फेसबुक मित्र बनाताना

फेसबुक मित्र बनाताना

ऍड.मनोहर सरोदे हे न्यायपालिकेतील एक नावाजलेलं नाव. ते एखादी केस स्विकारण्याआधी अशिलाकडे वेळ मागून घेत. अशीलाच म्हणणं शांत ऐकून घेतल्यावर काही मिनिटे डोळे बंद करून शांत बसत. त्यांच्या समोर ती दोनचार मिनिटे बसून ते कधी बोलतात या प्रतीक्षेत अशील गांगरून जाई. मग दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते डोळ्यावर फिरवून शांतपणे डोळे उघडून आशिलावर डोळे वेधून पाहत. जणू आशीलचे मन वाचण्याचा ते प्रयत्न करत. त्या नंतर ते आपला एक एक प्रश्न, एक एक शंका आशिलावरील नजर न हटवता विचारून घेत. यासाठी कधी दहा मिनिटे तर कधी तासही लागे. त्यांचे हे सेशन संपले की ते त्यांची केस घेणार की नाही या विषयी परखड मत मांडत. घाईघाईत कोणाशी बोलणं वा निर्णय घेणे ते नेहमी टाळत.

आज असाच एक अशील आपल्या मित्रासोबत त्यांची भेट घ्यायला आला होता. वेटिंग रूममध्ये तो तासभर थांबला होता. दर दोन पाच मिनिटांनी आपलं मनगटी घड्याळ पाहत होता, खरे तर त्या वेटिंग रूम मध्ये त्यांच्या समोरच मोठे घड्याळ लावले होते तेथेही त्याची नजर जात होती, त्यातून त्याची अस्वस्थता समजून येत होती. मुख्य म्हणजे ऍड. सरोदे यांच्या वेटिंग रूममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मुळे ऍड. सरोदे यांच्या ते लक्षात आले होते. त्यांच्या समोर बसलेल्या आशिलाशी बोलतांना नाही म्हटलं तरी या गोष्टीचा परिणाम होत होता. शेवटी त्यांनी स्वतः कॅमेरा स्विच ऑफ केला. त्यांच्या समोरच्या आशिलासोबतची बैठक संपली तशी ते ग्लासभर पाणी प्यायले आणि रिसेप्शनिस्टला त्यांनी नेक्स्ट म्हणत फोन ठेऊन दिला.

“सर, मे आय कम इन!” त्यांचा दरवाजा उघडत दोन माणसे आत आली, त्यापैकी एक बराच धास्तावलेला दिसत होता तर त्याच्या सोबतीला आलेली दुसरी व्यक्ती थोडी कुल होती. “येस, बोला माझी काय मदत आपल्याला हवी.”

कुठून सुरवात करावी? आणि कसे सांगावे? हे कदाचित त्याला कळत नसावे, त्यांनी आवंढा गिळला आणि म्हणाला, “सर, काल पासून एक मुलगी दर दहा मिनिटांनी मला व्हिडिओ फोन करते. मी कट केला तरी दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या अननोन फोन वरून फोन करून हैराण करते, मला धमकावते म्हणते तुम्ही मला व्हिडिओ कॉल करून अश्लील बोललात, चाळे केलेत, त्याच रेकॉडिंग माझ्याकडे आहे. पण खरं सांगतो साहेब मी तिला कॉल वगेरे अजिबात केलेला नाही, तीच माझ्यावर जबरदस्ती करते आहे. म्हणते तुम्ही मला मी सांगते त्या नंबर वर पन्नास हजार रुपये नाही पाठवले तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार करेन. मी प्रोफेशनल आहे ,या प्रकरणाने मी घाबरलो, काय करावे सुचेना म्हणून तुमचे ऑफिस गाठले.” ऍड.मनोहर हसले, “अहो पण मग तुम्ही माझ्याकडे का आलात? ही तक्रार तुम्ही पोलिसांकडे करू शकला असता. बरं हे अस केव्हा पासून सुरु झालं?”

“सर बहुदा, परवा रात्री पासून,साधारण दहाची वेळ असावी.” “तुम्ही तेव्हा नक्की काय करत होता?” ऍड. मनोहरनी विचारले. “मी मोबाईलवर facebook account पाहत होतो, म्हणजे स्पेसिफिक अस काही नव्हते, टाईम पास चालला होता.” “तुम्हाला आठवतयं का तुम्ही काय काय पाहिलं ते?” “नाही सांगता येणार, पण दिसेल तो व्हिडिओ पहात मी पुढे सरकत होतो.” “काही असेही फोटो किंवा व्हिडिओ असतील ज्यात कमी कपड्यातील सुंदर मुली, ज्यांनी तुमचं अटेन्शन वाढलं असेल,ती फ्रेम तुम्ही जास्त वेळ पहिली असेल किंवा तिला तुम्ही लाईक केलं असेल.” “तसं नक्की सांगता येणार पण कदाचित मी असे व्हिडिओ पाहिले असू शकतील,म्हणजे उत्सुकता म्हणून मी पाहतो.” “मिस्टर इथेच घात झालाय,तुम्ही उत्सुकता म्हणून तिचे कमी कपड्यातील फोटो तुम्ही तिला लाईक करून तुम्ही पाहिले आणि याच संधीचा फायदा घेत तिने किंवा तिच्या मित्रांनी तुमचा फोन नंबर शोधून काढला.” “पण मग आता मी काय करू? तिचा ससेमिरा चुकवू कसा? मी कुटुंब वत्सल आहे, पत्नीला हे मी सांगितले नाही कारण ती उगाचच संशय घेत राहिल आणि आमच्यात भांडणे होतील.”

“आपलं नाव काय म्हणालात?” “तो आपल्या मित्राकडे संभ्रमात पहात राहिला, बहुधा त्याला नाव सांगावं अस वाटत नसावे.” “हे पहा मिस्टर, तुम्हाला उपाय हवा असेँल तर माझ्यापासून काही लपवून चालणार नाही,तरच मी तुम्हाला मदत करू शकेन.” “माझ नाव श्रीधर सहस्त्रबुद्धे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, नरीमन पाइंटला माझं ऑफिस आहे. काय आहे चुकून माझ नाव कुठे सोसिअल मीडियात कळलं तर माझी प्रतिष्ठा पणाला लागेल म्हणून- – –” “हे पहा सहस्त्रबुद्धे असे फोन कॉल येणं यात काही नवल नाही,पण तुम्ही या गोष्टीला घाबरला हे जर समोरच्या व्यक्तीला कळले तर तो अनडयु advantage घेणार यात वाद नाही. तुम्ही एक काम करा,दोन तीन दिवस फोन बंद करून ठेवा. किंवा फोनची तुम्हाला नितांत गरजच असेल तर फक्त known कॉल घ्यायचे.” “पण हे सगळ थांबेल ना? काय आहे साहेब आम्ही पांढरपेशी माणसं या असल्या गोष्टीला घाबरतो, चार हात दूर राहतो. माझी मिसेस थोडी संशयी आहे, असा कॉल आला तिने माझा मोबाईल उचलला आणि ती तशी कमी कपड्यातील बया हिच्या दृष्टीस पडली तर उगाचच घरात भांडण होईल.” “सहस्त्रबुद्धे,तुम्ही आता घरी गेलात की एक काम करा, तुमच्या पत्नीला विश्वासात घेऊन हे सगळं सांगा,अहो असे फेक व्हिडिओ सगळेच पाहतात त्यात काही गुन्हा नाही. किंवा असे व्हिडिओ पाहिले म्हणजे तुमच्या पत्नीने रागावण्याचे काही कारणही नाही. आणि हे हँडल करणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या मिसेसना घेऊन माझ्याकडे या मी त्यांना समजावतो.” “नको नको ,I will handle it, थँक्स माझ्या मानवरचे दडपण कमी झाले,साहेब आपली फी.”

“हे पहा सहस्त्रबुद्धे तुम्ही भयमुक्त झालात की तुमच्या सोयीने आणि तुम्हाला योग्य वाटेल ती फी तुम्ही द्या. तसच काही तुम्हाला वाटले तर हा cyber crime चा नंबर, तिथे माझे मित्र द्वादशीवार इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे स्वतः जाऊन कंप्लेंट नोंदवा, he will help you out.” “Thanks sir, आपले आभार कसे मानावे कळत नाही.”
“आभार मानू नका पण,असल्या साईटवर उगाचच रेंगाळू नका, दूर्दैवाने या क्षेत्रात It मधिल काही experts शिरले आहेत. ते अशा साईट पाहणाऱ्या व्यक्तीचे डिटेल शोधण्यात माहिर असतात तुम्ही त्यांना स्वतः काही क्लू देता मग ते सहजच तुमच्या पर्यंत पोचतात आणि तुम्हाला बकरा बनवतात. मुख्य म्हणजे त्यांनी तुमचे चारित्र्य खराब करण्याची काहीही धमकी दिली तरी घाबरू नका. सायबर सेलला कळवले की ते अशी अपलोड केलेली माहिती कुठून आणि कोणी टाकली शोध घेतात आणि ही माहिती त्वरेने काढूनही टाकतात. तेव्हा निर्धास्त रहा.” सहस्त्रबुद्धेनी आपले पर्सनल कार्ड , ऍड. सरोदेना दिले.

