जाणीव

जाणीव

शरद नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये जायला निघाला, कितीही लवकर उठून जायची तयारी केली तरी काही ना काही राहून गेल्याचे लक्षात यायचे आणि उशीर व्हायचाच, कधी लॅपटॉपचा चार्जर, कधी रुमाल, तर कधी टिफिन. त्याला पोळी भाजी बनवून दिली की आई घरातील इतर कामे आवरायला जायची, तो स्वतः ची तयारी होत आली की मोठ्या आवाजात, “आई माझा चार्जर कुठे?,आई माझे सॉक्स जाग्यावर नाहीत, शोधून देतेस का?”
मग ती किचनमधून ओरडायची, “शरद, आदल्या रात्री या गोष्टी पाहून ठेवायला तुला काय होतंय? रोज तशीच ओरड घालत बसतोस, आज मी शोधून देते, पण उद्यापासून तुझ्या गोष्टी तुला सहज मिळतील अशा ठेवत जा.” “बरं, बरं, उद्या पासून मी नक्की तुझी सूचना फॉलो करेन,आजचा दिवस दे ना प्लिज, मॉम.”
वसुधा त्याला उशीर होऊ नये म्हणून, हव्या असलेल्या वस्तू तत्परतेने शोधून देई आणि म्हणे, “नुसता धांदरट आहे, उद्या लग्न झाल्यावर काय करणार आहे कोणास ठाऊक?” अर्थात यातील एकही शब्द न ऐकता शरद पटापट पायऱ्या उतरून निघून जाई.
तो जात नाही, तो विवेक आपलं आवरून डायनींग टेबलजवळ येता येता म्हणे, “वसुधा माझा नाश्ता आणते का? आणि हो, येतांना माझ्या बीपीच्या गोळ्याही आण.”

वसुधा,किचनमधूनच मोठ्याने ऐकू जाईल एवढ्या स्वरात म्हणते, “विवेक तु इथे आलास तर बरं होईल, तुझा नाश्ता वाढून ठेवला आहे, मला तिथे येता येणार नाही, गॅसवर फोडणी जळेल.”
विवेक स्वतः किचनमधून स्वतःचा नाश्ता, दूध आणि गोळी घेऊन हॉलमध्ये येतो. किचनमधून बाहेर पडतांना त्याला ठसका लागतो. तस तो म्हणतो, “वसुधा आताच फोडणी द्यायची गरज होती का? हे दूध माझ्या कपड्यावर सांडले असते तर व्याप झाला असता.”
वसुधा लगबगीने किचनमधून बाहेर येते, त्याच्या हातात टॉवेल देत म्हणते “sorry, कुठे पडलं असेल तर पुसून टाक, तू ऑफिसमध्ये जायला निघालास हे खरं,पण मी फोडणी देणं was just coincidence, मलाही किचन आवरून ऑफिसला निघायला हवं, खर ना? Dear husband , I can’t wait to wind-up my kitchen work. Anyway, sorry.”

वसुधेला विवेक काही बोलू शकत नाही,नव्हे बोलण्या सारखं काही नसतच, She was absolutely right,तिला किचन आवरून निघायच असतं पण त्यापूर्वी विवेकच्या वृद्ध वडिलांसाठी स्वयंपाक करून ठेवायचा असतो. विवेक नास्ता करतो, दूध घेता घेता हसतो, त्याला माहिती असते, वसुधाने त्याची विकेट काढलेली असते.

वसुधा पुन्हा किचनमध्ये जाते, इतक्यात वैशाली किचनमध्ये हजर, “मॉम, माझा नाश्ता ?” वसुधा तिच्याकडे न पाहताच म्हणते, “डायनिंग टेबलवर ब्रेड बटर ,जॅम ठेवलेला आहे, ब्रेड बटर नको असेल तर सेल्फ वर डब्यातून तुला हवं ते घे. I have only half an hour to finish this business.चहा किंवा दूध घेणार असशील तर मग इथे घेऊन ये.” “Mom, you prepare breakfast for everyone except me, is that fair?”
“Sorry Beta, I have no time, I have to go to the office. You have enough time to prepare for it.”
वैशाली थोडस त्रागा करते ‘मग’ आणून किचन प्लेटफार्मवर आदळते, “दे यात चहा, मला काहीच खायला नकोय.” “वैशाली, पून्हा, ‘मग’ आदळलास तर त्याचे परिणाम वाईट होतील. मी सकाळी सहा पासून इथे काम करतेय, मला सकाळी किंवा संध्याकाळी अजिबात वेळ नसतो तू हे पाहतेस, तुला स्वतः चहा किंवा स्नँक्स घ्यायला काहीच हरकत नाही. तू उशिराने कॉलेजला जाणार आहेस.” “But it’s unfair to me, everyone in the house gets prepared snacks, tiffin, press cloths and everything that they want, only I have to suffer.” “Vaishali, I have no time to discuss it, but they have to go to the office in time and they are men and you are women. Every woman in society has to work more than men. That’s the custom. Now finish your snacks and go to study. Let me go to the office I am getting let.

वसुधा किचन आवरून निघून गेली,तिच प्रत्येक मिनिटं महत्त्वाचे आहे याची पळणाऱ्या सेकंद काट्याने तिला जाणीव करून दिली.
बरोबर पंचवीस मिनिटात वसुधा ऑफिससाठी तयार झाली.ते ही अतिशय निटनेटक्या अन देखण्या स्वरूपात. “Bye Vaishu, उगाच वेळ वाया घालवू नको,आजोबांना म्हणावं, पोळीभाजी डायनिंग टेबलवर आहे. त्यांना त्यांच्या गोळ्यांची आठवण करून दे.”

वसुधा झपझप लिफ्टच्या दिशेने निघून गेल्याचा तिच्या हाय हिल चपलांचा आवाज वैशाली ऐकत राहिली. स्वतःची तुलना आईशी करत राहिली. मग पुटपुटली, “आज आईने पन्नाशीत ओलांडली असुनही ज्या चपळतेन ती सारं उरकते ते खरच कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल तिला मी तरी शंभर गुण देईन. अजून वर्षभरात माझं ग्रँज्युऐशन संपेल मग कदाचित पोस्ट ग्रँज्युऐशन किंवा जॉब. पण नुसत्या ग्रॅज्युएशनवर आपल्याला नोकरी मिळेल का ?”

तिने फायनल इअर ला मार्केटिंग का घेतलं ते ही तिला नीटसं कळत नव्हतं. पण आता माघार घेऊन चालणार नव्हती. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे तर कोणत्या फिल्डसाठी त्याची नीट कल्पना नव्हती. दादाला विचारले तर नुसता हसतो, म्हणतो आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर, मग ठरवता येईल.

डोअर बेल वाजली आणि तिची तंद्री भंगली, ती दाराकडे पोचण्यापूर्वी आजोबांनी आपल्या चावीने दार उघडले,”गधडे बेल वाजली ती ऐकली की नाहीस? आणि हे काय अजून तुझ चहापान चाललंय होय! , जा जा अभ्यास कर,उगाच वेळ वाया घालवू नकोस.”

“आजोबा,मी आता शाळेतली मुलगी नाही, I am enough old to handle my study. I can take care of mine. तुम्हाला मात्र मॉम चा निरोप आहे, इथे पोळी भाजी ठेवली आहे,आणि न चुकता औषध घ्या. तुम्हाला चहा हवा असेल तर सांगा,मी करून देते.” “माझा चहा सकाळी सहा ला, तुझ्या आजीला माझ्या हातचा चहा आवडायचा, आज ही मी सकाळी चहा स्वतः बनवून घेतो बरं, तुझा डॅड मी बनवलेला चहा घेतो. आता मला चहा नको आणि गोळ्यांच म्हणशील तर , माझ्या सगळं लक्षात आहे, तेव्हा तु तुझ्या कामाला जा.”

