गजालीक कारण की भाग 1

गजालीक कारण की भाग 1

तुमका सांगुन खरा वाटाचा नाय पण आजच्या काळातव कोकणात काय काय शाणे वंशाचो दियो व्हयो म्हणान मुलासाठी पाच सा चेडवा झाली तरी प्रयत्न करत रवतत. इतक्या मुला-बाळांचो संसार झेपाक नको? ज्याचा शेत आसा आणि जी स्वतः मेहनत करतत त्यांची गोष्ट येगळी तरीपण त्यांका कपडोलत्तो शाळेची वह्या, पुस्तका, युनिफॉर्म आणि कायमाय पुरवता पुरवता कर्त्या पुरूषाचो जीव मेटाकुटीक येता.

१९२५ किंवा १९३५ सालात ज्यांचो जन्म झालो त्यांच्या काळात घरात अमाप जनता होती. म्हणजे सांगुचाच झाला तर आमच्या बापाशीक दहा भावंडा, त्यांच्या चुलत चुलत्याक एक डझनाहून अधिक मुला. पण तो काळ वेगळो होतो. घरचो एकत्र व्यवहार होतो. १४० एकर जमीन होती. दर बाजाराक चारशे नारळ विकीत. दूध घरचाच होता, सरपण घरचा, परड्यात पिकात ती भाजी शिजा, कुळथाची पिठी उकड्या भाता बरोबर चला, आता दोन दिवस पिठी-भात खावचो इलो तर तिसऱ्या दिसाक अन्न सत्याग्रह सुरू होईत. म्हणान म्हणतयं आवशीन कुलदिपकाचो आग्रह धरलो तरी चार दोन चेडवांच्या पाठीवर तुमका पैशाच्या बाबतीत कुलदीपकाचा बाळंतपण झेपात काय? आणि मुख्य म्हणजे तुमच्या बायकोच्या तब्बेतीक झेपात काय ह्या बगूक नको?

ह्या महागाईच्या काळात चार सहा पोरा पदराक परवडतीत काय? पण आमचो पदलो तेतुरलोच एक, खरा तर मेल्यावर एक कादंबरी लिवान पूर्ण करूक व्हयी पण विकत घेऊन वाचतला कोण? तर आमचो पदलो मेल्याचा शिक्षण लय भारी, SSSAF म्हणजे तुमच्या भाषयेत एस एस सी अँपीएर बट फेल. कुलकर्णी सरांनी तो पोलिस पाटलाचो झील म्हणान, काठावर तरी पास जाऊक व्हयो यासाठी खूप प्रयत्न केलो, पण त्यांचोंव नईलाज झालो. आज काल बोर्डाच्या साईटवर जाऊन मोबाईलवर स्वतःचो नंबर टाकलो की रिझल्ट कळता. असोच पदीक एसएससी रिझल्ट पयलोच कळलो तरी इतर मुला रिझल्ट घेऊक इली म्हणान हो पण शाळेत इलो.कुलकर्णी सर त्याच्या हाती गुणपत्रिका देतांना म्हणाले, “पद्या, मेल्या पाच विषयात नापस, लाज नाय वाटणा? एकच विषयात बोर्डाच्या परीक्षेत पास होणारो शाळेच्या इतिहासात तू पयलो. तुझो रेकॉर्ड बोर्डावर लिवान ठेऊक व्हयो म्हणजे तुझो पराक्रम गावाक कळात. खरा तर झी वाल्यानी तुजी मुलाकात घेऊकच व्हयी म्हणजे जगाक तुझो पराक्रम कळात” तो निर्विकार चेहरो करून म्हणालो, “सर, त्या एकाच पेपराक माझी दया येऊन सुषमान माका थोडा फार दाखवल्यान, तिका अवदसा आठवली नसती तर मी सहाव विषयात नापास होऊन महाराष्ट्रात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांत पयलो इलो असतय.”