सहस्त्रबुद्धे आणि मित्र , ऍड.सरोदे यांचे आभार मानून बाहेर पडले. “My God, सुटलो एकदाचा,किती घाबरलो होतो मी, काल रात्री फोन आल्यापासुन माझी झोपच उडाली होती. बर झालं Sarode is really a true gentleman.” “ते चांगले असतीलच पण तू निघतांना मुर्खपणा का केलास? तुझ कार्ड त्यांना का दिलं,त्यांनी त्याचा गैरवापर केला तर?” अरविंद देशपांडे त्याच्यावर डाफरला. “काय! सरोदे त्याचा गैरवापर करतील?चल काहीतरी सांगू नकोस, एवढा मोठा वकील, तो आपल्या नावाचा गैरवापर कशाला करेल? तस असतं तर त्यांना आताच पैसे उकळायची संधी होती. पण एक रूपयाही त्यांनी मागीतला नाही, अरविंद तू साला कोणावरही संशय घेतोस.” “तुला तस नाही वाटत ना? मग झालं, मी तुला सावध केल इतकचं.” “अरविंद आपण चहा घेऊ, मग घरी जाऊ सकाळी डोक्याला भुंगे लागले होते, ही स्नॅक्स देत होती, पण माझा मूड नव्हता.” दोघ एका रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांनी स्नॅक्स घेतला. “अरविंद, तू फेसबुक वापरतो?” “का रे? तुला वाईट सवय आहे तिच मलाही आहे अस तर तुला म्हणायचे नाही ना?” “कसली वाईट सवय? तू ऐकल नाहीस का, सरोदे काय म्हणाले? असे व्हिडीओ पाहणं मुळीच वाईट नाही, फक्त आपली पर्सनल माहिती त्यांच्या हातात जाता उपयोगी नाही. पण तुला सांगतो आलेला व्हिडीओ कॉल इतका उमद्या पोरीचा होता की मी पाहतच बसलो.”

“खाल्लीस ना माती, घरात सुंदर बायको असतांना हे असं काही क्षण नेत्रसुख हवं कशाला? ती काय तुला सोबत करायला येणार होती का?” “अरविंद तु साला अगदीच साधू, अरे सुंदर गोष्टी बघण्यासाठीच असतात, ते सौंदर्य कुणी पाहिलं नाही वाखाणल नाही तर काय उपयोग?” “बरं जे काय सुख घेतलं त्याची किंमत चुकती करावी लागली असती, तिने तुझा खिसा पोखरला असता म्हणजे कळलं असत, थोडक्यात वाचलास.आता शहाणा हो,जर वहिनींना तु असल्या नादाला लागला आहेस हे कळलं ना तर या वयात डिव्होर्स घेतील. आता शहाणा हो आणि सगळं वहिनींना सांगून मोकळा हो.”

तसही, ऍड.सरोदे म्हणाले त्या प्रमाणे ही गोष्ट मला बायकोला सांगायला हवी. ती याचा विचार कसा करते ते फार महत्वाचे आहे.” “हो,तु घरी गेल्यावर त्या तुला स्वतः विचारतील की एवढ्या उशीरापर्यंत कुठे होतास ? आज ऑफिसमध्ये जायचं नाही का?” “तीच तर कटकट आहे,ती माझ्या कोणत्याच गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाही, पाहू आता घरी गेल्यावर कोणते रामायण घडते ते?” “श्रीधर यार बायकोला घाबरतोस, अगदीच ‘हा’ आहेस,एकदा कडक भाषेत बोल,पुन्हा तुझ्या वाटेला नाही यायची.”

