गेले क्षण पाहता धरू

गेले क्षण पाहता धरू

कधी कधी काही गोष्टी उशिराने मनाला कळतात
भावविश्व तोलता येत नाही, आठवणी पून्हा छळतात

ती दिसताच मन होते उल्हसित, रोमांच मनी फुलतो
तिच लक्ष वेधलं जावं म्हणून तिच्याकडे पाहून मी हसतो

तो मनाचा सल त्याच त्या गोष्टी भोवती घालतो पिंगा
आठवत रहातात काळजातील क्षण त्या वेळचा दंगा

बरेच अंतर कापून आल्यावर पून्हा गतकाळात डोकवणं
अन थोडं मिश्कीलपणे हक्काने तिच्यावरच उगाचच रागवणं

वयच होते कोवळे निशब्दपणे दोघही घेतो डोळ्यांनी निरोप
बोलायचं काय? सांगयचं काय? शब्दांचा जमतच नाही गोफ

पाहता पाहता शिक्षण, उत्साह, उन्मादात एकमेकांना विसरतो
प्रगती आणि स्वप्नांची गुंफण करत कालचक्रातच हरवतो

ना आठवण, ना कोंडमारा,जीवन हेच तारू, हाकतो संसारा
पत्नी, पिल्लं, त्यांच्या गरजा अन स्वप्ने मी उरतच नाही खरा

झेप घेणाऱ्या धबधब्यासम मी एकाच दिशेने रहातो चालत
स्वप्ने कुटुंबाची फुलवण्यासाठी चालतो नवीन आव्हाने झेलत

पाहता पाहता पिल्लांना फुटतात पंख झेपावतात नजरेच्या पार
आता आम्ही दोघेच, छळतो एकांत, मनात पोकळी मिट्ट अंधार

ती तिच्या मानसिक अन शारीरिक विवंचनेशी असते झुंजत
वाढत्या वयाबरोबर दोघही दिसामासाने चाललो थकत

आता सारेच निवांत, घेऊन निवृत्ती, नकळत बनतो अशांत
मनात घोघवते एक वादळ, कल्पनेचा खेळ नसे त्यास अंत

एक दिवस भास, अचानक ती रस्त्यातच दिसते, नजर बसते
अरे तू! मी बागडतच तिला गाठतो ती हात उंचावत हसते

गतकाळाचा पडदा चिरत तेव्हाच तिच रूपड पून्हा आठवून पाहतो
अंगान तिचा झालाय डबलरूम, पण डोळ्यात तोच निरागस भाव दिसतो

अस अचानक आपलं कुणी भेटलं की मनात पून्हा वादळ उठत
गेलेले क्षण कधी परतणारच नाहीत पण नाही सांगता येत नक्की काय वाटतं?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “गेले क्षण पाहता धरू

  1. Archana Ashok kulkarni
    Archana Ashok kulkarni says:

    कोचरेकर, प्रेमगीत छान जमले आहे..!😊😊

Comments are closed.