प्रेम ते लग्न भाग १

प्रेम ते लग्न भाग १

जो पर्यंत होत नाही, करावसं वाटतं प्रेम
आधी भेटी गाठी, मग प्रेझेंटची लेन देन
रुसणं फुगणं नेहमी तिचं हमखास चालतं
थोडी विनवणी, मनधरणी करत प्रेम फुलतं
तारीफ केली की मन झुळूक होऊन झुलतं
स्पर्शाची जादू न्यारी डोळे मिटूनही खुलतं

आता दोघांनाही भेटीची सारखीच ओढ
तिच दिसणं, हसणं मुरडणं सगळंच गोड
त्याच्या दणकट यष्टी स्टाईलवर ती फिदा
तिच्या सौंदर्याची तारीफ तो करे कितींदा
ती त्याची मंजुळ मैना, तो तीचा राघू, बने कान्हा
प्रेमाच्या डोहात त्यांना मिळे तिन्हीसांजेचा नजराणा

आता प्रत्येक भेटीत असते नव्याने तक्रार
तिची नेत्रपल्लवी म्हणजे जणू सुरी धारदार
त्याने किती जवळीक साधावी तीच ठरवणार
त्याची जास्त आगळीक झाली तर नजरेचा वार
तिचा लालेलाल चेहरा म्हणजे परजते हत्यार
तरीही प्रेमात तू एकदम कच्चा तिची गोड तक्रार

दिवस सरकताच होतात आणाभाका सूरू
कधी रुसेल नेम नाही कस त्या रमेला आवरू
समोर झुळझुळता झरा नाही पाण्याचा स्पर्श
कोरडा घसा, सुकले ओठ कसा व्हावा मनी हर्ष?
तरीही खुळी आशा, तिला कळेना प्रेमभाषा
तिच्या कमनीय बांध्याची, ओठांची, घटांची नशा

हळू हळू आवडू लागतो त्याचा स्नेह अन विश्वास
आता नित्य उभयता मनी भेटीचाच एक ध्यास
वेळ पाळता यावी यासाठी कसरत अन अट्टाहास
फुललेले श्वास अन एकांती स्पर्श मग मनी उल्हास
नाचे आनंदाचे कारंजे त्याची नशा, तृप्ती सर्वांगास
अन मग अखंड चलचित्र, विरह रात्रीचा अन आभास

एक दिवस अचानक ती जरा लाडात येते
जवळ सरकत हळूच हातच हातात घेते
तो चमकून पहातो तेव्हा ती स्माईल देते
हळूच कुजबुजत ती त्याला डार्लिंग म्हणते
तो आजूबाजूला नजर टाकत हुंकार भरतो
अन बिनधास्त जवळ ओढत किस करतो



affiliate link

आता कधी पिक्चर कधी पिकनिक होते सुरू
दर संडे वीकएंड भेटीच लागत ऍडव्हान्स ठरू
कधी गार्डन, कधी सी बीच दोघे कुठेही होती सुरू
ती फक्त दोघेच या आसमंतात धुंदीत फुलपाखरू
मधले दिवस भासू लागतात कितीतरी महिने सुने
प्रीतीची ओढ वाढू लागे, पेटती आता ज्वानीचे वणवे

एक दिवस पुरत नाही म्हणे करूया आता लग्न
तो तिला हसून म्हणाला लाडके सुधारू आता वागणं
झाडाखाली, गार्डनमध्ये पुरे झालं आता चोरून भेटणं
माझे लाडके नीट ऐक पुरे झालं आता तुझं हे अस नटणं
आता जरा दुरूनच चाल, पुरे बरं तुझं लगटत चालणं
आजू बाजूला पाहूनच बोल, थांबव उगाच फिदीफिदी हसणं

ती रागावत म्हणाली लग्न न करताच तुझा सुरू झाला जाच
मला शंका वाटते डोळ्यात डोकावणारा तूच ना होतास
लाडके घे ही कुल्फी म्हणणारा नक्की तूच ना की भास
ह्या मिडीत तू किती क्युट दिसतेस तूच तर नेहमी म्हणायचास
अन स्लीवलेस घातलास की तू डिट्टो मधुबाला कोण बोलायचास?
हाय हिल तुझीच पसंती, तू हेलन, हे कितीतरी वेळा सांगायचास