“घाबरत नाही रे, पण तिची कटकट सुरू झाली की मन क्षिणून जात. ती मुलांच्या समोर टोमणे मारते आणि पोर बापाची मजा बघत असतात. मुलं मोठी झाली आहेत याचही भान तिला नाही. तिला आपल्या माहेरच्या श्रीमंतीचा फार गर्व आहे. थोडी संशयी पण आहे,चुकून कोणाचं कौतुक केलं की तिचा पारा चढतो. तिची कटकट नको म्हणून मी शांत राहतो.” “अरे! कमाल आहे? आम्ही कोणी आलो की आमच्याशी तुझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतात की सांगता सोय नाही.” “जाऊ दे रे, अरविंद साल्या तू माझा जिवलग मित्र म्हणून मी तुझ्याकडे बोललो, नाहीतर आपल्या चांडाळ चौकडीला बोलता बोलता सांगशील, श्रीधरची बायको अशी आणि तशी. चल घरी येतोस का वहिनीच्या हाताचा चहा प्यायला?” “नको रे बाबा,तूच मनसोक्त पी, आधी पहा किटली किती गरम आहे ती, नाहीतर डायरेक्ट लावशील तोंडाला आणि तोंड पोळेल.”

श्रीधर आपल्या बिल्डिंगकडे वळला आणि अरविंद पुढे निघून गेला. दोन वेळा बेल वाजवून दार उघडले नाही म्हणून श्रीधर वाट पाहत होता, इतक्यात शाल्मलीने दार उघडले, तो घरात येताच, त्याच्याकडे पहात म्हणाली, “morning walk ला गेला होतास की अजून कुठे मित्राकडे, आणि वाजले किती पाहिलस का? ऑफिसला नाही जायचं आहे का?”

“अगं, घरात आल्याबरोबर प्रश्नांची सरबत्ती सुरू करशील का? आधी पाणी,चहा काही देशील की नाही? मी महत्त्वाच्या कामासाठी वकिलांकडे सल्ला घ्यायला गेलो होतो. आज ऑफिसला थोडं उशिरा जाणार आहे.” “मग सकाळी बाहेर पडलास तेव्हा सांगायचं होतं ना, मी अमुक ठिकाणी जातोय आणि मला उशीर होईल म्हणून, हे पहा मला कॉलेजमध्ये जायला उशीर होतोय, तुझा टिफिन भरून ठेवला आहे, तुला उशीराच जायचं होतं तर आधी सांगायचे म्हणजे माझी घाई झाली नसती. पण वकिलकडे काय काम काढलं, तुमच्या ऑफिसशी रेलेटेड होत का?” “माझ्याशी, म्हणजे माझं खाजगी, तुला उशीर होतोय तर तु जा मग संध्याकाळी तुला सांगतो. आता तू घाईत आहेस.” “तुला मला सांगायचं नाही आहे का? नको सांगूस.” “शाल्मली, यार तू कोणत्याही गोष्टीत तिढं का शोधतेस? त्यात लपवण्यासारख काही नाही. इथे बैस सांगतो.” “मला तितका वेळ नाही, सांगतोस तर झटपट सांग, मला १०.४५ पकडायची आहे. मला थंबसाठी पोचावं लागत, तुझ्या सारख नाही, केव्हाही पोचलास तरी विचारणारं कोणीही नाही.”

“बरं बरं, माझ्याशी कंपेअर केल्याशिवाय तुझा एकही दिवस जात नाही. गेले दोन दिवस मी किती टेन्शनमध्ये होतो तुला माहीत तरी आहे का?” “तु टेन्शनमध्ये! का?ऑफिसमध्ये काही झालय का? आणि तू सांगातल्याशिवाय मला कस कळणार?” “अग परवा रात्री मला एक फेक व्हिडीओ कॉल आला, आणि ‘ती’ म्हणाली,”तु मला कॉल करून अश्लील चाळे केलेस,मी तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणार?” “श्रीधर शीs s s , तु ऑफिसच काम सुरू आहे म्हणत असले अश्लील उद्योग करतोस?” “Shut up, कसले आरोप लावतेस कळतंय का?आधी पूर्ण ऐकून घे.”
“काय सांगणार आहेस,हेच ना की माझा याच्याशी काहीही संबंध नाही.” “मग नाहीच काही संबंध.मी कधीतरी facebook पाहतांना by default एखादा तसा video आला असावा, जो कुतूहल म्हणून मी क्लिक केला? Otherwise कोणाशी बोलायची किंवा कोणाचा video पहायची मला काय गरज?” “बरं मग,पुढे काय झाले?” “काहीही झाले नाही, तिने मला व्हिडीओ कॉल करून harassment सुरू केली, मी सांगते त्या मोबाईलवर Gpay करा नाहीतर तुमचा व्हिडीओ व्हायरल करीन.” जे घडलच नाही त्याबद्दल ती मला ब्लॅकमेल करत होती.” “बसं एवढच घडलं आणि तू घाबरलास, खर सांगतोसय ना? की मग तुझ्या ऑफिसमधलं काही लफडं…” “शाल्मली काय बोलतेस? तुझ्या जीभेवर सरस्वती नाचतेय जणू, मला काय समजलीस?असली लफडी करायला मला वेळ तरी आहे का?”

