी स्वप्ने दाखवून जनतेला, खरे प्रश्न विसरवण्याची धर्माची गोळी विकत आहेत
आपल्या या महान देशात स्वयंभू नेते स्वतःच देव बनत आहेत
मै हू ना? चालीवरती, मुमकीन सारेच करत आहेत, माना गरीबांच्या डोलत आहेत
झुंडशाहीची परिसीमा सरली, ईडीच्या आडून आवाज खाली दबत आहे
आपल्या या महान देशात पक्षीय बदल घडत आहेत
पालखीचे भोई, हवसेनवसे पक्ष बदलू रात्री बेरात्री बहुरूपी बनून भेटत आहेत
आपल्याच काकाला अंगठा दाखवत, चाकर बनून यांची नोकरी करत आहेत
आपल्या या महान देशात रोज अपघात होत आहेत
निरपराधाना चिरडूनही, नशेली पोरे, सहीसलामत सुटत आहेत
त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न पोलीस, खासदार, गद्दार डॉक्टर धावत आहेत
आपल्या या महान देशात सामान्य नागरिक झुरत आहे
कोणाला न त्यांची चिंता, रस्ते न सुविधा, कुढत कुढत जगत आहे
सुंदर रस्ते त्यांच्यासाठी, फ्लाय ओव्हर, बुलेट ट्रेन, हवेतून उडत आहेत
आपल्या या महान देशात सारेच अर्तक्य घडत आहे
विचार कुणी न केला होता, राजा मान खाली घालून, ढसाढसा रडत आहे
राजकारणात नवीन पहाट, वेगळे काही घडवत आहे, गर्व नको म्हणत आहे
आपल्या या महान देशात लोकशाही नव्याने रुजत आहे
भ्रमाला थारा नको, खोट्याला सहारा नको, उघडा डोळे, मतदार म्हणत आहेत
शिका यातून, सुधरा स्वतःला, ऐका आतला आवाज प्यारा, मातृभूमी सांगत आहे
आपल्या या महान देशात समिकरणे नवीन जुळत आहेत
अहंकाराला थारा नको, कानात खोटा वारा नको, आशेने भारत बघत आहे
विकासाची नवीन पहाट, घटीकापात्र भरत आहे, पुर्व पुन्हा उजळत आहे
you are in reality a just right webmaster. The site loading velocity is incredible. It seems that you are doing any unique trick. In addition, The contents are masterwork. you have performed a wonderful task on this topic!