तो तिला गोंजारत म्हणाला प्रिये लग्न असत नाजूक बंधन
सप्तपदींनी येणारी मर्यादा अन मग समाज यांच अस्पर्श रिंगण
कितीही मोकळं असलं तरी कोणीतरी डोकावणार असं अंगण
प्रेमात सगळं चालत गं, पण लग्नानंतर हवंच दोघाचं काबूत मन
दोन जीवांची जागृत मिलन अवस्था म्हणजे अग्निदेवतेचे कंकण
लग्न म्हणजे स्वाहाकार ते बंधन स्वीकार याच समजासमोर मंथन

ती धुसपुस करत म्हणते सगळेच पुरुष लग्नात बनतात पक्के नवरे
आधी तुम्हाला बरे चालतात आमचे गोंडस लोभस नखरे
तो म्हणाला लग्नपूर्वी मुलं मुली असतात मुक्त भ्रमर, प्रेमवीर,
सप्तपदी आणि मंगलाष्टके यानंतर जोडप्याने व्हावचं थोडे गंभीर
समाजाची चौकट प्रेमाला असली की पती पत्नी नात्याला येतो अर्थ
लग्न हा असा संस्कार सोहळा इथले रितीरिवाज नसतातच व्यर्थ

लग्न झालं आणि लागले दोघांना मधूर मधूचंद्राचे वेध
उटी की कुलू -मनाली की स्वित्झर्लंड तिचा सुसाट अश्वमेध
तो मनाशी हिशेब करत म्हणाला या वेळेस माथेरान जाऊ
जवळच गेलेल बरं, मस्त चार आठ दिवस निवांत दोघेच राहू
ती नाराज, हे काय रे! तूच तर म्हणालास तुझ्यासाठी काहीपण
अग अगदी खरच म्हणालो, दोघे प्रेमात डुंबू, हा बघ मोती साबण

ती रागावली, रूसली, त्याने हनी डार्लिंग म्हणताच प्रेमात फसली
मोजक्या बॅगसह, ओलात बसली, त्याच्या स्पर्शाने मनी हसली
थंडगार हवा उष्ण श्वास त्या दोघांचा चार दिवस घट्ट सहवास
कुशीत शिरत प्रेमात चिंब भिजली, आता मनी तोच एक ध्यास
समजून घेत एकमेकांना वेल झाडास बिलगली अन मनी फुलली
प्रेमाचा मोर नाचू लागला अद्वैतात गुलाब पाकळी सुगंधाने भिजली

दोघेही प्रेमाच्या बेहोशीत, वाटे त्यांना संपूच नये कधी मधुचंद्र
दिवसरात्री सारखा, अन रात्र सदाबहार, चांदणी सोबत पूर्ण चंद्र
पण सुर्योदयात विरणाऱ्या धूक्यासारखे संपले नकळत चार दिवस
आत्ताच तर कुठे ओळख होत होती तोच जणू प्रेमात आली अवस
त्यांनी तिची समजूत घातली आपण नक्की येऊ आता आवरतं घेऊ
प्रेमानेच पोटाचं भागणार नाही, थोडा वेळ आता नियमित कामाला देऊ

ती थोडी रूसली, रागावली, अबोला धरत एकटी खिडकी जवळ बसली
इतक्यात एक पाल आत घुसली, घाबरून ती बिलगली तिथेच फसली
त्याने तिची समजूत घालत, थोडं थोपटले तस ती फसफसत गोड हसली
तिची खुलती कळी पहात तो स्वतःला गेला विसरून आणि ती खुलली
मधुचंद्र संपवून ते परतले तरीही मन अजूनही त्या स्मृतीत रेंगाळत होत
आधी होते प्रेमवीर,मग मैत्रीचा दृढ विश्वास तिथेच जमल हे नवीन नातं

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “प्रेम ते लग्न भाग १

  1. Bhosle R. B.

    छान….

    1. Kocharekar mangesh
      Kocharekar mangesh says:

      धन्यवाद,

Comments are closed.