“मी कुठे काय समजले? तु ऑफिसमध्ये काय करतोस मी कधीतरी तुला विचारलं आहे का? तू असल्या एका निनावी फोन किंवा मेसेजमुळे गडबडून जाशील अस वाटलं नव्हतं. एकदम कच्चा आहेस, मला असे मेसेज अनेकदा आलेत,मी तुझ सिमकार्ड वापरते म्हणून, मी ते सगळ एंजॉय करते. असे व्हिडिओ पाहून कुणाचं काही नुकसान होत नाही पण तू अतिउत्साहात तिचा व्हिडिओ कॉल उचलला हीच ती चूक. त्यांना रिप्लाय करायची गरज नसते. त्यांना कुठे माहिती आहे मी पुरुष आहे की स्त्री.” “अरे हो ! हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. या बाबतीत तू खरच स्मार्ट आहेस, पण या बायका आपल उत्तान प्रदर्शन करतात,तुला त्यांची लाज नाही वाटत?” “का लाज वाटावी? जाहीर प्रदर्शन त्या करतात, मग ते कोणी पहावं आणि कोणी नाही त्यांच्या हातात आहे का? पहायच की नाही हे आपण ठरवतो ना? तुम्हाला पहायची जबरदस्ती आहे का? तु का म्हणून पाहिलंस?” “म्हणजे मी तो व्हिडिओ कॉल उत्सुकता म्हणून उचलला, मला माहिती नव्हते त्याचा ती असा फायदा घेईल.” “श्रीधर, अगदी साळसूद बनू नको तु न्युजपेपेरमध्ये अशा अनेक केसेस वाचल्या असशील तुला राहवलं नाही हे सांग की! कुठेही न अडकता पहा किंवा पाहू नको. तु त्यांच्या कचाट्यात सापडलास तर ती किंमत वसूल करणार .बरं ते जाऊ दे past is past, यापुढे काळीजी घे.”

“शाल्मली तुला उशीर होतोय ना,आपण रात्री बोलू. आताच सगळं बोललं पाहिजे का? थोड्या वेळाने मुलं येतील, त्यांच्या समोर ही चर्चा नको.” “बरं मी निघते, जातांना तुझा टिफिन घे नाहीतर विसरून जाशील, पोळी भाजी खाऊन जा. गॅसवर दूध आहे. मला सांग वकील महाशयांनी काय सल्ला दिला? खिसा किती खाली केला?”

“सरप्राइजींगली नाही, एक ही रूपया त्यांनी घेतला नाही.”
“काय म्हणतोस! कस शक्य आहे? वकिलांनी फी घेतली नाही म्हणजे कमाल झाली, हा कोण हरिचंद्राचा अवतार, नाहीतर वकील हपापले असतात. तू खरं सांगतोयस ना?” “पाहिलस, तुझ्या ह्या अशा संशयी स्वभावामुळे तुला काहीही सांगू नये अस वाटतं, प्रत्येक गोष्टीत तुला शंका असतेच.” “अरे,त्यांच वागणं संशयास्पद वाटलं म्हणून विचारले, बऱ मग काय म्हणाले?” “म्हणाले, ignore her call and messages. If you have a fear in mind, complain to the Cyber crime branch,he gave me one number.” “So now, I hope,you are comfortable and fearless now, Let me go to college.श्रीधर तू पापभिरू आहेस हे मला चांगल माहिती आहे, तू चोरून एखाद्या मुलीकडे, आय मीन बाईकडे पाहिलंस तरी तुलाच तुझी भिती वाटेल. खरं ना? पण तू सुंदर मुली पाहत नाहीस याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही.पण it’s ok, it’s nothing but natural.उगाचच धाडस करून अडकू नकोस आणि मुलांसमोर हस करून घेऊ नकोस.”

श्रीधर हसला, ” So you mean I am free to flutter, शाल्मली तु नक्की कशी आहेस हेच कळत नाही. कधी उगाचच आरडा ओरडा करतेस आणि माझ्यावर संशय घेते. तर कधी हसण्यावारी नेते, तु म्हणजे एक कोडं आहेस.” शाल्मलीने त्याच्या जवळ येत त्याच चुंबन घेतल,त्यानेही तिला जवळ ओढत मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. “तिने त्याला दूर लोटल, पाहत नाहीस आता मी office attires मध्ये आहे. No dear,it’s not time to mingle. we will complete the part at night.” ती गुढ हसली.निघतांना म्हणाली, “बरं, तू जातोयस ना office ला तुझा डबा मी डायनिंग टेबलवर भरून ठेवला आहे. मुलांसाठी बिर्याणी करून ठेवली आहे, you can taste it. By happy !”

