दिवस हरवले ते सुखाचे

दिवस हरवले ते सुखाचे

काल दुपारी काही काम नव्हत म्हणुन जुने अल्बम पाहण्याची लहर आली.एकोणिससे नव्वदपर्यंत  मोबाईल नव्हते आणि स्वत:चा कॅमेराही नव्हता पण उत्साह अमाप होता. चार जणांना विचारलं की एखाद्या सद्ग्रहस्ताचा कॅमेरा मिळायचा आणि त्याच्या अनेक सूचना ऐकुन घ्याव्या लागायच्या , कॅमेरा सामानात ठेऊ नको, लहान मुलांच्या हातात देऊ नको,बॅटरी वेळेवर बदल,फ्लॅप उघडा ठेऊ नको.

 मुलं लहान असतांना त्यांना गावी जायचा प्रचंड उत्साह असायचा.आणि मला वेध लागायचे हिरव्या गर्द रानाचे फोटो घेण्याचे. आंब्यावरचा मोहर आणि त्यांच्यावर रूंजी घालणारी फुलपाखरं आणि मधमाश्या टिपण्यात मला मजा यायची.

फणसाने खोडापासुन ,शेड्यापर्यंत डवरलेल झाड, जांभळाच्या भाराने वाकलेली आणि झुकलेली जांभळ आणि लालसर गुलाबी रंगावर आलेले आंबे माझ्या कॅमे-यात बंदिस्त व्हायचे . केळीचा घड आणि त्या प्पिक्या केळीशी झटणारी खार मला शांत बसू देत नव्हती यातून शिल्लक राहिले तर चार फोटो गावातील भाऊ ,वहीनी आणि म्हैस, मांजर ,कुत्रा यांचे. माझं वेडच वेगळं होत. निसर्ग ,हिरव्या वेली , रान-फुले, पाखरं हेच मला फोटोत भावायचे.ते मनसोक्त फोटो मला गावी घेता यायचे. गणपतीत,  आमच्या घरापाठचा बंधारा तुडुंब भरलेला असायचा ,त्यांच्या पाण्यात ओथंबुन आलेल्या ढगांची प्रतिबिंब दिसायची, हिरव्या गार झाडांच्या सावल्या त्यात नाचायच्या खुप मजा यायची .मी पाण्यातली प्रतिबिंब कॅमेरात टिपायचो.

मुंबंईला जाऊन कधी एकदा रोल डेव्हलप करून फोटो पाहतो असं व्हायचं.आता हवे तेवढे फोटो मोबाईलने घेऊ शकतो.  नको तर डिलीट करा.कॅमेरा लेन्स अॅडजेस्ट करायची झंझटच नाही.जास्त पिक्सलचा कॅमेरा, चांगला फोटो.काही काही श्रम नाही. लेन्स अॅडजेस्ट करणं नाही.अन रोल टाकण नाही.

पण पंचविस वर्षापुर्वी या सर्व गंमतीमुळे माझ्या मुलांइतकच मलाही गावी जाण  प्रचंड आवडायच.गावी जाण्याचे वेध दिड महिना अगोदरच लागायचे आणि एस.टी. च बुकींग करण्यासाठी रात्रभर जागुन काढावी लागायची कधी कधी दोन दिवस डेपोत घालवल्यावर तिकीट मिळायच आणि एखादा गड जींकल्याचा आनंद व्हायचा  मलाही आणि कुटूंबालाही.

फारशा अपेक्षाच नव्हत्या.मिळेल तेवढ्यावर सुख मानण्याची वृत्ती होती.एस.टी.ची रातराणी श्रीरामवाडी-पेण येथे पहिला थांबा घ्यायची आणि कंडक्टर ओरडुन सांगायचा गाडी दहा मिनीटे थांबेल.एस.टी. बाहेर पडण्यासाठी झुंबड व्हायची ,कोणाला हातपाय मोकळे करायचे असतं, कोणाला फ्रेश व्हावंसं वाटे कुणाला अजुन काही.कंडक्टर आला की घंटी बडवायला सुरुवात करी आणि प्रवाशी असतील तसे पळत पळत एस.टी. गाठत.तरीही कंडक्टर नेहमिच्या सरावाने सांगे आपण आपले शेजारी आले का बघुन घ्या. शेवटच्या सिटवर एखादा पॅसेंजर आलेला नसे आणि मग एस.टी.सुटायला उशिर झाला की सारे तोंडसुख घेत.

 आता पर्यंत सामान ठेवण्यावरुन झालेली भांडणे,सिट वरून झालेलं तू तू मे मे सारं संपलेल असे.आणि गाडीत एकमेकांच्या ओळखीचा कार्यक्रम सुरू होई. वातावरण घरगुती बने.

गप्पा टप्पा रंगात येत , नाती निघत आणि इंदापुरला कॅंटिनमध्ये डबा एकत्र खाण्यापर्यंत संबंध घरगुती बनत.

