गारुड मनावर
काही माणसांची उंची मोजयला जगात नसतं कोणतंच योग्य साधन
अशा विभूतींची बांधू नका स्मारके, अजोड करुनि कर्तृत्व करावे मनी स्मरण
मानवातील ते देवदूत निगर्वी, सालस, निर्भय, सुहास्य वदनी जिंकती सकल जन
मानबिंदू भारतभूचा, सोज्वळ, साधा, उच्च विद्याविभूषित ‘टाटा रतन’
राष्ट्राप्रती, निस्सीम प्रेम,स्वप्रेमाला दिली तिलांजली, झिजले राष्ट्रासाठी कणकण
उभारण्या शिक्षणसंस्था, दवाखाने, संशोधन संस्था, खर्चिले पदरचे अमाप धन
गिरण्या, कारखाने, माहितीजाल, वीजनिर्मिती,चौफेर मुशाफिरीला ना कोठे बंधन
दातृत्व त्यासम ना कोणी, ना गाजावाजा, ना अपेक्षांचे कोठे स्वार्थी रिंगण
केवळ कामगार हित घेऊन ध्यानी, तुटीतल्या व्यवसायाचे केल रक्षण
भेटीस जाती सहकाऱ्यांच्या, द्रष्टा मालक, नित्य घडवी मनोमिलन
आपुलकीचे जोडती नाते, असा मनस्वी राजा, सहकाऱ्यासोबत घेती भोजन
बडेजाव ना कुठे कोठला, रांगेत सामन्यापरी ठाकला, तो
नवल नंदन
दुखावले ना कधी कुणाला, निर्मोही, निर्मळ,जणू संतश्रेष्ठ सज्जन
आपपरभाव ना कधी बाळगला, निष्कलंक शुध्द अंतकरण
अडचणीतून मार्ग काढणं, गरीबांना सुविधा देणं हेच त्यांचं मनोरंजन
साऱ्या जगात त्यांचे चाहते, गरिबांना स्कॉलरशिप मधून मिळे शिक्षण
थांबणे ना ठाऊक त्यांना, नवी भरारी देश सेवा हेच मनी सदैव चिंतन
अशा विभूती ना क्षती तयांना, राखू स्मृती आम्ही भारतीय नित्य, चिरंतन
त्यांचे नेतृत्व, सारेच अविस्मरणीय, अफाट कर्तृत्व म्हणून त्यांना वंदन
त्यांनी दिली, राष्ट्राला कर्तृत्व प्रेरणा, दिले धन, नेपथ्य, झाले देहाचे चंदन
कर्तुत्ववान खूप झाले असतील, ‘रतन टाटा’ लखलखीत हिरा, नवल कोंदण
‘भारतरत्न’ द्या, अथवा नकारा, कोट्यवधी भारतीयांचे त्यांना अखंड नमन
टाटा शब्दाचे गारुड मनामनावर, सचोटी, शुद्ध व्यवहार, तसेच वर्तन
टाटा खरे देशभक्त, देशाची शान, ‘टाटा’ ही भूमी गाईल तुमचे स्तवन
I like the efforts you have put in this, regards for all the great content.
I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!