चोर
खरं तर प्रत्येकाच्या मनात असतो लपलेला एक चोर
सापडत नाही कुणाला तोवर आपण नक्कीच शिरजोर
कुणी मन चोरतं कुणी धन, कुणी चोरतं कुणाचं अंगण
चोरून कुणाचं तर बरेच ऐकतात, मग रंगत वादाचं रिंगण
आपण नाही कृष्ण, कान्हा, नाकारता येत नाही केलेला गुन्हा
आपल्या भोवती नाही गोपी, नाही गौळणी ना कुणी सुदामा
कळत नकळत तो करतो चोरी, कधी शब्दांची कधी मद्याची
चोरतो गाणी त्यांच्या चाली, बांधून वेष्टन लेबले लाऊ आमची
कथा असो दुसऱ्या कुणाची, आम्ही आमच्या नावे खपवतो
अंगलट येते असे वाटताच, चिरीमिरी देत मॅटर हळूच संपवतो
झोपू योजनेची कथा वेगळी इथं सह्यांची फाईल असे महान
आम्ही बँकेची करतो लूट त्यासाठी कुणा दुसऱ्याची जमीन गहाण
इथले नेते, भ्रष्ट बिल्डर आणि व्यापारी यांचे मिंधे, त्यांचे पक्के गुलाम
यांना निवडणुकीस दिला चंदा, तर सहज कापतील सामान्य जनतेची मान
काय चोरावं “चोरानं”? याला ना घरबंध ना काही लिखित नियम
कोणाचं मन, कुणाचं ह्रदय चोरणं ठीक, किडनी चोरांना नाही संयम
पेशंट दाखल होताच त्याला देती व्हेंटिलेटर, अन पाहता पाहता विचारती बिमा कव्हर
अत्यावस्थ ठरवून, ऑपरेशन करावे लागेल म्हणत सलाईन लावत, आणती फिवर
कोविड सेंटरची कथाच वेगळी तिथला कारभारच चोरांच्या हाती
मंत्रालयातच ठरते कंत्राट, तेथेच ठरते टक्केवारी अन देती प्लॉट, प्रेमाच्या पोटी
कोणी होतो चार महिन्यात काही प्लॉटचा मालक तर कोणी होतो जमीनदार
प्रत्येक इमारतीत ह्यांच्या सदनिका व्यवसाय न करता हे कसे बनती मालदार
असो कंत्राट रस्त्याचे वा पुलाचे आधी ठरते टक्केवारी त्याचा हप्ता पहिला घरी
सिमेंट, लोखंडचा निम्म्याने वापर, कंत्राटदार पूल वा रस्ता रखडत पूर्ण करती, इथेही चोरी
कधी विहीर तर कधी रस्ता चोरीला जातो, तर कधी मंत्री आपल्या भावाला अनुदानाचा चेक देतो
गरीब गरजू शेतकरी मदत मिळेल या आशेवर चिरीमिरी वाटून कंगाल होतो
यांना मिळते मंत्री पदाचे आंदण अन चार दोन वर्षात यांचे चंदेरी अंगण
गरीबास नाही निवारा, ना नोकरीची हमी त्यांनी करावे फक्त राष्ट्रास वंदन
असा आहे सरकारी बाबूंचा आणि मंत्र्यांचा, आणि चोरांचा अखंड सुळसुळाट
महान भारत होणार म्हणता, पण संपू दे आधी भ्रष्टाचार आणि चोरांची काळी रात्र
‘ चोर ‘ या कवितेतून तुम्ही समाजातील सध्याच्या परिस्थितीवर अगदी मोजक्या शब्दात वर्णन केले आहे. खूप सुंदर सर