तो मूडमध्ये आला होता पण तिच्याकडे आता वेळ नव्हता. ती दार ओढून निघून गेली, लॅच लागल्याचा मागून आवाज आला आणि तो अत्यानंदाने ओरडला, “Yes! now I got it,she loves me like anything.” श्रीधर तिच्या बरोबर बोलून एकदम फ्रेश झाला, त्यांच टेन्शन एकदम रिलीज झालं. काही म्हणा शाल्मली आपल्यापेक्षा नक्कीच स्मार्ट आहे. आपण किती घाबरलो होतो.शाल्मली काय म्हणेल?, मित्र काय म्हणतील? पण तिच्याशी बोललो आणि एकदम रिलॅक्स वाटू लागलं. शाल्मली बिनधास्त सांगते ती असे व्हिडीओ एंजॉय करते, कमाल आहे. तो स्वतः शी म्हणाला.

तो तयार होऊन ऑफिससाठी निघाला,तो लिफ्टमध्ये शिरला इतक्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला,तो गडबडीत होता,त्याने फोन कोणाचा आहे ते न पाहताच मोबाईल कानाला लावला. “Darling आप ठीक तो हो ना?आप हमसे नाराज हो क्या? आपने हमे मिलनेका वादा किया है। आपको याद है ना?” “Idiot, I don’t know who you are and I don’t want to talk to you, if you try to ring me again I will complain to cyber crime.” एवढं बोलून त्याने लगेचच फोन कट केला. लिफ्ट मधून उतरेपर्यंत तो घामाघूम झाला. त्याने आजूबाजूला पाहिले.जवळ कोणीही नाही पाहून तो रिलॅक्स झाला,इतक्यात पुन्हा मोबाईल वाजला,त्याने मोबाईल रिंगचा इतका धसका घेतला होता मोबाईलची पूर्ण रिंग वाजून गेली तरी त्यांनी मोबाईल उचलला नाही. पुन्हा रिंग झाली, तेव्हा त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि काहीतरी सणसणीत बोलायचे ठरवून फोन कानाला लावला तर शाल्मली विचारत होती,” निघालास ना ऑफिसला?बर तुझा टिफिन घेतलास का?” “अग घाईगडबडीत तो टेबलवर राहिला.सगळ आवरेपर्यंत उशीर झाला आणि मग” ती हसली, “एकदम धांदरट आहेस,आता बाहेरून काहीतरी मागवं.” “शाल्मली, शाल्मली!” , तो खर तर तिला येऊन गेलेल्या कॉल बद्दल सांगणार होता पण मोबाईल कट झाला. ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत तो सगळं विसरून गेला. दोन क्लायंट वाट पहात होते,खर तर त्यांना साडेअकरा ची वेळ दिली होती पण सकाळी ऍड.सरोदे यांच्याकडे जायचं ठरवलं आणि वेळेचा सगळा गोंधळ झाला. दुपारी उशिराने त्याने सँडविच मागवले,खाता खाता त्याला सकाळच्या कॉल ची आठवण झाली पण त्यांनी मोबाईल पाहणं टाळलं, शाल्मलीने समजाऊनही त्याची घडणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायची तयारी नव्हती.
पुन्हा क्लायंट बरोबर मीटिंग करता करता सात वाजत आले तसा तो उठला. त्याला उशीर झाला म्हणून श्रेयाचा, त्याच्या मुलीचा फोन येऊन गेला. मोबाईल सायलेंट असल्याने त्याला ते समजले नाही.

तो घरी पोचला तेव्हा साडेआठ वाजून गेले होते. त्यांनी स्वतःजवळच्या की ने लॅच उघडला, हॉलमध्ये झुंबराची प्रतिमा सिलींगवर चमकत होती. शाल्मली किचनमध्ये होती आणि मुलं बहुधा त्यांच्या बेडरूममध्ये अभ्यास करत असावी.त्याची चाहूल लागताच शाल्मलीने मुलीला हाक मारली, “श्रेया डॅड ला पाणी दे आणि तो चहा घेणार का ? विचार.”

