ॠत्वी
अडीच वर्षाच्या ॠत्वीच शाळेत नाव घालायचं ठरल तेव्हा आजोबा मुलाला म्हणाले “रत्नाकर गाढवा सहा वर्षापर्यंत तू शाळेत जात नव्हता एव्हढ्याश्या मुलीला शाळेत पाठवायला तुला काहीच कस वाटत नाही .रत्नाकर काही बोलला नाही. पण रेश्मा सासऱ्याकडे पाहत म्हणाली “आप्पा काळ बदललाय बर, तुम्ही रत्नाकरच्या वयाचे होता तेव्हाच तुमच घर, आणि रत्नाकरने घेतलेलं घर फरक आहे न !” तुम्ही म्याट्रिक होतात मग रात्नाकारला इंजिनिअर का केलंत?यु.एस.ला का पाठवलंत? आप्पा निरुत्तर झाले . आप्पा त्या काळी म्याट्रिक झाले होते प्रपंचाची जबाबदारी पडली म्हणुन पुढे शिकता आल नाही. त्या काळात म्याट्रिक झालं तरी चांगली नोकरी मिळत होती.अण्णांना खाजगी कंपनीत लिपिकाची नोकरी मिळाली.काम शिकत शिकत ते हेड क्लार्क झाले. काटकसरीने संसार करून त्यांनी दोन्ही मुलांना शिकवले.रेवती बी.कॉम.झाली टेलिफोन निगम मध्ये कामाला लागली. रत्नाकर इंजीनिअर झाला त्याला चांगला जॉब मिळावा म्हणुन कर्ज काढून एम. एस. करायला यू एसला पाठवल.रेवतीच लग्न ठरलं तेव्हा गाठी असणारे पैसे खर्च झाले.
रिटायर होतांना आपांच्या कंपनीतून मिळालेल्या ग्र्याचुईटीच्या लाखभर रुपयावर समाधान मानावं लागल. आप्पांना हे सार आठवल आणि सुनेचा राग आला ऐपत नसतांना रत्नाकरला यू एस ला पाठवलं म्हणून आज टी सी एस ला प्रोजेक्ट म्यानेजर झालाय हे सांगाव अस वाटल पण आप्पा काही बोलले नाहीत. ते बळे बळे हसत म्हणाले “तू म्हणतेस ते हि खर आहे म्हणा तेव्हा एव्हडा विचार कोणी करत नव्हत पण मला आपल वाटत एव्हढ्याशा मुलांना उगाचच शाळेत का कोंडयचं?” “आप्पा चाळीस हजार फी भरून आलोय एकदा भेट देवून या म्हणजे कळेल तिथे काय काय शिकवतात ते. ती काही गावाकडची अंगणवाडी नाही.मुल गोळा केली खिचडी शिजवून घातली कि झाली शाळा. ” रत्नाकर अप्पांकडे पाहत म्हणाला . ” ‘रत्नाकर, अरे तू अशाच बालवाडीत शिकलास हे विसरलास का ? पुराणिक बाईनी काहीच तुला शिकवलं नाही अस सांग बर शपथेवर! ” त्याचं बोलण चालू असतांना ॠत्वी आली तिच्या हाती नवी कोरी शाळेची ब्याग होती त्याचा वास आप्पांच्या नाकात भरून राहिला.
“आबोजा ,आबोजा उद्या पासून मी नर्सरीत जाणार,तुम्ही येणार न मला सोडायला?” “ॠत्वी, बाळा येईन कि तुला सोडायला,तुझी ब्याग घेईन तुला उचलून घेईन” आप्पा तिच्याकडे पाहत कौतूकान म्हणाले. रेश्मा ॠत्वीला जवळ घेत म्हणाली “बेटा तुला घ्यायला गाडी येणार खाली,हॉर्न वाजवणार मग आपण मोटर गाडीन जायचं आजोबांना त्रास नाही द्यायचा.” “मी आजोबान बरोबर जाणार , मला आजोबाच सोडणार,होय कि नाही आजोबा? ” बाळा तुझी ममा सांगते ना गाडीने जायचं मग गाडीनेच जायचं मी येईन हो तुला गाडीत सोडायला. ” रेश्माचा हात सोडत ॠत्वी आजोबांना येवून चिकटली “आबोजा तुम्ही नक्की येणार न मला गाडीत सोडायला !” रत्नाकर तिची समजूत घालत म्हणाला येतील हो बेटा, तू खेळ जा बाजूच्या खोलीत आम्ही थोड डिस्कस करतोय.त्या चिमुरडीला काय कळल कुणास ठाऊक पण ती खुर्चीत टाकलेली बार्बी घेऊन निघून गेली. “आप्पा तुम्ही तिला रोज सोडायला जात जाऊ नका, तिला स्वतःला सवय होऊ दे, कधी तुम्ही नसलात तर कोण सोडायला जाणार ?” “अरे मी कुठे जाणार ? आणि मी नसलो एखादे दिवस तर हि आहेच कि ” “आप्पा तिला डिसिप्लीन कळावा म्हणून आईला सुद्धा नका पाठवू.” आप्पा त्याच म्हणण ऐकून काय समजायचं ते समजून गेले.
