त्या निसरड्या वाटेवर भाग २
दोन दिवस निघून गेले तरी अभय जाण्याचं नाव घेईना तसं ती शेखर नसतांना त्याला म्हणाली, “भावाने पुढील शिक्षणासाठी आसरा दिला आणि तू त्याच्या बायकोवरच… लाज वाटते तुझी आणि माझीही आता लवकर आमच्या आयुष्यातून चालता हो.” तो काहीच घडलं नसावं तसं तिच्याकडे पहात बसून होता. त्याचं तसं वागणं तिचा संताप वाढवत होतं.
“अभय तुझं आणि माझं नात काय ते तुला समजतंय ना? आपल्या सख्ख्या भावाच्या बायकोवर तू डोळा ठेवतोस, तिच्याशी व्यभिचार करतोस. शेखरला हे समजलं तर एक मिनिटही तुला घरात ठेवणार नाही, या पुढे या घरात तुला थारा नाही, तुझी सोय तू दुसरीकडे कर.” तो तिच्याकडे पहात सराईतपणे हसला, “व्यभिचार! कोणी केला? मेधा तू या व्यभिचारात सहभागी होतीस, एका हाताने टाळी वाजत नाही. तेव्हा मला शहाणपण शिकवू नको. तुला आता परतीचा मार्ग नाही, शेखरला काही आद्यप कळलेलं नाही, त्याची गुप्तता पाळणे तुझ्या हाती आहे.”
“मेधा, तूझ माझं नातं जस आहे तस राहू दे, मी काही शेखरला सांगणार नाही, तू तुझं तोंड गप्प ठेव ह्यात दोघाचं हित आहे. कळतंय ना तुला!” ती प्रचंड रागावली,”अभय, तुझ्या वासनांध नजरेची मी शिकार झाले. तू मला नको ती गोष्ट करायला भाग पाडले, मला ओरबाडून मोकळा झालास, माझ्या नकळत गोष्ट घडून गेली आणि आता तूच मला ब्लॅक मेल करतोस, तू नको त्याच भांडवल करू नको, मी, तू समजतो तशी मुलगी नाही, माझ्या आयुष्याशी खेळू नको.”
“मेधा तुला लवकर शहाणपण आलं, नाही का? पण मग दोन दिवसांपूर्वी बेडरूममध्ये केलास तो रोमान्स आठव, त्यात तुझा सहभाग नव्हता का? मीच तुझ्यावर बळजबरी केली अस तुला म्हणायचं आहे का?” “होय तूच बळजबरी केलीस, माझं वाटोळं केलंस,तूच मला ओढून बिछान्यावर.. ती जोर जोराने रडू लागली,तो मात्र निर्लज्जपणे तिच्याकडे एकटक पहात होता.
तिच्या जवळ असणारा फ्लॉवरपॉट तिने त्याच्याकडे भिरकावला. त्याने तो झलकला, “अभय,get lost, please Stop it. काय पाहतोस? जे घडलं तो अपघात होता, तुझ्या नजरेच्या सैतानाने केलेलं आवाहन, पण घडलं ते चुकीचं, मी शेखरला फसऊ शकत नाही, अभय तू इथून चालता हो, माझ्या नजरेसमोर थांबू नको. एक मिनिटही आता थांबू नको. मी काय करीन ते सांगता येणार नाही”
“काय करशील? तू किती ताकदीची आहे त्याचा अनुभव मी घेतला आहे, मला पुन्हा आव्हान देऊ नको.” “तू म्हणतेस तर मी जातो,पण मग दादाला काय सांगशील, मी तडकाफडकी का गेलो ते तुला विचारलेच, तेव्हा काय करशील? आणि त्याला कळालं की तुझ्यात आणि माझ्यात तसे संबंध होते तर?”
