कुठे शिवबाचे राज्य अन..
गर्जना करणाऱ्या वाघाला हवे बदलत्या परिस्थितीचे भान
स्वार्थासाठी जमतील उपरे त्यांचा इतिहास आहे का महान?
खंजीर खुपसला गुरूवर ज्यांनी त्यांना निमूट करशी सलाम!
आयुष्य झिजवले विरोध करूनी परी तू आज दिल्लीपतींचा गुलाम
कुठे हरवला शिवरायांच्या शुरविरांचा, मर्दानी अभिमान?
भोगला तुरुंग कितिक मुलांनी, अजूनही करती ते धुरंधरास सलाम
तेच खरे शिवबाचे भक्त परी तुला कुठे वाटतसे अभिमान ?
आयुष्य झिजवले ज्या नरवीर छाव्यांनी त्यांचे व्यर्थच की रे बलिदान!
प्रत्यंचा तू सदैव ओढतो, परी हातून तुझ्या सुटेल का कधी बाण?
अंदाज घे मावळे नसता अंगावर शत्रू घेण्याचे आहे का रे त्राण?
स्वभाव मूळचा बोलघेवडा, कृतीतून दाखव, घाल जिभेला लगाम
मंत्री जमविती कोटींचे हप्ते, गृह खात्याची काय राहिली शान?
फरार होती आयुक्त अन पोलीस, का खोटेच काढशी तू रान?
शिवभक्त म्हणून मनगटी बांधती दोरा,परी ते महाराष्ट्र करती बदनाम
जमवती हप्ते, ड्रग्जही विकती, खुनाचाही गुन्हा, हेच का पक्षाचे काम?
सोडून दे तू मिंधेपण, आठवून पहा शब्द त्यांचे, अथवा भोग परिणाम
सत्तेची गुर्मी बरी नाही रे, इतकी गुलामी खरी नव्हे रे, योग्य तेच तू जाण
तळी उचलणे, खुर्ची करता शब्द फिरवणे, तुला म्हणावे कसे गुणवान?
शासकाने, देशहितास्तव, मनी ठरवून मोजके नेक, निर्णयास हवे ठाम
स्मरून पहा पूण्य पित्याला,आपले प्रताप पाहून म्हणालेच असते हे राम!
आठव क्षणभर संत तुक्यास, तो म्हणे शिवरायांना सोने मज मुर्तिके समान
आठव तू क्षणभर बाजी, ज्यांनी लढवली खिंड अन शिवबास केला सलाम
आठवून पहा पून्हा काशीद, शिवबासाठी ज्याने केले स्वतःला कुर्बान
पहा आठवून तानाजीला लढवूनी कोंढाणा ज्याने रायगडी दिला सन्मान
कुठे त्या शिवबाचे राज्य ज्याचा आजही मराठी मुलखास वाटतसे अभिमान
हरवू नको देशभिमान, घालवू नको महाराष्ट्राची शान
नको टाकू राष्ट्र स्वार्थासाठी गहाण, राख महाराष्ट्र अभिमान
अप्रतिम सर सगळ्याच्या मनात हिच खदखद आहे …
कुठे हिंदूह्दय बाळासाहेब
आणि कुठे हे मॅडम समोर गुडघे टेकणारा त्याचा मुलगा
धन्यवाद मॅडम ,मला ते सतत खटकतं, साहेबांनी इतकी हाजी हाजी कुणाचीही केली नाही . अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
Reality of Politics
अमेय धन्यवाद. पटतय ना?