सोमवारी ॠत्वी नर्सरीला जायला निघाली तेव्हा तिचा रंगी बेरंगी पोषाख,गळ्यात आय. डी. खांद्याला वाटर ब्याग पाहुन अप्पा खुश झाले. त्यांचा नर्सरीला पाठवण्याचा राग निवळला. ॠत्वी स्वताहुन त्यांच्या पाया पडायला खाली वाकली तेव्हा त्यांनी तिला कौतुकानी उचलुन घेतलं. “आबोजा माझा ड्रेस मळेल ना ! ” आप्पांनी तिला हलकेच खाली ठेवलं “स्वारी बाळ माझ्या हे लक्षातच आल नाही.” आजी आणि रेश्मा गालातच हसल्या. रस्त्यावरून स्कूल बसचा आवाज आला तस ऋत्वी ओरडत म्हणाली “मम्मा माझी स्कुल बस आली,बाय आजी, बाय आबोजा .” आप्पांना नातीचा हेवा वाटला ह्या एव्हढ्याश्या पोरीला कित्ती कळतंय? ते मनातच म्हणाले. रुत्वीची नर्सरी सुरु झाल्या पासुन त्यांचा वेळ कसा तो जाईना. नर्सरी फार दूर नव्हती फार तर दहा मिनिटांच अंतर एक दिवस स्वतःच आवरून ते फिरत फिरत नर्सरीत गेले बाहेर पोएमचा कोरस ऐकू येत होता. लेझी मेरी वील यू गेट अप, वील यू गेट अप, टू डे ” आप्पांना मोठी गम्मत वाटली ,डोकावून पहाव अस वाटल इतक्यात आतून आवाज आला “व्हाटस रोंग विथ यू,?व्हाय यू आर नॉट रह्यामिंग पोएम ?” उत्तरा एवजी फक्त रडण्याचा आवाज येत होता. “व्हाट डू यू वांट ?” “मम्मी , मम्मी, मला मम्मी पायजे .” आप्पांच मन कातर झाल आत्ता ह्या पोरीला हि बया मम्मी कुठून आणून देणार ?” आप्पांची पावलं जड झाली पण मना विरुद्ध ते वाटेला लागले, न जाणो नर्सरीचा डिसिप्लीन आड यायचा रत्नाकर रागवायचा तिथ कोणी जायला सांगितलं म्हणुन. दुपारी ऋत्वी घरी कधी येते ह्याची ते वाट पाहत राहिले . खाली स्कूल बसचा आवाज येताच ते लिफ्ट ऐवजी जिन्यानेच खाली गेले. ऋत्वीला उचलून घेण्याचा विचार त्यांच्या मनात आला तोच ते दचकले कपडे स्पॊइल झाले तर तिची मम्मा रागवेल. तिचा हात धरून लिफ्ट मध्ये चढता चढतच त्यांनी विचारल “बाळ आज तुझ्या शाळेत रडत कोण होत?’ हे काय हो आबोजा माझी नर्सरी आहे, ती काय शाळा थोडीच आहे? गरीब मुल शाळेत जातात नाही तर अंगण वाडीत जातात.” “बर बर, पण रडत कोण होत ते तरी सांग ” “ती न, ती काजल. नेहमीच तशी रडते टीचर म्हणतात शी इज नॉट गुड गर्ल”आप्पा विचार करू लागले खरच का नर्सरी मुल्लांना घडवते?
ऋत्वी नक्कीच हुशार होती वेगाने सगळ शिकत होती.एक दिवस आप्पा चिवडा खात होते. वाटीतला चिवडा हातात ओतुन घेवुन खातांना पाहुन ऋत्वी अप्पांकडे पाहत म्हणाली ” आबोजा तुम्ही स्पुन ने का खात नाही मम्मा म्हणते हवाराटा सारख बका बका खाऊ नये ” आप्पा ते ऐकताच गोंधळले. त्यांची नात त्यांना टेबल म्यानर्स शिकवत होती. खरच आताच जनरेशन शार्प होत चाललय त्यांचा वेग पकडण आवशक होत नाहीतर वर्तुळा बाहेर पडण्याची भीती होती. मनो मन आप्पांनी नातीला गूरू मानली. अब बहुत कूच सिखना बाकी था . हयाट्स अप टू ऋत्वि आणि तिची नर्सरी.