श्रेया हॉलमध्ये येता येताच म्हणाली,”डॅड, तुला यायला किती उशीर झालाय माहिती आहे का? ममा पण आज लेट आली, आम्ही बोअर झालो होतो, तुला फोन केला,तर तू फोन उचलला नाहीस . तुला ऑफिसमध्ये एवढं काम असतं का, की तू आम्हाला विसरून जातोस?”

“नाही रे पिल्ल्या,तुम्हाला विसरणं शक्य आहे का? त्यातही तुला तर नाहीच नाही, बर जा मला पाणी घेऊन ये and bring something to eat. I am hungry. आमचं नक्षत्र काय करतंय?” तो ना, सम सोल्व करतोय.” श्रेया त्याला चिवडा घेऊन आली, “डॅड तु अजून फ्रेश होऊन आला नाहीस? जा आधी, फॅन सुरू आहे चिवडा थंड झाला तर काय उपयोग?” तो वॉशरूमकडे गेला, तिने डिशवर प्लेट ठेवली.थोड्या वेळाने तिने कॉफी आणून दिली आणि ती अभ्यासाला गेली. डिनरसाठी ते एकत्र आले तेव्हा त्यांनी सात्विककडे त्याच्या अभ्यासाची चौकशी केली, “So my Son, how is your study? What’s going on in your school ? You didn’t tell me anything from last week.” “Everything is OK,we have prelims from 2nd January. I have to complete three subjects in ten days.” “Which are they? aren’t marathi, history and civics?” “Yes, but how do you know the exact subject in which I am lagging?” “Because your Mom teaching those subject in jr.college” शाल्मलीने त्याच्याकडे पहात डोळे वटारले. तसं तो म्हणाला, “मी पंधरा दिवसांनी कधीतरी त्याचं Maths, Science घेतो, पण जोवर मी शिकवलेल त्याला समजलय याची लमाझी खात्री पटत नाही तोवर मी त्याची पाठ सोडत नाही. Am I right?”
सात्विक हसला,”ममा शिकवते ते ही मला समजते, पण ती पहावं तेव्हा कामात तरी असते नाहीतर मोबाईलवर मग मी ही विसरून जातो.” “Sativik, don’t blame me for your negligence, you can wait and ask me about your difficulties. I see, you are playing on mobile whenever I am Free.” “बरं आता ब्लेम गेम नको,within the next ten days you have to pay special attention to your subject.” “Done, I will, but Mama has to give me her time.” सात्विक शाल्मलीकडे पहात म्हणाला.

रात्री मुलं त्यांच्या बेडरूममध्ये गेली. श्रीधर त्याच office work करत होता. शाल्मली किचन आवरून आली तस त्याच्या बाजूला बसत म्हणाली, “मग तुझा प्रॉब्लेम एकडचा सुटला का?” तो तिच्याकडे पाहत म्हणाला “कसचं काय? सकाळी ऑफिसमध्ये जाण्याच्या वेळेस मी लिफ्टमध्ये असतांना कॉल आला होता, मी फोन उचलत नाही तोच ती मला बिनधास्त darling म्हणाली.” शाल्मली सिरीयस होत म्हणाली,”मग,तु काय केलंस?” “मी,मी तिला शिवी घातली, idiot म्हणालो आणि फोन कट केला.” “बघू कोणत्या फोन नंबर वरून ती बोलत होती?” तो मुलांचा कानोसा घेत म्हणाला, “इथे नको, मुलं जागी असतील आपल्या बेडरूममध्ये चल, मी हे आवरून येतो.” तो बेडरूममध्ये आला,शाल्मलीच्या बाजूला बसत त्यांनी मोबाईल काढून कॉल हिस्टरी तपासली, पण पाहतो तो एकही अन नोन नंबर नव्हता, तो ऑफिसमध्ये जायला निघाला ती वेळ आठवू लागला, तेव्हा तर शाल्मलीने फोन केला होता, तो वेड्यासारखा तिच्याकडे पहात राहिला. ती काहीच घडलं नाही अशी शांत होती,अचानक त्याला क्लिक झाल. शाल्मली तु फोन फोन केला होतास! आश्चर्य आहे,मी रागाने इडियट म्हणालो तरीही तू..” ते बोलत असतांना शाल्मलीच्या मोबाईलवर त्याच्या मित्राचा,अरविंदचा फोन आला,” हू तुझ्या मित्राचा फोन,अरविंद, बघ काय सांगतोय ते?” हॅलो, मी श्रीधर बोलतोय,बोल,काय म्हणतोस? माझा फोन सायलेंट आहे, असेल,कशासाठी एवढ्या रात्री फोन केलास? काय? माझी खुशाली घ्यायला,काय म्हणतोस? पुन्हा फोन आला होता का? हां नाही आला,सकाळी फोन आल्यासारखं मला वाटलं पण तो माझा गैरसमज होता.”