१९९२ला कोकण रेल्वे आली आणि क्रांती झाली.पन्नास एस.टी. मध्ये मावतील एवढे प्रवासी एका गाडीने प्रवास करते झाले. लोकांमधील अंतर वाढलं. आधी एस.टी.च तिकीट काढायला महिनाभर अगोदर पळालं लागायचं ,आता दोन -तीन महिने अगोदर रेल्वेच्या बुकिंग आॅफीस जवळ रात्री पहारा देत बसावं लागे.

पण मुलांना रेल्वे-गाडीतून  एवढा दुरचा प्रवास करायला मिळणार याचा आनंदच मोठा होता.पळणारी झाडे, वाहत्या नद्या आणि हिरव्यागार डोंगराच्या रांगा पहाता ,पहाता मुलं झोपी जात.मे महिन्यात गावी आंबे ,चिंचा, बोरे, जांभळं, काजू,करवंद असा न संपणारा रानमेवा जोडीला फणसाचे कापे

रसाळ फणस अशी धम्माल असे.शिवाय कुळवाड्यांनी दिलेलं चिनं,  खेकडे कधीतरी डुकराचे मटण ही मेजवानी असेच.

गणपती सणाची तयारी एक महीना आधी गावी आणि शहरात दोन्ही ठिकाणी चाले. गावी दिड हात रुंदिच्या मातीच्या भिंती शेण,राख, लाल माती आणि जुन्या शेलमधील मसाला यांनी सावरली जाई .त्याला मसा  काढणे म्हणत. शहरातली माणसं गावी न्यायच्या वस्तूंची खरेदी महीनाभर करत. हाती पैसे असतील तसे एक एक वस्तु जवळ करून ठेवत. गावी न्यायच्या सामानात सजावटिच्या सामानात पासुन ते शेजारी भेट द्यायच्या वस्तूपर्यंत सगळं असे.आणि गावी जायच्या दिवशी दोन तीन बॅगा, दोन-चार थैल्या यांच्यासह डेपो गाठला की हायस वाटे. कोकण रेल्वे आली आणि सगळं कसं सौप्प करून गेली.तस खरेदीचही झालं , आता फारसं  कुणी मुंबंईहुन खरेदी करून गावी नेत नाही. शहरातल्या सगळ्या वस्तू गावातल्या बाजारात मिळू लागल्याने प्रवासही सौप्पा झाला. कधीतरी सणा वाराला जाणारे चाकरमानी कारण काढून गावी जाऊ लागलेत. गावच्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलाय आणि एकमेकांशी संवादही सौप्पा झाला.गावातही आता गॅसची शेगडी ,कुकर, फ्रिज, मिक्सर सगळंच आहे.

सगळ्यांच्या हाती मोबाईल म्हणून अप्रुपही कमीच आहे.फरक पडलाय तो , परसात आता पहिल्यासारखी अळी कुणि घालत नाही.म्हणे पाऊस काही ठेवत नाही.म्हणुनच दारात काकड्या , चिबुड  अभावान दिसतात.केळीच्या भाराने वाकलेल्या केळी चार दोन घरीच दिसतात.चुल पेटवल्यावर दुरवर येणारा गोवरीचा वास आता जाणवत नाही.सुरकुतल्या हातानं जवळ घेऊन मुका घेणारी आजी आता हयात नाही. गणपतीची आरास करायला कांगल, शिफ्ट,हरणं ,पहायला कुणि रानात जात नाही.थर्माकॅलच्या रेडिमेड चमकदार मखरात गणपती आसनस्थ होतो.पूजा सांगायला वेळ नसल्यान, मोबाईल वरच्या  अॅपवर पूजा उरकली जाते .हेल काढुनी भजनी चालीवर आरती म्हणण्यासाठी कुणाजवळ फारसा वेळ नाही.शेवया, घावणे, आंबोळ्या ,सांजो-या याची कुणास गोडी नाही. गावाने आता काय टाकली आहे.बर्गर, पिझ्झा, चायनिज आणि मंचुरियन गावची तरूणाई खात आहे.मागे कुणाला रहायचं नाही गावही आधुनेकतेच्या प्रवाहात वाहात आहे.भातशेती उघडी नागडी खंतावुन झिजत आहे. कोकणचे कॅलीफोर्निया गावातल्या मनात उतरत आहे.