वैशाली काही न बोलता उठून जाऊ लागली तस आजोबा तिला हाक मारत म्हणाले,” ए वैशु,अग डायनिंग टेबलवरची ही भांडी सिंकमध्ये ठेव, कामवाल्या बाई येतीलच इतक्यात.” आजोबांकडे कुत्सित नजरेने पाहत ती म्हणाली, “आजोबा तुम्ही आमच्यावर लक्ष ठेऊन का असता ? आम्ही कधी चुकतो आणि तुम्हाला कधी बोलायला मिळते असच तुम्हाला वाटतं ना? “

“अग, तू निघून गेलीस की हे कोणी आवारायचं? ,चांगल्या सवयी लावाव्या लागतात तरच लागतात. तुम्ही सर्व निघून गेलात की घरात मी एकटाच असतो . मी नाही का माझी भांडी आवरत, तुम्हाला स्वतःला समजलं असतं तर बोलावं लागलं असत का?”

“आजोबा हा न्याय तुम्ही डॅड आणि दादा ला लावलेला दिसत नाही. ते सकाळी स्नॅक्स आटोपून निघून जातात,तेव्हा मॉम त्याचं आवरते.” “हं, सकाळी मी morning walk ला गेल्यावर काय होतं, ते मला कसं कळणार? त्यांना ऑफिसमध्ये जायचं असते,त्यांची घाई होत असावी, तुला नाही का असं वाटत?”
“आजोबा हे काही बरोबर नाही,These are silly excuses , it does not take two minutes to drop plates and cup in sink. पण तुम्ही त्यांना नियमातून वगळंल, का? तर they are earning members, am I right?” “अग तसच काही नाही, उद्या पासून नियम त्यांनाही लागू होईल “Justice is Justice, पण तू , तु आहेस, मुलगी. In future,when you will marry your husband and his house member will expect same thing and then you will find it difficult, so it’s better to have practice. तुझी आई नाही का करत?”

“तेच मी म्हणते, आई सगळं निमूट करते पण मी नाही करणार, आजोबा, एकतर मी लग्न करणार नाही, यदाकदाचित केलच तर अन्याय खपवून घेणार नाही. स्त्री पुरूष कामाची विभागणी मला मान्य नाही, प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार वाट्याला येईल ते काम करावे, मग पुरूषांनी किचन सांभाळणे किंवा गरज पडल्यास घरात स्वच्छता करणे का स्विकारू नये?”

“बरं बाई, तुला योग्य वाटेल ते तू कर, फक्त भांडण करून पुन्हा माहेरी येऊ नको म्हणजे झाल.” “आजोबा, तुमचं म्हणणं मला अजिबात मान्य नाही, मुलीचे लग्न करुन दिले किंवा झाले म्हणजे पालकांची जबाबदारी संपली का? तिचे सासरी पटत नसेल तर तिने माहेरी का येऊ नये? तिचाही माहेरी तितकाच हक्क असतो जितका पुरूषांचा असतो.” “वैशू चर्चा पुरे झाली,एकतर तू लग्न करणार नाहीस अस म्हणत आहेस, जेव्हा तुझ लग्न होईल तेव्हा परिस्थिती काय असेल? सांगता येत नाही मग उगाचच चर्चा करून काय उपयोग? तेव्हा तुझ्यावर जो काही अन्याय होत असेल त्याची चर्चा आपण नंतर करू. सध्या तू अभ्यासाला जा.”
“आजोबा,पून्हा तेच, I know my responsibilities,I will manage it.” “बरं, तू तुला हवं ते कर, तुझ्या बरोबर मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही.” सदानंद नाईक आपल्या बेडरूममध्ये गेले,वाद,चर्चा संपली.

वैशालीने डायनिंग टेबल आवरले आणि ती आपल्या खोलीत गेली. नेहमीप्रमाणे सुगंधा दहाच्या दरम्यान कामाला आली आणि बरोबर तासाभरात भांडी,कपडे आणि लादी पुसणे ही कामे आटोपून निघून गेली. “आजोबा,मी कॉलेजला निघाले आहे, दुपारी मी जेवायला नाही येणार, तुम्ही तुमच्या वेळेत जेवून घ्या.” म्हणत वैशाली निघून गेली.

सदानंद नाईक स्वतःशी विचार करू लागले,आजची पिढी किती हुशार आहे? , स्वतःचा किती विचार करते? मग आपण तेव्हा खरेच अडाणी होतो का? सविता आज या जगात नाही तेच बरं, नातीची मुक्ताफळे ऐकून चक्रावून गेली असती. पण वैशाली विचार करते त्यात तिचं तरी काय चुकलं? वैशालीचे विचार ऐकले तर दुर्दैवाने सवितावर आपल्याकडून अन्याय झालाय असच आता वाटू लागलय. आज रात्री याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. सविता तर निघून गेली पण वसुधावरही आपण अन्यायच करतोय, नाही, हे बदलावं लागेल. आपल्या कुटुंबापुरत तरी हे शोषण थांबवलच पाहिजे. दुपारी त्यांनी जेवण गरम करून घेतलं,स्वतःच जेवण झाल्यानंतर सर्व जेवण व्यवस्थित फ्रिजमध्ये ठेवल. खरकटी भांडी धुवून सिंकमध्ये ठेवली. डायनिंग टेबलवर ओला फडका फिरवून ते पुसून काढल. थोडावेळ टिव्ही पाहिला. टिव्ही पाहता पाहता डोळा कधी लागला ते त्यांना कळलच नाही.

बेल वाजली म्हणून ते उठले आणि त्यांनी पिप होल मधून पाहिले तो बाहेर वैशाली उभी होती. त्यांनी दार उघडताच ती बागडत घरात आली. आजोबा लगबगीने तिच्यासाठी पाणी घेऊन आले. तिची सॅक त्यांनी तिच्या बेडरूममध्ये नेऊन ठेवली. त्यांचं लक्ष भिंतीवरच्या घडाळ्याकडे गेल, पाच वाजत आले होते. ते किचनमध्ये गेले त्यांनी,वेलदोडे घालून दोन कप चहा बनवला. डायनिंग टेबलवर चहाचे कप ठेवत त्यांनी नातील हाक मारली, “वैशु, बेटा चहा घ्यायला ये.” वैशु हॉलमध्ये येऊन पाहते तो आजोबा तिची डायनिंग टेबलजवळ वाट पाहत होते. “आजोबा, हे पहा मी तुम्हाला काय आणलंय,” म्हणत तिने भेळ आजोबांच्या समोर ठेवली. भेळ पाहून सदानंदच्या तोंडाला पाणी सुटले,पण वरकरणी ते म्हणाले, “अग भेळ कशासाठी आणलीस,आधी चहा घे पाहू.” तिने चहाचा एक सीप घेतला, “Wow! Marvelous, आजोबा तुमच्या हाताला टेस्ट आहे, खरच असा चहा मी पहिल्यांदा पितेयं. आजोबा तुम्ही भेळ खा की, मुद्दाम तुमच्यासाठी आणल्यायं, नरम झाली तर त्याची मजा निघून जाईल.” आजोबांनी भेळीचा कोन अलगद उघडला तसा मिरची, कोथिंबीर, कांद्याचा घमघमाट सुटला. त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत ते भुतकाळात गेले.सविता आणि ते कधी चौपाटीवर गेले तर आवर्जून एक भेळ दोघांत खात असत. आजोबांनी बोकणा भरला. वा! क्या बात है, भेळ फर्मास बनवली आहे.धर तू ही खा. मला एकट्याला एवढी थोडीच संपणार, वसुधाला मी भेळ खाल्ल्याचे कळले तर रागावेल,म्हणेल तुम्हाला अती तिखट चालत नाही म्हणून मी जपते तर तुम्ही भेळ खातायं?” “खा हो आजोबा,रोज थोडीच कोण खातयं आणि मॉम ला सांगायचे कशाला? जीव मारून जगण्यात काय मजा!”
आजोबा आणि नात दोघ गप्पा मारत चहा पित होते. इतक्यात दार उघडून वसुधा आत आली. वसुधेला पाहून आजोबांचा चेहरा पडला तरी उसन हसत म्हणाले, “सुनबाई, मी नव्हती हा सांगितली, वैशु घेऊन आली. तिने आग्रहच केला म्हणून मग- – -“
वसुधेला कळेना काय प्रतिक्रिया द्यावी,ती हसत सुटली तशी वैशु आणि तिच्या बरोबर आजोबांही हसत सुटले. हसता हसता त्यांना ठसका लागला, वसुधाने त्यांना पटकन पाणी दिले, त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. वसुधा तिची बॅग,भाजीची पिशवी आणि पर्स ठेऊन फ्रेश व्हायला गेली.

