बहुरूपी

बहुरूपी

प्रत्येक माणसात लपला आहे एक खट्याळ, नटखट, लबाड, विदूषक
फक्त एक जरूर लक्षात ठेवा, बनू नये आपण मनाने कोणासाठी तक्षक

बाळ रडते तेव्ह काही सूचत नाही, बाबा करतात विदूषकी चाळे
अन आईही, “अल्लेले, माझ बाळ ते, ललयाच नाही”, म्हणते बळेबळे

बाळ नको तो हट्ट करु लागलं की बाबा बनतात गोधडीतला बागुलबुवा
आपला नवरा खरच एक कलाकार आहे याचा बायकोला वाटतो हेवा

कधीकधी आई, बाप किंवा ताई, दादा, बनतो बाळाचा अवखळ घोडा
बाळ हसावं म्हणून ढोपर घासत ती, तो, चालतो, त्याला जपत थोडाथोडा

बाळ मोठं होतं, बसतं पाठीवर, म्हणतं बाबा म्हणा की, “कांदे घ्या कांदे!”
अन बाप बाळाला घेत घरात धावतो “कांदे घ्या कांदे”, आईला गंमत वाटे

बाळ शाळेत जाऊ लागतं अन उगाच हट्ट करतं, तेव्हा आई आर्जव करते
“काय हवं तुला मोटरगाडी का?” थांब हं, म्हणत Dad ला खोटा फोन लावते

कधी ते भावंडांच्या लुटुपुटूच्या मारामारीत भोंकाड पसरून रडू लागते
तेव्हा मोठ्याच्या पाठीत धपाटा घालत ती म्हणते “थांब हं, याच घर उन्हात बांधते”

आता “तो” बनतो व्रात्य, करू लागतो मोबाईल आणि रिबॉकची मागणी
त्याला सांगूनही समजत नाही, ती नवऱ्याकडे आग्रह धरून खाते बोलणी

त्याची एक एक मागणी पुरवताना नवऱ्याचे बोल आणि तिच्या डोळ्यात पाणी
किती करावे तिने विदूषकी चाळे? खतरुड नवऱ्यालाही म्हणते ती गुणी

सासू, नणंद, दीर, भावजय यांचे शब्द झेलत पदराआड ती गाळते आसू
अपमान झेलत जगतांना माहेरी कळू नये म्हणून चेहऱ्यावर खोटं हसू

त्याला तरी कुठे असतो मान, चुकलं तर साहेब करतो चारचौघात अपमान
तरीही “ऑल वेल” च नाटक करावंच लागतं, तरच घरी मिळतो मान

त्याचे कपडे फाटले, चपला झिजल्या तरी ताठ कण्यानं जगाव लागतं
मुलाचे हट्ट, मुलीच लग्न, पै पाहूणे यासाठी ऋण काढावं लागत

सासरच्या माणसांसाठी टापटीप, सुग्रास अन्न, कुबेराचा थाट
दाखवावा लागतो
दुःखाने ह्दयाला पिळ पडला तरी, चेहरा संयमाने हसरा ठेवावाच लागतो

सगळ्यांना जीवनात कधी ना कधी मुखवटा घेऊन निमूट जगावं लागतं
कधी घरासाठी, कधी समाजासाठी तर कधी स्वतःसाठी नाटक करावं लागतं

मित्रांनो कोणाची टिंगलटवाळी तुम्हाला करून मिळेल क्षणिक समाधान
करा मदत, वा दुःख हलकं करण्यासाठी हसवा, कुचाळक्या किंवा करू नका अपमान

तुमच्यामाझ्यात नव्हे, प्रत्येकात आहे एक छुपा, निद्रिस्त वा जागृत बहुरूपी
कोणाचे मन अकारण दुखवू नये याची हवे भान, असेच हवे वागणे आणि कृती





Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar