का करावा धावा?

का करावा धावा?

माझ्या दुःखाला मीच कारणीभूत, मग दोष कुणाला द्यावा?
अर्धा पेला भरलेला असता, तो किती रिता? का मी पहावा?

माझी जबाबदारी तुझ्यावर लोटून, का सुखाचा शोध घ्यावा?
तूझा सहवास वास्तवातील सूख तरी, का करावा शुद्र सुखाचा धावा?

अर्पिलेस जीवनपुष्प, तोडून पाश, त्याग या परी काय असावा?
सत्शील चारित्र्याचा तू दागिना त्यावर कोणता ठोकू मी दावा?

मला कल्पनाच नाही इतका ईश्वराने दिला मज शक्तीचा ठेवा
जेव्हा पाहतो विकलांग, शक्तीहिन तेव्हा मलाच वाटे माझा हेवा

कुणासही दोष देण्यास मज जागा नाही, जीवन नंदादीप ठरावा
दीन दुःखिताचे अश्रू पुसाया ईश्वरा मज आरोग्याचा आशिष द्यावा

कपड्यातील सौंदर्य, दागदागिने, नेटक्या ईमारती, हा सारा दिखावा
जेव्हा होईल भ्रम मनाला तेव्हा, हिरवाईने नटलेला निसर्ग पहावा

का भुल पडावी मनाला बेगडी ऐश्वर्याची? ते मिळवण्यास दुष्ट कावा
अथांग सागर सरिता यांचा संगम, त्यात मुक्त संचारती छोट्या नावा

पडेल प्रश्न कर्म कोणते योग्यअयोग्य? तेव्हा प्रभुसी संवाद साधावा
स्वार्थ साधण्या झटती सदैव, कधीतरी परमार्थ करण्यास वेळ द्यावा

कर्तव्याचे भान असावे, मनास हवी टोचणी, न कुमार्गाचे वळण घ्यावे
ईश्वराच्या कृपेने अमर्याद मिळाले आता अवेळी देण्याचे भान यावे

चुकले तर मनाकडे द्यावी कबुली, सन्मानाने योग्य तो मार्ग धरावा
कुणी करो न करो कौतुक परी, सत्याचा आग्रह मनास देई विसावा

तुजपाशी यापरी काय मागू, सन्मार्गावर चालण्याची उपरती व्हावी
कर्तव्याचे भान मनास दे, शिणेल शरीर तेव्हा चरणासी जागा द्यावी

खरे तेच सांगतो मला नेहमीच वाटतो माझ्या सुखाचा प्रचंड हेवा
पण कधीकधी शुद्र विचारांचे मळभ दिसतात मग तुझा करतो धावा

वाढत्या वयाबरोबर फिटलाय मनातील संशय आता कशाचा करू दिखावा?
जीवनपूष्प तुझ्या चरणावर वाहावे इतकाच स्वार्थ अन्य कोणताच नाही दावा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “का करावा धावा?

  1. visit howtoexplainer

    This is exactly what I was looking for.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *