दुःखाचा बाऊ करू नये
दुःख विकल जातं नाही, त्याला नसतो जडत्वाचा आकार
तरीही काही मित्र दुःखी होतं करतात, दुःखाचाच व्यापार
आजारी कोण पडत नाही? अपघात कोणाला घडत नाही?
प्रत्येकाच्या आनंदाला असतो दुसऱ्याच्या दुःखाचा सख्खा शेजार
कोणाला अचानक धनलाभ झाला तरी शेजारचा उगाचच गपगार
प्रत्येकाचं दुःख वेगळं, कोणाच्या दुःखाला असते असाह्य किनार
कोणाच दुःख हतबल, कोणाच अती दुर्बल, दुःख करणं हा आजार
दुःखी माणसाच्या दुःखाला असतो समदुःखी माणसाचा विकार
सधन नाही, सामर्थ्य नाही, नाही कुणाची फुंकर, होतो दुःखाचा संचार
कुणाचे अकालीच छत्र हरवते, होतो पोरका, पडतो उघड्यावर संसार
ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला मोठे दुःखाचा कसा करावा अहंकार?
पण प्रत्येक दुःखाची जातकुळी वेगळी, प्रत्येक दुःखाला वेगळा आकार
कधी उसासून रडावं वाटतं, कसलं दुःख झालंय तेच होत नाही साकार
आठवणीचा बुरखा फाडत एक एक प्रसंग आठवतो, डोळ्यापुढे अंधार
माणसं दुःखाने होतात हळवी,अकाली जाणं म्हणजे उघड्यावर संसार
दुःखी माणसाने लक्षात ठेवावे, दुःखच तर आहे आनंदाचे प्रवेशव्दार
दुसऱ्याला दुःख साजरा करण्याचे सामान विकणे, हाच काहींचा व्यापार
येशूला विचारा, समाज निर्भय व्हावा म्हणूनच त्याने केलं दुःख स्विकार
मित्रांनो दुःखाला करू नका पोरकं, परकं त्यालही हवा असतो शेजार
दुःखाने हताश झालेला, रडून रडून येतो धायकुतीला पडतो गपगार
सांत्वन करून कोणाचं दुःख हलकं केलं की वाटू लागतो अहंकार
सांत्वन पर शब्दांत हवा ओलावा नको नुसताच शब्दांचा कोरडा भार
दुःखी माणसाचा करू नये उपहास, स्वानुभव शिकवेल याचे सार
कर्त्या व्यक्तीचं जाणे नसते सोपं, उघड्यावर पडतो पूर्ण परिवार
सहनशीलतेला असते सीमा, सतत कोणावर नको शाब्दिक भडीमार
दुःख पेलवलं नाही की मनाचा कोंडमारा, अचेतन शब्द तुटे आधार
दुःखाचा बाऊ करू नये, कोणासच चुकत नाही असे निर्गुण निराकार
हरपते भान, ओलावती डोळे,सारेच व्यर्थ, दुःखाचा सर्वत्र असे संचार