उंबरा ओलांडून जाता
उंबरा ओलांडून जातांना मज आली सय पिल्लांची
कुठवर जपायची मी नाती? अपेक्षा त्याच्या जाणिवांची
उसवलेले तोडून धागे, मी अधीर, अनुभव घेण्या प्रीतीची
कुठे मज ठाऊक होते तेव्हा,ही तर सुरवात नव्या यातनेची
रंगवते मनात रोज स्वप्ने, दिवस नवे, सोबत नव क्षितिजाची
सरला तममय भुतकाळ, जीवनी नवी पहाट मखमली उषेची
मनी होई वर्षाव श्रावणसरींचा, येईल लहर नव्या कौतूकाची
स्नेह नजरेतून पाझरता, फुलतील फुले हळव्या धुंद प्रीतीची
नको उसासा, कढ दुःखाचा, नको फिरुन याद मुर्दाड आसवांची
त्याच्या डोळ्यात दिसते झलक, खूण पटली मज समृद्ध वैभवाची
त्याच्या स्पर्शात आहे जादू येते नशा मज सुखासिन ग्लानीची
तो मज हृदयीचा किमयागार छेडतो तार, झंकार लहर सुखाची
नको हृदयास ताण, फिरुनी आठवण मज त्या शापित गंधर्वाची
सूर जुळत आहेत येथे, रंगते नित्य नवी मैफल, साथ नको तराण्याची
शब्दांत फसून जे घडले, ते अनुभवे उलगडले, जोड मिळे अनुभवाची
कोणास देता येईल येथे खात्री, लढायच्या युध्दात जीत पराजयाची
आता नाही फसणार म्हणता, कळले न मज ही वाट उतरणीची
झेलून वार बने काळीज कठोर न भिती काट्याकुट्याची ना दरीची