जी लो बेटा

जी लो बेटा

मला मीच विचारलं, काय रे! आहे का तुझ्या जीवनाची हमी
अंर्तमन म्हणालं तुझा विश्वासच डळमळीत, हिच तर मोठी कमी

मी स्वतःशी हसलो, पोलिसांना हवे संरक्षण ते कोर्टात सांगतात
आमचे अनेक नामचित आमदार विधानसभेत संरक्षण मागतात

इथं पोलीस अधिकारीच नव्हे तर चक्क गृहमंत्री वावरतो भीतीत
कोण देणार तुमच्या माझ्या जीवाची हमी? घराच्या चार भिंतीत

विमान प्रवासातही आहे धोका, संरक्षण अधिकाऱ्याचा चुकतो ठोका
रस्ते प्रवास बरा म्हणावं तर बुलेट प्रूफ गाडीतही कधीही उडतो भडका

जल प्रवासाची नसेच हमी, चक्रीवात, वादळ, चाचे, यांची नसे कमी
लाईफ बोट असते सोबत पण ती कुठवर करेल सोबत, सांगावं कुणी?

जिथे राजाची सुरक्षाच धोक्यात आहे असे जाहीर त्याचे सांगतात भाट
आम्हा सामान्य माणसाचे काय? आता कोणीही घेतं कायदा हातात

कोणत्या हत्याराने, अपघाताने वा आजाराने आपण मरु हेच आहे गूढ
इथली परिस्तिथी इतकी भयाण की कोणत्याही शब्दाने बिघडेल मूड

निरुपद्रवी माणूसही कधीही होईल गजाआड सांगणं आहे थोडं अवघड
कोणाविषयी मत व्यक्त करणं हा ही गुन्हा, बोलावं की नाही हे उघड

सांगा कोण देऊ शकत का? उद्या भेटण्याची मित्रांना हमखास हमी
अहो दिवसाचे चोवीस तास त्यात शरीरात कधीही शुगर होते कमी

म्हणून आला क्षण कुटुंब-मित्रांसोबत करावा मस्त हसत, हसत साजरा
खावी भेळ, गावी गाणी, पाहावे नाटक,करावं डिनर, माळावा हसत गजरा

आनंद देणारी कोणतीही गोष्ट कधी उगाचच उद्यावर ढकलू नये
जी लो बेटा, मौज करो, उपवास, तब्येत, पथ्य पाणी याची कारण देऊ नये

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “जी लो बेटा

  1. KESHAV SHIVRAM SAMANT
    KESHAV SHIVRAM SAMANT says:

    Ji lo beta uttam poem. Congrats

  2. Kocharekar mangesh
    Kocharekar mangesh says:

    Thanks sir

Comments are closed.