तेवढ्या वेळात आजोबांनी सुनेसाठी चहा ठेवला. भेळीचा कोन तसाच अर्धवट ठेऊन तिची वाट पाहू लागले. वैशु त्यांची धावपळ पाहून म्हणाली, “आजोबा मला सांगायचं होतं की चहा ठेवायला. तुम्ही भेळ अर्धवट ठेऊन उठलात कशाला?” “अग तुझी आई रोज ऑफिसमधून थकून येते, आणि आली की पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाला लागते. तिला ही वाटत असेलच ना, की थोडं निवांत बसावं, कुणीतरी वाफाळता चहा आणून द्यावा. थोड्या गप्पा माराव्यात आणि मग स्वयंपाकाला जावे.” “आजोबा, तुमचं hundred percent बरोबर आहे, पण I have never ever noticed this, you are really gentle.” “अग वैशु , जेंटल वगेरे काही नाही, हे उशिरा आलेल शहाणपण आहे. ते सुध्दा तुझ्याकडून. हा तस जेव्हा तुझ्या बाबाचा आणि आत्याचा जन्म झाला नव्हता तेव्हा मी तुझ्या आजीला काही तरी मदत करायचो पण नव्या नवरीचे नव दिवस तसा तो उद्योग होता. खरं तर तेव्हाच हे कळायला हवं होत की एकटी बाई घरात कशी पुरी पडणार? कमावत्या माणसाने घरात पैसे कमावून आणले की त्याचं काम संपत नाही. पण पुरूषी अहंकारापोटी ते कळलच नाही.” त्यांच बोलण सुरू असताना वसुधा डायनिंग टेबलजवळ आली तर वैशाली म्हणाली, “Mom have a tea.Tell me how it smells?” “अरे ! आज सुर्य कुठून उगवला म्हणायचा? आजोबानी सांगितल्या शिवाय तुमची अक्कल चालणार नाही हे नक्कीच.” वैशु हसली, “अग आधी पिऊन तर बघ,चहा कसा झालाय तो, नंतर काय दुषण द्यायची ती दे,आता सगळ माझ्या सवयीच झालयं.” वसुधाने कप तोंडाला लावला,एक दोन सिप प्यायला आणि म्हणाली, “हा चहा तू केलास,खर सांगतेस?,इतका चांगला चहा बनवता येत असेल तर उद्या पासून तुझ्या हातचा चहा प्यायला मला नक्की आवडेल.” “पाहिलत आजोबा, हे असं आहे, आज आनंद मान, ते नाही, तर तिला उद्याची काळजी. जबाबदारी ढकलून मोकळं होणार म्हणून मी मदतीला जात नाही.” “अग मग तिच चुकल का? काहीतरी जबाबदारी प्रत्येकाने उचलायला नको का, मगाशी आपली काय चर्चा झाली, पालथ्या घड्यावर पाणी का?”

“नाना तुमची कसली चर्चा झाली? ते तर सांगा,कोणाच्या पालथ्या घड्यावर पाणी पडलं? वैशु आजोबा काय म्हणतात?” “आजोबा काय म्हणतात, ते मला कस कळणार? आजोबा काय म्हणतात ते जाऊ दे, तू ही भेळ खा, म्हणजे मी ती आजोबांना आणली होती पण ते म्हणाले मला इतकी तिखट भेळ मानवणार नाही, त्यांनी खास तुझ्यासाठी ठेवल्याय, नरम होईल, आणि चहा मी नाही आजोबांनीच बनवलाय. पण मी सुध्दा इतकाच चांगला चहा बनवू शकते.” “तुझ्या आजोबांच हे काय आज वेगळच? इतके वर्ष मी चहा बनवत होते, तेव्हा नाही कधी म्हटलं? उद्या विवेक माझ्यावर रागवेल, म्हणेल सासऱ्याला चहा बनवायला सांगते.”

आजोबा हसत म्हणाले,”त्याच्यासाठी मी सकाळी नियमित बनवतो, एक दिवस तुझ्यासाठी बनवला तर बिघडलं कुठे? बरं मी Evening walk ला जातोय,तुमचं चालू द्या.” आजोबा तयारी करून बाहेर निघून गेले. वसुधा,आपल्या नेहमीच्या कामाला निघून गेली, वैशु आपल्या बेडरूममध्ये नेहमीप्रमाणे अभ्यासाला गेली.