कुलकर्णी सरांनी त्याची फुशारकी ऐकून, केसांची झुलपा धरून हिसडल्यानी आणि ढुंगणावर दोन दणके घातले, तिथपासून पदीन शाळेचा तोंडव बगूक नाय. पदी नापास झालो. एक दोन विषयात कोणिव नापास होईत. पाच विषयात नापास होण्याचो पराक्रम केल्याची खबर कानोकान गावात पोचली. खरातर त्याका पालखीत घालून मिरवणूक काडूक व्हयी होती पण देवाची पालखी वर्षातसून एकदाच भाहेर निघता त्यामुळे ता रवला. त्यानंतर शाळेतून पदीच्या बापाशीक बोलावणा इला. दंगा मस्ती केली, मारामारी केली, खून पाडलो तरी त्याच्या आवशीबापाशीक काय वाटला नसता. असले अनेक केशी बाबल्या मसूरकरान पंचनाम्यात हाताळले हत, पण शाळेतसुन तक्रार इली तर इज्जतीक हात घातल्यावरी वाटता. पदीच्या बापाशीची गजाल तिच झाली. रिझल्ट इलेलो बाबल्या मसुरकराक कळला आणि त्यांनी पदीक विचारल्यान,”पद्या मेल्या पास झालस काय?” तर पदलो मान खाली घालून उभो, “दादा तुमका कुलकर्णी सरांनी भेटूक बोलवल्यानी हां.” “म्हणजे? तू परीक्षेत शाण खाल्लस काय? माका बोलवल्यानी, आणि कोणा कोणाक बोलवलाहां?” “ता काय ठाऊक नाय,पण तुमका भेटून जाऊक सांगल्यानी.”
शेवटी बाबलो मसूरकर कुलकर्णी सरांका भेटूक गेलो, तेंका बघून कुलकर्णी सर दादांचा स्वागत केल्यावरी म्हणाले, “या मसूरकर,तुमच्या झिलान केलेलो पराक्रम कळलो मां?त्याचो रिझल्ट बगलास ना?” “हो ! म्हणजे नापास झाल्याचा तो बोललो.” “किती विषयात गेलो म्हणान सांगल्यान?मसूरकर ! अहो सा पैकी पाच विषयात गटांगळी खाल्लीहा, पून्हा परीक्षेक बसवूचा असला तर म्याहनत घेवची लागात. न पेक्षा त्याका शेतीक ठेऊन घेवा म्हणजे तुमका हातभार लावीत. मसूरकर,आपल्या कोकणात ‘लातूर’ किंवा ‘बीड’ पॅटर्न नाय चलणा ठाऊक आसा ना? , म्हणजे कोणाचोच बापूस झिलाक एसएससी, एचएससी परीक्षेक कॉपी देऊक नाय जाणा. या खरा मां.”

“मास्तर तुम्ही सांगतास ता एकदम बरोबर, आमची मोठी पोरगी तुमच्या शाळेकच होती. अभ्यासात बरी होती.पण जास्त शिक्षण करुन उद्या लग्नाचे वांदे होतीत म्हणान दहावी पास झाल्यावर लग्ना लाऊन दिली. पदलो पास झालो असतो तर सोन्याऊन पिवळा झाला असता पण त्याच्या नशीबात नाय त्याका तो तरी काय करतलो?” “मसूरकर, तुमच्या पदीच्या नशीबात एस एस सी पास होणे लिवला नाय, ह्या तुमका कोणी सांगीतल्यान ?आपल्या भटान का गुरवान?”

“अहो मास्तर, परवा सातेरीक कौल लावलो होतो. तेव्हाच ता कळला, सातेरी देवीन डावो कौल दिलो. गुरवान शर्थ केल्यान,पण.. तसो तो पास होण्यातलो नव्हतोच आणि जरी तो नापास झालो तरी मी आकाश, पाताळ एक केल नसतय, येडझयान कधी पुस्तकच उघडून बगूक नाय, देवी काय आपल्या आवशीचो घो करीत? मी त्याका साफ सांगलय, शिक्षण नाय जमाणा तर गोरवा राख, पयरो म्हणान जा आणि ताव नाय जमाणा त मुंबई गाठ, हमाली केलस तरी हरकत नाय पण चोरी मारी करता नये. मास्तर माझा काय चुकला काय?”

“मसूरकर तुम्ही गावचे पोलीस पाटील, खरां मां? तुमचो झील पाच विषयात नापास झालो तरी तुमका काय वाटणा नाय? खालच्या आळीतलो अनंता पाटकर, पंचाहत्तर टक्के गुण घेऊन पास झाल़ो. पद्याक पास होऊक काय धाड भरलीहां, ता काय नाय, तेका पुन्हा परीक्षा देऊक लावा.” पदी, कुलकर्णी सर आणि दादा यांच्यातलो संवाद ऐकत होतो. तो म्हणालो,” कुलकर्णी सर,नापास मी झालयं, चुक माझी शिक्षा माकाच होऊक व्हयी, दादा काय करतले? माझ्या नशीबात असात ताच होईत.”

बापूस रागाक इलो,”मेल्या नापास झालस तो झालस आणि मास्तरांका तोंड वर करून चूक माझीच आसा म्हणान कसलो सांगतस?” “दादांनू ओ खरा ताच सांगतय,मी अभ्यास करूक नाय, ह्यात मास्तरांचो दोष काय? त्यांनी माझ्यावर खूप म्ह्यानत घेतली पण माझोच मेंदू चलणा नाय ,त्याका ते काय करतीत?” “रे शाणपण असात तर मास्तर सांगतत ता ऐक, शिक्षाण पूर्ण कर, आतापासूनच शात धरलस तर जीवनाच्या शाळेत कायमचो बाद होशीत.
तू शिक्षण पूर्ण करं, मुंबईत चुलत्याकडे धाडतय, त्याका सांगतय, कसलो तरी आयटीआयचो कोर्स जोडून दी, पोटापाण्याचा कमवशीत. हय चार महिने शेती, उरलेल्या दिसात काय पयरो म्हणान काम करशीत? लोकांची कामा करूक घोपण नको? लोक त्वांड बघून मजूरी नाय देवचे.” कुलकर्णी सर, मसूरकर यांच प्रबोधन ऐकून गप्पगार झाले. थोडावेळ कुणीही कोणाशी बोलेना मग कुलकर्णी सरांनाच वाटलं काही तरी उपदेश केलाच पाहिजे, ते मसूरकरांना म्हणाले, “तुमचो झिल चेष्टेचो विषय झालोहां, त्याका चार दिवस उपाशी ठेवा म्हणजे डोक्या ताळ्यावर येईत. चार दिसांनी येऊन आठवणीन फार्म भरा म्हणजे झाला.” “ओ मास्तर, ह्याका मी उपाशी ठेवीन पण आमच्या वायटावर असणारी ह्याका बोलवून जेवूक घालतीत आणि कान भरतीत तेंचा काय?” मसूरकरांनी पदीचा मनगट धरला आणि कुलकर्णी मास्तरांचो निरोप घेऊन ते वाटेक लागले. त्यांचा मस्तक तापला होता, शाळेच्या हेडमास्तरांनी पोलीस पाटलाक सल्लो देवचो म्हणजे काय? थोड्या अंतरावर पदीन आपलो हात बापाशीच्या हातातून हिसडी मारून सोडवून घेतलो आणि तो पळालो. कुलकर्णी सर बघीत रवले ते तरी काय करतले?

त्या दिवशी बाई मसूरकरणीन घो म्हणालो म्हणान पद्याक जेवण घालूक नाय. पद्याक कोणी पोटाक घातला ता त्याकाच ठाऊक. दोन दिवस उपाशी ठेऊनव पदीन बापाशीक उत्तर करूक नाय. शेवटी बापच हरलो बायलेक म्हणालो, “व्हयतो तुझो झिल, सकाळी आठ वाजले की तो गाव उंडगूक भायेर जाता तो दोपारण्याक गिळाक येता .पून्हा बाहेर पडलो की रात्री पान टाकूक घरी, याच्यात सुधारणा कधी होतली मी गेल्यावर?” बापूस पद्याक गाळी घाली. बकासुरावरी खाता काडीयेचा काम करणा नाय, आणि घरा घेईत हिंडता.”

पदीचो अपमान रतीब घालतत तसो ठरलेलो, शेवटी किती दिवस ह्या चलतला. एक दिवस बापूस त्याच्या आवशीक बोललो “आज पासून ह्याचे लाड बंद, हेचा अन्न बंद, नसते लाड माका झेपाचे नाय,काय तरी काम धाम करूक सांग. त्याचे भाऊ मुंबईत कष्ट करतत दोन पैसे माका धाडतत म्हणान घर चलता. काय तरी काम कर नुसता गिळून पथरी पसरूक बरा वाटता काय?”

