नातं
ओळखतही नव्हतो पण दिसली की ती हसायची
ठराविक स्थळी, डोळ्याची पाखर तिला शोधायची
यापलीकडे संबंध नव्हता, नव्हते कुतूहल कोण ती?
मनात कुणी घर केलं, की फुलत जातात नसती नाती
काय घडला प्रमाद असा? फुलतांना तिने मिटून घेतले
आता कुठे बहरत होती, हसत होते मुखी शिंपले
निशब्द मी, सांगता न आले, मनात शब्द गोठले
समजून न घेतले तिने, माझ्या मनी दुःख दाटले
पाहिले परतताना तिला, मन आक्रंदुनी पेटले
क्षणात आला दाटून कंठ, डोळ्यात अश्रू साठले
सोसले तिने कळेना किती, न वळून मागे पाहिले
काही न कळे माझ्या मना, कसे ? कुठे? काय?चुकले
पाहतो रोज स्वप्नी तिला, चेहरा जणू फुल सुकले
स्पर्शाचा मोह होतो मनी, दुभंगे मनचित्र डोळ्यातले
कोणता प्रसंग कोणावर येतो? कधी कधी कळत नाही
हळवी हृदये होतात कठोर, काहीच कुणा सांगत नाही
एकट्याने सारे निभावताना, दुःख त्यांना सोसवत नाही
सह्रद असतात त्यांना, आपल्या मित्रांचे दुःख पाहवत नाही
मन मोकळ करायलाच हवं, तरच दबलेलं दुःख हलकं होतं
कोणी कुणाचं दुःख घेत नाही, असंच तर जमतं कोमल नातं
छान
Thanks
I’m excited to continue exploring this website. It’s quickly become a favorite source of mine for knowledge and ideas. I hope they keep up the excellent work for years to come. Their content sparks important conversations and enables readers to make informed decisions. In an era of misinformation, websites like this one are invaluable. I’m truly grateful it exists and plan to remain a regular visitor.
I like the efforts you have put in this, regards for all the great content.