त्या निसरड्या वाटेवर भाग १

त्या निसरड्या वाटेवर भाग १

त्या दोघांचं भांडण ऐन भरात असतांना दार वाजले, तिने लगबगीने स्वतःचे आवरले आणि ती बेडरूममधून निघून गेली. वॉशरूममध्ये जाऊन तिने तोंड स्वच्छ धुतले आणि ती बाहेर आली. बाहेरील अंदाज घेत दार उघडले. दार उघडल्याचा आवाज आला आणि तो रागावून तिला बोलला, मेधा अग किती उशीर केलास दार उघडायला? मला वॉशरूमला जायचं होतं. तो शुज काढून लगबगीने वॉशरूमला गेला तसा तिने निश्वास सोडला. बेडरूमकडे जात ती हळू आवाजात बोलली, अभय आवर लवकर शेखर आलाय. त्याने आतून होकार भरला तशी ती किचनमध्ये निघून गेली.

शेखर वॉशरूम मधून आला आणि तिच्यावर डाफरला, “अग माझी फजिती झाली असती, तुला झटपट दार उघडायला काय झालंय? काय करत होतीस?” “अरे शेखर, कमाल करतोस तू, मी वॉशरूमला गेली होती, बेल वाजली तशी पटकन आले, तुला घाई होती तर कुठे तरी वाटेत थांबायचं ना?” “अभय कुठे आहे? कॉलेजमध्ये गेला होता ना?” “हो तर, थोड्या वेळापूर्वी आला आणि म्हणाला माझे डोके दुखते, मी थोडा वेळ पडून राहतो, मी म्हणाले ठीक, शेखर आला की उठवते.” तिने शेखरकडे पाहिले त्याला कसलाही संशय आलेला दिसत नव्हता. तिने उसासा सोडला. “आता चहा देणार आहेस,की मी करूनच घेऊ?” शेखर तिच्यावर डाफरला. तिने दहा मिनीटात शेखरला चहा दिला, तसं तो म्हणाला “अभयला बोलवतेस ना चहा घ्यायला?” ती अभयला बोलवायला बेडरूममध्ये गेली तेव्हा अभय उगाचच झोपेच नाटक करून पडून राहिला होता, “अभय, शेखर चहा घ्यायला वाट पाहतोय,आणि हे बघ तुझं डोकं दुखत होत म्हणून तू पडून राहिला होतास अस मी त्याला म्हणाले.” “ओके! तू हो पूढे, मी आलोच.” अस म्हणत, तो उठला. आळस देत तो हॉलमध्ये आला तर शेखर चहा घेत होता, अभयकडे पहात म्हणाला, “काय झालं तुझं डोकं दुखायला? सारखा लॅपटॉपवर रहात असशील. मेधा चहा आणते, गरमागरम चहा घे म्हणजे बरं वाटेल.” अभय फ्रेश होऊन आला आणि त्याच्या बाजूला बसला, “काही नाही रे उगाचच डोकं जड झाल्यासारखं वाटत म्हणून मी पडून होतो.”

मेधा अभयचा आणि स्वतः चा चहा घेऊन आली. काहीच घडलं नसावं अशी ती शेखरच्या बाजूला येऊन बसली. दोन्ही भावात त्याच्या अभ्यासा विषयी गप्पा सुरु झाल्या, अभयवर झालेल्या प्रसंगाचे कुठेच दडपण जाणवत नव्हते. ती मात्र आतून कोसळली होती. जर चुकूनही शेखरला संशय आला तर एक मिनिटात तीन माणसांची आयुष्य मातीमोल होणार होती. अभय MBA करण्यासाठी सांगली वरून आपल्या मोठ्या भावाकडे शेखरकडे राहायला आला होता,रहेजाला त्याचा MBA Finance साठी नंबर लागला होता. अभय दिसायला शेखरपेक्षा स्मार्ट होता आणि मुख्य म्हणजे,मेधाचं लग्न शेखरशी होण्या आधीपासून तो मेधाला ओळखत होता, नव्हे त्यांची औपचारिक मैत्री होती. ते दोघं एकमेकांचे मित्र आहेत याची शेखरलाही कल्पना होती. तो शेखरकडे राहायला आला तरी त्यांनी कधी नको ती सलगी दाखवली नव्हती. पण आज मेधाने जो ड्रेस घातला होता तो इतका भडक आणि तंग होता की त्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही, त्याची नजर सारखी तिच्याकडे जात होती.
त्यांने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न केला पण शरीर बंड करत होते.

तिच्याकडे वेड्यासारखा पाहत तो म्हणाला,”मेधा”. ती चपापली, तिने त्याच्याकडे वळून पाहिलं,”अभय तू मला नावाने हाक मारलीस?” “का काय झालं?नेहमीच तर वहिनी म्हणतो,म्हटले मेधा तर बिघडलं कुठं?” “अभय,तू माझ्याकडे टक लावून का पाहतेस,आज काय झालंय तुला?” “मेधा! मेधा ,आज किती क्युट दिसतेस तू!”
“अभय!तुझं डोकं ठिकाणावर आहे का? माझ्या सौंदर्याची तारीफ करायची गरज नाही. पुन्हा मुर्खा सारखं काही बोलू नको.” “ओ मेधा! तू उगाचच रागावतेस,या पूर्वी मी नावाने हाक मारलेली चालत होती ना? मग आताच हे वेगळं काय?” “मी आता तुझी मैत्रीण नव्हे, तुझ्या भावाची पत्नी, तुझी वहिनी आहे.बोलायच असेल तर नीट बोल.” “बरं नीट बोलतो, तू या ड्रेसमध्ये इतकी सुंदर दिसतेस की खरच तुझं हे सौंदर्य सार्थकी लावायला माझ्या सारखा उमदा मित्रच हवा. प्लिज माझ्या जवळ येऊन बस, मेधा! प्लिज,तुला जवळून पाहू दे, एकदा तुझे हे गुलाबी ओठ चुंबून पाहू दे”.
“अभय! काय बोलतोस तू? तू पिऊन तर आला नाहीस ना? आपल्या वहिनीशी अस वागतात? तुला कळतंय, तू मला काय म्हणालास?” “डार्लिंग मी अजूनही पूर्ण शुद्धीत आहे म्हणूनच मला तुझं सौंदर्य, त्यातील चढउतार कळतात, दादा अरसिक आहे, त्याला तुझ्या सौंदर्याची किंमत नाही.” “हे बघ,तू मुकाट्याने इथून निमुट निघून जा,नाहीतर मला शेजाऱ्यांना बोलवावं लागेल.” “त्याने काय फरक पडेल, बदनामी तर तुझीच होईल, मेधा प्लिज समजून घे, अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. कोणाला काही कळणार नाही.”

तिने आपण आता विवाहित आणि त्याच्या भावाच्या पत्नी आहोत हे सांगूनही त्याच आपलं गोंडा घोळणं सुरू होतं. “मेधा फक्त एकदाच, पुन्हा कधीच नाही म्हणणार,पण आज नाही म्हणू नकोस,तू नाही म्हणालीस तर मी- -” मेधा त्याचा नूर पाहून घाबरली,काय करणार आहेस? सांग काय करणार मी नकार दिला तर?” “मेधा! विषाची परीक्षा पाहू नको, मी तुला बरबाद करू शकतो.मी दादाला सांगेन की आपले या पूर्वी कसे संबंध होते,मग- -“

ती आता चिडली, त्याच्या समोर उभं रहात म्हणाली, “सांग कसे संबंध होते? मी तुला चांगला मित्र समजले, चुकलं का माझं? आणि आता तुला त्या मैत्री बद्दल माझं शरीर हवंय?” तीने त्याच्या समोर जाऊन आपला टॉप काढण्याचा अविर्भाव केला आणि म्हणाली, “काय हवंय तुला? माझं शरीर ना, घे.”, तस तो अधाश्या सारख तिच्याकडे पहात राहिला,आणि तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला बेडवर लोटले. तिने प्रतिकार केला पण त्याच्या पाशवी ताकदीपुढे तिचे काही चालले नाही. तो तिला पुन्हा पुन्हा म्हणतं होता, “मेधा,मेधा my sweet heart, I love you.” म्हणत गोंजारत होता आणि ती त्याच्या माऱ्याने पुरती वेडावली. काय होत होत ते तिलाही कळलं नाही पण ती त्याच्या त्या आक्रमी प्रणयात त्याला विरोध करण्याऐवजी गुंगून गेली. असा हा अनुभव तिला वेगळाच होता.पण आवेग संपला तस ती भानावर आली. फार मोठी चूक घडून गेली होती. ती त्याच्याकडे रागाने पहात म्हणाली, “केलंस ना मला बरबाद? काय मिळवलं? तुला स्वतःच्या भावाची बायको देखील कळली नाही, पशू तरी बरे. शेखरला हे कळालं तर काय होईल माहीत आहे? तू आमच्या संसारात विष कालवून टाकलस, याद राख उद्या तू इथे दिसता कामा नये, ही गोष्ट चुकूनही शेखरला कळली तर तो दिवस तुझा शेवटचा असेल.”

ती मोठया कष्टाने तिथून बाहेर पडली. सर्वस्व लुटलं गेल्याची जाणीव तिला होत होती, तिने स्वतःला धिक्कारलं, आपण तरी त्या मूर्ख माणसा समोर संयमाने वागायला हवं होतं. तिने संतापाने त्याच्याकडे पाहिलं, तो निर्लज्जपणे गालात हसत होता. तिने स्वतः चे कपडे ठीक ठाक केले. बेडरूम बाहेर जाता जाता ती म्हणाली, “अभय,याचा परिणाम खूप वाईट होईल, शेखर येण्याची वेळ झाली.
यदाकदाचित माझ्या जवळून काही बोललं गेलं तर इथे तीन मुडदे पडतील,याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. तुझं तू ठरव.”