त्या रात्री वसुधाने आपला स्वयंपाक करायला घेतला तेव्हा वैशु तिच्या मदतीला आली, तिला पाहून वसुधाला आश्चर्य वाटलं, “काय गं काही गिळायला हवयं का? भुक लागल्याय का? चहा बरोबर भेळ खाल्लीस ना?” “अगं, अशी हिडीस फिडीस का करते? मला काही नकोय मी तुझ्या मदतीला आले आहे.” “खरं सांगतेस की आपलं गुगली टाकून पाहते.” ” अगं अगदी खरं, पिठ मळल असेल तर मी पोळ्या करते.” तिने आईला स्वतः पोळ्या लाटून दिल्या. वसुधाला काहीही सांगावं लागल नाही. “वैशु पाहिलसं तू किती सुंदर पोळ्या करू शकतेस ते,हेच तर तुला सांगते ना! थोडी मदत केलीस तर आपण वेळेत जेवू शकू.”
“तुला आणखी काही मदत हवी का? लवकर सांग अन्यथा मी अभ्यासाला जाते.” “हे बघ वैशु ,तुझा अभ्यास ठेवून तू मुळीच येऊ नकोस पण तुला मोकळा वेळ असला तरी तू टाईम पास करत असते मग मला राग येतो. शेवटी मी पण कामावरून येऊन थकतेच ना, पण ते तुम्हाला दिसत नाही .” “हेच ते,तुला मदत करायला आलं की तू लेक्चर देत बसते, मी आता जाते काही असेल तर सांग.”

साडेसातच्या दरम्यान आधी आजोबा आले. आजोबांनी आपल आवरून होताच, देवाला दिवा लावला आणि टीपॉय वर दोन ग्लास पाणी आणून ठेवले. थोड्याच वेळात शरद आला, त्यांनी आपली बॅग शूज रॅकला टेकून ठेवली, आपले शूज काढून ठेवले आणि आईला हाक मारली,”मॉम प्यायला पाणी देतेस का?”
आजोबा सोफ्यावर बसून बातम्या पाहत होते,ते म्हणाले,”शरद पाणी टीपॉयवर आहे, उगाच तिला मोठयाने हाक मारू नकोस. तुझा डॅड आला की एकत्र चहा मिळेल उगाच ओरड घालत बसू नकोस.” तो पाणी पिता पिता आजोबांकडे पाहत राहिला.आजोबा आज हुकमी आवाजात बोलत होते याचं त्याला आश्चर्य वाटल. त्याच्या पाठोपाठ त्याचा डॅड आला, त्याने नजरेनेच पाहिलं, शरद टीपॉयवर ठेवलेलं पाणी पीत होता.टेबलवर दुसरे पाण्याचे ग्लास झाकून ठेवलेले होते.

विवेक स्वतःच आवरून आला तेव्हा वसुधाने बनवून ठेवलेला चहा आजोबांनी त्यांच्या हाती दिला.” विवेक पाणी हवं असल्यास टीपॉयवर आहे, उगाचच वसुधा म्हणून ओरडत बसू नकोस.”
विवेक घरातील बदलेलं वातावरण पाहात होता. ती कोंडी आजोबांनी फोडली, “मग शरद आज काल तुझ्या शेअर्स बद्दल काही टीप नाहीत का?म्हणजे नेहमीप्रमाणे तु कशात किती गुंतवा अस म्हणाल्याचं नाही आठवतं.” “आजोबा,मी अशा टीप अनेकदा देतो पण तुम्ही कधी काही गुंतवल्याचं आठवत नाही. तुम्ही हसण्यावारी नेता नाहीतर मी तुम्हाला कोट्याधीश बनवल असतं. तुम्ही ते पैसे पोष्टात गुंतवून सव्वासात टक्क्यांवर खूश असता.”
बरं , तुझ खरं आहे पण त्या मागचे कारणं तुला ठाऊक आहे, रिटायर होतांना आम्हाला लाखात नाही मिळाले त्यामुळे आहेत ते फुंकून टाकायची भिती वाटते. पण शरद मी तुला कोट्यवधी रूपयांची टीप बिन पैशात दिली तर आवडेल का?”