“काय सांगायचे ते मी पाहीन, पण तुझं राहणं मी आता सहन करू शकत नाही. तुझ्याजवळ पाहिलं की मला माझीच घृणा येते, वेळ आली तर मी माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करू शकते. तेव्हा जे काही घडलं ते विसरून जा आणि इथे राहू नको.” तिच्या या अग्रेसिव्ह वागण्याने अभय बिथरला, चार दिवसांपूर्वी आपल्या
बरोबर मनापासून सोबत करणारी, उत्तेजित होणारी ती हीच की कोणी दुसरी. जर खरंच तिने जीवाचं काही बरवाईट केलं तर त्याचा दोष नक्की आपल्यावर येईल आणि दोन माणसंच आयुष्य बरबाद होईल त्यापेक्षा आपणच इथून जावं पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मेधा हाती आली तर! पण शेखरने विचारलं दुसरीकडे का जातोस तर काय सांगायचं? काही तरी कारण हवंच ना? त्याच्या मनात आलं, इथे नीट अभ्यास होत नाही. होस्टेलवर गेलो तर मित्र आणि मी एकत्र अभ्यास करू अस सांगायला हरकत नाही. मनाशी त्यांनी विचार करून ठेवला. दोन दिवस निघून गेले अभय हॉल मध्ये टीव्ही पहात बसला होता, मेधा त्याच्या बाजूला येऊन बसली, “अभय तू अजूनही शेखरला जाण्या विषयी सांगितले नाहीस. जर तू सांगितले नाही तर नाईलाजने मला उद्या घडला प्रकार शेखरला सांगावा लागेल, I can’t tolerate you henceforth, get lost from my life. त्याने तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहिले पण ती आता निर्णयाला पोचली होती.
Yes I will leave your house, but you will always feel ashamed that you don’t have a true soul. You have shared my bed .
ती रागाने उठली आणि तिने त्याचे बखोटे धरून त्याला अचानक दूर लोटले. तिचा पवित्रा पाहून तो दार उघडून निघून गेला.
शेखर येण्याच्या वेळेस तो आला. घडलेल्या गोष्टीला एक आठवडा होऊन गेला, शेखरला काही कळले असण्याची शक्यता नव्हती. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कुठेही संशय येण्याची, दिसण्याची शक्यता नव्हती. एक दिवस अभयने रात्री जेवताना शेखरला सांगितले, “शेखर मी उद्या पासून होस्टेलवर राहायला जातो आहे,तिथे इतर मित्र आहेत, मला group discussion ला बर पडेल.” “अरे होस्टेलवर गेलास तर तुझी गैरसोय होईल, इथे तुझी वहिनी तुला हवं नको सगळं देते, तिथे कोण देणार तुला? खर ना?” “No problem. I’ll manage it, तिथे मेस आहे,जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही. इथून येण्या जाण्याचा वेळ वाचेल.”
“पण अस अचानक का चालला आहेस? मेधाच आणि तुझं काही झालं का? म्हणजे मेधा तुला काही म्हणाली का? “शेखरने त्याच्याकडे पाहत विचारले. “नाही,वहिनी नाही काही म्हणाली, पण मलाच वाटतंय की इथे येण्याजाण्यातला वेळ वाचला तर बरं होईल आणि group discussion करता येईल,म्हणून मग–””खर सांगतोस ना?तू चालला आहेस यावर माझा विश्वास बसत नाही,
आई नक्की विचारेल, काही भांडणं झालीत का म्हणून,काय उत्तर देऊ?” “दादा, तू उगाच मनात काही आणू नको, जे काही सांगायचे ते मी सांगेन.” “मेधा ऐकतेस ना?तूच सांगून बघ, तुझं ऐकेल तो. नाहीतर उद्या दोष सुनेवर यायचा.”