त्या दिवशी आवशीन जेवूक वाढल्यान आणि म्हणाली, “उद्या पासून खय तरी कामाक जाय, चार पैसे कमवून बापाशीच्या हातावर ठेय तरच तुका जेवूक घालीन, यांचो तसो सांगावो हां. तुझे भाऊस ममईक काम धंदो करतत आणि तू गाव भटकून खातस जरा शाणो हो.” ता ऐकून तो ताटावरून उठलो आणि वाटेक लागलो. गावात दोन तीन मोठी पोरा लोकाचो चिऱ्यांचो गडगो घालूच्या कामावर जाईत, हो त्यांच्या हातापाया पडलो, म्हणालो “मी तुमच्या बरोबर येतय, सांगशात ता काम करीन.” त्यांनी समजुत काडली, ” पदी, येडझया, चिरे उचलण्याचा काम लय जड, तुका चिरो उखलात काय? तू आपलो मुंबईक भावाशीकडे जा,थय कायतरी काम बघ.” पदी त्यांच्या कनपटीक बसलो, तेंच्या दारातलो चिरो त्यानी उखलून दाखवलो. गणपो बोललो, ” रे! हय एक चिरो उखललस, थय दिवसभर चिरो उखलूचो लागता, माझा खुळ्याचा ऐक, दुसरा काय तरी बग.” पदी बोललो, “दुसरा काय करु ताव तुच सांग, काय सांगशीत ता करीन, गणपो बोललो, माझो भाऊस कोकण रल्वेत खावचे वस्तू विकता. कुडाळ ते रत्नागिरी,थयसुन परत, त्याका विचारून बघ, ता कामव सोप्या न्हय, पण तुका जमात. सकाळी आठाक घर सोडुचा लागता. दिसभर डोक्यावर टोपली घेऊन प्रत्येक डब्यात फिरुचा लागता. तुका जमात काय?” “जमवुकच व्हया, न जमवून कुणाक सांगतलय?धंद्याक किती रूपये लागतले?” “तरी चार,पाच हजार रूपये व्हये, माल नेशीत त्याचे पैसे आणि रेल्वेचो पास,घेशीत तो आलुमीनचो टब. टीसी नायतर आरपीएफ भेटलो तर हप्तो भरूक शे पाचशे.नीट धंदो केलस तर चारशे रूपये रोजचे सुटतले.”

चारशे रूपये रोज ऐकून पदी गालात हसलो,एक दिसाक चारशे म्हणजे महिन्याक बारा हजार, दोन हजार हप्त्याक गेले तरी दहा हजार रवतीत. बापाशीक हजार दिले, माझो पास इतर खर्च हजारभर धरलो तरी सात आठ हजार रवतीत, वर्षाक नव्वद. पदीचो हिशोब मनातच सुरू होतो.

गणपो आरडान म्हणालो, “पद्या मेल्या लोकांची आडसरा धापण्या इतक्या सोप्या वाटला काय? व्हयती मेहनत तुका जमतली का बोल ,भावाशीक सांगतय तुका मदत करुक. गिराईका समोर हाजी हाजी करुची लागता, गर्दीतसून वाट काढीत जावचा लागत. कोणाक आपलो धक्को लागलो तर उद्धार करतले.डोक्या तेल घातल्यावरी शांत ठेवचा लागात. रोजच माल खपणा नाय, कदीतरी स्पेशलवाल्यांनी धाड घातल्यांनी आणि एक्स्प्रेस गाडीयेत पकडल्यांनी तर दोन पाच हजाराक झोपवतले. कधीकधी आपल्याच हातुन पैसे खयतरी पडतत, हिशोब चुकता. तरीपण महिन्याक तीन, चार हजार नक्की रवतीत. काय झोल झपट केलस नाय आणि नसत्या फंदात नाय पडलस तर धंद्यात मरण नाय.”

माका नक्की जमात, गणप्या तू तुझ्या भावाशीची गाठ घालून दी, माका ह्या जमवूकच व्हया. भाऊ पैसे धाडतत म्हणान त्यांका घरात मान, आमका शाट कोण विचारणा नाय,आज आये पण बोलली, “दादा म्हणतत तू ह्याका फुकट जेवाण घातलस तर पोर फुकट गेलो म्हणान समज, वेताळाची आण हां आजपासून त्याका जेवणखाण बंद.” मग आयोचो नाईलाज झालो. माझ्या शिवाय तिच्या घशाखाली घास उतराचो नाय ह्याव माका ठाऊक आसा. म्हणान माका ह्या आव्हान स्विकारूकच व्हया. तुझो भाऊ किती वाजता भेटात ता सांग? आजच मी त्याका भेटूक येतय. भावाशीपेक्षा जास्त धंदो करून दाखवीन तरच मी नावाचो खरो.”