शेखर आणि अभय यांच्यात फार तर दोन वर्षांचा फरक होता पण शेखर मुळताच अत्यंत हुशार आणि अभ्यासू असल्याने तो वालचंद इंजिनिअरिंग मधून बीई झाला आणि त्याला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नशिबाने मुंबईत नोकरी मिळाली. शेखरच्या आई बाबांनी त्याची मुंबईत गैरसोय होऊ नये म्हणून नोकरीला वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच गोखल्यांच्या घरी जाऊन मेधाच्या वडिलांकडे मेधाला मागणी घातली, दोन्ही कुटुंब गेले अनेक वर्षे एकाच कॉलॉनीत रहात होती, पटवर्धन आणि गोखले मित्र नसले तरी परिचित होते. शेखरच्या आईला शेखरची चिंता, मुंबईत नात्याचं फार कुणी नव्हते. आज पर्यंत शहराबाहेर कधी इतके दिवस एकटा राहीला नव्हता. काही महिने तो लॉजिंग बोर्डिंग मध्ये राहिला पण तिकडे वातावरण त्याला फारसे नाही आवडले. शेखरला कोणाकडे पेईंग गेस्ट राहायचे नव्हते.

त्याला घरचे जेवण मिळणार नाही त्यामुळे रोज बाहेरचे खाऊन त्याच्या प्रकृतीवर परिणाम होईल असे आईला वाटे. मुंबईत वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही अशी तिची समजूत होती. नवऱ्याच्या मागे लागून तिने गोखल्यांच्या मेधाचे स्थळ ठरवले. मेधा नेहमी जाता येता दिसत असे, तिच्याबाबत नाव ठेवायला जागा नव्हती. गोखले मोठे वकील होते, शहरात नाव होतं. लग्नाची बैठक अशी झालीच नाही. अण्णांनी शेखरला घरी बोलवून घेतल. मुली पाहण्याचा कार्यक्रम झाला. एकमेकांनी पसंती कळवली आणि फारसा काही व्यवहार न होताच लग्न झाले. गोखल्यांनी स्वतःच्या मनाने आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे मुलीला संसारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी दिल्या.

लग्न होऊन मेधा मुबंईकर झाली. मुबंईत जायला मिळत होत म्हणून मेधा आनंदी होती. लिव्ह अँड लायसेन्सवर शेखरला टू बीएचके फ्लॅट मिळाला होता. मुंबईत राहून तिला पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करता येणार होत. मेधा, शेखरच्या परिचयाची होती, स्मार्ट होती स्वभावाने सालस होती. लग्न झाल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. दोन तीन महिन्यात त्यांनी घर सजवले. दर आठवड्यात काही न काही खरेदी होत होती. मुंबईत वेळ कसा जातो तेच कळत नव्हते. ती दोघ फार आनंदात होती. ती मुंबईत येऊन वर्षही झाले नसावे आणि अभय आपल्या शिक्षणासाठी
भावाकडे राहायला आला.

मेधा आणि अभय भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये शिकत होते. जाता येता ते एकमेकांना दिसत. मेधा तशी फ्री मुलगी होती. कधी तरी अभयने तिला कॉलेजसाठी दोन तीन वेळा लिफ्ट दिली होती. एकाच कॉलॉनीत राहतात म्हणून ओळख या पलीकडे मेधाला त्याच्या विषयी काही वाटत नव्हते. अभयला तिच्या बद्दल आकर्षण असलं तरी त्याने स्वतः तिला तस कधी सांगितले नव्हते पण तो शेखरकडे राहायला आला आणि सततच्या सानिध्याने मेधाविषयी त्याला आकर्षण वाटू लागले. तिच्यावर तो कधी एकदम लट्टू झाला ते त्यालाही कळले नाही. आपल्याच वाहिनीकडे अशा नजरेने पाहणे, वाहिनीशी असे संबंध ठेवणे वाईट हे न समजण्या इतका तो लहान किंवा अल्लड नव्हता पण व्हायची गोष्ट होऊन गेली. मेधाच्या आकर्षक बांध्यानी आणि सिल्कच्या तंग ड्रेसने घात केला त्या दिवशी जे घडलं ते विचित्रच. ते सगळं अचानक झालं, तिचा समज होता की तो तिने टॉप काढताना पाहून तिथून निघून जाईल. पण त्यांनी तिला बेडवर ओढलं आणि त्यानंतर जे घडलं ते अकस्मात होत. ती शारीरिक ओढ होती की काय ते तिला समजल नाही. पण ती भानावर आली तेव्हा तिने त्याला लाथ मारत दूर लोटले. बेभान होऊन ती त्याच्यावर ओरडली पण काचेला तडा गेला होता. गेलेली अब्रू भरून येणार नव्हती, मनावर झालेला आघात आणि आपण आता शेखरसाठी लायक नाही ही भावना तिला जाळत होती.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “त्या निसरड्या वाटेवर भाग १

  1. त्या निसरड्या वाटेवर भाग २ - प रि व र्त न

    […] भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा. […]

Comments are closed.