शाल्मली त्याला हाताने खुणावत,पुरे कर सांगत होती. ते पाहून तो मित्राला म्हणाला. “अरविंद मी तुला सकाळी फ्री असेन तेव्हा फोन करतो,आता मला झोप येत्याय, फोन केल्याबद्दल थँक्स.” शाल्मली रागावली,”किती वेळ बोलतोस, लवकर कटवायच ना?” “अग मध्येच बोलण कस संपवणार? त्यांनी मुद्दाम माझ्यासाठी फोन केला, सकाळी माझ्या सोबत वकीलांकडे आला. नाही बोलल तर त्याला राग नाही का येणार?” “श्रीधर तुझा मित्र, अरविंद म्हणाला ते खरे आहे, तू तुझ्या कामात व्यस्त असलास की तुझ लक्षच नसते, तुझ आपल बे के बे. कॉल घेण्यापूर्वी तो कोणाचा आणि तुझ्या गरजेचा आहे की नाही,नको का पाहायला? उचलली जीभ की लावली टाळ्याल्या म्हणी सारखं, लगेच फोन कानाला का लावायचा? असला धांदराट पणा केलास तर तुला कोणीही गंडवेल. Be smart, नाहीतर क्लायंट चुना लाऊन जातील.”

“शाल्मली तू कामावर जायला निघाली होतीस, तू लगोलग मला फोन करशील असे वाटले नव्हते. त्यामुळे तुझा फोन असेल असा मला संशयही आला नाही. क्लायंटचा असेल समजून मी फोन उचलला. स्क्रीन पहायला हवी होती, थोड चुकलचं.” “अरे हो,तरीही लगेचच,फोन कोणाचा आहे न पाहता कानाला का लावलास? तुला झोपताना फोन आला आणि चुकीने तू न पाहता कानाला लावला तर मी समजू शकेन पण,दिवसाही..” “आता लेक्चर देत बसणार आहेस की..” शाल्मलीने लॅम्प स्विच ऑफ केला,ती त्याच्याकडे सरकली तिने त्याच्या अंगावर अलगद हात फिरवला. श्रीधर तिला हळू आवाजत म्हणाला “तुला समजून घेणं खूप अवघड आहे.” ती त्याच्या कानात कुजबुजली,”राजा, समजून घेण्याचा प्रयत्नही करू ही नकोस तरच सुखी होशील. ते व्हिडिओ, ते कॉल विसरून जा माझ्यात काय कमी आहे.” तिने त्याला पुन्हा जवळ ओढले.तस तो ही मुडमध्ये आला, धुसमुसळेपणा करु लागला तस ती रागावत म्हणाली, “हेच ते, थोड बोल, मी तुझ्या समोर, तुझ्या समाधानासाठी असतांना असा धुसमुसळेपणा शोभतो का? आता काही तू तिशीचा नाहीस. जरा धिराने घेतलस तरच तुला जीवन आणि रसास्वाद कळेल. सारख ओरबाडून घेण्याचा पवित्रा कशाला?” श्रीधर तिला मुसमुसत म्हणाला “Oh Shalmali I love you,with you I am always fearless and joyful.I can’t wait any more.” शाल्मली त्याच्या उबदार मिठीत शिरून विचार करत होती.
जर श्रीधर वाहवत गेला असता तर नक्कीच नको त्या संकटात सापडला असता.पण त्याला स्वतःला जाग आली म्हणून तो सावधपणे सापळ्यातून बाहेर आला. सुखाच्या ग्लानीत तो कधी झोपी गेला ते श्रीधरलाही कळले नाही. शाल्मली मात्र त्याच्या ओठावर ओठ टेकवत म्हणत होती. तरूण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास का रे!

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “फेसबुक मित्र बनाताना

  1. Virabet Giriş

    Virabet Giriş için sitemize göz atabilir resmi Virabet sitesine gidebilirsiniz.

  2. bigbrog Resmi

    Bigbrog Giriş için sitemize göz atabilir resmi Bigbrog sitesine gidebilirsiniz.

  3. snapchat video movie download

    Great article! I really appreciate the clear and detailed insights you’ve provided on this topic. It’s always refreshing to read content that breaks things down so well, making it easy for readers to grasp even complex ideas. I also found the practical tips you’ve shared to be very helpful. Looking forward to more informative posts like this! Keep up the good work!

Comments are closed.