द्यावी का जाहिरात?

द्यावी का जाहिरात?

रामाच्या पंचवटीत, गदीमांच्या नाशकात घडला मोठा अपघात
शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची निघाली वाऱ्यावरी वरात
पडली बुध्दी गहाण? जो-तो पातला चरणासी त्याच्या अंधारात
ठाऊक ना स्वतःचे भविष्य पाहू लागला राज्यातील नेत्यांचे हात

स्वघोषित कप्तान बहू वस्ताद निघाला, काही वर्षात टाकली कात
शिवांभूचे तिर्थ वाटूनी कित्येक करोड कमविले, त्याचा पहावा थाट
इशानेश्वर नाव न माहित कुणाला, पाडली याने नवीन देवाची वहिवाट
शिवपिंडीवर अभिषेक करण्या, कापली तर्जनी लोकांस पटे भूलथाप

अबलेवर संमोहन, म्हणे करीतो उपाय, होईल रक्षण, त्याही खुळ्या भ्रमात
संधी स़ाधूनी करण्या प्राशन तिर्थ देता गुंगी येऊन, करी त्यांचा घात
कित्येकांचे अश्लील व्हिडीओ बनवून, लुटतसे पैसा दाखवून त्यांना धाक
संधान बांधले थोरामोठ्यांशी, हातचलाखी याच्यापाशी, पकडले त्यांचे नाक

नीच पातळी गाठली त्याने, बालीकेची शिकार झाली,कौमार्य भंगले क्षणात
धाकधपटशा दावून मुक बनवले, आयुष्यातून उठली, हसे नराधम गालात
न्याय मागण्या गाठली चौकी, मिंधे सारे, हरवली निती, काही न पडे पदरात
ढसाढसा कुटुंब रडले, अश्रू न त्यांचे कुणी पाहिले, वर्दी झाकोळली राज्यात

बळकावल्या गरीबांच्या जमिनी, इमान विकले, अधिकाऱ्यांनी दाखवली जात
मदतीस सारेच धावती, गोदावरी चरणासी नेती, म्हणती देवाचा दूत खरात
अवैद्य धंदे कुणा न ठाऊक, चळती नेते वासनेची वखवख, जडीबुटी भरात
कोण भेटून गेले त्याला, करावी का नावे जाहीर देऊन मोठाली जाहिरात?

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “द्यावी का जाहिरात?

  1. ASL Meaning in Text

    This is a great piece of content.

  2. ASL Meaning in Text

    Great job on this article.

Comments are closed.