कावळा
कावळा गुलाबी, जांभळ्या, मोरपंखी रंगात असता तर!
कावळा तुमच्याआमच्या घरी पिंजऱ्यात नक्की दिसला असता
त्यालाही राघू, मैना, बुलबुल सारखं गाणं गाऊन घेतलं असतं
त्याला कुटुंबातील माणसांची नाव शिकवून काऊ बनवलं असतं
बाळाला दूधभात की चायनीज भरवताना, त्याला दाखवलं असतं
पण मित्रांनो कावळ्याला मुर्ख बनवणं खचितच इतकं सोप्पं नसतं
त्यालाही ठाऊक आहे, ना मला रंगरूप, ना स्वर, मी कुरूप आहे
तो स्वतःशी तरीही हसतो, म्हणतो काय गंमत, मी इतरांच्या पितरांस्वरूप आहे
अजून काही जुनी खोंड अधंविश्वासू, माझ्या शकूनावर त्यांचा विश्वास
नित्यनेमाने आजही स्वंयपाक शिजला की ठेवतात काऊचा घास
शहरी माणसांच मुळीच तसं नाही, पक्के स्वार्थी देती फक्त कागवास
कुणी निवर्तले तर मात्र, उशीर होतोय,पिंडाला शिवावे हाच मनी ध्यास
स्वार्थी लोकांना तो देतो चांगली हुलकावणी, वाट पाहुन येऊ देत डोळ्यात पाणी
भाद्रपद महिन्यात पितरे येणार, म्हणून सिडीवर यांच्या काव काव गाणी
कावळेही झालेत स्मार्ट, त्यांना कळतात नाटकं, मग यजमानांना हुलकावणी
पुरोहित अजूनच अधीर, म्हणती उशीर होतोय, दर्भाचा कावळा शिववतो सोडा पाणी
सांगा फक्त भाद्रपदात तुम्ही करता आठवण इतर वेळेस कसं जगावं?
प्रश्न त्यांनाही आहेच, To be or not to be, सांगा हसावं की रडावं?
खूप छान सर