अविचाराने वागू नये
मैत्रीतही फार जवळ जाऊ नये, गरजेविना सोबत करू नये
कोणाच्या मोठेपणाचे श्रेय, आपण उगा कधीच घेऊ नये
अवचित पडते धरेवर उल्का, खोट्या भ्रमात जगू नये
प्रेमात सारेच क्षम्य समजून, माणुसकी उधार मागू नये
दुर वरून पाहता चंद्र हसतो, जवळ जाऊन तो पाहू नये
कितीही विद्वान असलात तरी, विषाची परीक्षा पाहू नये
सुर्याला लागलं ग्रहण म्हणून, अविचाराने पाणी फेकू नये
मन सैरभैर झालं तरी, वड्याचे तेल वांग्यावर काढू नये
मैत्री कितीही दाट असली तरी, अंतरंगात डोकावून पाहू नये
काहीच दोष नसेल तुमचा तर, कोणाच्या बापाला भिऊ नये
प्रवासात एकटेच आसाल, अज्ञात माणसाकडून खाऊ नये
तुम्ही माहिर गायक असाल तरी, अवेळी काहीच गाऊ नये
दुःख विरहाचे असो की वियोगाचे, उगाचच कुणाला दाऊ नये
कोणी मारली गरूडझेप तरी, क्षमतेविना आपण धावू नये
कितीही सख्य असलं तरी, कुणाच्या भरोशावर राहू नये
दुसऱ्याचे वैभव पाहून, उगाचच दुःखी कोणी होऊ नये
रितीरिवाज, बुरसट विचार द्यावे फेकून, अविचाराने वागू नये
ज्याचं त्याचं प्रारब्ध, संकट आलं तरी, दोष माथी मारू नये
उगाचच कुणाच्या नावाला भुलून, कौतुकासाठी धावू नये
वरवरच्या श्रीमंतीला भुलून, गोत्यात कुणी येऊ नये
संकटात मनावर ताबा असावा, अविचाराने निर्णय घेऊ नये
आपण आपलं घर सावरावं, दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ नये
अभिमान जरूर असावा, गर्वाने खोट्या मुळीच फुगू नये
गरजवंताला अक्कल नसते, तरीही उधार पाधार मागू नये
परदेशी एकटे वावरताना, फाजील विश्वास दाखवू नये
अनोळखी ठिकाणी, अवेळी, उघड्यावर निद्रा घेऊ नये
मनात संशय ठाम असताना, शत्रूच्या दारी भुकेपोटी जेवू नये
जिवावर बेतले उगाच समजून, बेलगाम दिशाहीन धावू नये
देव प्रसन्न झाला म्हणून, हावरटासारखं काहीही मागू नये
वैभव वाट्याला आल समजून गर्वाने कधी ही मातू नये
परिस्थिती पालटली म्हणून दैवाला बोल फुका लावू नये
सुख दुःख येतं-जातं, संकट काळी परिस्थितीला भिऊ नये
I really appreciate the effort you’ve put into this content. It’s exactly what I was looking for.
Lüks su arıtma cihazı seçimi yaparken sadece görünüşe değil, teknik özelliklere de dikkat etmek gerekir. Arıtmapark, bu konuda kullanıcılarına detaylı bilgi sunarak doğru tercihi yapmalarına yardımcı oluyor. Ürünlerinin her birinde, suyun saflığını garanti altına alan kalite belgeleri ve uzun ömürlü kullanım vaatleri bulunuyor.
Your content was incredibly helpful, thank you for sharing your expertise.