“अरे! तो म्हणतो ते बरोबर आहे,पार्टनर बरोबर एकत्र स्टडी केला तर त्याला जास्त फायदा होईल, त्याला हवं तेव्हा तो इथे येऊ शकतो.” “म्हणजे तो जाणार हे तुला माहीत आहे, पण मग तू मला बोलली नाहीस!” “अरे आजच तो म्हणाला, इथून कॉलेजमध्ये जा ये करण्यापेक्षा तिथेच राहिला तर वेळ वाचेल. त्याला तिथे राहून फायदा होणार असेल तर..” “होय दादा, मला वाटतं, exam जवळ येत आहे तदपूर्वी थोडं ब्रश अप झालं तर मला त्याचा फायदाच होईल.” “आता तू म्हणतोच आहेस तर ठीक आहे, पण खर्चाच कसं करणार? मी काही तुला मदत करू शकणार नाही, अण्णांशी बोलला आहेस का? ते काही म्हणालेत का?” “नाही बोललो,पण बोलणार आहे,आणि कॉलेज जवळ एक फर्म मध्ये
पार्ट टाईम जॉब बद्दल बोलणं झालं आहे.” “अच्छा म्हणजे हे तुझ दोन दिवसातल प्लँनींग नाही, तर वेल डिसायडेड आहे , बघ हो! नाहीतर आई, अण्णा म्हणतील भावाने घरातून बाहेर काढला.” “नाही अण्णांना मी सांगेन, आणि मला तिथे uncomfortable वाटलं तर परत येईनही.”
दुसऱ्या दिवशी शेखर असतांनाच त्यांनी पॅकिंग केलं, दोन बॅग आणि दोन सॅक एवढं सामान झालं. शेखरने ओला बुक केली आणि अभय मेधाच्या पाया पडायला गेला, तस ती बाजू झाली, ते पाहून शेखर म्हणाला, “अग !, तो स्वतंत्र होतोय, वहिनी आहेस त्याची त्याला blessings दे. उद्या पासून तो स्वतःच स्वतः पाहणार आहे, पण वेळेत उठशील ना? इथे वहिनी होती चार वेळा हाक मारायला, तिथे मित्र आपल्या कामात असतील. काळजी घे”
मेधा त्यावर काही म्हणाली नाही. शेखरने त्याच्या हाती पैसे ठेवले, “हे ठेव तुझ्याकडे असू दे वेळेला उपयोगी पडतील. आणि हो! रोज फोन करून कळवत जा. म्हणजे आम्हाला काळजी नाही.” शेखरने त्याच्या बॅग “ओलात” ठेवल्या, त्याने शेखरचा हात हाती घेत दाबला, “दादा काही चुकलं असेल किंवा वहिनीला चुकून बोललो असेल तर माफ कर.”
दोघांनी बाय केल तस गाडी हलली, दोघ फ्लॅटमध्ये आले. शेखरला अजूनही कळत नव्हतं की हे अस अचानक दुसरीकडे रहायला जायच खुळ त्याच्या डोक्यात कुठून आलं? त्या दिवशी शेखरने सुट्टी घेतली. आज दोघच घरी होती, शेखरने मेधासाठी मस्त प्लॅन बनवला, तो मेधाला म्हणाला, “मेधा आज मस्त मुड आहे, दिवसभर बाहेर फिरू, तुला हवं तर शाँपींग कर ,बाहेरच लंच घेऊ आणि संध्याकाळीच घरी येऊ.” मेधा म्हणाली, “अरे अस अचानक प्लॅनींग करायला तुझ काय जात, मला सगळ आवरायला किती वेळ लागेल कल्पना आहे का?” तो तिला,जवळ ओढत म्हणाला, “ठरलं म्हणजे ठरलं, मी तुला आवरायला मदत करतो मग तर झालं, चल तू किचन पहा,मी हॉल आवरतो.”