त्याच दिवशी रात्री, पदी, शेखर पावसकराक भेटलो. पावसकरान धंद्यातले खाचखळगे त्याका समजावून सांगितले. दिवसाक विस किलो चिवडो खपवलो तर आठशे रूपये सहज हाती पडतत, खयची गाडी खय गाठूक व्हयी आणि क्रॉसिंग लागला की खयसून पाठी परताक व्हया ता समजून सांगितला. साहेब लोक कसे जोडूक व्हये आणि कोणाक काय आवड हा ता सांगितला. आता फक्त धंद्याच्या भांडवलाची सोय होवची रवली होती. रात्री जेवण झाला की दादा खळ्यात पान लावीत बसतत आणि आये पाठल्या दारी भांडी घाशीत बसता ह्या पदीक पक्या ठाऊक होता म्हणानच पदी आवशीक भेटूक पाठल्या दारी गेलो. तो इतक्या रात्री पाठच्या दारातून येईत ह्याची कल्पना आवशीक नव्हती म्हणानच, पदी अचानक केळीच्या सोप्यातून बाहेर इलेलो बघान आऊस घाबरली,ती मोठ्याने आरडली, “कोण हा तो? इतक्या रात्री हय काय करता? ओ ऐकलास काय? पदीचे आबा,दांडो घेऊन येवा हय केळीच्या आडोशाक कणीतरी हां.” “गे आये, आरडा नको. निवांत रव, मी तो! माझा तुझ्याकडेच काम हा, उगाच त्या आग्या वेताळाक उठवू नको. मी उद्या पासून धंदो करूचा ठरवला हां, माका धंद्याक पाच हजार दी मी वर्षभरात तुझे पैसे परत करतय.” “पदी, झिला, अरे चोरट्यासारखो पाठून कित्याक म्हणान इलस, माका भियाक झाला मा? कसलो धंदो करतलस? तुका पाच हजार खयसून देव, तुझ्या बापाशीन घरात नोटांचो हंडो गाडलोहा काय? ते काय म्हणतत ता ऐक, उगाच अंगात इल्यावरी करू नको. शिकूचा नसात तर मुंबईत आपल्या भावाशीकडे जा आणि कायतरी कोर्स कर, म्हणजे पोटा पाण्याक लागशीत.”

“आये,तू नसते सल्ले देईत बसा नको, काय करूचा तां मी नक्की ठरियलय तू थोडे दिवसासाठी माका झाला तर व्याजावर पाच हजार दी.” “अरे तुझो बापूस घरात काय व्हया नको ता बघता माझो आणि त्या पैशांचो संबंध नाय, माझो बापूस काय सावकारी करी? तर तो माका हाणून देतलो. रात झालीहां माझा काम संपवून माका टकली टेकू दे. तुका पैशैच व्हये तर बापाशीक सांग, तो दर वर्षा भात विकता, आंब्याची कलमा मोईन व्यापाऱ्याक देता, डोंगरातले साग विकता. बघ तेंका सांगून, व्याज देशीत म्हणतस तर कदाचित व्हय म्हणतीतवं.”

“आये,दादांसमोर जाऊन माका गाळ खावची इच्छा नाय,तू तुझी काकणा बापटाकडे ठेवलस तरी माझ्या पैशांची सोय होईत, ती काकणा आज्यान तुका लग्नात घातली हतं,ती तुझी आसत,तू काय येव करू शकतस.” “लय शाणो रे तू, बापट आणि हे दोस्त आसत, तेंका नुसता कळला की मी काकणा गहाण ठेऊक गेललयं त खेटरान पूजा घालतीत.”

आये पैसै देऊक तयार जाणा नाय बघून,तोच गंगाधर बापटाकडे गेलो, आपली कथा आणि धंद्यासाठी पैशे व्हये असल्याची कथा त्यांनी त्यांका ऐकवली. बापट पक्को सावकार होतो, तो म्हणालो, “मी पैसे देतो पण तुझ्या बापाला मला ते सांगाव लागेल, उद्या तुझ काही बरं वाईट झालं तर माझे पैसे फेडणार कोण? तू फक्त या पत्रावर सही करं.”