मी आजही गावी जातो ,गाणारे पक्षी पाहतो, वाहणारे ओढे आपहातो, थकलेले नाना पाहतो  पण तरुणांत मला कोकणी माणुस शोधुन सापडत नाही आधुनिक बनण्याची आम्ही अतीच केली घाई.केशरी कार्ड धारकांना शंभर रुपयांत अन्नाची हमी दिली खरी पण खेड्यातल्या माणसाला या अन्न हमीने आळशी करून टाकले. त्याला आता शेतीत राबावस वाटत नाही.रोज काम करावं असं वाटतं नाही.गावी शेतीच आणि वरकड काम करायला कोणी तयार नाही.नेपाळी आणि बिहारी यांची मदत घेतल्याशिवाय काम उरकत नाहीत..मला वाईट वाटतंय की कोकणात कोकणी कष्टकरी शेतकरी  राहणार की शहरातल्या ओढीन आठ दहा हजारांची नोकरी करण्यासाठी गावालाच रामराम म्हणणार हाच कळीचा प्रश्न आहे.मातीच्या जाड भिंतींची घर पाडुन आम्ही बंगले बांधले.बंगल्यासमोर मोटरसायकल,फोर व्हिलर दिमाखात ऊभी आहे, मात्र रातांब्याच्या झाडाखाली पडणारा सडा आवरायला, आणि काजी जमा करण्यासाठी शिरड वर करायला आम्हाला सवडच नाही. हातात पडणा-या वेतन आयोगाच्या नोटांनी आम्हाला एवढं वेड केलं आहे की घरातल्या वृध्द आजीची सेवा करायला आम्हाला वेळ नाही .तीची देखभाल वृध्दाश्रम करतो आणि तीची नातवंडं सवड झाली तर तीला भेटायला जातात. समृध्दिच्या वेड्या खुळात आमचं सुख ओंजळीतुन निसटुन गेलं आम्ही फारच सधन झालो,  पण समाधानी झालो का ? शांत आणि चिंता मुक्त झालो का? “सुख पाहता जवा एवढे दु:ख पर्वता एवढे” असं घोकत बसण्यापेक्षा उगाच मृडजळामागे धावण्यापेक्षा समाधान पायरीवर थोडं थांबा आणि जाणिवेतुन नेणिवेकडे जा तरच जगण्याचा अर्थ गवसेल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

18 thoughts on “दिवस हरवले ते सुखाचे

  1. Xiomara

    Hey would you mind stating which blog platform you’re working with?

    I’m planning to start my own blog soon but I’m having a hard time deciding between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.
    The reason I ask is because your layout seems different then most
    blogs and I’m looking for something completely unique.
    P.S Apologies for getting off-topic but I had to ask!

  2. Gretta

    Hi! Do you know if they make any plugins to safeguard against hackers?
    I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any tips?

  3. Alexandria

    Hey! I could have sworn I’ve been to this site before but after
    reading through some of the post I realized it’s new to me.
    Anyhow, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking and checking back often!

  4. Aurelia

    Excellent weblog right here! Additionally your
    site lots up very fast! What web host are you using?
    Can I am getting your affiliate hyperlink on your host? I wish my web site
    loaded up as quickly as yours lol

  5. Asa

    Thank you for the auspicious writeup. It in fact was a
    amusement account it. Look advanced to more added agreeable from you!
    However, how could we communicate?

  6. https://www.pfdbookmark.win/

    Greetings fгom Caгolina! I’m bored at work so I decided too
    check out your site on my iphone duгing luncһ breɑk.

    I enjoy the іnfo yoou ρrovide here and can’t wait to take a ⅼook whеn I gеt home.
    I’m amazed at how fast your blog loaded on my phone ..
    I’m not even uskng WIFI, just 3G .. Αnyhow, amazing blog!

  7. Normand

    Hi! I simply wish to offer you a huge thumbs up for your excellent info you have right here on this post.
    I’ll be returning to your web site for more soon.

  8. Thurman

    I take pleasure in, cause I discovered just what I used to be having
    a look for. You have ended my four day long hunt! God
    Bless you man. Have a nice day. Bye

  9. vintage band t-shirts

    Hellо, I log on to your blogs like every week. Your humoristic style iis awesome, keеp up the good work!

  10. Stephaine

    Hi there! Do you use Twitter? I’d like to follow you if
    that would be ok. I’m definitely enjoying your blog and look forward
    to new updates.

  11. http://mylekis.wip.lt/redirect.php?url=https://milkyway.cs.rpi.edu/milkyway/show_user.php?userid=1595535

    My fаmily members alwqyѕ sayy that I amm killing my time hesre at net, however I
    know I am gettiung know-hоw all the time by reading thes fastіdiouus articles.

  12. id pro pkv games

    Heya i amm for the primary time here. I found this board
    and I find It really helpful & it helped me outt a lot.

    I am hoping to present something back and aid otherѕ such as
    you аided mе.

  13. Mitchell

    I appreciate, result in I found exactly what I was looking for.
    You’ve ended my four day lengthy hunt! God Bless you man. Have a nice day.
    Bye

  14. bet lines

    magnificent post, very informative. I wonder why the opposite experts
    of this sector don’t understand this. You should continue
    your writing. I’m sure, you’ve a great readers’ base already!

  15. minecraft prison servers

    I just couldn’t depart your web ite before suggesting that
    I really enjoyed the standard info a person provide for your
    visitors? Is gonna be back often to check up on new posts

  16. Sherman

    Greetings from Los angeles! I’m bored to death at work so I decided to browse your
    blog on my iphone during lunch break. I love the information you provide here and can’t wait to take a look when I get home.
    I’m amazed at how fast your blog loaded on my phone .. I’m not even using WIFI, just 3G ..
    Anyways, amazing site!

  17. Pat Mazza

    If you wish for to get a great deal from this post then you
    have to apply these techniques to your won blog.

  18. Pat Mazza

    Thank you, I’ve just been searching for information approximately this topic for a long
    time and yours is the best I’ve discovered till now.

    But, what concerning the bottom line? Are you positive concerning the source?

Comments are closed.