“काय आजोबा,अशी कोणती गोष्ट आहे का जी बिन पैशात मिळते?” शरद प्रश्नार्थक नजरेने आजोबांकडे पहात होता.
“नाना,आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आमची फिरकी घेण्याची लहर आल्याय का? उगाच कोड्यात बोलण्या एवजी काय सांगयचे ते सांगून टाका.” विवेकने पुस्ती जोडली. “विवेक तुझं म्हणणं अगदी रास्त आहे, पण प्रश्नांच गांभीर्य तुमच्या लक्षात यावे म्हणून मी वाट पाहत होतो. तु ऑफिसला जातो, शरद ऑफिसला जातो आणि वसुधाही ऑफिसला जाते. तुम्ही दोघ ऑफिसवरून आल्यावर काय करता?” “नाना,तुम्ही पाहताच की सर्व,आल्यावर आम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे? तुम्ही सांगा म्हणजे करू.”
“आज पासून तुम्ही चहा घेऊन झाला की वसुधेला तिच्या कामात मदत करायची.” “आजोबा आईच्या कामात आम्ही तिला काय मदत करणार? पोळ्या करून देणार? की भाजी साठी तयारी करून देणार?” “शरद,पहिला स्वतः चा चहाचा कप स्वच्छ धुवन ठेवत जा, तुझ्या डॅड चा कप ठेवलास तरी चालेल, दुसरी गोष्ट तिला ज्या गोष्टी निवडून, चिरून हव्या असतील तर त्यासाठी मदत करू शकतो. तिच जेवण तयार झालं की डायनिंग टेबलवर आणून ठेऊ शकतो.” “आजोबा,पण मॉम ने यासाठी कधीच आग्रह धरला नाही, आज काही झालं का, ती तुम्हाला काही म्हणाली का ?”

“हेच ते, अपघात घडायलाच हवा का? अपघात टाळण्यासाठी काहीच करता येणार नाही का? वसुधा तुमच्या सारखीच ऑफिसला जाते आणि दोन वेळा जेवण करते, घरातील असंख्य कामे आवरते. रोज तिला ऑफिसमध्ये जाण्यासाठी धावपळ करावी लागते आणि रात्री तिला वेळेवर झोपायला जाता येत नाही.” “तुमच म्हणणं खर आहे आजोबा, पण आम्ही काय मदत करु शकतो?” “तेच तर तुम्हाला सांगितले,सगळ्यात प्रथम, अमुक एक काम बायकांच आहे हा विचार तुमच्या मनातून काढून टाका, मग घरातील कामे तुम्हाला दिसतील, करावी वाटतील. घरात महिलाच नसली तर तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागली असती ते आठवा मग आपोआप तुम्हाला दिशा मिळेल.”
वसुधा हे सगळ बोलण अस्पष्ट ऐकत होती. तिच काम आवरल तस ती बाहेर येत म्हणाली, “नाना तुम्ही कशासाठी हे सगळ त्यांना सांगताय, मारून मुटकून भटजी बनवून पूजा करता येणार नाही. तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे .” “नाना, तुम्ही आणि वसुधा मिळून आमचा गेम करायच ठरवलेलं दिसतयं, पण हे बाळकडू आधीच पाजायला हवं होत,आता थोडं अवघड नाही का? म्हणजे आम्ही नाही म्हणत नाही पण- – -” “विवेक, पण नाही आणि परंतू नाही, रात्री जेवलास की शतपावली घालत फिरतोस तेव्हाच आजपासून रात्री तू किचन ओटा आवरायचा, शरद तू सगळे जेवण फ्रिजमध्ये नीट झाकून ठेवायचं,मी
डायनींग टेबल स्वच्छ पुसून ठेवेन आणि वैशु खरकटी भांडी स्वच्छ धुवून घासण्यासाठी ठेवेल. वसुधा रात्रीच जेवण झालं की काही आवरणार नाही ते काम आपलं.” “नाना एवढ्या दिवसात या विषयी कुणी बोललं नाही मग आज अचानक – – –”
“वैशुचा आग्रह आहे, डॅड ऑफिसला जातो तशी मॉम ही जाते. दोघे घरासाठी पैसे कमावून आणतात. मग घरातील कामाची श्रम विभागणी सारखी झाली पाहिजे. तिचे म्हणणे योग्य वाटले. वसुधाने एकटीने घरासाठी किती राबायचे.” “Done , I agree with you, every person in the house should take equal responsibility.”