‘उतावीळ नवरो आणि गुडघ्याक बाशिंग’ म्हणच आसा ,पद्यानी कागदावर काय लिहीलेला हां, ह्या न बघता सही केली. बापट सावकारांनी पाचशेच्या दहा नोटा देता देता २% व्याजाचे शंभर कापून घेतले आणि म्हणालो, चालू महिन्याचे व्याज आगावू कापून घेतले, कसे? ” त्यांनी ₹४९०० पद्याच्या हातावर ठेवले. पद्याच्या बापाशीक ह्या चार दिसानी कळला तो संतापलो. बापटाकडे जाऊन त्याचो उध्दार केलो. “गंगाधर, आपल्या मैत्रीक तू बरो रे जागलस,तूका ठाऊक होता, माझो झिल माझो विचार न घेता धंदो करूक बघता. माझो त्याका विरोध आसा तरी तू..”.

बापट म्हणाला, “बाबल्या जर मी उसने पैसे दिले नसते तर त्यानी शिरसाट किंवा पेडणेकर यांच्याकडे घेतले असते. कदाचित जास्त दराने व्याज भरलं असत. तू निर्धास्त जा, माझे पैसे कसे वसुल करायचे ते मला चांगल माहिती आहे. मी काही तुझ्याकडे तगादा लावणार नाही.”

बाबल्या हातपाय आपटत घराकडे इलो. उद्या लोक ह्याच म्हणतीत की बाबल्यान पैसे असुन झिलाक दिल्यान नाय.
बाबल्या मसूरकर,आपल्या बायलेवर संतापलो, “बघलस तुझ्यामुळे पोरगो हाता बाहेर गेलो. आज बापटाकडून कर्ज घेतल्यान उद्या अजून कोणी देईत आणि झिलाक फेडूक जमला नाय त मगे वसुल करूक हयच येतीत.” बायको बाई मसूरकर वैतागली, “येऊन माझ्यावर जोर करतास ते त्याका धारेवर कित्याक म्हणान धरूक नाय? तुमच्या झिलाक सांगून तो ऐकतलो, तो तुमच्यावर गेलो हां, एकदा ठरवल्यान की पाठी सराचो नाय. बापट भावजींनी त्याका काय म्हणून कर्ज दिल्यानी? ते पक्के स्वार्थी आसत, त्यांका ठाऊक हां, आमच्या झिलाकडले पैसे खय बुडणत नाय.”

पदलो माल घेऊन सावंतवाडी -दिवा गाडी पकडू लागलो. संध्याकाळी घरी आल्यावर लवकर जेवणखाण आटपून पोरांच्या गजालीक जाऊ लागलो. आरपीएफ पोलीस त्याची थट्टा करत कधी गालगुच्चो घेईत तर कधी अंगचटीक येईत. एक दीवस एका पोलीसाक त्यांनी काजू फेणी भेट म्हणून आणून दिली. पोलीस एकदम खूश झालो. ते दिवसापासून आरपीएफ त्याका सॅल्युट करू लागले. माल विकताना तो मजेशीर हाळी घाली. गिरायीक त्याचेकडसून खडखडे, बंगाली खाजो, पोह्याचे लाडू, डिंक लाडू असा खरेदी करीत. तो दर आठवड्याक नेहमी पेक्षा वेगळो म्हाल घेऊन जाय.

लवकरच त्याचो कोकण रेल्वेत जम बसलो. हाती इलेले पैसे बापट सावकाराक देऊन दिड वर्षात त्यानी हळूहळू कर्ज उतरून टाकला. बापटाकडचो कागद सोडवून आणून बापाशीच्या पायावर घातलो. दादा, बघलास,दिड वर्षीत काकाचा कर्ज व्याजासकट फेडलय. तुमका जमण्यातला होता काय?” बापाशीन त्याका पोटाशी धरलो. बाबलो म्हणालो, तू जीद्दीक पेटलस तर कायेव करू शकतस ह्या खरा, पण गाडीयेत फिरान माल विकणा सोप्या न्हय.”

