पहिलीच भेट
पहिलीच होती भेट आपली, प्रवासात तुझा शेजार
माझी पोपटपंची ऐकूनही, केली न तू काही तक्रार
हळवा स्पर्श झाला तुझा, मनी तरळले स्वार्थी विचार
अलगद घ्यावा हात हाती, छेडावी सतार, कानी झंकार
तुच माझ्या प्रेमाचे तारू, आठवे रोमांच अन थरार
नजरेत व्याकूळता पाहूनी तू उघडले प्रितीचे दार
आयुष्यभर साथ देण्याचा कधीच केला न मी करार
तुला येईल माझा कंटाळा तेव्हा दे तू स्पष्ट मज नकार
हसलीस मोकळ्या मनी, नजरेत तुझ्या भवानीची धार
तुझ्या चेहऱ्यावर वाचले भाव, क्षणभर मनी मिट्ट अंधार
कधीच न मनाशी म्हणालो केली मी तुझी शिकार
तुला तुझी भुमिका जगण्याचा, आहेच की अधिकार
येथे न मांडला कधी कुणी अतृप्त भावनेचा बाजार
स्वतःस महान समजण्याचा कोणास जडो न आजार
आयुष्यभर साथ देण्याचा कधीच केला न मी करार
तुला येईल माझा कंटाळा तेव्हा दे तू स्पष्ट मज नकार
मैत्री आपली बहरत गेली,प्रीतीच्या बागेस नवा बहर
पौर्णिमेच्या चांदव्याला चांदण्याचे शिवले तूच अस्तर
भेटीत सरे विषयांचे द्वैत, मनी जळून गेला अहंकार
तव उदात्त विचारांचे रोपटे माझ्या मनास त्याचा आधार
तुझ्या मनीचा आरसा, तुला शोभती तुला स्पष्ट विचार
तव भेटीची ओढ मज नको देऊस चकवा नको अंतर
आयुष्यभर साथ देण्याचा , कधीच केला न मी करार
तुला येईल माझा कंटाळा तेव्हा, दे तू स्पष्ट मज नकार