ती हसली, आणि किचनमध्ये गेली. किचनमधले आवरून ती बेडरूम आवरायला गेली आणि तिचे मन पुन्हा नको त्या आठवणीत गेले. घडल्या प्रसंगाला चार सहा दिवस झाले होते, उद्या या गडबडीत गर्भ राहिला तर? शेखरने आणि त्यांनी प्लँनींग केले होते, किमान पुढील तीन वर्षे मूल नको असे ठरले होते आणि आता अचानक असे झाले तर शेखरला काय सांगायचे हा प्रश्न होताच. यातून सुटका करून घेण्यासाठी मार्ग शोधणे भाग होते. एकतर डॉक्टर गाठावा लागणार होता किंवा एखाद्या साईट वर काही उपाय मिळतो का शोधावे लागणार होते. तिने तो विचार झटकण्याचा खूप प्रयत्न केला पण मन पुन्हा पुन्हा त्याच शंकेने विचलीत होत होत होत. शेखर हॉल आवरून बेडरूममध्ये आला तेव्हा ती विचारातच होती, शेखरने तिला पाठून धरले, तस ती दचकली,”अभय काय काय करतोस? सोड मला, सोड म्हणते ना! अस म्हणून तिने त्याला लोटण्याचा प्रयत्न केला.” आणि अचानक ती वळली तेव्हा तिच्या आपली चूक लक्षात आली, तीला शेखरने पाठमोरी धरले होते.अभय तर केव्हाच निघून गेला होता. तिच्या बोलण्याने घात झाला होता. शेखर तिच्या या बडबडण्याने गोंधळला, “मेधा,थोड्या वेळा पूर्वी काय म्हणालीस तू?”
“कुठे काय? काहीच तर नाही.” मेधा बोलतांनाही गडबडत होती. “मेधा,आता मी येऊन तुला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू, “अभय मला सोड,सोड.”अस म्हणालीस, मला पाठी ढकलून टाकलस. मेधा, मला अगदी खरं खरं सांग, काय झालं? अभयने काही केल का ?”
ती ओक्साबोक्शी रडू लागली.मनावर ताण असल्याने चूक घडून गेली होती. आता लपवून ठेवणे शक्य नव्हते,तसेही ते गुपित बाळगून त्याच्या समोर जगणे अवघड होते. त्याने तिला जवळ बसवत प्रेमाने पाठीवरून हात फिरवला,जवळ घेऊन तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला, “मेधा,जे असेल ते खरं खरं सांग. काय झाल? तुझ्यावर अभयने..” त्याला ते बोलतानाही कसेतरी वाटू लागले. मेधा मांडीत डोके खुपसून रडू लागली, “शेखर, मी बरबाद झाले, अभयने, अभयने…” बोलता बोलता तीची शुध्द हरपली.
शेखर गोंधळला, क्षणभर काय करावे त्याला सूचेना. त्याने तिच्या तोंडावर पाणी मारले. तीचे डोके जवळ घेऊन डोळे उघडून पाहीले. तिच्या छातीला बाम चोळला. तो स्वतः रडकुंडीला आला. चार पाच मिनिटांत ती शुध्दीवर आली. पून्हा रडू लागली. तस तो तीची समजूत काढत म्हणाला. “मेधा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी तुला रागावणार नाही, तुला सांगायचे नसेल तर नको सांगू. मी तुला चहा ठेवतो तो घे आणि थोडा वेळ पडून रहा. “तो उठून चहा करायला जाणार तर तीने त्याला घट्ट धरले. “शेखर प्लीज तू मला सोडून जाऊ नको,प्लीज नको ना जाऊ, तीने स्वतः ला सावरत घडलेली सगळी हकीकत सांगीतली. तो तिला धीर देत म्हणाला, “मेधा तू त्याच्या समोर तशी जाऊन चूक केलीस वयात आलेल जनावर आणि पुरूष दोन्ही सारखे,त्यांना नात कळत नाही. यात तू त्याच्या समोर तशी गेलीस ही चूकच झाली, अस मला वाटत .”