मुंबईत झिल होते त्यांच्यापेक्षा व्हयतो टापटीप रवा. आवशीबापाशीक कापडा आणि, पायतणा घेऊन येय. तर कधी गाडीयेतसून नेलकटर, फणी, बॅटरी,असा काय काय आणी. मसुरकरीण झिलावर खुश तो तिका साडी घेऊन येय, काकणा भरूक पैसे देय. बापाशीक काय व्हया नको ता विचारी. बाबल्या मसूरकर एकदम खूश होतो. झिल शिकलो नसलो तरी त्याची मीजास मुंबईकरांच्या वरताण होती. पदीचो भाऊस संदीप गावाक इलो तेवा आवशीन लग्नाचो विषय काडलो तर म्हणता, “गे आपलो लाकडाचो माच हा तेदी बारकी खोली आसा, लग्न करून बायलेक खय ठेव?” वय वाडत होता आणि मसूरकराक आडून आडून झिलांच्या लग्नाविषयी विचारणा झाली की ते घरवालीक ता सांगत, “लोकांच्या पोरांची लग्ना झाली पण तुझो झिल लग्नाचा मनावर घेणा नाय. त्याच्या कानावर घाल, कोण पोरग्या बघला असात तर सांग,आमका काय अक्षता टाकून मोकळे जाव.” ती रूजवात करी, “ओ तुमच्या कानावर घातल्या शिवाय संदीप तसा करीत काय? तुमीच त्याका पटात अशी पोरगी देखवा, हयच लगीन आटोपून टाकू.” दिवस ढकलत होते. पदलो मात्र आपल्या धंद्यात खूश होतो.

पदलो कष्टामुळे अंगान भरलो आणि बापयो दिसाक लागलो. आवशीन त्याची स्वरगत ठरवण्याची गोष्ट मालकांच्या कानावर घातली? “ओ ऐकलात काय,आपली मोठी पोरा लग्नाचा मनावर घेणत नाय, का थकडेच कुणाशी सूत जुळवल्यानी ताव कळाक मार्ग नाय आपण तेंका विचारून पदीचा लगीन ठरवला तर?” “गो! खुळावलस काय? थोरल्या मुलांच्या अगोदर हेचा लगीन केला तर लोक काय म्हणतीत?” “लोकांचा कधीपासून मनावर घेऊक लागलास? उद्या बाहेर काय घोळ घातल्यान तर तो निस्तरीत बसण्यापेक्षा आपणच पुढाकार घेतलेलो बरो.शाण्यासारखो विचार केलास तर पटात. गरीबा घरची कामसू प्वार बघून लगीन लावूक व्हया. आमका हुंडो-बिंडो काय नको, प्वार संसारी व्हया म्हणजे झाला.” “तुझ्या बघण्यात कोणाचा प्वार आसा काय ? तं माका सांग,भेट घेऊन येतय, मगे पदीक दाखवू.” “ओ, तोच घोळ हां,/आताशा आपल्या गावातले एकजात सगळ्या पोरी कॉलेजात जातत. बारावी पर्यंत शिकतत, त्यांचे ते अर्धवट कपडे, उंच टाचाची चपला, हाती मोबाईल,कापलेल्या केसांची झिपरा आणि तुमचो दहावी नापास झिल जमतला कसा?” “तो प्रश्न आसाच, पण आधी त्याका कोणी पसंत तर करून व्हयो.” “कित्याक म्हणान पसंत करूची नाय,तो काय लुळो,पांगळो हां, स्वतःचो धंदो हां, नोकरदारापेक्षा जास्त कमावता आणखी काय व्हया?”

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “गजालीक कारण की भाग 1

 1. Archana Ashok kulkarni
  Archana Ashok kulkarni says:

  माका भारी आवडलाक.तुमका भाषा न गोष्ट

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   कोकणी साहित्य वाचशात तर नक्की भाषेच्या प्रेमात पडशात. माझ्या भाषेत आसा मधु मंगेश कर्णीकांची वाणी,
   मंगेश पाडगावकरांची लयबद्ध गाणी, साधी असली तरी माझी मालवणी लय अभिमानी.

   आमच्या मच्छिंद्र दादांनी ती सातासमुद्रापार नेली
   थय ‘वस्त्रहरण’होव नये म्हणान मित्राक तंबी दिली.
   ‘पांडगो इलो रे!पण खयसुन ताव कोणाक कळेना
   लोकांची मात्र हसानच वाट लागली. आमी चेटूक करतव प्रेमाचा,’केला तुका नी झाला माका’ पुरती फजीती झाली.

   काय सांगू बाई, माझी मालवणी खय खय पोचली
   कोणाच्या काळजात ती घट्ट रूतान बसली
   कोणाक आठवता सोलकडी तर कोणाक बांगडो
   पण बिशाद नाय, हापूस वरी कोणीच नाय तगडो

   तुमी प्रयत्न करीत रवलास तर तुमकाव भराडी आई पावतली।

Comments are closed.