मिळणार ना एकांत

मिळणार ना एकांत

प्रेमाच्या सागरातील तू हवी हवीशी वाटणारी लाट
मी किनारा होईन तुजसाठी, दे सखये मज हाक

क्षणभर थांब, दे अलिंगन, पुन्हा मिळणार ना एकांत
परतून जाण्याची करू नकोस घाई, मोहीनी दे हात हातात

वाट नित्य पाहतो इथे, तू थांबत नाहीस याचेच मनी दुःख
हळुवार स्पर्शाने मी मोहित, निद्रेतून परततो जाणीवेत

येतेस पायातील चाळ नाचवित, सांग सखे मनातील गुज
तव नृत्य बहरते, चढता रवीच्या सोनेरी किरणांचा साज

तुज धावत येतांना पाहुनी हरखून मी मोहरतो मनात
परी भेट क्षणीक आपली, कळेना का पाहशी माझा अंत

तुजवरी कोणते बंधन आहे, का बाळगशी दुःख उरात?
खुल्या दिलाने सांग मजशी, तुझी आहे ना मजवरी प्रीत?

तुज पाहुन फुले चंद्रमा, तो झुले खुल्या निळ्या नभात
सांग त्याला मज ना सोस स्वर्गाचा, नको उगा राहू भ्रमात

तुझ्या पोतडीत कित्येक मोती, कित्येक रत्ने, या दर्यात
कित्येकांना झुलवते तू, गर्वाला बुडवते, पाडते मोहात

भुलणार नाहीस त्या वैभवाला हे जरी आहे मज ठाऊक
आशंकीत मनास दे दिलासा, करी मजवरी प्रेमाची बरसात

मी ओसाड किनारा, आघात झेलणारा, दे मज प्रेमाची साथ
सोड खट्याळ चाळा, थांब दोन प्रहर, तुझी जागा मम हृदयात

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “मिळणार ना एकांत

  1. user890251

    Nice post! 1754785550

  2. vaseline lotion

    Your blog is a testament to your expertise and dedication to your craft. I’m constantly impressed by the depth of your knowledge and the clarity of your explanations. Keep up the amazing work!

Comments are closed.