“शेखर तो अस काही करेल असं मला वाटलं नव्हतं, मला वाटलं तो निमूट निघून जाईल पण तसं काही नाही घडलं. मी तुझ्यासाठी आता शुद्ध राहीले नाही, मला जगण्याचा काही अधिकार नाही, मला विष घालून मारून टाक. नाहीतर अस कर, किचनमध्ये नेऊन मला पेटवून टाक.मला आता जगावस वाटत नाही.” ती वाटेल तसे बडबडत होती, रागाने स्वतःचे केस ओढत होती, स्वतःच संतुलन हरवल्या प्रमाणे वागत होती. त्याने तीला जवळ घेऊन थोपटले,मेधा, झाला प्रकार अतिशय वाईट आहे पण तू जीव देऊन यातून मार्ग निघेल का? हे बघ जे काही घडल ते फक्त तुझ्या माझ्यात. आईअण्णांना यातल काही सांगायच नाही, तुझ्या आई आणि नानांना यातल कळता कामा नाही. तू माझ्यासाठी तीच मेधा आहेस, तितकीच शुद्ध. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या हरामखोर सापाच काय करायच ते मी पाहून घेईन. लहानपणापासून त्याचे खूप लाड झाले, त्याला MBA मुबंई मधून करायचं होतं म्हणून अण्णांनी सात लाख फी भरली. चांगलं पांग फेडल भावाचं. तू उगाच मनात वाईट विचार आणू नकोस” ती हमसून हमसून रडत होती, “शेखर, तुझ्या हातुन काही विपरीत घडल तर मी जगून काय उपयोग,त्या पेक्षा मीच मेलेली बरी” “मेधा उगाच वाट्टेल ते बोलू नको. मला काय करायचं ते मी शांतपणे करणार आहे, कुठेही न जाता. मेधा, माझ्या निष्पाप बायकोवर अत्याचार करणारा, भाऊ असला म्हणून काय झालं, तो गुन्हेगार आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे.”
शेखरने काय ठरवल होत आणि काय झालं? मनाचा नुसता संताप होत होता, आत्ता जाऊन अभयला धडा शिकवावा अस सारख त्याच्या मनात येत होत. तीची कशीबशी समजूत काढून त्याने तिला तयार केलं, या वातावरणातून
थोडावेळ दूर जाण गरजेच होत, ते निघणार इतक्यात शेखरला अभयचा पोचल्याचा फोन आला. त्याने फारशी चौकशी न करताच फोन कट केला. थोड्या वेळाने त्याचा पून्हा फोन आला. त्याने काही न बोलता उचलून कानाला लावला. मेधाच्या अंगावर भितीने काटा येत होता,आता नक्की काय घडणार? हा विचार करून डोक फुटत होतं.
शेखरने मोबाईल स्विच ऑफ केला. तिची समजूत घालून तिला तयार व्हायला सांगितलं, त्याच्या मनातही भीती दाटून होती, रागाच्या भरात तिने जीवाचं बर वाईट केलं तर तो काय करणार? तिच्या प्रत्येक हालचालीवर तो लक्ष ठेऊन होता. ती बाथरूममधून बाहेर आली आणि त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्याने अवघ्या पाच मिनिटांत स्वतःची तयारी केली.
ते घराबाहेर पडले, चालत राहिले,दोन तीन रस्ते ओलांडून गेल्यावर एक maternity hospital दिसल्यावर दोघ थांबले, बाहेर बोर्ड होता त्यावर Mrs. Trivedi, Gynecologist नाव होते. Lady doctor होत्या.