वैशू हॉलमध्ये आली,मॉम ,डॅड ,भाई आणि नाना आजोबा एकत्र गप्पा मारत आहेत पाहून तिला गंम्मत वाटली तस आजोबा तिला म्हणाले. ” Vaishu, as per your demand we have decided to help your mama. Now you will play the important role to assist to get the work done.
वसुधा हसून म्हणाली ,”नाना, मला माझ्या कामात तुमची कोणाचीही अजिबात मदत नको कामं आवरण्या ऐवजी तुम्ही माझी काम वाढवाल आणि उपद्व्याप करून ठेवाल. तुम्हाला उशीराने का होईना जाणीव झाली हे ही नसे थोडके.” “नाही वसुधा, नाना म्हणाले ते अगदी खरं आहे, आजपर्यंत आमच्या हे डोक्यात आले नाही किंवा आम्ही दुर्लक्ष केले असे म्हण, पण यापुढे आम्ही प्रत्येक जण शक्य ती मदत तुला करणारच. तसही तू पन्नाशी पार केली आहेस, तू ही घर आणि नोकरी अश्या दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळत असताना थकत असशील हा विचारच अजाणता शिवला नाही. खर तर ती अक्षम्य चूकच.” “मॉम याचं सगळं श्रेय माझं बरं का, मी आजोबांना म्हणाले म्हणून आजोबांनी तस ठरवलं.” “वैशु , पण ते का ? ते नाही सांगितलेस, सकाळी डायनिंग टेबलवर सगळ्या गोष्टी तशाच टाकून तू जात होतील. खरं की नाही. कोणत्याही घरात स्त्री च्या कष्टाची जाणीव होण ही फक्त ठिणगी आहे.”

“मी आणि वैशाली घरात असतांना तुम्ही काम करण्याची मुळीच गरज नाही, तशी मला सवयही नाही. वैशाली आता पुरेशी मोठी आहे त्यामुळे तिने मला हातभार लावला तर फारच उत्तम. उद्या सासरी गेली तर तिला कोणतही काम जड जाऊ नये ही अपेक्षा. वैशालीच्या डोक्यात सध्या समानता नाचते आहे पण कालांतराने ती सुधारेल.” वसुधाने विवेककडे पाहिलं.

आपल्या घरात आपण जरा डोकावून पाहिले तर घरातील महिला आपली कामे आवरताना मेटाकुटीला येत असलेली दिसेल. तू किती थकतेस ? ही केवळ कोरडी सहानुभूती पुरेशी नाही, तर आपण प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला तर एक घर हसत खेळत होईल. घरातील कामे महिलांचीच असा शिक्का आपण मारला असल्याने आणि वर्षानुवर्षे तोच पायंडा पडल्याने, महिलांना किती काम करावे लागते? याची दखल पुरुष कधीच घेत नाहीत.

कधी जाणूनबुजून तर कधी अजाणतेपणी ज्या चुका आपल्याकडून झाल्यात त्याची जाणीव होणे ही पहिली पायरी आहे.तुम्ही संवेदनशील असाल तर नक्कीच या पायरीवरून पुढेच जाल. फक्त स्वतः चे समाधान शोधत दुखवायचे की तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करायचा हे पाहणे ही प्रत्येकाची स्वतः ची जबाबदारी आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “जाणीव

  1. Krishnakant Railkar

    खुप सुंदर‌
    थोडं व्याकरण दृष्ट्या सुदृढ लिखाण झालं असतं तर आणखी आवडलं असतं.
    पण स्त्रियांच्या काम,काम आणि काम या रगाड्यातून घरातील पुरुषांनी हातभार लावला पाहिजे हि जाणिव खूपच छान आहे. घरोघरी हा विचार पोहोचला पाहिजे.

Comments are closed.