शेखरने, receptionist कडे चौकशी केली, मॅडम उपलब्ध होत्या. दोघ भेटले,त्यांनी आम्हाला ही प्रेग्नन्सी नको आहे,काय करावे लागेल विचारले,मॅडमनी तिची तपासणी केली,आद्यपी टेस्ट काही रिझल्ट दाखवत नव्हती,त्या म्हणाल्या, “Mrs. patwardhan तुम्ही पुढच्या आठवड्यात या आपण गर्भ पिशवी साफ करू, तुमचे मिस्टर सोबत नाही आले तरी हरकत नाही.” दोघ डॉक्टर त्रिवेदी कडून बाहेर पडली.मेधाला टेन्शन आलं होतं,
“पुढच्या आठवड्यात,बापरे! शेखर मला त्या बाईंची सारखी भीती वाटत होती, काही उलट सुलट विचारलं तर.”
“अग उलट सुलट विचारण्याचा प्रश्न येतो कुठे? मी सोबत आहे ना! मेधा, या डॉक्टर लोकांना पैश्याशी मतलब, त्यातून तू काही गर्भ चाचणी करून घेत नाहीस, त्यांना कांय करायचं आहे ,तुला मूल हवं की नको त्याच्याशी?” “अरे ! पण गर्भपाताला बंदी घालण्यात आली असतांना त्या अस करू शकतात?” “Madam, पैसे टाकले की सगळं मॅनेज होत. don’t worry.” आता त्या म्हणल्यात ना,पुढच्या आठवड्यात या म्हणून, उगाच काळजी करू नको.”
ते तिथून बाहेर पडले, काय करायचं? कुठे जायचं काहीच निश्चित नव्हतं, फिरताना PVR ला टाईम पास-३ चा बोर्ड पहिला,अजून शो सुरू व्हायला अर्धा तास होता,त्याने तिकीट काढले आणि शेजारच्या रेस्टॉरंट मध्ये नाश्ता केला. मेधा थोडी सावरली होती. शेखरने मोबाईल सुरू केला
त्याला अनेक मेसेजेस येऊन गेले होते. अभयचे कॉल पण होते. त्याने पुन्हा मोबाईल स्विच ऑफ केला. मेधाने विचारले, “कोणाचे मेसेज होते? तू ऑफिसमध्ये कळवलं आहेस ना?” तो तिच्याकडे पहात म्हणाला,”एक दिवस नाही कळवलं म्हणून काही होत नाही, मेसेजच करतो तब्येत ठीक नाही म्हणून ,चल शो सुरू होईल.” ते थेटरमध्ये गेले,बऱ्यापैकी क्रावूड होता. picture सुरू झाला, Time Pass ची या पूर्वीची स्टोरी माहीत होती,पण त्याचा पार्ट दोन दोघांनी पहिला नव्हता. पिक्चर धमाल होता. interval ला दोघांनी कॉफी घेतली. घरी परततांना ती सावरली होती, त्याने तिची वाटेत समजूत घातली, “मेधा आता उगाच पुन्हा पुन्हा तो विषय काढायचा नाही,आईचा किंवा कुणाचा फोन आला तर भावनेच्या भरात काही सांगून मोकळं होशील तर तुलाच त्रास होईल. ते घरी पोचले, त्याला अभयला जाब विचारायचा होता, नव्हे अद्दल घडवायची होती,पण मेधा समोर कोणताही विषय न काढता गुपचूप हे काम करायचं होतं. घरात तिला एकटीला राहू देणं धोक्याचं वाटत होतं.
अभयचा फोन आला आणि रागाच्या भरात काही करून बसली तर! या विचारानेच त्याच डोकं ठणकत होत. मेधा स्वतःच आवरायला गेली तसे त्यांनी मोबाईल सुरू करून मेसेज वाचून डिलीट केले. अभयचे तीन चार कॉल आणि पाच मेसेज आले होते. अभय बरोबर बोलावं की नाही हेच ठरवता येत नव्हतं. अभय होस्टेलवर ज्या मित्राकडे राहणार होता त्याच नाव, मोबाईल नंबर काही काहीच माहिती नव्हतं. मेधा स्वतःच आटोपून बाहेर येण्यापूर्वी त्याला अभय संबंधी निर्णय घ्यायचा होता.
क्रमशः.
[…] भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. […]